' संपूर्ण देश ज्या गंभीर समस्येतून होरपळून निघतोय त्याविषयी ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असायलाच हव्यात! – InMarathi

संपूर्ण देश ज्या गंभीर समस्येतून होरपळून निघतोय त्याविषयी ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असायलाच हव्यात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कुपोषण हा भारताला लागलेला मोठा रोग आहे. आपल्याकडे चर्चा होते ती फक्त GDP ची. २०१३ मध्ये भारताचा GDP हा ५० टक्क्यांनी वाढला होता.

पण, तरीही पूर्ण जगातील एक तृतीयांश पेक्षा जास्त कुपोषित बालक हे भारतात आहेत हे एका रिपोर्टने सिद्ध केलं आहे आणि यापैकी अर्ध्याहून अधिक मुलं हे तीन वर्षांच्या खालची आहेत आणि वजनाने सुद्धा खाली आहेत.

आर्थिक विषमता हे या बालकांच्या कुपोषित असण्यामागे कारण आहे असं सांगितलं जातं. कौटुंबिक परिस्थिती मध्ये कुपोषणाची समस्या असेल तर अश्या घरात येणारं बाळ हे सुद्धा कुपोषित होतं असं आढळून आलं आहे.

 

malnutrition inmarathi
asianage.com

 

कुपोषणाचे साईड इफेक्ट्स म्हणजे निमोनिया, ट्युबर्क्युलोसिस सारखे आजार आहेत. भारतात एकीकडे खूप मोठा मजूर वर्ग आहे तर दुसरीकडे एक श्रीमंत वर्ग आहे की ज्यांना स्थूलपणा हा सुद्धा एक मोठा त्रास आहे.

भारतीय स्त्रियांपैकी १४% स्त्रियांना तर १८% पुरुषांना स्थूलपणा हा आजार आहे जो की इतर आजारांना आमंत्रण देत असतो. शहरी भागात हे प्रमाण ४०% पर्यंत आहे.

ह्या लोकांना डायबेटिस, कॅन्सर अश्या आजाराने ग्रासलेलं आहे.

कुपोषण म्हणजे गरजेपेक्षा कमी किंवा गरजेपेक्षा जास्त अन्न सेवन करणे. गरजेपुरतं खाणं हीच निरोगी शरीराची गरज आहे. हे खरं तर लहानपणीच अभ्यासात शिकवणं गरजेचं आहे.

सध्या तर अशी परिस्थिती आहे की, गरीब मनुष्य हा पळतोय भाकरी मिळवण्यासाठी आणि श्रीमंत मनुष्य हा ट्रेडमिल वर पळतोय भाकरी पचवण्यासाठी. ह्या दोन्ही प्रकारच्या कुपोषणाला समजून घेऊयात.

 

rich poor inmarathi

 

‘कुपोषित’ असणे म्हणजे शरीराच्या गरजेपेक्षा कमी अन्न मिळणे. शरीराची वाढ ही अश्या प्रकारच्या कमी खाण्याने लांबत असते. या प्रकारच्या कुपोषणाने शरीरावर विपरीत परिणाम होत असतात.

अन्न मिळण्याचं प्रमाण एका मर्यादेच्या खाली गेलं तर हे तुमच्या प्राणावर सुद्धा बेतू शकतं. शरीरात व्हिटॅमिन्स, मिनरल्स ची सुद्धा कमतरता झाल्यास त्याला सुद्धा कुपोषित असंच म्हणतात.

कुपोषित व्यक्तिची रोग प्रतिकारक शक्ती कमी होते आणि त्या व्यक्तीला त्याच्या कामात फोकस करणं शक्य होत नाही. कुपोषित व्यक्तीला खालील समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं :

१. व्हिटॅमिन A ची कमतरता : लहान मुलांना या कमतरतेमुळे दृष्टी कमी होण्याचा त्रास होत असतो.

२. व्हिटॅमिन C ची कमतरता : या कमतरतेमुळे स्कर्वी हा आजार होऊ शकतो. तुमच्या आहारात ताज्या भाज्या, फळांचं सेवन कमी होत असेल तरीही हा आजार होण्याची शक्यता आहे.

स्कर्वी चा त्रास हा वयस्कर लोकांना, ज्यांना दारू पिण्याची सवय आहे त्यांना आणि काही मानसिक त्रास असणाऱ्या व्यक्तींना जास्त होत असतो.

 

scurvy inmarathi

 

३. क्वाशिओरकोर : अन्नाच्या कमी सेवनामुळे हा आजार होण्याची शक्यता असते.

४. Marasmus : हा सुद्धा एक आजार आहे ज्यामध्ये शरीरावरचं मास कमी होतं.

लक्षणे :

१. काहीच खाण्याची किंवा पिण्याची इच्छा न होणे.

२. थकवा आणि चिडचिड होणे.

३. एकाग्रता कमी होणे

४. सतत थंडी वाजणे.

५. अचानक वजन कमी होणे.

६. आजारपण येणे आणि लवकर बरे न होणे.

७. कोणतीही जखम भरून येण्यास उशीर लागणे.

८. अगतिकता वाढणे.

या सर्वांवर उपाय करणं शक्य आहे. पण, काही केसेस मध्ये जास्त उशीर लागू शकतो. यावर लवकरच नियंत्रण न आल्यास कॅन्सर, लिव्हर चा आजार, गिळायला त्रास होणे असे त्रास होऊ शकतात.

या सर्व गोष्टीचं कारण हे एकटं राहणे, स्वतःची काळजी न घेणे किंवा अन्नावर पुरेसे पैसे खर्च करण्याची ऐपत नसणे हे असू शकतात.

जास्त अन्न सेवन केल्याने किंवा अन्न व्यवस्थित न पचवल्याने खालील त्रास होऊ शकतात :

१. मानसिक आजार : तुमचा अति आहार हा तुम्हाला डिप्रेशन, स्क्रीझोफ्रेनिया, अनेक्सिया नर्वोसा सारख्या आजारांच्या दारात नेऊन ठेवू शकतो.

 

depressed guy inmarathi
odishagazette.wordpress.com

 

२. Crohn’s disease आणि celiac disease हे अन्न व्यवस्थित न पचण्याने होत असतात.

३. अल्कोहोल च्या अति सेवनाने गॅस्ट्रीटीस हा आजार होत असतो ज्यामुळे लिव्हर खराब होत असतं. शिवाय अल्कोहोल मध्ये कॅलरी असतात. ज्यामुळे व्यक्तीला भूक लागणं कमी होतं.

कोणतीही व्यक्ती कुपोषित आहे की नाही हे शोधण्यासाठी काही सोप्या पद्धती वैद्यकीय शास्त्राने सांगितल्या आहेत :

१. व्यक्तीची उंची आणि वजन हे योग्य प्रमाणात आहे की नाही ते चेक करावे. ज्याला की बॉडी मास इंडेक्स (BMI) असं नाव आहे.

२. मागच्या तीन महिन्यात त्या व्यक्तीचं न ठरवता कमी झालेलं वजन याची नोंद ठेवणे. ५ ते १०% पर्यंत वजन कमी किंवा जास्त होणे हे नॉर्मल मानलं जातं. पण, त्याहून अधिक बदल म्हणजे काळजीचं कारण आहे.

३. शारीरीक आणि मानसिक स्थिती लक्षात घेऊन त्या व्यक्तीला पॉईंट्स देणे. पाच दिवसांपेक्षा जास्त जर का बरं वाटत नसेल तर त्या व्यक्तीचा स्कोर दहापैकी ३ इतका असेल.

४. तुमचा रिस्क स्कोर हा २ पेक्षा जास्त असू नये असं वैद्यकीय शास्त्र सांगतं.

५. तुमच्या नेहमीच्या डॉक्टर कडून या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी एक केअर प्लॅन तयार करून घ्या.

 

health care plan inmarathi
usatoday.com

 

कुपोषणाचे लक्षण दिसल्यास त्वरित तुमच्या हेल्थ एक्सपर्ट सोबत चर्चा करून त्यावर योग्य आहार काय असेल हे समजून घेणं गरजेचं आहे. भारतीय वातावरण हे या सर्व गोष्टींवर लवकर नियंत्रण आणण्यास मदत करणारं आहे.

गरज आहे आपण योग्य ती काळजी घेण्याची आणि योग्य वेळी बोलण्याची.

Prevention is better than cure हे कायम लक्षात ठेवावं आणि आपल्या शरीराला वेगवेगळ्या ऋतूनुसार फळं, पाचक अन्न घेणं हे प्रत्येकाने आपलं कर्तव्य समजलं पाहिजे. कारण, आपली काळजी ही आपल्यालाच घ्यावी लागते.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?