' ऑनलाइन लेक्चर्स-मिटिंग मधील मुद्दे लिहिण्याचा गोंधळ टाळण्याचे “९ उपाय” नक्की वाचा – InMarathi

ऑनलाइन लेक्चर्स-मिटिंग मधील मुद्दे लिहिण्याचा गोंधळ टाळण्याचे “९ उपाय” नक्की वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोणाला वाटले होते की वर्क फ्रॉम होम बरोबरच मोबाईल वर शाळा देखील सुरू होतील? पण टेक्नॉलॉजी फार प्रगत झाली आहे. संवाद साधणे, संपर्कात राहणे, व्यवसायाला कॉम्प्युटरच्या मदतीने बाहेरच्या देशांत पोहचवणे, डॉक्टरांचा सल्ला घेणे ही सगळी कामं आपण घर बसल्या करू शकतो.

याच टेक्नॉलॉजी मुळे या महाभयंकर महामारीच्या काळात, आपल्याला घरून काम करणे शक्य झाले आहे. बाहेर जाणे शक्य नसल्याने आपण आपले ऑफिस घरीच आणले.

 

work from home inmarathi
MalayalaManorama.com

 

झूम अॅपच्या मदतीने, शेकडो लोकांची ऑनलाईन मीटिंग घेता येऊ शकते हे आपल्याला समजले, आपल्या घरातल्या लहान मुलांच्या शाळा देखील या अॅप मार्फतच सुरू झाल्या.

आता कितीही म्हटलं तरी, शाळेत जाऊन शिक्षण घेण्याचा अनुभव हा ऑनलाईन शाळेत येत नाही.

प्रत्येक विद्यार्थी आपल्या घरी आपल्या सोयीनुसार, मोबाईल समोर बसतो व मोबाईलच्या स्क्रीनच्या पलिकडे असतात ते शिक्षक. या झूम मीटिंगच्या शाळेत सगळ्यांचे कॅमेरे बंद असतात, त्यामुळे कोणता विद्यार्थी काय करतोय हे शिक्षकांना समजणे अवघडच.

या बरोबरच मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमधल्या मिटिंग्स आणि कॉन्फरन्स कॉल्स सुद्धा ऑनलाईनच होतात!

मोठ्या कंपन्यांमध्ये, इंटरव्ह्यू मध्ये, मीटींग्ज मध्ये महत्त्वाचे मुद्दे लिहून घेण्याची अर्थात नोट्स काढण्याची गरज असते. समोरचा ज्या वेगाने बोलतो त्याच वेगाने लिहिणारा लिहू शकत नाही.

 

online conf call inmarathi
businesstoday.in

 

त्या मुळे लिहिताना गोंधळ होतो, चुका होतात. यावर उपाय महणून ट्रान्सक्राइब करण्यासाठी, अर्थात व्हॉईस मेसेज ला टाईप केलेल्या अक्षरांत बदलण्याचे बरेच ट्रान्सक्रीप्शन अॅप्स उपलब्ध आहेत ज्याबद्दल आपण आज जाणून घेऊ.

१) एमएस ऑफिस (MS Office) :

 

m s office inmarathi
venturebeat.com

 

एमएस ऑफिस अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअर आहे, जे आपण आपल्या रोजच्या कामांसाठी वापरतो पण आता याच सॉफ्टवेअर द्वारे आपण लाईव्ह कन्वर्सेशन किंवा पूर्वी पासून रेकॉर्ड केलेली ऑडियो क्लिप टायीप अक्षरात परिवर्तित करू शकता. या साठी प्रक्रिया अशी आहे –

मेन्यू – डिक्टेशन – ट्रान्सक्राइब हे ऑप्शन सिलेक्ट करा. ट्रान्सक्राइब हे ऑप्शन सिलेक्ट केल्यावर आणखीन २ ऑपेशन्स स्क्रीन वर येतील. ते म्हणजे “अपलोड ऑडियो फाईल किंवा रेकॉर्ड ऑडियो”. यांपैकी आपल्याला जे हवे असेल त्या ऑप्शन ला सिलेक्ट करा.

जर तुम्ही कोणत्या मीटिंग मध्ये आहात तर दुसरा पर्याय निवडून त्यावर क्लिक करू शकता. या मुळे लाईव्ह मीटिंग किंवा क्लास मध्ये बोलले जाणारे सगळे काही हे सॉफ्टवेअर रेकॉर्ड करून उतरवून घेईल.

नंतर आपण ते पुन्हा वाचून, त्यात थोड्याफार ज्या चुका असतील त्या दुरुस्त करू शकता.

 

२) गूगल डॉक्स (Google Docs) –

 

google docs inmarathi
sekerenews.com

 

गुगल डॉक्स हे अॅप किंवा docs.google.com या वेबसाईटचा वापर करून सुद्धा ऑडियो ला लिखित डॉक्युमेंट मध्ये कन्वर्ट करू शकता. या साठी खालील प्रोसिजर फॉलो करा –

नवीन डॉक्युमेंट सिलेक्ट करून – टूल्स – व्हॉईस टायपिंग हे ऑप्शन सिलेक्ट करा. यानंतर स्क्रीन वर माईकचं बटन येईल, त्यात तुम्हाला हवी असलेली भाषा सिलेक्ट करा.

भाषा सिलेक्ट केल्यानंतर त्या माईकचा आयकॉन लाल रंगाचा होईल. अर्थात रेकॉर्डिंग सुरू होईल.

 

३) गूगल कीबोर्ड (Google keyboard) –

 

google keyboard inmarathi
voicebot.ai

 

प्रत्येक अँड्रॉइड स्मार्ट फोन मध्ये गूगल कीबोर्ड असतोच. तुम्ही जर दुसरा कोणता कीबोर्ड वापरत असाल तर तूर्तास तो गुगल कीबोर्ड शी बदलून ट्रान्सक्रीप्शन करू शकता. कसे ते खालील प्रोसीजर वाचून आपल्याला कळेल.

गुगल कीबोर्ड ओपन करा – भाषा सिलेक्ट करा – टाईप करायला घ्या – उजव्या हाताला माईक चे चिन्ह दिसेल – त्यावर क्लिक करून, समोर येणारे इंस्ट्रक्शन “speak now” असे आले की बोला किंवा रेकॉर्डिंग प्ले करा.

जसे जसे बोलणे ऐकू येईल, तसे तसे टायपिंग सुरू होईल. स्पष्ट उच्चार नसले तर थोड्या चुका होण्याची शक्यता असते पण तुम्ही पुन्हा वाचून सगळ्या चुका दुरुस्त करून घेऊ शकता.

 

४) ऑटर (Otter) –

 

otter inmarathi

 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर आधारित हे अॅप ट्रान्सक्रीप्शन साठी सगळ्यात उपयुक्त असे अॅप आहे. याची अॅक्युरसी लेव्हल सुद्धा बाकी ट्रान्सक्रीप्शन पर्यायांपेक्षा अधिक आहे.

हे अॅप वापरण्यासाठी सगळ्यात सोपे आहे. या अॅप द्वारे ट्रान्सक्रीप्शन करायचे असेल तर आधी थोड्याशा किमतीत आपल्याला यावर एक अकाउंट ओपन करावे लागेल.

त्यानंतर, बस ज्यावेळी तुम्हाला ट्रान्सक्रीप्शन करण्याची गरज आहे त्या वेळी या अॅप मध्ये असलेल्या रेकॉर्डिंग च्या बटणवर क्लिक करून घ्या रेकॉर्डिंग आणि टायपिंग आपोआप सुरू होईल.

हे अॅप आता झूम सोबत पण कनेक्ट करता येऊ शकते. त्यामुळे ती ही चिंता नाही.

 

५) ड्रॅगन एनीव्हेअर –

 

dragon anywhere inmarathi
scottbakersbook.com

 

हे अॅप ट्रान्सक्रीप्शन करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे, बरेच पॉप्युलर अॅप असून ते वापरणेही तितकेच सोपे आहे. ९९% अक्युरसी असलेले हे अॅप वापरण्यासाठी थोडे पैसे खर्च करणे आवश्यक आहे पण काम सोपे होणार असेल तर, ही नॉमीनल फी नक्कीच वाया नाही जाणार.

हे अॅप अँड्रॉइड आणि iOS डीवाईसेस वर वापरता येते. याच बरोबर आपल्या कॉम्पुटर व लॅपटॉप शी सिंक्रोनाईझ करून त्यावरही वापरता येते.

या अॅपचा अजून एक फायदा असा की वेगळे वर्ड डॉक्युमेंट बनवण्याची गरज नसते. या अॅप मध्ये सेव्ह केलेल्या फाईल्स आपण डायरेक्ट ई – मेल, ड्रॉपबॉक्स, एव्हरनोट, ईत्यादि द्वारे डायरेक्ट शेअर करू शकता.

ट्रान्सक्रीप्शन करण्यासाठी ऑडियो चे प्ले बटन ऑन करा आणि ऑडियो आपोआप रेकॉर्ड होऊन ट्रान्सक्राईब होत राहील.

 

६) गुगल असिस्टंट –

 

google assistant inmarathi
techcrunch.com

 

आपल्या सगळ्याच अँड्रॉइड फोन वर गुगल असिस्टंट उपलब्ध असते. त्याला व्हॉईस कमांड देऊन आपण, गाणी प्ले करणे, व्हिडिओ प्ले करणे, मेसेज पाठवणे, गुगल मॅप वापरणे इत्यादी कामाव्यतिरिक्त ट्रान्सक्रीप्शन साठी सुद्धा हे सॉफ्टवेअर तितकेच उपयुक्त ठरते.

गुगल असिस्टंट वर एक त्रुटी आहे की फक्त मेसेज ट्रान्सक्राईब करता येते. त्यामुळे फार लांब किंवा फार काळ चालणाऱ्या मीटिंग किंवा क्लास साठी हे फार उपयोगाचे ठरणार नाही.

जर याची क्षमता वाढवायची असेल तर IFTTT शी पेयर करणे अनिवार्य आहे.

 

७) स्पीच टू टेक्स्ट –

 

text to speech inmarathi
techprevue.com

 

हे अॅप फक्त अॅपल उपकरणांवर वापरता येऊ शकते. पण ९०% अॅक्युरासी असलेले हे ऍप जरा महाग पडते. पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी वर आधारित हे अॅप पत्रकार, मोठ्या कंपनीतील सेक्रेटरी ईत्यादि व्यक्ती वापरतात.

ह्या अॅप वर १५ मिनिटांची फ्री ट्रायल उपलब्ध असते व पुढे $5 प्रती तास व $30 प्रती १० तास असे चार्जेस आकारण्यात येतात.

 

८) स्पीचनोट्स –

 

speechnotes inmarathi
my.barton.ac.uk

 

लिहिण्याच्या स्पीड पेक्षा बोलण्याचा व विचारांचा स्पीड जास्त असतो त्यामुळे हे अॅप ट्रान्सक्रीप्शन साठी सगळ्यात जास्त उपयुक्त आहे.

हे अॅप एकदा रेकॉर्डिंग सुरू केले की तुम्ही विचार करण्यासाठी थांबलात किंवा मीटिंग मध्ये काही मिनिटांचा खंड पडल्यास रेकॉर्डिंग करणे थांबवत नाही.

मोठ्या मीटिंग, क्लास, याचे मिनिट्स किंवा नोट्स घेण्या करता बेस्ट आहे.

 

९) व्हॉईस नोटबुक –

 

voice notebook inmaratho
game4n.com

 

हे अॅप फ्री आहे व इतर अॅप्स प्रमाणेच यातून तुम्ही फाईल्स ट्रान्स्फर, एक्सपोर्ट इम्पोर्ट करू शकता. हे अॅप गुगल ड्राईव्ह वर उपलब्ध आहे. तसेच अँड्रॉइड फोन वर वापरता येते.

याची अॅक्युरसी लेव्हल ८०-९० % असून यात विविध भाषांचे पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत.

या सगळ्या अॅप्स मुळे आता ऑनलाइन मिटिंग्स मध्ये मांडले जाणारे मुद्दे लिहायला नक्कीच मदत होईल. या यातिरिक्त तुमच्या माहितीतील अजून कोणती अशी सॉफ्टवेअर किंवा अॅप्स असतील तर आम्हाला नक्की कळवा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?