“पिझ्झा हट” ने केलाय चक्क अंतराळात एक रेकॉर्ड! वाचा जबरदस्त कहाणी!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
डॉमिनोजची अर्ध्या तासात पिझ्झा डिलीवर करायची जाहिरात आपल्याला माहीत असेलच. अर्ध्या तासात पिझ्झा नाही आला तर तो आपल्याला फुकट मिळत असे. असं फार क्वचित झालं असाव!
पण तरीही पिझ्झा विकायची एक आगळी वेगळी पद्धत आजमावणारे पहिले पिझ्झा आउटलेट!
फास्ट फूड आणि त्यातही इटालियन फूडची काही वेगळीच मजा आहे. पास्ता, पिझ्झा, गारलीक ब्रेड वगैरेची सध्या सगळीकडेच क्रेज दिसते आहे!
झोमॅटो, स्वीगी आणि इतर फूड डिलिव्हरी, फूड चेन अस्तित्वात यायच्या आधीचे दिवस आठवा.
भूक लागली आणि घरात काही पर्याय शिल्लक नसला की सर्रास पिझ्झा मागवले जायचे. चीजची येणारी तार आणि मसाल्याचे कॉम्बिनेशन आणि हवं असलेला प्रकार. तसेच अर्ध्या तासात डिलिव्हरीमुळे फास्ट फूड प्रकारात पिझ्झाची डिमांड खूप होती.
डॉमिनोज यायच्या आधी तरी पिझ्झा मध्ये पिझ्झा हटचं नाव तसं मोठं.आणि आजही इटालियन पिझ्झा जर हवा असेल तर पिझ्झा हटलाच पब्लिक पसंती देते.
तर, याच पिझ्झा हट बाबत आज आपण एक भन्नाट गोष्ट जाणून घेणार आहोत.
पिझ्झा हटचं आऊटलेट जवळपास कुठे मिळणार नाही असं होणार नाही. आणि जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जरी असलो तरी घरपोच डिलिव्हरी मिळणार नाही याची शक्यता पण शून्य.
याच पिझ्झा हटने पिझ्झा डिलिव्हरीच्या बाबतीत एक वेगळाच विक्रम केला आहे. पिझ्झा हटने चक्क अंतराळात पण पिझ्झा डिलिव्हरी केली आहे.
२००१ साली अंतराळात पिझ्झा पाठवून,अंतराळात पिझ्झा डिलिव्हरी करणारी पिझ्झा हट ही पहिली कंपनी बनली. एकूणच हा एक पब्लिसिटी स्टंट होता. ज्याच्यासाठी जवळपास १ मिलियन डॉलर एवढा खर्च आला होता.
तर, ६ इंचाचा पेपरॉनी पिझ्झा आयएसएस (इंटरनॅशनल स्पेस सेंटर) येथे पाठवण्याचे ठरले. अमेरिकन बिल्ट युनिट आणि झाऱ्या ही रशियन मॉड्युल अंतराळात पृथ्वीच्या कक्षेत या डिलिव्हरीसाठी तयार होती.
पिझ्झा वर करायच्या त्या सर्व टेस्ट पार पाडल्यानंतर १२ जुलै २००० रोजी झ्वेझदा सर्व्हिस मॉड्यूल आणि पिझ्झा हटचा पिझ्झा कझाकस्तानमधील बायकोनूर येथून प्रोटॉन-के रॉकेट मार्फत लाँच केला गेला. रॉकेटवर ठळक पिझ्झा हटचा लोगो लावण्यात आला होता.
माईक रोलिंग, पिझ्झा हटचे तत्कालीन सीइओ म्हणतात,
आम्ही पिझ्झा या जगातच नव्हे तर अंतराळात कुठेही डिलिव्हरी करू शकतो याचं हे उदाहरण आहे. रशियन शास्त्रज्ञ आणि पिझ्झा हटचे कर्मचारी यांच्या मेहनतीचे हे फळ आहे. मेहनतीच्या जोरावर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे यांनी दाखवून दिलं आहे.
या प्रोजेक्ट दरम्यान कंपनीने ३० सेकंदाच्या व्यावसायिक जाहिरतदारांना जितके पैसे द्यावे लागतील त्यापेक्षा निम्मे पैसे दिले.
अशी बातमी आहे की पब्लिसिटी स्टंटची किंमत एक मिलियन डॉलर एवढी आहे,परंतु त्यावेळी रशियन स्पेस एजन्सी मधील कोणीही या संख्येची पुष्टी करू शकले नाही.
तथापि असे मानले जाते की १,५०,००० डॉलर एवढा निधी मॉस्कोमधील ख्रुनिचेव्ह सेंटरला दिलेले आहेत. हे केंद्र मुळात ५० च्या दशकातल्या ऑटोमोबाईल फॅक्टरी असलेल्या ठिकाणी बांधले गेले होते.
सोव्हिएत युनियनचं पतन झाल्यानंतर अंतराळ संस्थेच्या बजेटमध्ये ८८% घट झाली. पिझ्झा हटच्या मदतीने त्यांना आवश्यक अपग्रेड करण्यासाठी मोठी मदत प्राप्त झाली.आजही तिथे रशियन रॉकेट्स तयार केली जातात.
स्पेस स्टेशनवर मोहीम २ चे कमांडर युरी उसाचेव्ह यांनी पिझ्झा रिसिव्ह केला. व्हॅक्युम मध्ये बंद असलेल्या पिझ्झा सोबत खेळतानाची त्याचं एक फुटेज सुद्धा उपलब्ध आहे.
नासाची गाईडलाईन आहे की त्यांच्याशी संबंधित असलेल्या अंतराळवीरांना कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करण्यावर बंदी आहे. त्यामुळे ते फुटेज काही शेअर केली गेली नाही.
आज २०२० मध्ये कमर्शियल अंतराळ विश्व खूप पुढारले गेले आहे.त्यामुळे अंतराळात सुद्धा मानवी इच्छा आणि आवड जपण्याचे काम सुद्धा होत आहेत.
नेटफ्लिक्स वर आलेल्या स्पेस फोर्स मध्ये आपण पाहिले असेल की चंद्रावर ते बटाट्या व्यतिरिक्त काहीही उत्पादन घेऊ शकत नाही. त्यामुळे जितका वेळ तिथे राहावं लागेल त्यांना बटाटाचं खावं लागणार होतं.
आता असे चिन्ह दिसत नाहीत, मागच्याच वर्षी डबल ट्री या व्यवसायिक हॉटेल चेन ने अंतराळात स्पेस सेंटर मध्ये नासाच्या मदतीने चोको चिप्स पाठवले होते.
पण, एकूणच असे खाद्यपदार्थ अंतराळात पाठण्यासाठी होणारा खर्च पाहता जोपर्यंत याला स्वस्त पर्याय येत नाही तोपर्यंत दशकातून एकदाच अशी फूड डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल.
तर, मानवी बुद्धीला आणि त्याच्या आकांक्षेला मर्यादा नाहीत हे पुन्हा पिझ्झा हटने केलेल्या कामामुळे दिसून येते.आणि पृथ्वी मानवाला आता कमी पडत आहे ज्यामुळे मानव अंतराळात सुद्धा गवसणी घालायला तयार झाला आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.