' हिंदी सिनेमातील सत्याचा विपर्यास! आपल्या मनात रुजवले गेलेले घटनाक्रम वास्तवात किती वेगळे होते – InMarathi

हिंदी सिनेमातील सत्याचा विपर्यास! आपल्या मनात रुजवले गेलेले घटनाक्रम वास्तवात किती वेगळे होते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलिवूड सिनेमा आणि त्यात हाताळले जाणारे विषय हे अगदी वेगवेगळे असतात. साधारण लव स्टोरी पासून ते अगदी एखादा सिरियस विषयावर अनेक सिनेमे निघालेत.

त्याहूनही एखाद्या प्रख्यात व्यक्तीच्या रिअल लाइफ वर बायोपिक्स तयार करण्याचा नवा ट्रेंड बॉलीवुड मध्ये आला आहे आणि त्यातून कोट्यावधी पैसे कमावले जात आहेत.

 

bollywood biopics inmarathi
bollywoodlife.com

 

इतके की पात्राने खर्‍या आयुष्यातही एवढे पैसे कधी कमावले नाहीत. निर्माते प्रेरणादायक कथेतून व्यवसाय करतात पण मूळ गोष्ट अशी आहे की ते कथा बदलतात.

अशीच काही पुढील उदाहरण आहेत.

 

१. नीरजा :

 

neerja movie inmarathi
indianexpress.com

 

१९८६ मध्ये पॅन एएमच्या ७३ फ्लाइटमध्ये असलेल्या ९३ प्रवाशांच्या जिवाचे रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या धैर्यवान नीरजा भनोटची ही एक कथा आहे.

एका दहशतवादी संघटनेने हे विमान हायजॅक केल होत. जरी हा सिनेमा नीरजावर आधारित होता. तरी तिच्या त्यागातील सहकारी कर्मचार्‍यांनी असा दावा केलाय की,

नीरजाला काही महत्त्व यात दिल गेलेलं नाही. त्यांच्यामते नीरजा एक अप्रतिम व्यक्ती होती आणि त्यांना वाटत की आज तिचा आत्मादेखील अशी अयोग्य प्रशंसा केलेली बघून रडू लागला असेल.

 

२. अझर :

 

azhar movie inmarathi
koimoi.com

 

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन अझर यांच्या जीवनावर आधारित एक बायोपिक प्रेक्षकांच्या समोर आला. तो भारतीय कर्णधार होता.

हा सिनेमा लोकांवर खोटी छाप टाकण्याचा प्रयत्न करतो, की कोर्टानेच भारतीय कर्णधारावर असलेले सर्व आरोप मंजूर केले आहेत.

पण वास्तविक संग्रहित वृत्तपत्रांच कटिंग आणि लेख पाहिल्यावर संपूर्ण चित्रपट हा चुकीच्या गोष्टींवर आधारित आहे हे आपल्याला दिसून येत.

 

३. एम.एस.धोनी : द अनटोल्ड स्टोरी :

 

m s dhoni inmarathi
naukrinama.com

 

एम.एस.धोनी एक क्रिकेटर, फलंदाज आणि कर्णधार या नात्याने पुढे आला. हा निष्कर्ष फक्त प्रियंका झा शी असलेल्या नात्यामुळेच आलाय असं चित्रपटात दाखवलं आहे.

या चित्रपटात तो पकिस्तानशी एकदिवसीय मालिका झाली त्यावेळी तिला भेटला होता अस दाखवलय. आणि मग तिला भेटल्यानंतर त्याने शतक ठोकल आणि त्यानंतर त्याने भारतीय संघात आपल स्थान निश्चित केल.

पण जेव्हा आपण इतर फोटो आणि क्लिपिंग आपण पाहतो तेव्हा लक्षात येत की धोनी याने २००२ पासून प्रियांकाला डेट करायला सुरुवात केली होती तेव्हा तो भारतीय पथकासोबत झिम्बाब्वे आणि केनिया इथे होता.

 

४. उरी: द सर्जिकल स्ट्राइक :

 

uri garuda inmarathi
youtube.com

 

२०१६ साली उरीचा सर्जिकल स्ट्राईक झाला होता ज्यात वापरलेला गरुड सदृश ड्रोन हा DRDO च्या इंटर्ननी तयार केला होता. पण चित्रपटात दाखवलेला ड्रोन हा कॅनडा इथल्या एरियल अॅनालिटिक्स नावाच्या कंपनीने २०१७ साली तयार केला.

रॉबर्ड अस या पक्षाच नाव आहे. चित्रपटात दर्शविल आहे की तो ४ तासांपर्यंत उड्डाण करू शकतो पण प्रत्यक्षात तो १०- १५ मिनिटांसाठी उड्डाण करू शकतो.

याचा फायदा फक्त ऑडिओ सेन्सॉर इतकाच आहे ज्यात पक्ष्यांना शेतातून आणि एयरपोर्ट वरुन दूर करण्यासाठी होतो. परंतु चित्रपटात तो इन्फ्रारेड कॅमेर्‍यासह एकाधिक वैशिष्ट्य दाखवली आहेत.

तरीपण, चित्रपटात दर्शविलेल्या तथ्यांना आव्हान देता येणार नाही कारण सुरक्षिततेच्या उद्देशाने भारतीय सैन्याने तथ्य उघड केलेल नाही.

 

५. एयरलिफ्ट :

 

airlift inmarathi
dailyo.in

 

अस म्हणता येईल की जे मुळात घडल आणि या चित्रपटात दाखवलय त्यात शून्य साम्य आहे. ऑगस्ट, १९९० रोजी कुवैत पडलं. आपले परराष्ट्र व्यवहार मंत्री इंदर कुमार गुजराल एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत बगदादमध्ये गेले होते.

त्यांनी इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांशी चर्चा केली आणि त्यांना आपल्या आयएएफ इल-७६ मध्ये परत नेल आणि त्यानंतर इतिहासातील सर्वात मोठ विमान त्यांनी पाठवल.

बगदादमधील दूतावासाला जाण्यासाठी बस कंत्राटदार सापडला आणि जॉर्डनने इराकशी असलेली सीमा कधीही बंद केली नव्हती. हल्ल्यानंतर दहाव्या दिवशी सर्वप्रथम विमान वाहतूक झाली. 

शेवटचा भारतीय परत सुखरूप येईपर्यंत रेस्कु ऑपरेशन चालू होत. सुमारे १०,००० माणस कुवेतमध्येच राहिली आणि त्यांनी इराकी लोकांच संरक्षण केल. जे इराकी लोकांशी मैत्री करणारे होते आणि त्यांनी जाणीवपूर्वक एकाही भारतीयांना दुखावल नाही.

ही खरी कहाणी होती आणि चित्रपटात जे दाखवल गेलय ते काल्पनिक आहे अस म्हणता येईल.

 

६. मेरी कॉम :

 

mary kon inmarathi
theepochtimes.com

 

मेरी कॉमने स्वतः एका मुलाखतीत सांगितल की, चित्रपटात  मोठ्या प्रमाणात खोट दाखवलं गेलय.

चित्रपटात अस दिसून आल की मेरी कोम पैशासाठी स्ट्रीट बॉक्सिंग करायची पण प्रत्यक्षात तिने एकदाच असा लढा दिलाय आणि पैशासाठी तिने कधीच संघर्ष केला नव्हता.

चित्रपटात अस दिसून आलं की तिच्या वडिलांनी बॉक्सिंगला कडाडून विरोध दर्शविला होता.

जेव्हा मुलाच ऑपरेशन चालू होत तेव्हा मेरी कॉम कधी बॉक्सिंगच्या रिंगमध्ये नव्हतीच पण चित्रपटाच्या अनुसार ती विजेतेपदाची अंतिम फेरी खेळत होती आणि जेव्हा मुलगा पुन्हा आला तेव्हा चॅम्पियनशिप जिंकली.

चित्रपटाला टीआरपी मिळवण्यासाठी हे दृश्य पूर्णपणे काल्पनिक तयार केलय.

 

७. दंगल :

 

dangal movie
indiatimes.com

 

चित्रपटात असं दिसून आल की गीता आणि बबिता यांनी छेडछाड करणार्‍या मुलांना मारल्याच्या घटनेनंतर त्यांचा कुस्तीचा प्रवास सुरू झाला.

पण, प्रत्यक्षात महावीरसिंग फोगट यांना २००० मध्ये वेटलिफ्टिंगमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणार्‍या कर्णम मल्लेश्वर कडून त्यांना प्रेरणा मिळाली.

गीताचे प्रशिक्षक पीआर सोधी यांना दंगल या चित्रपटात नकारात्मक पात्र म्हणून चित्रित केलय. पण, प्रत्यक्षात महावीरसिंग यांच्या मुलींसाठी केलेल्या प्रयत्नांच प्रशिक्षकांनी कौतुक केल.

तसेच शिबिराला भेट देण्यासाठी आणि आपल्या मुलींना भेटण्यासाठी आमंत्रित केल.

चित्रपटात असही दर्शवल गेलय की महावीरसिंगला कोचने येण्यासाठी नकार दिला होता पण प्रत्यक्षात तो स्टॅण्डमध्ये बसून गीताला पदक जिंकताना पाहात होता.

 

८. संजू :

 

sanju inmarathi
businesstoday.in

 

बायोपिकवर जरी असला तरी एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचा प्रत्येक पैलू दर्शवू शकत नाही पण जेव्हा महत्वाच्या वैयक्तिक घटनांबद्दल आपण बोलतो तेव्हा तरी खोटे प्रसंग दाखवू नयेत अस आपल्याला वाटतं.

त्यातील एक म्हणजे जेव्हा संजूची बायको न्यूयॉर्कमध्ये उपचारांसाठी होती तेव्हा माधुरी दीक्षित सोबत त्याचे प्रेमसंबंध होते.

पण जेव्हा त्याला अटक करण्यात आली तेव्हा त्याने त्यांच्यातली प्रत्येक गोष्ट त्याच्या बायकोला सांगितली होती.

तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की बॉलीवुडचे हे प्रोड्यूसर सत्यकथा सांगताना किती पैसे कमवतात याचा तुम्हाला अंदाज येऊ शकतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?