' मराठी स्त्रीचे “वेस्टर्न टॉयलेट”च्या अयोग्य वापराबद्दलचे सणसणीत मत! Exclusive रिपोर्ट! – InMarathi

मराठी स्त्रीचे “वेस्टर्न टॉयलेट”च्या अयोग्य वापराबद्दलचे सणसणीत मत! Exclusive रिपोर्ट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मानवी जीवनात अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच स्वच्छता ही सुद्धा एक मुलभूत गरज आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरायला नको. हल्ली कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता, स्वच्छता ठेवणे नितांत आवश्यक झाले आहे.

तरीसुद्धा अनेक सार्वजनिक ठिकाणी लोक स्वच्छतेचे साधे नियम पाळत नाहीत. कोरोना येण्याच्या आधी सुद्धा सार्वजनिक शौचलयांमध्ये जायची वेळ आली तर शिसारी यायचीच.

घरात आपण स्वच्छता पाळतो, मग सार्वजनिक ठिकाणी हे सगळे नियम धाब्यावर बसवले जातात का? कामाच्या ठिकाणी दिवसभर आपण जे शौचालय वापरणार आहोत ते स्वच्छ असावे असे कोणालाच वाटत नाही का?

या आणि अशा अनेक प्रश्नांना सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी धुमाळ हिने काही महिन्यांपुर्वी वाचा फोडली. फेसबुकवर तिने या अस्वच्छतेविषयी चीड व्यक्त करणारी पोस्ट लिहिली होती. फारसा चर्चेत नसलेला तरिही प्रत्येकाच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या संवेदनशील विषयावर तिने केलेल्या या चर्चेचे सर्वांकडून कौतुक करण्यात आलं होतं.

 

hemangi kavi dhumal inmarathi

 

हल्ली बऱ्याच कामाच्या ठिकाणी western toilets (commode) असतात. त्यात काही common toilets म्हणजे स्त्री- पुरुषांकरता एकच toilet असतं.

अशावेळी ते toilet कसं वापरावं याचं ज्ञान हे शाळेत किंवा घरातच पालकांनी लहानवयात आपल्या मुलामुलींना द्यायला हवं. अत्यंत गरजेचा विषय आहे समजून!

पुरुष मूत्र विसर्जन करताना commode च्या ring वर, आजूबाजूला जी काही रांगोळी करून ठेवतात ते बघूनच अंगावर शिसारी येते.

स्त्रियांची मूत्र विसर्जन करायची पद्धत या पुरुषांना माहीत नसते का? की याचा विचारच केला जात नाही? की अशा घाणेरड्या commode वर त्या कशा बसत असतील? बसत नसतील तर मग कशा manage करत असतील?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

त्यांचा हा मूलभूत नैसर्गिक हक्क बजावताना काय द्राविडी प्राणायाम करत असतील याचा विचार होत नाही का?

मासिक पाळी (#periods, menustral cycle) च्या वेळी काय करत असतील याचा विचार होत नाही का? होत नसेल तर करावा. स्त्री पुरुष दोघांनी!

#Commode कसं वापरावं हे कळत, माहीत नसेल तर न लाजता विचारावं, शिकून घ्यावं! कारण त्याचा थेट संबंध दोघांच्या ही hygiene, health शी असतो! सगळ्यांनी या विषयी openly बोलावं!

कित्येकदा काहीजण आपला कार्यभाग उरकल्यावर flush ही करत नाहीत… अरे काय? एक button दाबायचं असतं फक्त… तेवढं ही होऊ नये आपल्याकडून? बरं ते दिवसभर पुन्हा आपल्यालाच वापरायचं असतं. असो…

 

dual-flush-toilet-inmarathi04

 

तर commode, western toilet, युरोपियन toilet कसे वापरावे याची आपल्याला google करून माहिती मिळवता येईल, पण आपल्यातला साधं flush button ही push करता येत नसल्याचा आळस बघता इथे मी मला जमेल तसं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.

पुरुषांनी मूत्र विसर्जन करताना commode ची रिंग (frame) वर करून आपला कार्यभाग उरकून flush करून झाल्यावर पुन्हा ती frame toilet seat वर पाडायची असते.

Commode seat स्वच्छ, कोरडं कसं राहील याकडे लक्ष द्यावं! व्यवस्थित #flush झालंय की नाही ते पाहावं जेणे करून दुर्गंधी येऊन जीव गुदमरून जाऊ नये याची खात्री करून मगच बाहेर पडावं.

काही पुरुष आम्ही ती रिंग वर करू, पण पुन्हा ती खाली पाडणार नाही असा भलताच पुरूषी अहंकार गाजवतात, त्यांना कोपऱ्यापासून दंडवत!

या गोष्टीकडे आपण कधीच गांभीर्याने पाहत नाही किंवा हसण्याचा, चेष्टेचा विषय म्हणून सोडून देतो… पण त्यामुळे होणारे अनेक त्रास, #infections याकडे अनाहूतपणे आपण दुर्लक्ष करतोय.

हे शिकून किंवा समजून घेण्यात काहीच कमीपणा नाही. उलट स्त्रियांचं आरोग्य यावर ही अवलंबून असतं याचा विचार करावा!  प्रत्येकाला ‘मनासारखं’ ‘मनोसोक्त’ हलकं व्हावंसं वाटत असतं याचा आदर व्हावा एवढीच इच्छा!

टीम इनमराठीशी याविषयी बोलताना हेमांगी म्हणाली, की “पुरुष आणि स्त्रिया या दोघांनी याविषयी जागरूकता बाळगणे गरजेचे आहे.

अनेकदा लेडीज टॉयलेटमध्ये सुद्धा स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. सॅनिटरी पॅड्स कसेही पडलेले असतात. त्यामुळे प्रत्येकानेच शिस्तीने वागणे गरजेचे आहे.

 

toilet inmarathi

आपण अंतर्वस्त्र विकत घेण्यासाठी गेल्यावर त्या दुकानदाराला मोकळेपणाने साईज आणि डिझाईन वगैरे सांगतो, तर मग मासिक पाळी, अस्वच्छतेमुळे होणारा त्रास याबाबतीत उघडपणे बोलण्यास का कचरतो?

स्वच्छता तर गरजेची आहेच, पण त्याहीपेक्षा या सगळ्या गोष्टींवर मोकळेपणाने बोलण्याची गरज आहे” असं ती म्हणाली.

“टॉयलेट कसं वापरायचं याचे संस्कार बालवयातच झाले, तर ही समस्या आटोक्यात येऊ शकते” असंही ती म्हणाली.

ही पोस्ट सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल झाली आहे आणि अनेक कलाकारांनी देखील हा मुद्दा किती महत्त्वाचा आहे आणि या विषयावर व्यक्त होणे गरजेचे आहे असे म्हटले आहे.

 

pushkar shrotri comment inmarathi

===

comments on hemangi kavi dhumal post inmarathi

===

priya berde comment on hemagi kavi post

===

nikhil raut comment on hemangi post inmarathi

===

खरंतर हा त्रास आपल्यापैकी अनेकांना होत असतो, पण लाजेखातर आपण त्यावर बोलत नाही. या गोष्टी किंतु- परंतु न बाळगता बोलल्या गेल्या पाहिजेत ही गोष्ट पोस्ट वाचल्यानंतर पुन्हा ध्यानात येते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?