प्रॉपर्टी डिस्प्युट आणि ७/१२ मुळे होणाऱ्या वादांना ब्रेक लावण्यासाठी महाराष्ट्रानेही उचलले ठोस पाऊल
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
तुम्ही एखाद्या ठिकाणी फ्लॅट घेता. त्याचे सगळे पेपर्स तुम्ही एका फाईल मध्ये लावून ठेवलेले असतात. त्यावर घर बुक केल्यापासून ते घर ताब्यात मिळेपर्यंत वेगवेगळे कागदपत्र लावलेले असतात.
साधारणपणे घर बुक करणाऱ्या व्यक्तीला बिल्डर ने जमीन खरेदी केल्यानंतर ची माहिती उपलब्ध करून दिली जाते.
पण, काही ठिकाणी असं झालेलं आपण वाचतो किंवा ऐकतो की, जमीनदार आणि बिल्डर यांच्या करारातील कोणत्या तरी गोष्टीची पूर्तता झालेली नसते आणि नंतर जमिनीचा मालक बिल्डर वर आणि पर्यायाने त्याने केलेल्या बांधकामावर कोर्टात केस करतो आणि या प्रकरणात तिथले रहवासी विनाकारण भरडले जातात.
हा सगळा त्रास वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकार ने प्रॉपर्टी कार्ड हा एक सोपा उपाय तयार केला आहे.
प्रॉपर्टी कार्ड मध्ये जमीन मालक, त्यांची पूर्ण माहिती, त्या जमिनीचे आजपर्यंत झालेले सर्व व्यवहार हे त्या एकाच कार्ड मध्ये रेकॉर्ड असणार आहेत.
हे कार्ड त्या भागातील महानगरपालिका किंवा नगर परिषद ही इश्यू करणार आहे.
हे मालमत्ता पत्रक म्हणजे ग्रामीण भागात जमीन विकत घेतल्यावर मिळणाऱ्या ‘७/१२’ सारखंच आहे. दोघांमधील फरक एकदा जाणून घेऊया:
फरक :
मालमत्ता पत्रक हे मुख्यतः शहरी भागातील जमिनीच्या मालकीबद्दल माहिती देते.
७/१२हे ग्रामीण भागातील जमिनीची माहिती देते आणि त्यामध्ये जमीन मालक आणि जमिनीचा वापर कोणत्या कामासाठी होत आला आहे जसं की शेती किंवा उद्योग किंवा व्यक्तिगत या बद्दल सुद्धा माहिती असते.
७/१२ हा शहर हद्दीच्या बाहेरील जमिनीची माहिती देत असतो.
मालमत्ता पत्रकाचे (प्रॉपर्टी कार्ड) महत्व :
१. प्रॉपर्टी कार्ड हे शहरी भागातील जमिनीचा मालक कोण हे प्रमाणित करतो.
२. प्रॉपर्टी कार्ड ने शहरी भागातील जमिनीवर सांगितलेल्या दाव्यांचा सुद्धा निकाल लावणं सोपं जातं.
३. मालमत्ता पत्रक हे कोणीही अनधिकृतपणे एखाद्या जमिनीवर हक्क सांगू नये यासाठी गरजेचं आहे.
४. कोर्ट सुद्धा मालमत्ता पत्रकाचा दाखला घेऊन जमिनीवर वादात मालमत्ता पत्रकाचा पुरावा ग्राह्य धरणार आहे. जेणेकरून वर्षानुवर्ष चालत रहाणारे खटले थोड्या प्रमाणत तरी लवकर निकाली लागतील.
५. प्रॉपर्टी कार्ड हे जमीन मालकाला भविष्यात येऊ शकणाऱ्या कायदेशीर बाबींपासून सुद्धा मुक्त करण्यास मदत करेल.
प्रॉपर्टी कार्ड चा उपयोग कुठे होणार ? :
१. जमीन विकत घेताना : इथून पुढे जमिनीचा व्यवहार करताना प्रॉपर्टी कार्ड हे आवश्यक असेल.
२. फ्लॅट विकत घेताना: फ्लॅट विकत घेताना प्रत्येक ग्राहकाने प्रॉपर्टी कार्ड बघूनच व्यवहार करावा म्हणजे नेमकं कोणाच्या जमिनीवर बांधकाम होऊन त्याला हा फ्लॅट विकला जात आहे.
३. जमिनीवरील दावा सिद्ध करताना कोर्टात : जर का तुमच्या जमिनीवर कोणी अनधिकृतपणे आक्रमण केलं तर हे कोर्टात सिद्ध करायला प्रॉपर्टी कार्ड हे अनिवार्य असेल.
४. प्रॉपर्टी कार्ड वर जमिनीचं exact location आणि प्लॉट नंबर, square meter, जमिनीवर घेतलेलं लोन, त्यावर भरलेला किंवा शिल्लक टॅक्स ही माहीती नमूद केलेली असल्याने बऱ्याच वेगवेगळ्या खात्यांकडे जाण्याची गरज असणार नाहीये.
प्रॉपर्टी कार्ड मिळवायचं कसं ? :
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या ‘आपले सरकार’ या अधिकृत वेबसाईट वरून कोणीही प्रॉपर्टी कार्ड ला अप्लाय करू शकतं आणि प्रॉपर्टी कार्ड मिळवण्यासाठी ‘महाभुलेख’ ला संपर्क साधावा.
प्रॉपर्टी कार्ड ला अप्लाय करताना ह्या स्टेप्स वापराव्यात :
१. महाराष्ट्र आपले सरकार च्या वेबसाईट ला भेट द्या. तिथे असलेल्या ‘Right to Services (RTS)’ वर क्लिक करा.
२. पुढच्या पेजवर आपलं एक प्रोफाईल तयार करा आणि त्याला Register करा.
३. नाव लिहिताना स्पेलिंग वगैरे बरोबर आहे ना ते एकदा चेक करून घ्यावे कारण हेच नाव पुढे प्रत्येक ठिकाणी वापरण्यात येईल.
४. तुमचा प्रोफाईल तुम्हीच तुमच्या मर्जीने तयार करत आहात की नाही बघण्यासाठी आधार क्रमांकाला जोडलेल्या तुमच्या मोबाईल नंबर वर एक OTP पाठवण्यात येईल.तो आलेला OTP विचारलेल्या बॉक्स मध्ये लिहा. तुमची माहिती आधार क्रमांकावरून घेतली जाईल.
५. वरीलपैकी तुमच्याकडे काहीही जरी उपलब्ध नसेल तर खालील माहिती लिहू सुद्धा शकता :
– अर्जदाराची व्यक्तिगत माहिती
– अर्जदाराचा पत्ता
– अर्जदाराचा मोबाईल नंबर
– मोबाईल नंबर लिहिल्या नंतर तुम्हाला खात्री करून घेण्यासाठी एक OTP पाठवला जाईल.
– त्यानंतर तुम्हाला तुमचा एक पासपोर्ट फोटो, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि address proof ची माहिती असणारा लाईट बिल किंवा रेशन कार्ड अपलोड करावं लागेल.
६. I Accept वर क्लिक करून तुमचा फॉर्म सबमिट करा.
७. प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यासाठी लागणारी फीस ची विंडो ओपन होईल. पेमेंट करा.
८. हा व्यवहार पूर्ण झाल्यावर होम पेज वर या.
महाभूआलेख (महाराष्ट्र भूमी अभिलेख) च्या वेबसाईटवर आल्यावर तुमचा जिल्हा निवडा.
View Property Cards वर क्लिक करा. तिथे तुमचा जिल्हा, तालुका निवडा. आधार नंबर लिहा, तुम्हाला तुमचं प्रॉपर्टी कार्ड बघायला मिळेल.
महाराष्ट्र सरकारने प्रॉपर्टी कार्ड ची संकल्पना राबवण्याचा हेतू म्हणजे प्रत्येक जमिनीवर बांधण्यात आलेल्या फ्लॅट्स चा रेकॉर्ड ठेवण्यासाठी केला आहे.
त्यासोबतच कमर्शियल कॉम्प्लेक्स मधील होणाऱ्या गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी प्रॉपर्टी कार्ड चा खूप उपयोग होणार आहे.
२०१९ च्या अखेरीस पर्यंत ५६ लाख प्रॉपर्टी कार्ड इश्यू करण्यात आलेले आहेत.
“Vertical property rules” हे बिल्डर, जमीनदाराने व्यवस्थित follow केले जावेत यासाठी राबवण्यात आलेल्या प्रॉपर्टी कार्ड योजनेचं आपण सर्वांनीच स्वागत केलं पाहिजे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.