' टुथपेस्ट मध्ये वापरली जाणारी ही घातक केमिकल्स ठरतील कॅन्सर सारख्या गंभीर आजारांसाठी निमित्त!  – InMarathi

टुथपेस्ट मध्ये वापरली जाणारी ही घातक केमिकल्स ठरतील कॅन्सर सारख्या गंभीर आजारांसाठी निमित्त! 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

टूथ पेस्ट. रोजच्या दैनंदिन वापरातील महत्त्वाची वस्तू. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आणि रात्री झोपायच्या आधी शेवटची वापरली जाणारी गोष्ट.

बघायला गेलो तर एक माणूस त्याच्या पूर्ण आयुष्यात एक गॅलन (सुमारे पावणे चार लिटर) टूथ पेस्टचा वापर करतो. एकूणच या साध्या टूथ पेस्टचा ‘बिझनेस’ सुद्धा तेवढाच मोठा आहे.

कोलगेट, पेप्सोडेंट, विको अन पतंजलीच्या दंतकांती सारख्या प्रचंड मागणी असलेल्या ब्रँडचा हाच बिझनेस करोडाच्या घरात आहे.

 

toothpastes inmarathi
youtube.com

 

आता बिझनेस आला की स्पर्धा आली. आणि स्पर्धा आली की हेवेदावे आले.

आयुर्वेदिक टूथ पेस्टच्या जाहिरातीच्या वेळेस इतर टूथ पेस्टमध्ये असलेल्या विषारी आणि शरीराला हानिकारक असलेल्या घटकांचा उल्लेख करून त्या टूथ पेस्टची जाहिरात करण्यात आली होती.

त्यामुळे आपसूकच पेस्ट मध्ये असं काही आहे का पाहायला गेलो तर उत्तर हे होकारार्थी मिळत. तर आज पाहूया टूथ पेस्ट मध्ये असणाऱ्या काही अशा घटकांबद्दल ज्याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.

टूथ पेस्ट खाल्ली जात नाही. दात घासताना ती आपण बाहेर टाकून देतो. मग याचा शरीरावर काय परिणाम होणार? तर अस नाही. दात घासताना टूथ पेस्टचा संबंध तोंडाच्या अस्तराशी येतो.आणि याच अस्तराच्या वाटेने ते आपल्या रक्तात मिसळते.

आणि रक्ताचा प्रवाह हा पूर्ण शरीरात अविरत फिरत असतो. म्हणून तोंडावाटे हे घटक पूर्ण शरीरात पसरण्याची शक्यता जास्त असते.

 

indian boy brushing inmarathi
brandequity.economictimes.indiatimes.com

 

तर पाहूया टूथ पेस्ट मध्ये असलेले अपायकारक घटक.

फ्लोराईड :

 

flouride inmarathi
harmonydentalbeaverton.com

 

जवळपास ९०% टूथ पेस्ट मध्ये फ्लोराईड हे असतच असत. दातांच्या मजबुतीसाठी आणि दात किडण्यापासून वाचण्यासाठी फ्लोराईड गरजेचं असते हे आज कित्येक वर्षे आपणास सांगितले जाते.

पण, अन्नपदार्थ मार्फत येणारे फ्लोराईड हे त्यासाठी पुरेसे असते हे कोणी सांगत नाही.

नुकतेच झालेल्या अभ्यासावरून लक्षात आले की टूथ पेस्ट मार्फत फ्लोराईडची अतिरिक्त मात्रा ही शरीरात जात आहे.

आणि त्यामुळे पोटाचे आजार,दात ठिसूळ होणे,पचन क्षमतेवर परिणाम सारखे आजार दिसून यायला लागले आहेत. विशेष करून लहान मुलांमध्ये.

हेच टाळण्यासाठी अमेरिकेत एफडीआयने प्रत्येक टूथ पेस्ट कंपनीला फ्लोराईडचे प्रमाण ब्रँडिंग बॉक्स वर अनिवार्य केले आहे.

 

ट्रायक्लोजन :

 

triclosan inmarathi

 

साबण,क्लीनर मध्ये सर्रास वापरले जाणारे अँटी बॅक्टेरीयल केमिकल. बऱ्याच देशांमध्ये स्वच्छतेच्या वस्तूंमधून या केमिकलला हद्दपार केले आहे. का?

तर ट्रायक्लोजन मुळे कॅन्सरची लागण झालेले केस हे आढळून आले होते. अंगावर वापरल्या जाणाऱ्या साधनांमधून जर कॅन्सर होत असेल तर तोंडात गेल्यावर त्याचा किती वाईट परिणाम होईल? विचार करा.

 

सँचरिन :

 

saccherin inmarathi
experiencelife.com

 

सँचरिन म्हणजे कच्च्या तेलावर प्रयोगशाळेत प्रयोग करून बनवलेली साखर. उसापासून बनणाऱ्या साखरेच्या तब्बल ३५० पट ही साखर गोड असते.

डाएट फूड,लीप बाम,सॉफ्ट ड्रिंक मध्ये सर्रास वापरली जाते. सँचरिनच्या अतिवापरामुळे कॅन्सर होतो हे १९७० पासून अनेक अभ्यासाद्वारे सिद्ध केले गेले आहे.

परिणामी काही रुल्स अँड रेग्युलेशन मार्फत सँचरिनचा मर्यादेत वापर केला जातो.

 

पॅराबेन्स :

 

parabens inmarathi
patientconnect365.com

 

टूथ पेस्टसह सौंदर्यप्रसाधनांमध्ये पॅराबेन्स हा सर्रास वापरला जाणारा पदार्थ आहेत.

संरक्षक म्हणून वापरल्या जाणार पॅराबेन्स हे अस रसायने आहे जे एस्ट्रोजेन संप्रेरकाची नक्कल करू शकतात आणि कर्करोग, त्याची वाढ यासारख्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतात.

पॅराबेन्सशी साधर्म्य असलेले पदार्थ पुढील प्रमाणे, ज्याचा परिणाम सुद्धा त्यासारखाच आहे.

मेथिलपराबेन, एथिलपराबेन, इसोबूटीलपराबेन, प्रोपिल्लबाबेन, बुटीलपराबेन, आयसोप्रॉप्यलपराबेन, बेन्झिलपराबेन इत्यादी.

 

सोडियम लॉरेथ सल्फेट आणि सोडियम लॉरेल सल्फेट :

 

sodieum laureth sulfet inmarathi
uniliver.com

 

साबणाचा फेस ही एखादी गोष्ट स्वच्छ करते,असा बऱ्याच जणांचा समज आहे. समज म्हणण्यापेक्षा गैरसमज म्हणून शकतो. फेसाने कोणतीच गोष्ट ही साफ होत नाही.

सारखीच बाब दातांना सुद्धा लागू होते. हाच फेस तयार करण्यासाठी सोडियम लॉरेथ सल्फेट किंवा सोडियम लॉरल सल्फेट या रसायनांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

या रसायनामुळे कॅन्कर फोड, तोंडात अल्सर, पोटातील समस्या आणि कर्करोग सारखे आजार होऊ शकतात.

 

प्रोपेलीन ग्लायकोल :

 

proplyne glaycone inmarathi
madebyradius.com

 

प्रोपीलीन ग्लायकोल हे एक खनिज तेल आहे जे औद्योगिक क्षेत्रात अँटीफ्रीझ, पेंट्स, एनामेल्स आणि विमान डी – आयसर मध्ये वापरले जाते. म्हणूनच फक्त दात गोठलेले असल्यास, प्रोपलीन ग्लायकोल आपल्याला मदत करते.

दुर्दैवाने, यामुळे कर्करोग, त्याचे पुनरुत्पादक समस्या आणि त्वचेची जळजळ होण्याची शक्यता असते.

 

•एसपार्टम :

 

aspartame inmarathi
ecowatch.com

 

एसपार्टम साखरेला पर्याय म्हणून वापरला जातो आणि मोठ्या प्रमाणात आज वापरला जाणारा सर्वात कॉमन कृत्रिम गोड पदार्थ आहे. हा पदार्थ, पेय, टूथपेस्टमध्ये आढळते.एसपार्टम साखरेपेक्षा २०० पट जास्त गोड असतो.

गोडपणा प्राप्त करण्यासाठी तसेच पदार्थ आणि पेयांमध्ये कॅलरी कमी ठेवण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

आता याचे दुष्परिणाम बघूया.

संभाव्य दुष्परिणामांमध्ये मायग्रेन, चक्कर येणे, मळमळ, स्नायूंचा त्रास, वजन वाढणे, पुरळ उठणे, नैराश्य, थकवा, चिडचिडपणा, निद्रानाश, दृष्टी समस्या, श्रवणशक्ती कमी होणे, हृदय धडधडणे, चिंता, चक्कर, स्मृती कमी होणे सारख्या आजारांचा समावेश असू शकतो.

तसेच एसपार्टमचा वापर संभाव्यत: अल्झायमर, मधुमेह, मल्टिपल स्क्लेरोसिस, लिम्फोमा, पार्किन्सन रोग आणि फायब्रोमायल्जिया यासारख्या आजारांना कारणीभूत ठरू शकते.

तर, रसायन हे शरीराला घातकच असतात. मुळात खनिज आणि खनिज तेलासारख्या पदार्थांपासून तयार झालेले द्रव्य यांचे कमी प्रमाण सुद्धा शरीराला हानिकारक असते.

म्हणून या पुढे टूथ पेस्ट असो वा आणि कोणतेही सौंदर्य प्रसाधन, त्याच्यावर त्यामध्ये वापरल्या गेलेल्या द्रव्यांचे प्रमाण पाहूनच त्याचा वापर करावा.

लहान सहान वाटणाऱ्या या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो ज्याचा दूरगामी असा परिणाम हा आपल्या शरीरावर होण्याचे प्रमाण हे जास्त असते.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?