' यशाचं सिक्रेट म्हणजे फक्त या “५ गोष्टी”, मात्र तुम्ही दाखवायला हवे सातत्य! – InMarathi

यशाचं सिक्रेट म्हणजे फक्त या “५ गोष्टी”, मात्र तुम्ही दाखवायला हवे सातत्य!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

यशाचं सूत्र एकदम सोपं आहे — तुमच्या दृष्टीने यशस्वी असलेल्या लोकांची copy करा! अर्थात हे बोलायला सोपं आहे. पण नेमकं काय copy करायचंय हे माहीत असणं हीच पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे! यशस्वी लोकांच्या काही एक-सारख्या सवयी आहेत. त्या follow केल्या तर आपले यशस्वी होण्याचे chances वाढतात.

यशस्वी लोकांच्या अश्याच ५ खास सवयी –

१) स्वतःशी संवाद साधा

 

self-talk

Image source: Vectorgroup

तुम्हाला काय हवंय, कसं हवंय, कधीपर्यंत हवंय…ह्या basic प्रश्नांची उत्तरं फक्त तुम्हालाच माहिती असू शकतात. तुमच्या रोजच्या जीवनात, तुम्ही तुमच्या ध्येयाच्या जवळ जाताय की भरकटत आहात – हेही तुम्हीच सांगू शकता.

म्हणून – थोडासा वेळ स्वतःसाठी…रोज किमान अर्धा तास…थोडंसं meditation आणि स्वतःशी गप्पा. बघा कसा magical परिणाम होतो ते!

२) Be health conscious – फिट रहा

हो – सर्व यशस्वी लोक स्वतःची काळजी घेतात.

health

Image source: pcworld

रोज जिमला जाणं किंवा प्राणायाम करणं जरा अवघड वाटत असेल तर – lift टाळून पायऱ्यांचा वापर करणं, शक्य तेवढं शारिरीक काम करणं, bike/car टाळणं, वेळच्यावेळी सकस अन्न जेवणं…अश्या छोट्या, सोप्या गोष्टींनी सुरुवात करा. ह्या सवयी लागल्या की slowly, स्वतःला थोडं अजून push करा. व्यायाम सुरु करा, jogging करा. असं थोडं थोडं – one step at a time – पुढे जा.

म्हणतात ना – निरोगी शरीरातच निरोगी मन रहातं!

३) वाचत रहा!

केवळ newspaper अन इंटरनेटवरची articles म्हणजे वाचन नव्हे. कादंबऱ्या, वैज्ञानिक माहितीपर ग्रंथ किंवा रहस्य कथा, ऐतिहासिक ग्रंथ किंवा अर्थ विश्व उलगडणारं पुस्तक…रोज काहीतरी खास वाचा.

dig-into-reading

Image source: google

वाचनाचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, विविध क्षेत्रातील रोचक माहिती आपल्या जीवनातील भव्यता वाढवते. Life अधिक interesting करते. ज्याने रोजच्या लढाईत energy मिळते.

४) “नाही” म्हणायला शिका

 

aarogya-d InMarathi

Image source: mojitomother

यशाचं रहस्य जितकं ‘positive’ विचारात आहे, तितकंच “नाही” म्हणता येण्याच्या skill मध्ये आहे. Officeमध्ये एखादं काम अंगावर आलंय पण ते deadline मध्ये होऊ शकत नाही हे तुम्हाला पक्कं माहितीये तर शांतपणे पण ठामपणे ते सांगता आलं पाहिजे. Family tour प्लॅन केलीये आणि दूरच्या नातेवाईकांचं कुठलंसं function आहे – priority तुमच्या कुटुंबाला देता आली पाहिजे.

नको असलेल्या, त्रासदायक गोष्टींना “नको” म्हणताना जरा वेळ त्रास होतो पण त्याने तुमचा (आणि कधीकधी समोरच्याचासुद्धा) कितीतरी जास्त वेळ आणि मानसिक त्रास वाचतो.

५) Plan B तयार ठेवा

साध्य – तुमचं goal, ध्येय – आणि साधन – ते goal मिळवण्याचा मार्ग — ह्यात confuse होऊ नका. बऱ्याचदा आपण जो रस्ता निवडतो तो चुकला असल्याचं थोडंसं पुढे गेल्यावर लक्षात येतं. हे रस्ता चुकणं ठीके, that’s fine…पण “रस्ता चुकलाय” हे लक्षात आल्यावर तुम्ही चटकन रस्ता दुरूस्त करता का? की कुठल्यातरी भावनिक weaknessमुळे जुन्याच रस्त्यावर धावत जाता — ह्यावर तुमच्या प्रवासाचं यश ठरतं.

Plan.B

Image source: bizjournals

आपली चूक होतीये हे कळाल्यावर गोंधळून जाऊ नये ह्यासाठी Plan B नेहेमी तयार ठेवा. “जर हा रस्ता चुकला तर…” ह्या dilemmaमध्ये अडकून पडू नका. Solution तयार ठेवा!

यशस्वी माणसं कळत नकळत वरील ५ गोष्टी follow करत असतात. To become successful, तुम्हीसुद्धा ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि follow करा.

तुमच्या मते, यशस्वी माणसं आणखी कुठल्या गोष्टी follow असतात?

आमच्यासोबत share करा…आम्ही त्या इतरांपर्यंत पोहोचवू!

Cheers!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?