' “१५० झाडांचं घर” – अशा इको फ्रेंडली इमारतीची कल्पना सुद्धा आजवर कुणीच केली नसेल! – InMarathi

“१५० झाडांचं घर” – अशा इको फ्रेंडली इमारतीची कल्पना सुद्धा आजवर कुणीच केली नसेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“ऊन जरा जास्त आहे, दरवर्षीच वाटतं”…’गारवा..’ गाण्याची ही पहिली ओळ. आपण खूपदा म्हणतो. उन्हाळा हा चार महिन्यांचा वेगळा ऋतू असला तरीही महाराष्ट्रातले किंवा देशातले कितीतरी भाग हे बाराही महिने स्वतःला उन्हापासून वाचवण्यासाठीची नेहमीच धडपड करत असतात.

कायम फॅन खाली किंवा AC समोर स्वतःला कसं ठेवता येईल याचा प्रयत्न करत असतात. थोडा मोठा विकेंड आला की प्रत्येक जण महाबळेश्वर किंवा लोणावळा अश्या ठिकाणी कधी एकदा जाता येईल याची मनापासून वाट बघत असतो.

निसर्गाच्या सानिध्यात असताना तुम्हाला आल्हाददायक तर वाटतेच; शिवाय तुम्हाला मानसिक शांतता मिळते.

मे महिन्यात तर आपल्याकडे उन्हाचा त्रास इतका वाढलेला असतो की, प्रत्येक जण त्या सिजन मधली एक तरी सुट्टी वॉटर पार्क ला कशी एन्जॉय करता येईल याची प्लॅनिंग करत असतो.

 

water parks inmarathi
whitewaterwest.com

 

विचार करा, जर का हा गारवा जर आपल्याला घरी बसल्या बसल्याच मिळाला तर?

वनराई मधील ज्या जेवणासाठी आपण जास्त पैसे देऊन तिथे असलेल्या हॉटेल मध्ये जेवायला जायला तयार असतो तो अनुभव जर का आपल्या घरातच मिळू लागला तर ?

इटली मधील एका बिल्डर ने हे खरंच ‘करून दाखवलं’ आहे. टूरिन नावाच्या शहरात 25 Verde या नावाचं एक पाच मजली अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंट ला ट्री हाऊस असं नाव देण्यात आलं आहे.

शहराच्या मध्यवर्ती असलेल्या अपार्टमेंट ने त्याच्या design आणि बांधकामाने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. आर्किटेक्ट Luciano Pia यांच्या कल्पनेतून ही बिल्डिंग साकारली आहे.

या एका अपार्टमेंट च्या भोवती १५० झाडं लावण्यात आली आहेत आणि त्याद्वारे तिथे राहणाऱ्या लोकांना हवा आणि ध्वनी प्रदूषणापासून यशस्वीपणे दूर ठेवण्यात येत आहे.

या अपार्टमेंट मध्ये ६३ घरं आहेत. एका तासात ही जागा वातावरणातील २ लाख लिटर्स इतका कार्बन डाय ऑक्साईड शोषून ऑक्सिजन आपल्याला देते असं एका सर्वेक्षणात सांगण्यात आलं आहे.

 

tree house inmarathi
boredpanda.com

 

उन्हाळ्यात या झाडांची पानं अपार्टमेंट च्या छताचं काम करतात. त्यामुळे अपार्टमेंट मधील लोकांना विनाकारण AC वाढवावा लागत नाही आणि त्यामुळे सुद्धा एका प्रकारे पर्यावरणाची काळजी घेतली जाते आणि ग्राहकांच्या वीज बिलाची सुद्धा.

अपार्टमेंट च्या या रचनेमुळे हिवाळ्यात हवा ही झाडांमुळे अडली जाते आणि घर गरम राहत. इथे लावण्यात आलेल्या प्रत्येक झाडाला विशेष प्रयोजनाने लावण्यात आले आहे.

रंगसंगती आणि झाडांना येणाऱ्या मोहोर यांचा विशेष अभ्यास करून त्यांना निवडण्यात आलं आहे. नेहमी सारख्या अपार्टमेंट समोर केलेल्या या स्टील बार च्या मदतीने हे अपार्टमेंट हे एखाद्या स्वप्नातील फॉरेस्ट हाऊस सारखं तयार झालं आहे.

25 Verde या बिल्डिंग च्या समोर एक झाडाच्या आकाराचं मेटल स्ट्रक्चर उभारण्यात आलं आहे ज्यावर विविध प्रकारच्या झाडांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. हे design पर्यावरण खात्याने चेक करून त्याला मान्यता दिली आहे.

हे शक्य असल्याचं अजून एक कारण म्हणजे टूरिनो या शहराचं दिवसांचं तापमान कधीच ३० डिग्री च्या वर जात नाही आणि रात्रीचं तापमान कधीच २० डिग्री च्या वर जात नाही.

ग्लोबल वॉर्मिंग चं संकट जसं पूर्ण जगावर आहे तसं ते इथे सुद्धा आहे. टूरिनो या शहराला उष्ण लाटांचा तडाखा काही वेळेस बसून झाला आहे. या गोष्टीची पुरावृत्ती होऊ नये म्हणून अश्या प्रकारच्या अपार्टमेंट ला सरकार प्रोत्साहन देत आहे.

 

tree house 2 inmarathi
archilovers.com

 

झाडांसोबत बांधकामात सुद्धा पूरक बदल सुचवण्यात आले आहेत. जे की, ३५ सेंटीमीटर चा स्लॅब, brick walls, cross ventilation, glass surface, green roof हे बदल जास्त सौर ऊर्जा, नैसर्गिक उजेड घरात येण्यास पूरक आहेत.

छत हे ६० ते १०० सेंटीमीटर इतक्या मातीने तयार केलेले असल्याने तिथे झाडं आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग चा उपयोग चांगला होऊ शकतो.

25 Verde मध्ये बसवलेली हिटिंग आणि कुलिंग सिस्टीम ही geothermal energy चा वापर करणारी आहे. जेणेकरून गरम पाणी आणि थंड पाणी या सोयी प्रत्येक घराला देण्यात आली आहे.

नवीन विद्युत उपकरणं लावायची कोणालाच गरज नसेल आणि कोणतंही इतर प्रदूषण टाळता येईल.

या अपार्टमेंट मध्ये घर घेणाऱ्या व्यक्तींना सरकार ने पर्यावरण पूरक इमारत म्हणून टॅक्स मध्ये सुद्धा सूट दिली होती.

अपार्टमेंट बांधताना या बिल्डर ने हे पूर्ण स्ट्रक्चर येणाऱ्या ५० वर्षांच्या भौगोलिक परिस्थतीला पूरक आहे असा दावा केला आहे.

“रियल इस्टेट मार्केट मध्ये सध्या मंदी आहे” हे आपण सध्या नेहमीच ऐकत असतो. हे वातावरण बदलण्यासाठी गरज आहे ती ‘फ्लॅट’ या गोष्टीकडे एका वेगळ्या नजरेने बघण्याची आणि प्रत्येक ग्राहकाला जास्तीत जास्त फायदे देऊन पर्यावरण पूरक ‘घर’ देण्याची.

 

tree house 3 inmarathi
archilovers.com

 

सिमेंट च्या बिल्डिंग मुळे होणारी वृक्ष तोड आणि प्रदूषण हे तर आपण थांबवू शकत नाही. निदान, अश्या ‘इको फ्रेंडली’ अपार्टमेंट मुळे आपल्या घरातच निसर्गाच्या सानिध्यात राहता येण्याचा आनंद मिळेल.

बांधकाम क्षेत्रातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा लेख पोहोचावा आणि येणाऱ्या काळात आपल्याला सुद्धा अश्या घरात राहता यावं हाच आमचा या लेखाचा उद्देश आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?