हरितालिका पोथी टिश्यू पेपर म्हणून वापरणाऱ्यांना ना धर्म कळालाय, ना स्त्री-मुक्ती!!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
हिंदू संस्कृतीत सणांचं अनन्य साधारण महत्त्व आहे. पूर्वी महिलांनी एकत्र यावं, त्यांना “चूल आणि मूल” यातून थोडासा वेळ मिळावा, मनोरंजन व्हावं यासाठी काही सण हे महिलांसाठी राखून ठेवलेले असायचे.
असाच एक सण म्हणजे भाद्रपद महिन्यातील “हरितालिका पूजन”. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी किंवा चांगला पती मिळावा म्हणून या दिवशी हरितालिकाचे पूजन करून सबंध दिवस सुवासिनी व कुमारिका उपवास धरतात.
या सणाचे महत्त्व अधिक आहे कारण यामागे एक पौराणिक कथा आहे. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी पार्वतीने कठोर व्रत केले होते, कित्येक दिवस अन्नाचे सेवन न करता केवळ शंकराच्या तपस्येत पार्वती लीन असे.
पार्वतीची ही कठोर तपश्चर्या पाहून, भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले.
यामुळेच असे मानले जाते, की जी मुलगी हे व्रत करते, तिला इच्छित नवरा मिळतो आणि त्याचे वैवाहिक जीवन देखील सुखी होते.
सध्या सोशल मीडियावर याच सणाची कथा सांगणारे पुस्तक “महिला – विरोधी” आहे हे सांगणारा, एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
“हे पुस्तक अगदीच कामाचं नाहीये आणि त्याचा मी आता टॉयलेट पेपर म्हणून वापर करावा का?” असं ही बाई निरागसतेने विचारतेय.
कोण आहे ही महिला??
सुश्मिता सिन्हा असे या महिलेचे नाव असून, ती दिल्लीत पत्रकारिता करते म्हणे. “Bolta Hindustan” साठी ती काम करते. तिच्या ट्विटर प्रोफाइलमध्ये लिहिल्यानुसार, ती free thinker आहे.
युट्युब चॅनेलवर तिने लिहिल्यानुसार, “पेशाने पत्रकार असून, सेक्युलर आणि फेमिनिस्ट देखील आहे.” (?)
नेमकं व्हिडीओमध्ये म्हट्लंय काय?
“उत्तरप्रदेशात “तीज” हा सण खूप प्रसिद्ध आहे. ज्यामध्ये महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास आणि प्रार्थना करतात. यामध्ये महिला पाणी देखील पिऊ शकत नाहीत.
मी जर म्हणाले, की हा सण महिला- विरोधी आहे तर मला अनेकजण शिव्या देतील. म्हणून मी स्वतःहून काहीही न सांगता तुम्हाला एक गोष्ट वाचून दाखवणार आहे, जी वाचल्याशिवाय हरतालिकेचे व्रत संपन्न होत नाही.”
असं म्हणून “हरितालिका तीज व्रत कथा” या पुस्तकातील एक भाग तिने वाचून दाखवला आहे.
“या पुस्तकातील अनेक गोष्टी या महिला विरोधी आहेत. आपल्या संस्कृतीत कधीच पुरुषांविरुद्ध अशा गोष्टी बोलल्या जात नाहीत. “असंही ती म्हणाली.
या रद्दी पुस्तकासाठी मी १५ रुपये खर्च केले, आणि यातल्या गोष्टी वाचून हे पुस्तक माझ्या काहीही कामाचं नाहीये हे मला कळलंय. हे पुस्तक आता मी टिशू पेपर म्हणून वापरू की टॉयलेट पेपर म्हणून? तुम्हीच सांगा.”
तिने हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर लगेचच त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी हिंदू लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल तिला अटक करावी अशी मागणी लोकांनी केली आहे.
“हिंदू धर्मातील रीतींचा अपमान केल्याबद्दल तिला शिक्षा झालीच पाहिजे” असा काहीसा सूर सोशल मीडियावर उमटताना दिसतोय.
Leftists find pleasure in abusing gentle Hindus and Hindu believes. Here @Sushmitasinhaa, who works for @BoltaHindustan (owned by Mohd. Rahmani) uses Hindu texts as toilet paper! Give us any relevant details in my DM for FIR. We already have her linkedin, insta, FB. pic.twitter.com/K6wvrbHzAZ
— Hindu IT Cell (@HinduITCell) August 25, 2020
खरंतर हे असं घडण्याची ही काही पहिली वेळ नाही. या आधी सुद्धा स्वतःला “सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर” म्हणवून घेणाऱ्या सुश्मितासारख्या अनेक लोकांनी अशी अनेक वादग्रस्त विधानं केली होती.
संविधानाने दिलेल्या “फ्रिडम ऑफ स्पीच”चा वापर करत मनाला वाटेल ते विनोद करायचे, भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती, थोर नेते, हिंदू-मुस्लिम वाद, राजकारण हे सगळे विषय मध्ये गोवायचे आणि जातीपातीचं राजकारण, महिला विरोधी प्रथा असं म्हणत यांचं विषारी बीज लोकांच्या मनात पेरायचं हेच काय ते ह्यांचं काम!!
राममंदिर, मोदी या सगळ्यांना टार्गेट बनवून विनोद करणारा कुणाल कामरा असो किंवा पद्मावतवर शो करणारा वरून ग्रोव्हर असो. वाद छेडल्याशिवाय यांचा एकही शो पूर्ण होतंच नाही.
केतकी चितळे, अग्रिमा जोशुआ आणि वर घेतलेली कितीतरी नावं ही याच ओळीतली आहेत.
स्वतःला “सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर” म्हणवून घेताना त्यांना नेमकं कोणाला आणि कशासाठी “इन्फ्लुएन्स” करायचं असतं हा एक साधा सोप्पा प्रश्न नेहमी पडतो.
यांचा हेतू हा लोकांपर्यंत उत्तम गोष्टी पोहोचवण हा असतो, की केवळ प्रसिद्धीचं वलय आजूबाजूला हवं म्हणून बहुसंख्य लोकांच्या भावना छेडणारी विधानं करून लोकांच्या चर्चेत राहायचं हा असतो? हेच नेमकं काळात नाही.
पुढे पुढे या सगळ्या वक्तव्यांमुळे त्यांचा स्वतःचा असा एक “क्लब” तयार होतो. यातून सामाजिक तेढ वाढत असली, तरीही यांचा हेतू मात्र साध्य होतो, कारण द्वेषाने का होईना, पण लोक “रिऍक्ट” करायचं थांबत नाहीत.
स्वतःला अमुक एका चळवळीचा भाग समजत समाजात काड्या टाकण्याचं काम ते करतात. समाज बदलण्याची हीच वेळ आहे वगैरे सांगत स्वत:ची प्रसिद्धी वाढवण्याचा हा त्यांचा स्ट्रॅटेजीक प्लॅन असतो.
शेवटी अशा गोष्टी पोस्ट केल्यांनतर जसा लोक विरोध करतात, तसंच काही लोक हे पाठिंबा देखील देतात. या पाठिंबा देणाऱ्या लोकांच्या जीवावर राजकारणात एक नवा चेहरा येतो आणि पुन्हा “डावं- उजवं” राजकारण सुरुच राहतं.
हा एक न संपणारा पाठशिवणीचा खेळच आहे. कळत- नकळतपणे अशा वादग्रस्त पोस्ट्स शेअर करून, त्यांच्यावर फेसबुक- इंस्टाग्रामवर व्यक्त होऊन आपण त्यांची पब्लिसिटी वाढवण्यास मदतच करत असतो आणि त्यांनी रचलेल्या पिंजऱ्यात अडकत असतो.
फक्त व्यक्त न होता, कायदेशीर मार्गाने आपण काही करू शकतो का? याचा विचार जनमानसात झाला पाहिजे.
आपल्यामुळे आपल्या पतीला कधीही त्रास होऊ नये असा विचार करणाऱ्या, कुटुंबासाठी लहानमोठ्या गोष्टींचाही विचार करून वागणाऱ्या, निस्सीम त्याग करणाऱ्या बायकांसाठी “हरीतालिकेचे पूजन” ही एक श्रद्धा आहे.
हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात पूजन शक्य नसले, तरीही मनातल्या मानत प्रत्येक स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची आणि सुखी संसाराची कामना करत असते आणि त्यापुढे एका दिवसाचा उपवास तिला फार मोठी गोष्ट वाटत नाही.
त्याही पलीकडे जाऊन उपवास करणं , न करणं हा श्रद्धेचा भाग असला तरीही यामागची मूळ भावना कधीच बदलत नाही.
पुस्तकातला एखादा भाग वाचून हा सण “महिला-विरोधी” आहे असं म्हणणाऱ्या, स्वतःला आधुनिक “फेमिनिस्ट” म्हणवून घेणाऱ्यांना हा सण, त्यामागची श्रद्धा, भावना ही खरंच समजलीये का? असाच प्रश्न राहून राहून मनात येतो.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.