मुंबई खऱ्या अर्थाने “घडवणारे” कर्तृत्ववान व दानशूर “नाना शेठ”…!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
मुंबई म्हणजे देशाची आर्थिक राजधानी, मुंबई म्हंटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो खवळणारा समुद्र, मरीन लाईन्सवरची रम्य दृश्य, आणि कधीही न झोपणारी मुंबईची गर्दी, लोकल ट्रेन इत्यादि!
ह्याच आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ (मुरकुटे) यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ मध्ये झाला आणि आजच्या दिवशी म्हणजे ३१ जुलै १८६५ ला त्यांचं स्वर्गवास झाला.
ब्राम्हण कुटुंबात जन्माला आलेले शंकर शेठ यांनी त्यांच्या पूर्वजांप्रमाणे व्यापारच केला आणि त्यातूनच त्यांनी त्यांची ख्याती साऱ्या मुंबईत पसरली.
मुंबई स्टीम नेव्हीगेशनची स्थापना, मुंबई ठाणे लोकल सेवा, नाटकांचे प्रेक्षागृह अशा कित्येक गोष्टींचे श्रेय नानांनाच जाते!
त्यांचं बालपण हे अतिशय संपन्न कुटुंबात गेले असले तरी त्यांनी कधीच त्या गोष्टीचा गर्व बाळगला नाही किंवा त्यावरून कधी त्यांनी इतरांना कमी लेखले नाही.
मुंबईला श्रीमंत करण्यात सिंहाचा वाटा उचलणारे हेच ते नाना शंकर शेठ. वंचित लोकं तसेच महिलांना शिक्षण मिळवून देण्यासाठी ते झटले. सतीच्या अमानुष प्रथेविरोधात सुद्धा त्यांनी आपला विरोध परखडपणे नोंदवला!
मुंबई च्या जडणघडणीत महत्वाचे योगदान देणाऱ्या महापुरुषांमध्ये उद्योजक, समाजसेवक व शिक्षणतज्ञ नाना शंकर शेठ यांचे नाव अग्रभागी घ्यावे लागते.
मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यामध्ये तसेच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात नानांनी अतुलनीय कार्य केले आहे. व्यवसायातून मिळविलेला पैसा त्यांनी मुंबई च्या सर्वांगीण विकासासाठी खर्च केला.
हे ही वाचा –
===
जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांचे योगदान पुढीलप्रमाणे:
१८२२ – स का छत्रे यांच्या सहकार्याने पहिली शिक्षण संस्था काढली.
१८२४ – पहिल्या शिक्षण संस्थेचे बॉम्बे नेटिव्ह एजुकेशन सोसायटीत रूपांतर.
१८३७ – एल्फिस्टन कॉलेज ची स्थापना केली.
१८४५ – जे जे मेडिकल कॉलेज ची स्थापना केली.
१८४८ – स्टुडन्ट लिटररी व सायंटिफिक सोसायटीची सुरवात केली.
१८४९ – स्वतःच्या वाड्यात मुलींची शाळा सुरु केली.
१८५७ – द जगन्नाथ शंकरशेठ फर्स्ट ग्रेड varnaculer स्कूल ची स्थापना
१८५५ – विधी महाविद्यालयाचा पाया घातला
त्या काळात सतीच्या प्रथेविरोधात आवाज उठवणारे तसे कमीच लोकं होते. स्त्रीयांवर होणारा हा अन्याय थांबण्यासाठी कित्येक लोकांचा तसेच समाजाचा रोष पत्करून नानांनी सतीची प्रथा बंद करण्याच्या विधेयकास पाठींबा दिला होता.
आज जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये येऊन शिकायची स्वप्नं कित्येक कलाकार तसेच विद्यार्थी बघत असतात अशा ह्या जे जे स्कूल ऑफ आर्टस् च्या स्थापनेत सुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग होता!
महापालिकेत असताना आरोग्यव्यवस्था, विहीर तलाव व्यवस्था त्यांनी सुरु केल्या.
आज आपण मुंबईत कुठेही लोकल मधून बिनधास्त फिरू शकतो, तसेच आता मुंबई प्रमाणेच ठाणे सुद्धा आर्थिकदृष्ट्या एक महत्वाचे शहर म्हणून ओळखले जाते!
ठाणे आणि त्या भागातल्या शहरांना मुंबईशी जोडण्याचे काम नानांनी केले. त्यांच्या कार्यकाळात मुंबई ठाणे रेल्वे सुरु झाली
हे ही वाचा –
===
१५० वर्षांपूर्वी नाना शंकरशेठ यांनी दिलेल्या देणग्या :
रॉयल एशियाटिक सोसायटी – ५००० रुपये
व्हिक्टोरिया व अल्बर्ट वस्तुसंग्रहालय – ५०००
जगन्नाथ शंकरशेठ स्कूल – ३००००
एल्फिस्टन श्क्षिण निधी – २५०००
राणीची बाग – २५०००
असं म्हंटलं जातं की मरीन लाईन्स ते मलबार हिल्स ह्या परिसरात नानांची प्रचंड मोठी जमीन होती. पण नानांनी त्यांच्या श्रीमंतीचा उपयोग शिक्षणासाठी लोककल्याणासाठी केला!
नानांनी उदंड पैसे कमाविले आणि कमाविलेल्या या पैशाचे फक्त उंच इमले न बांधता त्यातून समाज घडविणाऱ्या संस्था उभ्या केल्या. मुंबईने जेवढं नानांना दिलं त्याच्या कित्येक पटीने त्यांनी त्याची परतफेड केलेली आहे
मुंबईने ज्यांना श्रीमंत केले अशी खूप लोकं आपल्याला दिसतील, पण आपल्या कर्तृत्त्वाने आणि दातृत्वाने ज्यांनी मुंबईला श्रीमंत केले असे अगदी हातावर मोजण्याईतपतच सापडतील.
नानांनी उभारलेल्या संस्था पाहिल्या की आजही आवाक् व्हायला होते. नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेठ हे ह्या कर्तबगार लोकांच्या यादीतील अग्रगण्य नाव.
आजच्या काळात टाटा, बिरला, अंबानी, महिंद्रा ह्यांना मुंबईचा किंग म्हंटलं जातं पण ह्यांच्याही आधी नाना शंकर शेठ यांच्यामुळेच मुंबईचा हा रुबाब आज सुद्धा टिकून आहे हे आपण मुंबईकरांनी विसरता कामा नये!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.