' चातुर्मासात ‘ठराविक पदार्थ’ खाऊ नये असं सांगतात, पण का? जाणून घ्या, यामागचं आयुर्वेद – InMarathi

चातुर्मासात ‘ठराविक पदार्थ’ खाऊ नये असं सांगतात, पण का? जाणून घ्या, यामागचं आयुर्वेद

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जुलै ते ऑक्टोबर हा चार महिन्यांचा काळ हिंदू, बौद्ध, जैन इत्यादी धर्मीय लोकांमध्ये महत्त्वाचा काळ म्हणून मानला जातो. या काळात बरेच उपास, व्रतं, पथ्यं पाळली जातात.

हा काळ हिंदू धर्मात आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या दरम्यान, म्हणजे साधारणतः पावसाळा ऋतुचा काळ आहे.

या काळात देव झोपलेले असतात अशीही हिंदू धर्मीय श्रद्धा आहे. म्हणूनच आषाढी एकादशीला ‘देवशयनी एकादशी’ तर कार्तिकी एकादशीला ‘देवउठी एकादशी’ म्हणूनही अनेकदा संबोधले जाते.

 

vitthal inmarathi
konkankatta.in

 

अनेक लोक या काळात एकवेळ जेवून राहणारे आहेत. तर बाकीचे त्यांच्या काही आवडीच्या पदार्थांपासून या काळात दूर राहतात.

आयुर्वेद या चातुर्मासाच्या काळात काही पदार्थ खाऊ नयेत याबद्दल आग्रही आहे.

उदा. हिरव्या पालेभाज्या श्रावणात खाऊ नयेत, भाद्रपदात दही खाऊ नये, अश्वीन महिन्यात दूध पिऊ नये, कार्तिक महिन्यात डाळी आणि कडधान्ये खाऊ नयेत अशा प्रकारच्या सुचना आयुर्वेद देत असते.

आयुर्वेदानुसार, या पावसाळ्या ऋतुत वेगवेगळे आजार आणि संसर्ग होण्याची शक्यता इतर ऋतुंपेक्षा अधिक असते.

शरीरातील त्रिदोष – वात, पित्त, कफ –

 

aayurved inmarathi
chronicle.lu

 

आयुर्वेदाच्या सांगण्यानुसार, पावसाळ्यात आपल्या शरीरातील वात, पित्त, आणि कफ या त्रिदोषांचे प्रमाण असंतुलित होते आणि त्याचा परीणाम आपल्या शरीरातील सांधे, चयापचय क्रिया आणि एकूणच आरोग्यावर होतो.

आपल्या शरीराला विविध प्रकारचे आजार आणि संसर्ग होऊन शरीरप्रकृती बिघडते. सर्दी, पडसे, ताप आणि इतर आजार बळावतात.

आयुर्वेदानुसार, आपल्या शरीरात वात पित्त आणि कफ हे तीन घटक आपल्या शरीरातील क्रिया आणि शरीराचे आरोग्य राखण्यास कारणीभूत असतात.

त्यासाठी हे तिन्ही घटक संतुलित अवस्थेत शरीरात कार्यरत असले, तरच शरीराचे आरोग्य चांगले राहते. मात्र ते जर असंतुलित झाले, यातील एखादा घटक अतिरिक्त प्रमाणात वाढला, किंवा कमी झाला तर आपल्याला अनारोग्याला सामोरे जावे लागते.

पावसाळ्यात हे तिन्ही घटक असंतुलित होण्याचे प्रमाण वाढते.

हे तीन घटक शरीरात काय कार्य करतात ते आधी पाहू –

 

 

aayurved tridosh inmarathi
addveda.com

 

आयुर्वेदानुसार, आपले शरीर हे सृष्टीतल्या पंचमहाभूतांपासून बनलेले असते. या पंचमहाभूतांमध्ये पृथ्वी, आकाश, जल, वायू आणि अग्नी ही तत्वे असतात.

हीच तत्वे आपल्या शरीरातही संतुलित प्रमाणात राहून आपल्या शरीराचे कार्य चालवत असतात. यात मुख्य तीन तत्वं कार्यरत असतात –

वात –

म्हणजे वायू. हा शरीरातील उर्जेशी संबंधित घटक असून शरीराची आणि शरीराच्या अवयवांची हालचाल ही या वात घटकावर अवलंबून असते.

पित्त –

पित्त हा शरीरातील अग्नीशी संबंधित असतो. आपले शरीर अन्न पचवण्याचे काम या अग्नीद्वारेच करत असतो.

जर शरीरातील या अग्नीचे म्हणजेच पित्ताचे प्रमाण असंतुलित होऊन कमी जास्त झाले, तर पचनक्रियेत अडथळे येतात.

कमी झाले तर त्याला अग्निमंद् होणे आणि वाढले तर पित्ताचा प्रकोप होणे असे म्हटले जाते.

कफ – 

आपल्या शरीरात पृथ्वी आणि जल तत्व एकत्र येऊन कफ हा गुण निर्माण होतो. त्याचेही प्रमाण संतुलित असले तरच शरीराचे कार्य नीट चालते. अन्यथा शरीराच्या श्वसनक्रियेत अडथळे येऊन अनारोग्य होते.

म्हणूनच या काळात पूर्वीचे लोक कमी जेवणं, एकवेळ जेवणं, हलकं अन्न घेणं, आंबवलेले, पचायला जड पदार्थ, डाळी इत्यादी न खाणे, दही-दूध अंडी, मासे, मांस इत्यादी पचायला जड पदार्थ न खाणं इत्यादी पथ्ये पाळत असत.

 

दूषित  पाणी –

 

rainy season precaution inmarathi2
livemint.com

 

या ऋतुत पाणी दूषित होण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. या दुषित पाण्याच्या माध्यमांतूनही अनेक आजार होतात. या काळात जमिनीवरच्या लहानमोठ्या जंतूंची उत्पत्तीही वाढते.

अनेक अभ्यासांतून हे दिसून आले आहे, की जमिनीतून उगवणाऱ्या हिरव्या पालेभाज्यांतून या जंतूंचा प्रादूर्भाव वाढलेला असतो. उदा. पालक, कॉबी आणि इतर पालेभाज्यांमधून अशा बॅक्टेरिंयांची वाढ होत असते.

म्हणून अशा भाज्या या चातुर्मासात न खाण्यासंबंधी सांगितले जाते. पाणी उकळून, व्यवस्थित गाळून पिण्यास सांगितले जाते.

 

आहाराची पथ्ये –

 

cooking inmarathi
edexlive.com

 

ऑगस्ट ते सप्टेंबर, म्हणजेच आषाढ ते भाद्रपद या तीन महिन्यात पावसाचे प्रमाण सर्वाधिक असते म्हणून या काळात दही, आंबवलेले पदार्थ न खाण्यासंबंधी सांगितले जाते.

असे पदार्थ पचण्यास जड असतात आणि पावसाळ्यात वात, पित्त, कफ या त्रिदोषांचे असंतुलन झाल्याने ते पदार्थ पचणे अधिक कठीण होते.

शरीरातील चयापचय क्रिया या काळात मंदावलेली असते, पचनक्रिया कमकुवत झालेली असते.

 

digestive-problems-inmarathi
nutritional healing center

 

निसर्गोपचार पॅथीतले लोक देखील या काळात अल्कोहोलिक ड्रिंक्स, इडली-डोसा, ढोकळासारखे आंबवलेले पदार्थ खाण्यास मनाई करतात.

उडीद डाळ, मसूर डाळ इत्यादी डाळी या प्रोटीन्सनी भरपूर असतात. आणि या काळात पचनक्रिया मंदावलेली असल्याने, ह्या डाळी पचण्यास जड असतात म्हणून अशा डाळी देखील चातुर्मासात वर्ज्य करण्यास सांगितले जाते.

भारताच्या काही भागात या चातुर्मासाच्या काळात कांदा, लसूण, अंडी, मांस, मासे इत्यादी पदार्थ देखील लोक वर्ज्य समजतात.

कांदा- लसूण हे पदार्थ तामसिक असल्याने तुमच्या मानसिक संतुलनावरदेखील त्याचा परिणाम होत असतो.

तुम्ही जरी या काळात उपासतापास, व्रतं वगैरे करण्यात मानत नसलात, तरी काही खालील गोष्टी लक्षात ठेवल्यात तर या काळात तुमचे आरोग्य चांगले राहील :

हिरव्या पालेभाज्या नीट बघून, स्वच्छ करून, स्वच्छ पाण्याने नीट धुवून मगच शिजवा.

 

vegetable cleaning inmarathi
WebHD.com

 

दूध चांगले उकळू प्या. उकळल्यामुळे दुधात असलेले बॅक्टेरिया मरून जातील.

दूधामध्ये थोडं पाणी घालून ते पातळ करून प्या. जेणेकरून त्यातील लॅक्टोजचे प्रमाण कमी होऊन ते या काळात पचायला सोपं जाईल.

जेवण वेळच्यावेळी घ्या. संध्याकाळचं जेवण लवकर आटोपून घ्या. त्यामुळे चयापचय क्रियेवर ताण न येता त्या व्यवस्थित चालू राहतील.

थोडक्यात काही गोष्टी परंपरेने चालत आलेल्या असतात, त्यामागे काही लॉजिकल कारणे देखील असतात. आपण जरी उपासतापास व्रतं वैकल्यं मानत नसू, तरी काही गोष्टी ऋतु, हवामान, स्थल, काल परिस्थिती इत्यादींवर अवलंबून असतात.

त्याप्रमाणे आपल्या आहाराविहारात बदल करणे हे शास्त्रच असल्यामुळे काही गोष्टी पाळल्या, तर त्या आपल्याच आरोग्याला हितकारक ठरतील यात शंका नाही.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?