' वारंवार शरिराचं तापमान तपासताय? पण त्या तापमानाबद्दलच्या या खास बाबी तुम्हाला नक्कीच ठाऊक नसतील! – InMarathi

वारंवार शरिराचं तापमान तपासताय? पण त्या तापमानाबद्दलच्या या खास बाबी तुम्हाला नक्कीच ठाऊक नसतील!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आज – काल कोरोनाचं सावट आपल्या आयुष्यावर पडलेलं असल्यामुळे आपण आपल्या तब्येतीविषयी अधिकच सतर्क झालो आहोत. थोडीशी कणकण वाटली किंवा थकवा जाणवला तरी आपण लगेच थर्मामीटर घेऊन शरीराचे तापमान तपासतोय.

अगदी कुठल्याही ऑफिसात, सोसायटीत, कामावर जाताना, प्रवास करताना सगळीकडेच शरीराचं तापमान मोजल जात आहे. सध्या याचं कारण केवळ कोरोना असलं तरी आपल्या शरीराचे तापमान वेळोवेळी बदलत राहतं.

 

corona temprature inmarathi
thehindu.com

 

याच तापमानाच्या गोष्टी आज जाणून घेऊया. ताप म्हणजे काय तर आपल्या शरीरात तापमानाची झालेली तात्पुरती वाढ.

जॉन हॉपकिन्स मेडिसिन आणि मायो क्लिनिक यांनी मानवी शारीरिक तापमानाबद्दल जो अभ्यास केला आहे त्यानुसार तापमानाचा आपल्यावरती काय परिणाम होतो हे पाहू.

शारीरिक तापमानाची वाढ आपली तब्येत बिघडल्याचे द्योतक

खरं म्हणजे आपल्या शरीराचं तापमान आपल्याला आपल्या तब्येतीची माहिती देत असतं. सर्वसाधारणपणे आपल्या शरीराचे तापमान जर ९७.५°F ते ९८.६°F असेल तर तापमान नॉर्मल आहे असं समजलं जातं.

त्यात एखाद-दुसऱ्या अंशाने फरक होऊ शकतो. परंतु जर तापमान १००°F किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर मात्र आपल्या शरीराचं गणित बिघडलेलं असतं, त्याची ही सूचना असते.

बाहेरच्या परिस्थितीचा परिणाम

आपल्या शरीराचे तापमान हे मुख्यतः बाहेरच्या परिस्थितीवरही अवलंबून असतं. सकाळी जर तापमान पाहिलं तर ते कमी असतं आणि दुपारी ऊन वाढल्यावर ते जास्त असतं.

तुम्ही खूपच व्यायाम केला आणि ताप मोजला तर तो वाढलेला दिसतो.

ताप येण्याची कारणे आणि लक्षणे

सर्व साधारण ताप आल्यानंतर माणूस आजारी पडतो त्या मागची कारणं वेगवेगळी असू शकतात जेव्हा आपल्याला ताप येतो तेव्हा साधारणपणे पुढील गोष्टींची लक्षणे आपल्याला दिसून येतात.

थंडी वाजून ताप येतो आणि थरथर होते. घाम येणे, डोकेदुखी, स्नायूमध्ये वेदना होणे, भूक न लागणे, चिडचिड होणे, निर्जलीकरण, सर्वसाधारण अशक्तपणा जाणवणे.

 

temprature inmarathi
visualstock.com

 

जर तुमच्या शरीराचे तापमान १०३°F पेक्षा जास्त गेलं तर लगेच डॉक्टरांकडे गेलं पाहिजे असं मायो क्लिनिक आणि जोन्स हॉपकिन्स यांचा सल्ला आहे.

तसेच तापा बरोबरच प्रचंड डोकेदुखी असेल, त्वचा लाल होणे, त्वचेवर पुरळ येणे, प्रकाश नकोसा वाटणे, गळ्याजवळ दुखणे, पुढे वाकताना त्रास होणे, विचित्र भ्रम होणे, मळमळ होऊन उलटी होणे, छातीत दुखणे, श्वास घ्यायला त्रास होणे, ओटीपोटात वेदना होणे, लघुशंकेला त्रास होणे.

इत्यादी त्रास होत असतील तर लगेच डॉक्टरांना दाखवलं पाहिजे.

पॅनिक होणे टाळले पाहिजे

ताप येतो तेंव्हा मग लोक लगेच घाबरून आता कोणत औषध घेऊ? हे घेऊ की ते घेऊ! असं करत आयबुप्रोफेन घे किंवा अॅसेटोमिनोफन घे असं करतात, आणि लगेच ताप उतरवतात. पण जर शंभरपेक्षा जास्त ताप नसेल तर लगेच औषध घेण्याची खरं तर इतकी गरज नसते.

कारण ताप येणे म्हणजे आपल्या शरीरामध्ये काहीतरी अनैसर्गिक सुरू आहे याचं लक्षण आहे. आपल्या शरीराला त्याची वर्दी लगेच लागते आणि आपलं शरीर त्या इन्फेक्शनशी लढाई चालू करते.

त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला ताप येत असतो. यामुळेच आपल्या शरीरात स्वतः हूनच अँटीबॉडीज म्हणजेच प्रतिजैविक तयार होत असतात. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते.

हा ताप साधारण १००°F पेक्षा जास्त जात नाही. असा ताप हा साधारण दोन-तीन दिवसात जातोही.

व्हायरल इन्फेक्शन असेल तर ताप आपोआप जाऊ शकतो. पण जर बॅक्टेरिअल इन्फेक्शन असेल आणि न्यूमोनिया झाला असेल तर मात्र डॉक्टरांनी सांगितलेली औषधं घेतली पाहिजेत.

या प्रकारच्या तापात अँटिबायोटिक्स अधिक चांगल्या प्रकारे काम करतात. पण ती डॉक्टरांनी प्रिस्क्राइब केलेली असली पाहिजेत.

नवजात अर्भके आणि लहान मुलं यांचे शारीरिक तापमान

 

indian kid temprature inmarathi
babycenter.in

 

नवजात बालकं आणि लहान मुलं यांचं तापमान हे मोठी मुले आणि प्रौढ व्यक्ती यांच्या पेक्षा नेहमीच जास्त असतं. नवजात बालकांचे तापमान तर ९९.५°F इतकं असतं.

मायो क्लिनिकच्या अभ्यासानुसार जर जन्मलेलं अर्भक आणि तीन महिन्यांपेक्षा मोठी नवजात बालकं यांच्या शरीराचे तापमान जर वाढत असेल तर त्यांना कोणतंतरी इन्फेक्शन झाले असण्याची शक्यता अधिक आहे.

जर तीन ते सहा महिन्यातील बाळांना १०२°F पेक्षा जास्त ताप असेल तर तो त्यांच्यासाठी धोकादायक आहे.

सहा ते चोवीस महिन्याच्या बाळांच्या गुदाशयातील तापमान १०२°F पेक्षा जास्त असेल तर डॉक्टरांना दाखवले पाहिजे.

जर बाळांना तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस ताप राहिला तर ही धोक्याची घंटा असू शकते.

सहा महिने ते पाच वर्षांच्या बाळांना जर १०२°F पेक्षा अधिक ताप राहिला तर त्यांना फेफरे येऊ शकतात. अशावेळेस लगेच डॉक्टरांकडे गेले पाहिजे.

Covid-19 अर्थात कोरोना चा ताप

आता covid-19 च्या आजारात देखील ताप येणं हे महत्त्वाचे लक्षण मानले जात आहे. यामध्ये प्रौढ व्यक्तीला १००.४ डिग्री किंवा त्यापेक्षा अधिक ताप आणि लहान मुलांना ९९.४ डिग्री किंवा त्यापेक्षा अधिक ताप असतो.

याशिवाय covid-19 ची इतर लक्षणेही आढळत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. सध्या बरेच रुग्ण हे घरातच होम आयसोलेशन द्वारे डॉक्टरांच्या सल्ल्याने बरे होत आहेत.

 

covid inmarathi
m.economictimes.com

 

वाढत्या वयाचा आणि तापाचा संबंध

माणसाचं वय जसं वाढत जातं तसं त्याच्या शरीराचे तापमानही थोडसं कमी व्हायला चालू होते. आपण पाहिलंच असेल की आपल्या घरातील आजी आजोबा हे उन्हाळ्यात देखील स्वेटर घालून झोपतात.

६५ ते ७४ वयोगटातील व्यक्तींचे शारीरिक तापमान हे नॉर्मल टेंपरेचर पेक्षा थोडेसे कमी म्हणजे ९७.५°F ते ९७°F असते. तर ७५ ते ८५ वयोगटातील वृद्ध व्यक्तींचे तापमान अजून कमी म्हणजे ९६°F पर्यंत असते तर ८५ पुढच्या वयोगटातील वृद्ध व्यक्तींचे तापमान हे खूपच कमी असते.

काही जणांच्या बाबतीत ९३.५°F पर्यंत खाली असू शकते. हे आपल्याला कमी वाटेल पण त्यांच्यासाठी हे त्यांचे नॉर्मल टेंपरेचर असते.

पुरुष आणि स्त्रिया यांच्यामधील शारीरिक तापमानाचा फरक

पुरुषांपेक्षा स्त्रियांचे शारीरिक तापमान अधिक असते. मात्र स्त्रियांचा तळहात पुरुषांच्या तळहातापेक्षा थंड असतो.

डोक्यावर टोपी घातल्याने शारीरिक तापमानात खरंच फरक पडतो का?

लहानपणी आपली आई आपल्याला थंडीच्या दिवसात डोक्यावर टोपी घालायला सांगायची. याचं कारण म्हणजे डोकं गरम राहिलं तर शरीर थंड पडणार नाही किंवा थंडी वाजणार नाही. आणि ताप येणार नाही.

परंतु आता केलेल्या अभ्यासानुसार टोपीचा आणि थंडीचा काहीही संबंध नाही. आपल्या डोक्याचे तापमान देखील आपल्या शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच राहतं त्यात विशेष असं काही नसतं.

आजकाल परदेशात नवजात बालकांना देखील थंडीत टोपी घालण्यास मनाई केली जात आहे.

खोटं बोलण्याने शारीरिक तापमानात फरक पडतो

जेव्हा तुम्ही खोटं बोलता त्यावेळेस तुमच्या शरीराच्या तापमानात बदल होतो. अलीकडेच केलेल्या एका अभ्यासानुसार खोट बोलत असताना माणसाच्या नाक आणि डोळ्याजवळचे, कपाळावरील तापमान वाढलेलं असतं.

थर्मल इमेजिंग वापरून शास्त्रज्ञांनी हा शोध लावला आहे.

 

lie inmarathi
everydayhealth.com

 

तिखट लाल मिरचीचे सेवन तापमान वाढ होते

जर तुम्ही लाल तिखट मिरची किंवा लाल तिखट खाता तेंव्हा तुमच्या शरीराचे तापमान वाढतं. परंतु त्वचेचे तापमान मात्र कमी होतं. जे लोक अजिबात तिखट खात नाहीत त्यांनी तिखट खाण्यास सुरुवात करावी.

कारण त्यामुळे आपले वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. खूप तिखट खाल्ल्याने भूक मंदावली जाते. पण म्हणून अती तिखट खाऊ नये.

हार्ट अटॅक आल्यावर शरीराचे तापमान कमी केले जाते

जॉन हॉपकिन्स मेडिसिनच्या म्हणण्यानुसार हार्ट अटॅक आल्यानंतर व्यक्तीच्या शरीराचे तापमान वाढत जाते. म्हणूनच त्या वेळेस डॉक्टर त्या रुग्णाचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करतात.

याचं कारण हेच आहे की असं केल्याने ताप मेंदूपर्यंत पोहोचत नाही आणि शरीराची हानी होण्यापासून रुग्णाला वाचवता येतं. रुग्ण देखील लवकर बरा होण्याचे चान्सेस वाढतात.

मृत शरीर व्यक्तीचे मृत्यू वेळ सांगते

 

dead body inmarathi
deccanchronicle.com

 

माणसाचा मृत्यू होतो त्यावेळेस त्याचे शरीर थंड पडायला चालू होते. या प्रक्रियेला अल्गोस मोर्टीस असे म्हणतात. फॉरेन्सिक इन्वेस्टीगेशन करताना ही पद्धत वापरली जाते.

यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू नक्की किती वाजता झाला आहे याचा अंदाज बांधता येतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?