फेब्रुवारीमध्ये का असतात फक्त २८ दिवस? ‘रोमनकालीन रंजक इतिहास’ जाणून घ्या!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
हा प्रश्न प्रत्येकाला कधी न कधी पडला असेल. बरं या मागे पाश्चिमात्य देशांमध्ये एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. या आख्यायिकेनुसार पूर्वी फेब्रुवारी महिन्यामध्ये २९ दिवस असायचे.
रोमन साम्राज्याचा सम्राट ऑगस्टस सीझर याने या महिन्यातील एक दिवस चोरला आणि तो ऑगस्ट या महिन्यात जोडला कारण या महिन्याला त्याचे नाव देण्यात आले होते. असो, शेवटी ही एक दंतकथा आहे. त्यामागे कोणतेही सबळ असे पुरावे उपलब्ध नाहीत.
८ व्या शतकात रोमन संस्कृतीमध्ये रोमन साम्राज्याचा संस्थापक रोमलस याने तयार केलेले एक कॅलेंडर प्रचलित होते. या कॅलेंडरमध्ये केवळ १० च महिने असायचे. हे कॅलेंडर मार्च ला सुरु होऊन डिसेंबरला संपायचे. म्हणजे तेव्हा जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने अस्तित्वातच नव्हते.
ते कॅलेंडर खालीलप्रमाणे:
Martius: 31 days
Aprilius: 30 days
Maius: 31 days
Junius: 30 days
Quintilis: 31 days
Sextilis: 30 days
September: 30 days
October: 31 days
November: 30 days
December: 30 days
जर या सर्व १० महिन्यांच्या दिवसांची बेरीज केली तर आपल्या लक्षात येते की हे वर्ष केवळ ३०४ दिवसांचेच आहे. त्या काळी हिवाळ्याचा मौसम सुरु झाला की कोणताही महिना पाळला जात नसे आणि या हिवाळ्याकडे कोणी फारसे लक्ष देखील द्यायचे नाही.
तेव्हाचा शेतकरी पेरणी आणि कापणीसाठी या १० महिन्यांच्या कॅलेंडरचा वेळापत्रकानुसार वापर करायचा. त्यांच्यासाठी हिवाळा म्हणजे निरर्थक होता. हा हिवाळा पाहायला गेले तर दोन महिन्यांचा असायचा. म्हणजे त्याकाळी लोक ६१ दिवस पकडायचेच नाहीत.
जर हिवाळ्यात कोणी रोमन लोकांना प्रश्न विचारला, काय ओ, कोणता महिना सुरु आहे सध्या? तर त्यांच उत्तर असायचं,
कोणताही महिना नाही. आता थेट हिवाळा संपल्यावर Martius अर्थात मार्च उगवणार.
रोमलस नंतर नुमा पोम्पीलीयस हा रोमचा द्वितीय राजा म्हणून गादीवर बसला. त्याला हे ३०४ दिवसाचं वर्ष म्हणजे मूर्खपणा वाटला. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, जर तुम्ही ६१ दिवस म्हणजे दोन महिने फुकट घालवत असलं तर त्या कॅलेंडरचा उपयोग तरी काय?
—
- आपल्या रोजच्या वापरातील कॅलेंडर कधी, कसं जन्मलं? भारतीय कॅलेंडरची सुुरुवात कधी झाली याचा रोचक इतिहास वाचा
- इंग्रजी इतिहासातील चमत्कारिक वर्ष – २ सप्टेंबरला झोपलेली लोकं १४ सप्टेंबरलाच उठली!
—
याच विचाराने त्याने जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने जोडून १२ महिन्यांचे एक कॅलेंडर तयार केले, या नवीन कॅलेंडर मध्ये ३५४ दिवस होते. या दोन महिन्यांचा कॅलेंडर मध्ये शेवटचे दोन महिने म्हणून समावेश करण्यात आला. म्हणजे डिसेंबर नंतर जानेवारी आणि नंतर फेब्रुवारी हा शेवटचा महिना म्हणून पाळला जात असे.
पण कोणतेही रोमन कॅलेंडर एखाद्या प्राचीन अंधश्रद्धेच्या प्रभावाशिवाय पूर्ण होणारे नव्हतेच. काही अतिविद्वानांनी सांगितले की,
सम संख्या रोमन साम्राज्यासाठी योग्य नाही, त्यामुळे आपत्ती ओढावू शकते.
त्यामुळे नुमा पोम्पीलीयस याने प्रत्येक महिन्यामधील दिवसांचा आकडा विषम असावा आणि वर्षातील एकूण दिवसांची बेरीज देखील ३५५ च व्हावी अश्या प्रकारची कॅलेंडरची रचना करण्याचे प्रयत्न सुरु केले. परंतु इथे अजून एक समस्या निर्माण झाली, कारण ३५५ आकडा होण्यासाठी १२ महिन्यांपैकी एकातरी महिन्यामधील दिवसांचा आकडा सम असणे भाग होते.
यावर उपाय म्हणून त्याने फेब्रुवारी महिन्यामधील दिवसांची संख्या २८ केली. याला कारण असे की या फेब्रुवारी महिन्यामध्ये रोमन लोक मृत लोकांशी निगडीत विधी करत असतं तसेच फेब्रुवारीचा अर्थ ‘to purify’ अर्थात शुद्धीकरण करणे असा होतो.
ज्या महिन्यात शुद्धीकरण विधी होतात तो महिना अपोआप शुद्ध होतो त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात सम दिवसांची संख्या असल्यास त्याचा जास्त वाईट परिणाम रोमन साम्राज्यावर होणार नाही असा तर्क लावला गेला.
दुसरी गोष्ट म्हणजे फेब्रुवारी महिना शेवटचा महिना असल्याने कॅलेंडरच्या इतर रचनेवरही फारसा फरक पडणार नव्हता. अश्याप्रकारे नुमा पोम्पीलीयस याने बनवलेले नवीन कॅलेंडर हे खालीलप्रकारे होते.
Martius: 31 days
Aprilius: 29 days
Maius: 31 days
Iunius: 29 days
Quintilis: 31 days
Sextilis: 29 days
September: 29 days
October: 31 days
November: 29 days
December: 29 days
Ianuarius: 29 days
Februarius: 28 days
या नवीन कॅलेंडरमध्येदेखील अनेक त्रुटी होत्या. काही वर्षानंतर ऋतूचक्र बदलत गेलं आणि त्याचा परिणाम या कॅलेंडरवर झाला. ऋतुचक्र आणि कॅलेंडरची रचना यांमधील संतुलन बिघडू नये म्हणून रोमन जाणकारांनी Mercedonius या २७ दिवसांच्या लीप महिन्याला सुरुवात केली. रोमन सरकार फेब्रुवारी महिन्यातील शेवटचे दोन दिवस खोडून टाकायचे आणि २४ फेब्रुवारी पासून लीप महिना सुरु करायचे.
या लीप सिस्टमचा सर्वसामान्य नागरिकांना फारच त्रास व्हायचा. या लीप महिन्यामध्ये एकसूत्रता नव्हती. कारण ज्यांच्या हातात धर्मसत्ता होती ते ठरवायचे की लीप महिना कधी सुरु करायचा. लोकांना दुसऱ्या दिवशीही कळायचे नाही की आज नेमका कोणता दिवस सुरु आहे, इतका सावळा गोंधळ माजला होता.
अखेर हे विस्कटलेले कॅलेंडर प्रकरण मार्गावर आणण्यासाठी ऑगस्टस सीजरने लीप महिना संपुष्टात आणला आणि नव्याने कॅलेंडर तयार केले.
सीजरने इजिप्शियन संस्कृतीप्रमाणे सूर्याला डोळ्यासमोर ठेवून कॅलेंडरची रचना केली. गरज पडल्यामुळे त्याने संपूर्ण वर्षात १० दिवस अधिकचे जोडले. तसेच कॅलेंडर संतुलित राहावे म्हणून दर चार वर्षांनी फेब्रुवारीमध्ये एक दिवस अधिकचा असेल अशी तरतूद केली.
अश्याप्रकारे सरते शेवटी ३६५ दिवसांचे एक वर्ष याप्रमाणे १२ महिन्यांचे कॅलेंडर सीजरने तयार केले.
सुरुवातीला जी आख्यायिका सांगितली त्याला सीजरच्या या कार्यामुळे काहीही आधार उरत नाही. कारण ऑगस्टस सीजरने कधीही फेब्रुवारी महिन्यातला दिवस कमी केला नाही हे इथे स्पष्ट होते.
आज आपण जे ग्रेगरीय पद्धतीचे कॅलेंडर वापरतो ते याच रोमन कॅलेंडरचे आधुनिक रूप आहे..!
असा आहे या फेब्रुवारी महिन्यामागचा आपल्यासाठी अनभिज्ञ असलेला रंजक इतिहास!!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.