गृहिणींना नॉन-स्टिक भांड्यांबाबत सतावणारी एक कटकट “या” टिप्समुळे कायमची अदृश्य होईल
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
स्वयंपाकघरात काळाप्रमाणे भांडी बदलत गेली. अगदी सुरुवातीला मातीची, मग लोखंडाची, मग तांब्या-पितळेची कल्हई करून, नंतर आला स्टीलचा जमाना आणि त्यानंतर आला नॉनस्टीकचा जमाना.
हा नॉनस्टिकचा जमाना येऊनही खूप काळ लोटला. नॉन स्टीक ही गरज होती. कारण स्वयंपाकघरात अनेक पदार्थ करताना, ते भांड्याला चिकटून बसण्याची समस्या गृहिणीसमोर होती. तो एक वैताग होता.
विशेषतः डोसा, धिरडी, घावन हे प्रकार अत्यंत नाजूक आणि नीट जमायला तापदायक. नेहमीच्या लोखंडाच्या तव्यावर ते चिकटून बसत. बनवायला नको वाटे. बीडाची कढई, तवे हे वजनाला जड त्यामुळे नको वाटत.
नॉनस्टिक आला आणि पदार्थ चिकटायचे बंद झाले. एवढंच नव्हे, तर ते चिकटू नयेत म्हणून जास्तीचे भसाभसा तेल चोपडण्याची देखील आवश्यकता राहिली नाही. कॅलरी जपण्याच्या काळात याचीही गरज होती.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
तेलाचा वापर नॉनस्टिक भांड्यांमुळे आपोआप कमी होऊ लागला. त्यामुळे नॉनस्टीक भांडी ही गृहिणींच्या गळ्यातली ताईत बनली. कढई, तवा, पॅन, भांडे अशी नॉनस्टिकची रेंज आपल्याकडे असावी असे गृहिणींना वाटू लागले.
त्यातही वेगवेगळे ब्रॅन्ड आणि त्यांची क्वालिटी भिन्न दिसू लागली. चांगल्या कंपनीची घ्यावी, तर ती महाग असतात, परंतु त्याला नॉनस्टिक आवरण बऱ्यापैकी जाड आणि टिकाऊ असतं.
स्वस्तातली, कमी जाडीचा नॉनस्टिक लेयर असलेली भांडी लवकर खराब होऊ लागली. त्याचे लेअर दोन चार महिन्यात उडू लागले. नॉनस्टिक भांड्यांत त्यांचा नॉनस्टिक हा लेयरच अती महत्त्वाचा.
प्रत्येक भांड्यांचे काही ना काही वैताग आणणारे गुण असतात. उदा. तांब्या-पितळेच्या भांड्यांना सतत कल्हई लागायची. मातीची भांडी फुटायची. स्टिलच्या भांड्यात वस्तू चिकटायच्या. तसंच नॉनस्टिक भांडीही वैताग देणारी असतातच.
एकतर ही भांडी खूपच नाजूक असतात. त्यांना जपून वापरावे लागते. खसाखसा घासून चालत नाही.
स्टिलचे डाव, चमचे यात पदार्थ हलवण्यासाठी वापरता येत नाहीत. कारण ते लागून भांड्यांच्या लेयरचे लगेच चरे उडू लागतात. ते लेयरच गेले, की त्या भांड्यांचा उपयोगच गेला.
त्यासाठी लाकडाचे डाव चमचे वापरावे लागतात. अती तेलानेही ही भांडी खराब होतात. कमी तेल वापरून पदार्थ केले, तर भांडी अधिक टिकतात.
अशी अनेक अवधानं ही भांडी वापरताना सांभाळावी लागतात. आणि ही अवधानं सांभाळली, तर मात्र ही भांडी चांगली टिकतात आणि स्वयंपाक सोपा होतो.
अशी भांडी अधिकाधिक टिकवण्यासाठी काय करावे?
जर पुढील ट्रिक्स तुम्ही अवलंबाल, तर तुमची नॉनस्टिक भांडी सहजपणे पाच वर्षांहूनही अधिक काळ चांगली राहातील. नॉनस्टिक भांडी खराब न करता स्वच्छ ठेवण्याच्या ट्रिक्स :
डिशवॉशरचा उपयोग टाळा –
नॉनस्टिक भांडी डिशवॉशरमध्ये टाकून धुऊ नका. हाताने धुवा. भांडी खरेदी करताना मिळालेल्या माहिती पुस्तिकेचे वाचन नीट करा. त्यावर ही भांडी कशी धुवायची याच्या सुचना दिलेल्या असतात, त्या काळजीपुर्वक वाचा.
कारण प्रत्येक कंपनीची ही नॉनस्टिक भांडी वेगवेगळ्या गोष्टींपासून किंवा सामानापासून बनवलेली असतात. सगळी भांडी सारखी नसतात. तरीही यातील कोणतंही भांडं डिशवॉशरमध्ये न टाकलेलंच बरं.
जर तुम्ही हाताने ही भांडी स्वच्छ केलीत तर ती अधिक टिकतील.
या भांड्यावर जो नॉनस्टिक लेप असतो तो अधिक उष्णता, आणि त्याचा निष्काळजीपणे वापर यामुळे लवकर खराब होतो.
ही स्वच्छ करताना वापरले जाणारे साबण देखील सौम्य असावेत. खरबरीत साबणाने आणि लोखंडी तारेने भांडी घासल्यास ती लगेच खराब होतील.
कंपनीने जरी यावर ‘डिशवॉशर सेफ’ असा शिक्का दिलेला असला, तरी शक्यतो अशी भांडी हातानेच स्वच्छ करा.
स्वयंपाक झाला की ताबडतोब अशी भांडी साफ करा –
जर स्वयंपाक झाल्यावर भांडं थोडं थंड झालं, की लगेच घासून टाकलंत तर त्यावर जो अन्नाचा थर जमा झाला असेल, ती लवकर निघून जाईल.
नॉनस्टिक भांडे गरम असताना त्यावर कोणतीही वस्तू चिकटून राहू शकत नाही. मात्र थंड झाल्यावर ती थोडी चिकटून राहू शकते. म्हणून भांडं फार थंड होण्याआधीच धुवून टाका.
धुताना सौम्य साबण वापरा. आतून, बाहेरून दोन्हीकडून भांडं स्वच्छ करा. त्यासाठी सौम्य साबण, पाणी आणि मऊ, फायबरच्या घासणीचा उपयोग करा.
तारेच्या आणि कडक घासणींचा वापर करू नका –
तारेच्या, प्लास्टिकच्या जाड घासण्या तुमच्या नॉनस्टिक भांड्यांचे नुकसान करतील.
जुने लोखंडाचे तवे घासण्यासाठी वापरत असू तशा कडक घासण्यांनी ऩॉनस्टिक भांडी घासलीत तर ती लगेच खराब होतील.
त्यावरील लेयर निघून जाईल. त्यांना चरे पडतील. त्यामुळे अशा घासण्यांचा वापर करू नका. त्याऐवजी मऊ, कापडी स्क्रबरचा वापर करा.
धुताना बेकींग सोड्याचा वापर करा –
कधी कधी भांडी घासण्याचे साबण, लिक्विड्स इत्यादी खूप हार्ड रसायनांपासून बनलेली असतात. असे साबण तुमच्या नॉनस्टिक भांड्यांचे नुकसान करतील.
त्याऐवजी कोमट पाण्यात थोडा बेकींग सोडा एकत्र, करून त्याची टुथपेस्टइतकी दाट पेस्ट तयार करून घ्या आणि नंतर मऊ घासणीवर ही पेस्ट घेऊन त्याने आपली नॉनस्टीक भांडी घासून घ्या.
अशाने भांड्यावर जमलेली अन्नाची परत निघून जाण्यास सहजपणे मदत होईल.
‘क्लिनिंग कॉकटेल’ चा वापर करा –
कुकवेअर कंपनीने अशी भांडी स्वच्छ करण्यासाठी ‘क्लिनिंग कॉकटेल’चा वापर करण्याची सुचना केली आहे. ते पुढीलप्रमाणे –
अर्धा कप व्हिनेगर आणि दीड कप पाणी तुमच्या स्वच्छ करण्याच्या नॉनस्टिक भांड्यात घ्या. मध्यम आचेवर पाच ते दहा मिनिटे गरम करा. गॅस बंद करून भांड्यातलं ते मिश्रण थंड होऊ द्या.
त्यानंतर कोमट पाणी, सौम्य साबण आणि मऊ घासणीने भांडं साफ करून घ्या.
तेल लावा –
तुमची भांडी थोड्याशा तेलामुळे देखील चांगली राहतात. अर्थात लोखंडी भांडी गंजू नये म्हणून तेल लावून ठेवत असू तितकी गरज नाही.
वापरण्यापूर्वी आणि वापरून झाल्यावर थोडासा तेलाचा हात फिरवून ठेवला तर अशा भांड्यांचा नॉनस्टीक लेयर टिकून राहण्यास मदत होते.
नीट कोरडी करून ठेवा –
तेल लावून घेतल्यावर तुमची अशी भांडी पूर्ण कोरडी करून घ्या नंतर कपाटात ठेवा. कोरडे करण्यासाठी स्वच्छ, मऊ कपड्याचा वापर करा.
अशी भांडी दुसऱ्या भांड्यांसोबत ठेवू नका. त्या दुसऱ्या भांड्यांशी घर्षण होऊन या भांड्यांवर चरे पडू शकतात.
वरील साध्या सुचना पाळून तुम्ही तुमच्या नॉनस्टिक भांड्यांची काळजी घेतलीत आणि स्वच्छ केलीत तर खात्रीने तुमची ही भांडी कमीत कमी पाच वर्षे तरी जशीच्या तशी राहतील.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.