बबड्याचा मास्क आणि महाराष्ट्र पोलीस…..जुळून आलंय एक वेगळंच कनेक्शन!!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
सध्या बातम्या, वर्तमानपत्र, सोशल मीडिया जिकडे तिकडे एकच विषय चर्चेचा आहे तो म्हणजे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि दिवसागणिक वाढणारे आकडे.
हल्ली तर सहज गप्पा मारायला म्हणून कोणाला कॉल केला, तरीही कोरोनाबद्दल ओघाने बोलणं होतंच. इतका हा विषाणू आपल्या दैनंदिन जगण्याचाच एक भाग झालाय. त्यामुळे आता या विषाणूसोबत जगण्याची मानसिक तयारी केलीच पाहिजे.
कोरोनाचं सावट अजूनही टळलं नाहीचे. लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले असले, तरीसुध्दा नागरिकांनी घराबाहेर गरज नसल्यास पडू नये, अशा सूचना शासनाकडून वारंवार देण्यात येत आहेत.
अगदीच अत्यावश्यक कामांसाठी घराबाहेर पडावं लागलं, तर योग्य ती खबरदारी नागरिकांनी घेणे गरजेचे आहे. बाहेर पडतांना सॅनिटायझर, तोंडावर मास्क या गोष्टी नितांत गरजेच्या आहेत.
वारंवार सूचना देऊनही लोकांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात नाही, हे पाहिल्यानंतर पोलिसांनी काही भन्नाट कल्पना शोधून काढल्या.
सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी अनेक कल्पक ट्विट्स महाराष्ट्र पोलिसांनी केले. लोकांना आवाहन करण्यासाठी सुप्रसिद्ध डायलॉग, नेते, चित्रपटांमधले सीन्स यांचा त्यांनी वापर केला.
जगप्रसिद्ध सिरीज “FRIENDS” मधील जोइच्या व्यक्तिरेखेचा वापर करून देखील, लोकांनी मास्क वापरावेत आणि ते एकमेकांमध्ये शेअर करू नये असे आवाहन त्यांनी केले होते.
If ‘friends’ share masks, it all becomes a ‘moo point!’#JoeyDoesntShareMasks#TakingOnCorona pic.twitter.com/v39hu6vvK9
— Mumbai Police (@MumbaiPolice) August 18, 2020
आता अशीच एक भन्नाट आयडिया त्यांनी वापरलीये ती “बबड्या”ला घेऊन.
झी मराठीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील “बबड्या” ही व्यक्तिरेखा सध्या मिम्सचा विषय ठरलीये.
आधी अत्यंत बुळचट दाखवण्यात आलेल्या या पात्राने आता एक नकारात्मक पवित्रा घेतलाय, त्यामुळे प्रेक्षकांना त्याची भयंकर चीड आहे. आणि यातूनच अनेक मिम्स सध्या व्हायरल होताना दिसतायत.
बबड्याने दाखवलेली खोटी डिग्री, आई- पत्नीची फसवणूक, पैसे चोरी….आणि एवढं सगळं असूनही त्याच्या आईचं त्याच्यावर असलेलं नितांत प्रेम. यातून कुठेरी सोशल मीडियावर तीव्र प्रतिसाद उमटत आहेत.
बबड्याच्या या प्रसिद्धीचा वापर “महाराष्ट्र पोलिसांनी” मात्र अत्यंत चपखल पद्धतीने केलाय. बबड्याचा मास्क घातलेला फोटो ट्विट करत त्यांनी म्हटलंय,
कथानकात ‘ट्विस्ट’ आहे! बबड्या चांगला की वाईट आम्हाला ठाऊक नाही, परंतु बबड्या एक जबाबदार नागरिक नक्कीच आहे.
कथानकात ‘ट्विस्ट’ आहे!
बबड्या चांगला की वाईट आम्हाला ठाऊक नाही परंतु बबड्या एक जबाबदार नागरिक नक्कीच आहे.#UseAMask#FollowUnlockGuidelines pic.twitter.com/vNB2VIkWX8
— Maharashtra Police (@DGPMaharashtra) August 20, 2020
मालिकेत अभिनेता आशुतोष पत्की हा सोहम उर्फ ‘बबड्या’ची भूमिका साकारत आहे. त्याच्या प्रसिद्धीचं वलय लक्षात घेता महाराष्ट्र पोलिसांच्या या ट्विटवर देखील काही भन्नाट प्रतिक्रिया आल्या आहेत.
—
—
—
—
—
—
—
—
—
—
—
लोकांना समजेल, रुचेल, आवडेल अशा भाषेत त्यांना समजावून सांगणं हे महाराष्ट्र पोलिस वेळोवेळी करत असतात. आताच हे ट्विट म्हणजे त्याचचं उदाहरण म्हणता येईल!!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.