' भारताचे नागरिक “नसलेले” – पण आपल्या सीमेचं रक्षण करणारे “खास” जवान…! – InMarathi

भारताचे नागरिक “नसलेले” – पण आपल्या सीमेचं रक्षण करणारे “खास” जवान…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

टुटू रेजिमेंट – आपल्यापैकी फार कमी जणांनी हे नाव ऐकलं असेल. १९६२ साली हे रेजिमेंट तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहारलाल नेहरू यांच्या निर्णयाने ही रेजिमेंट तयार करण्यात आली होती. हे तेच वर्ष आहे जेव्हा भारत आणि चीन यांच्यात युद्ध झालं होतं.

कुठे असते ही टुटू रेजिमेंट? त्यांना तयार करण्याचं कारण आणि त्यांचं योगदान याबद्दल जाणून घेऊयात :

ऑक्टोबर २०१८ – चक्रता, उत्तराखंड, जगातील सुंदर हिल स्टेशन्स पैकी एक. डेहराडून पासून फक्त १०० किलोमीटर अंतरावर असलेलं हे एक गाव आहे.

इतक्या वर्षात आपण त्याबद्दल ऐकलेलं नसल्याचं किंवा तिथे जाऊन कोणाला सेल्फी काढलेलं न बघितल्याचं कारण म्हणजे, हा पूर्ण एरिया टुटू रेजिमेंट च्या अखत्यारीत येतो.

हा पूर्ण एरिया restricted आहे. इथे जायचं असेल तर तुम्हाला आधी केंद्रीय गृह खात्याची परवानगी घ्यावी लागते. फॉरेनर पर्यटकांना सुद्धा इथे येण्यास सक्त मनाई आहे.

 

tutu regiment inmarathi
bhaskar.com

 

Yana Cask ही एक युरोप मधील प्रसिद्ध गायिका आहे. २०१८ मध्ये ती तिच्या एका म्युजिक अल्बम च्या शुटिंग साठी भारतात आली होती. तिला किंवा तिच्या टीम ला चक्रता च्या बंधनांबद्दल माहीत नव्हतं.

तिने चक्रता इथे शुटिंग करायचं ठरवलं आणि त्यांची पूर्ण टीम तिथे पोहोचली. तिथे पोहोचल्या नंतर तिथल्या स्थानिक गुप्तहेरांच्या हे लक्षात आलं आणि तातडीने Yana Cask आणि त्यांच्या टीम ला पोलीस कस्टडी मध्ये घेण्यात आलं.

चक्रता येथे दाखल होण्याच्या गुन्ह्यावरून त्या सर्वांना नोटीस बजावण्यात आली आणि त्यांना देश सोडण्याचा आदेश देण्यात आला होता. Yana ला भारतीय केंद्र सरकारने ‘ब्लॅकलिस्ट’ केलं होतं. ही घटना त्यावेळी ट्विटर वर बरीच गाजली होती.

चक्रता हा एरिया बॅन का आहे? याचं नेमकं कारण हे कोणालाही माहीत नाहीये. टुटू रेजिमेंट चा एरिया म्हणूनच हा एरिया ओळखला जातो जे की या एरिया मध्ये अत्यंत सिक्रेट पद्धतीने त्यांना दिलेले ऑपरेशन्स करत असतात.

त्यांच्या कोणत्याच ऑपरेशन ची माहिती जाहीर केली जात नाही. या रेजिमेंट चा मूळ उद्देश हा चीन च्या सीमेमध्ये प्रवेश करून लडाख च्या अवघड भौगोलिक कंडिशन मध्ये सुद्धा लढता येणारे फायटर तयार करता यावे हा होता.

तिबेट मधून रेफ्युजी म्हणून प्रवास करून आलेल्या तरुणांना या कामासाठी निवडण्यात आलं होतं. ह्या रेजिमेंट मध्ये योग्य तरुण सैनिक निवडण्यासाठी इंडियन आर्मी च्या एका तुकडीची तिथे नेमणूक करण्यात आली होती.

रिटायर्ड मेजर जनरल सुजन सिंघ यांची टुटू रेजिमेंट चे पहिले IG म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

सुजन सिंघ यांनी दुसऱ्या महायुद्धात २२ वी माऊंटन रेजिमेंट चं नेतृत्व केलं होतं. म्हणून त्यांच्या या रेजिमेंट ला २२ किंवा टुटू रेजिमेंट असं नाव देण्यात आलं होतं.

 

suhan singh inmarathi
newsbust.in

 

गोरखा रेजिमेंट मधील सैनिक हे सुद्धा टुटू रेजिमेंट चा भाग म्हणून ओळखले जातात. सुरुवातीच्या काळात टुटू रेजिमेंट मध्ये फक्त तिबेटीयन तरुणच जॉईन करू शकत होते. त्या काळात US Intelligence CIA ने टुटू रेजिमेंट ला ट्रेनिंग दिलं होतं.

सैनिकांना अमेरिकन आर्मीच्या ‘Green Beret’ च्या धर्तीवर ट्रेनिंग देण्यात आलं होतं. अमेरिकेतील M-1, M-2 आणि M-3 सारखे शस्त्र सुद्धा टुटू रेजिमेंट ला वापरणसाठी दिले होते.

नोव्हेंबर १९६२ मध्ये चीन ने दोन देशातील संबंध सुधरवण्याचे निर्देश देऊनही टुटू रेजिमेंट मध्ये सैनिकांची भरती ही सुरूच ठेवण्यात आली होती.

या विचाराने की भविष्यात जर का चीनने कधी युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली तर टुटू रेजिमेंट ही संघटना सर्वात महत्वाचं शस्त्र म्हणून कामी येईल. टुटू रेजिमेंट मधील सैनिकांना rock climbing आणि para jumping हे शिकवण्यात येतं.

१९७१ च्या बांगलादेश विरुद्ध च्या लढाईत सुद्धा टुटू रेजिमेंट च्या सैनिकांनी ऑपरेशन ईगल मध्ये सहभागी होऊन आपला ठसा उमटवला होता. त्यापैकी ४६ सैनिकांना वीरमरण प्राप्त झाले होते.

त्याशिवाय, १९८४ च्या ऑपरेशन ब्ल्यु स्टार मध्ये सुद्धा टुटू रेजिमेंट ने खूप मोठी जवाबदारी निभावली होती. १९९९ च्या कारगिल युद्धात सुद्धा ऑपरेशन मेघदूत आणि ऑपरेशन विजय मध्ये सुद्धा टुटू रेजिमेंट चा सहभाग मौल्यवान होता.

काही वर्षांपासून टुटू रेजिमेंट च्या सैनिकांना इंडियन आर्मी इतकाच पगार देण्याचा निर्णय दिल्ली हायकोर्ट ने जाहीर केला आणि तो आमलात सुद्धा आणला आहे.

 

tutu regiment inmarathi 2
newsbust.in

 

हे सैनिक भारतीय नागरिक नाहीत किंवा भारतीय आर्मी चे सदस्य देखील नाहीत. तरीही, ते भारताच्या सीमा सुरक्षेसाठी त्यांचं योगदान देत आहेत.

ही खूप मोठी गोष्ट आहे ज्याची दखल दिल्ली हायकोर्ट ने दिलेल्या निकालात घेण्यात आली होती.

टुटू रेजिमेंट चं रिपोर्टिंग हे RAW आणि कॅबिनेट सेक्रेटरी च्या मार्फत पंतप्रधानांना असतं. टुटू रेजिमेंट च्या सैनिक भरती ची कधीच जाहिरात सुद्धा केली जात नाही.

टुटू रेजिमेंट मध्ये किती सैनिक आहेत, किती ऑफिसर आहेत, किती ट्रेनिंग झाल्या आहेत हे सामान्य माणसासाठी आज ही एक गूढ आहे.

टुटू रेजिमेंट चा उद्देश आज ही तोच आहे – चीन ने जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली तर त्यांना कडवं आव्हान देणं आणि भारताला चीन विरुद्धच्या प्रत्यक्ष लढाईत सुद्धा विजय मिळवून देणे.

 

china india tibet featured inmarathi
thehopinion.com

 

‘टुटू रेजिमेंट’ सारख्या सैन्य साखळी मुळे आपण सामान्य माणसं निवांत आयुष्य जगू शकतो असं म्हंटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?