पडद्यावर अतिशय सुंदर दिसणारी ही सर्व गाणी एका वेगळ्याच तारेवरच्या कसरतीची उदाहरणं आहेत
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
गाणे ही आपण भारतीय लोकांच्या आयुष्यातील अविभाज्य गोष्ट आहे, असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. कोणत्याही कामात असो किंवा प्रवासात गाणी आपल्यापैकी बहुसंख्य लोकांच्या आजूबाजूला सुरूच असतात.
गाण्यांच्या चाहत्यांमध्ये एक नाव अजूनही आहे जे कदाचित तुम्हाला नसेल. ते नाव आहे आपल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याचं.
मागे दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की, तो प्रवासात असताना एकच गाणं हेडफोन वर दिवसभर ऐकत असतो. मागच्या काही वर्षात गाणी बघणे ही सुद्धा लोकांच्या आवडीची गोष्ट झाली आहे.
त्यामुळेच, सध्या किती तरी म्युझिक चॅनल्स ला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
काही वर्षांपूर्वीचे गाणे आठवले तर लक्षात येईल की, हिरो आणि हिरोईन च्या मागे जवळपास शंभर लोकं नाचताना दिसायचे.
कसे शुटिंग करायचे इतक्या लोकांना एकत्र घेऊन, एक गाणं तयार व्हायला त्या काळात किती वेळ लागत असेल हा एक प्रश्नच आहे.
त्या काळात तर सिनेमाच्या बजेट सुद्धा खूप जास्त नसायचं. एका कॅमेरा ने पूर्ण गाणं शुट केलं जायचं; इतकंच नाही तर पूर्ण सिनेमा एकाच कॅमेरा ने शूट केल्याच्या बातम्या आहेत.
हिरो आणि हिरोईन एखाद्या झाडाखाली उभं राहायचे आणि तीन मिनिट गाणं म्हणायचे, असाही एक काळ बॉलीवूड ने बघितला आहे.
१९८० आणि ९० च्या दशकात तयार झालेल्या गाण्यात लोकांना खूप वेगवेगळे लोकेशन्स, बॅकग्राऊंड बघायला मिळाले आणि त्यामुळेच ती गाणे आपल्या मेमरी मध्ये रजिस्टर झाले आहेत.
१९५० च्या दशकात शक्ती सामंता या दिगदर्शकाने एक कमाल करून दाखवली होती. ‘आराधना’ या सिनेमातील ‘रूप तेरा मस्ताना’ हे गाणं त्यांनी ‘एका टेक’ मध्ये शुट करण्याचा पराक्रम केला होता.
या प्रयोगानंतर बऱ्याच दिगदर्शकांनी हा प्रयत्न केला होता. ही त्या गाण्याच्या कॉरिओग्राफर्स, कलाकार यांची चांगलीच परीक्षा असते असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही.
‘आराधना’ या सिनेमातली सगळीच गाणी हिट होती.
ज्यामध्ये ‘मेरे सपनो की रानी’, ‘कोरा कागज था’, ‘बागो मे बहार है’ हे सगळेच गाणे राजेश खन्ना आणि किशोर कुमार यांना यशाच्या शिखरावर नेणारे होते. पण, ‘रूप तेरा मस्ताना’ हे गाणं या सर्वांमध्ये त्याच्या ‘वन टेक’ शुट मुळे स्पेशल आहे.
१९६९ नंतर हा प्रयोग परत रिपीट होऊ शकला तो १९९४ मध्ये.
कॅमेरा समोर होते शाहरुख खान आणि माधुरी दिक्षीत. सिनेमा चं नाव होतं ‘अंजाम’. ‘बरसो के बाद’ हे गाणं ज्यामध्ये माधुरी दिक्षीत चा बराच मोठा डान्स सिक्वेन्स आहे.
ह्या गाण्याची कोरिओग्राफी सरोज खान यांनी केली होती. राहुल रवैल हे सिनेमाचे दिगदर्शक होते. आनंद – मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं
माधुरी दिक्षीत च्या ग्रेसफुल दिसण्याने आणि ‘वन टेक’ मध्ये इतक्या डान्स स्टेप्स केल्याने तिच्या फॅन्स साठी कायम स्पेशल असेल.
२००४ मध्ये हा प्रयोग फराह खान ने ‘मै हूं ना’ या सिनेमाच्या ‘चले जैसे हवाए…’ या गाण्यात केला होता.
आश्चर्य वाटणं स्वाभाविक आहे कारण, तुम्ही जर हे गाणं आठवलं तर लक्षात येईल की या गाण्यात जवळपास शंभर लोक हिरो आणि हिरॉईन च्या आसपास नाचताना आपल्याला दिसतात.
इतक्या लोकांच्या ताफ्याकडून आधी किती तरी रिहर्सल करून नंतर Action म्हंटल्यावर एका टेक मध्ये हे पूर्ण गाणं शूट करण्याचं काम फराह खान ने करून दाखवलं आहे.
तिच्या करिअरचा कोरिओग्राफीचा असलेला अनुभव तिने पूर्ण पणाला लावला या गाण्यासाठी आणि हे करून दाखवलं असं म्हणावं लागेल. कारण, या आधीच्या दोन्ही गाण्यात पडद्यावर फक्त हिरो आणि हिरोईन आपल्या दिसतात.
२००४ मध्येच रिलीज झालेल्या ‘ऐतराज’ या अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा यांच्यावर चित्रित झालेल्या ‘I want to Make Love to You’ या गाण्याचे शुटिंग सुद्धा एका टेक मध्ये झालं होतं हे वाचून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल.
सुनिधी चौहान ने गायलेलं हे गाणं अब्बास – मस्तान या दिगदर्शक जोडी ने ‘वन टेक’ मध्ये शुट करून त्यांच्यातल्या आणि पूर्ण टीम मध्ये असलेल्या ट्यूनिंग चं दर्शन घडवलं असं म्हणावं लागेल.
२००७ मध्ये रिलीज झालेल्या ‘कॅश’ या सिनेमात हा प्रयोग परत करण्यात आला होता. अनुभव सिन्हा हे या सिनेमाचे दिगदर्शक आहेत. ‘ऐ छोरी जरा नच के दिखा’ हे शेवटची नावं दाखवताना येणारं गाणं एका टेक मध्ये शुट केलं होतं.
विशाल – शेखर यांचं संगीत असलेलं हे गाणं झाएद खान, रितेश देशमुख, शमिता शेट्टी, दिया मिर्झा आणि इशा देओल इतकी मोठी स्टारकास्ट या गाण्यात होती ज्यांनी या ‘वन टेक’ च्या दिगदर्शकाच्या प्रयत्नाला यश मिळवून दिलं.
२०१५ मध्ये रिलीज झालेल्या झोया अखतरने दिग्दर्शीत केलेल्या ‘दिल धडकने दो’ मध्ये ‘गल्ला गुरिया…’ हे गाणं ‘वन टेक’ मध्ये शुट करण्यात आलं होतं.
हा पूर्ण सिनेमा एका जहाजावर शुट करण्यात आला आहे. जिथे की दोन तीन परिवार एका प्रवासावर दाखवण्यात आले आहेत. या गाण्यात सुद्धा जवळपास शंभर लोक आपल्याला बघायला मिळतात.
इतक्या लोकांना एकाच वेळी सगळ्या डान्स स्टेप्स लक्षात ठेवून डान्स करायला लावणं ही खरंच अवघड गोष्ट आहे.
शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यात अनिल कपूर, शेफाली शाह, फरहान अखतर, प्रियांका चोप्रा, रणवीर सिंग, अनुष्का शर्मा, झरीना वहाब आणि कोरस इतकी मोठी स्टारकास्ट आपल्याला बघायला मिळते.
या सर्व गाण्यात ‘चले जैसे हवाए’ आणि ‘गल्ला गुरिया’ या दोन गाण्यांचं त्या गाण्यात असलेल्या कलाकारांच्या संख्येमुळे त्यांच्या ‘वन टेक’ मध्ये शूट होण्यासाठी दिगदर्शक आणि टीम चं विशेष कौतुक करायलाच हवं.
आपण स्वतः एकटे जरी कधी कॅमेरा समोर उभं राहून बोललो आणि नंतर आपण जरी तो विडिओ बघितला, तर आपण पहिल्याच प्रयत्नाने क्वचितच समाधानी असतो.
फोटो काढताना सुद्धा आपल्याकडे सर्वांना दोन – तीन फोटो क्लिक करायची सवय असते. कोणतीही गोष्ट ‘वन टेक’ मध्ये सर्वोत्तम करणं म्हणजे त्या कलाकाराचं त्याच्या कलेवर असलेल्या प्रभुत्व आणि विश्वासाचं प्रतिक म्हणता येईल.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.