' सरोज खान यांच्या मोहक हास्य व हावभावांच्या मागे एका दीर्घ खडतर जीवनाची सावली होती… – InMarathi

सरोज खान यांच्या मोहक हास्य व हावभावांच्या मागे एका दीर्घ खडतर जीवनाची सावली होती…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

ताल से ताल मिला, डोला रे डोला, एक दो तीन, तम्मा तम्मा ही आणि अशी कित्येक गाण्यांवर बॉलीवुडच्या कलाकारांना आणि आपल्यालाही थिरकायला शिकवलं ते ‘सरोज खान’ यांनी.

बॉलीवुडच्या हजारो गाण्यांची त्यांनी आजवर कोरियोग्राफी केली. स्वतःच्या दिलखेचक अदांनी आणि नृत्यवरील प्रेमाने त्यांनी जगभरात सगळ्यांची मन जिंकली.

अशा या मनमुराद नृत्य करणार्‍या आणि दिलखुलास हसणार्‍या सरोजजींच आज शुक्रवारी तीव्र हृदयविकारच्या झटक्याने मुंबईत निधन झाल.

त्यांच्या निधनानंतर हिंदी चित्रपटसृष्टीने आपला सर्वात प्रिय आणि आदरणीय नृत्यकर्त्ती गमावली.

 

saroj khan inmarathi
indianexpress.com

 

माधुरी दीक्षित आणि श्रीदेवीची यांच्या नृत्याची जादू त्यांच्याशिवाय अपूर्ण ठरेल अस म्हणण चुकीच ठरणार नाही.

सरोज यांचा जन्म १९४८ मध्ये मुंबईत झाला. नुकतेच त्यांचे आई-वडील पार्टीशन नंतर पाकिस्तानमधून इथे स्थलांतरीत झाले होते. लहानपणी सरोज खान यांना सावलीत दिसणार्‍या हातांशी खेळायची सवय होती.

त्यांच्या एका शेजार्‍याने त्यांच्या आईला सांगितलं हिची नृत्याची आवड मला दिसतेय, हिला सिनेमात काम करू द्या. आणि अशाप्रकारे त्यांच्या घरातील पहिले व्यक्ति जीने या इंडस्ट्रिमध्ये पाऊल टाकलं.

१९५० च्या उत्तरार्धात नर्तक म्हणून आणि बाल कलाकार म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.

 

saroj khan chil actress inmarathi
starsunfolded.com

 

त्यांचं मूळ नाव निर्मला होत. त्यांच्या वडिलांनी त्यांना चित्रपट क्षेत्रात पाठवल्यावर ते नाव बदलेलं होतं. लोकांना त्या रूढीवादी कुटुंबातल्या लहान मुलीने चित्रपटात काम केलं हे सत्य कोणाला समजायला नको.

त्या काळी मुलींनी अशी काम करण आदरणीय मानल जात नसे. बाल-कलाकारापासून, त्या एक सामुहिक नर्तक बनल्या आणि त्यानंतर त्यांनी सहाय्यक नृत्य मास्टर आणि शेवटी नृत्य मास्टर म्हणून पदवी प्राप्त केली.

त्यांनी नृत्याचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण घेतलेले नाही. त्या सुप्रसिद्ध नृत्य मास्टर बी सोहनलाल यांच्याकडून नृत्य शिकल्या.

त्यांनी सरोजींना कथक, कथकली, मणिपुरी, भरतनाट्यम वगैरे मूलभूत गोष्टी शिकवल्या. त्यांनी मास्टर सोहनलालशी लग्न केलं तेव्हा त्या केवळ १३ वर्षांच्या होत्या. त्यावेळी ते ४३ वर्षांचे होते.

त्यावेळी लग्न म्हणजे काय हे सुद्धा त्यांना माहित नव्हत.

स्वतंत्र नृत्यदिग्दर्शक म्हणून सरोजींचा पहिला ब्रेक फक्त १९७४ मध्ये गीता मेरा नाम हा चित्रपट.

पण त्यानंतर त्यांना १३ वर्ष प्रतीक्षा करावी लागली आणि त्यांचं पहिलं गाणं लोकांनी डोक्यावर घेतल ते म्हणजे १९७८ मध्ये आलेल मिस्टर इंडिया सिनेमातल हवा हवाई हे गाणं.

 

hawa hawai inmarathi
ndtv.com

 

आणि हे गाण आजही तितकंच फेमस आहे. जर आपण मिस्टर इंडिया मधील काटे नहीं कट ते या गाण्याबद्दल बोललात तर त्याचही श्रेय सरोजजी यानांच जात.

श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित यांच्या बरोबर केलेले सर्वोत्कृष्ट नृत्याविष्कार आजही आपल्या स्मरणात आहेत. श्रीदेवी बरोबर त्यांनी नगीना (१९८६) आणि चांदनी (१९८९) सारख्या चित्रपटांमध्ये कामं केली होती.

मे तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा (नगीना) सारखी गाणी आठवा आणि आपल्याला कळेल की सरोजी यांच्या नृत्यात लोक परंपरा आणि शास्त्रीय पद्धती याच मिश्रण आपल्याला दिसेल.

माधुरी दीक्षितच्या कारकीर्दीतील जवळपास अर्धा वाटा सरोजजी यांचा आहे. तिच्या अभिनय कौशल्याव्यतिरिक्त, जर जर एखादी गोष्ट खास असेल तर ती नृत्य आहे.

आणि तिच्या पायातील आणि नजरेतील जादू ओळखून त्याचं सोनं केलं ते सरोज खान यांनी. ९० च्या दशकात माधुरी भारतीय चित्रपटांच्या पडद्यावर अधिराज्य गाजवत होती.

तिच्या सर्व चित्रपटांमध्ये नृत्यमय गाणी होती आणि त्यापैकी बहुतेक सरोजींनी कोरिओग्राफ केली आहेत. एक दो तीन, तम्मा तम्मा, धक धक करने लगा,चोळी के पिछे कया है.

 

madhuri dixit songs inmarathi
timesofindia.indiatimes.com

 

जी अजूनही प्रचंड लोकप्रिय आहेत. नुकताच त्यांनी पुन्हा गुलाब गँग आणि कलंक या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. 

९० च्या दशकात वर्चस्व गाजविल्यानंतर सरोजींच्या कारकिर्दीत अचानक फराह खान आणि श्यामक दावर यांच्यासारख्या तरूण नृत्य कलाकारांचा उदय झाला.

इतकंच नाही तर त्यांच्या हातून जो जिता वही सिकंदर, हम आपके है कौन? यांच्या सारखे सुप्रसिद्ध सिनेमे हातून गेले. यामुळे त्यांची कामं कमी होऊ लागली पण त्या डगमगल्या नाहीत.

त्या म्हणतात त्या या सगळ्या नृत्य दिग्दर्शकांशी कधीच स्पर्धेत नव्हत्या. करण त्यांचं अस्तित्व आणि शैली ही कायम वेगळीच राहिली.

सरोजजी कायम अभिमानाने सांगतात की त्यांनी रेखा, श्रीदेवी, माधुरी, करिश्मा, उर्मिला ते अगदी ऐश्वर्या, परिणीती या सगळ्यांना नृत्य शिकवलं.

त्यांना डान्स स्टेप्स बाबत कोणत्याही नायिकां बरोबर कोणतीही अडचण आली नाही. कारण त्यांना माहित आहे की सरोजजी कधी अश्लील गोष्टी दाखवत नाहीत.

आणि म्हणूनच त्या वेगळ्या आहेत. सरोजजींचा कायमस्वरुपी लोकप्रिय वारसा नेहमी हाच असेल की त्या नर्तकांच्या चेहर्‍यावरील भाव आणि वेगवान गाण्यांचा वापर एकत्र उत्तम प्रकारे करू शकल्या.

 

saroj khan 2 inmarathi
indiatvnews.com

 

तरुण नृत्यदिग्दर्शकांप्रमाणे उत्साह, लालित्य, नवीन नृत्यप्रकर आणणे या अशा अनेक डिग्री त्यांना आधीच मिळाल्या आहेत. त्यांनी अनेक कलाकार आणि निर्माते यांच्या बरोबर काम केलं.

आणि त्यांच्या हातात दिलेल्या प्रत्येक गाण्याचं त्यांनी सोनं केल.

त्या कायम म्हणायच्या ‘नृत्य माझे जीवन आहे. मी आता वेग कमी केला असला तरीही मी काम करण्यास पुरेशी तंदुरुस्त आहे.’

नृत्याकरता स्वतःचे आयुष्य वाहिलेल्या सिनेसृष्टीतील या सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शिकेला मानाचा मुजरा.

 

हे ही वाचा –

===

 

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?