' आर्थिकदृष्ट्या रसातळाला गेलेल्या ‘ह्या’ देशाने व्हॉट्सऍपवर टॅक्स लावायचा निर्णय का घेतला? वाचा! – InMarathi

आर्थिकदृष्ट्या रसातळाला गेलेल्या ‘ह्या’ देशाने व्हॉट्सऍपवर टॅक्स लावायचा निर्णय का घेतला? वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आजकाल एकमेकांशी कुठल्याही विषयवार लगेच बोलायचं साधन आहे व्हॉट्सऍप. जगाच्या पाठीवर कुठेही जा तुमच्या मित्रांना, कुटुंबाला जोडणारं हे सगळ्यांच लाडकं ऍप आहे.

या व्हॉट्सऍपचा वापर अगदी १० वर्षाच्या मुलांपासून ८० वर्षांच्या आजी-आजोबांपर्यंत सगळेजण करताना दिसतात. आणि आता तर या लॉकडाउनच्या काळात आपल्याला त्याच महत्व अधिकच पटलय.

साधारण ऑफिस च्या मीटिंग्स असुदेत, घरच्यांची लग्न असुदेत, मित्रांचे वाढदिवस असुदेत किंवा काही ऑनलाइन कोर्सेस असुदेत आपल्याला व्हॉट्सऍप हा पर्याय पाहिजेच.

 

whatsapp inmarathi
forbes.com

 

त्यातसुद्धा आता अनेक नवीन गोष्टी समाविष्ट केल्यामुळे लोकांशी बोलणं त्यांच्याशी आपले विचार शेअर करण अगदीच सोप झालय.

पण तुम्ही काय कराल जेव्हा तुम्हाला कळेल की व्हॉट्सऍप सारख्या अतिशय महत्वाच्या आणि आपल्या रोजच्या वापरायच्या एपवर कोणीतरी टॅक्स लावलाय?

ऐकून आश्चर्य वाटतय ना? पण अस खरच झालं.

Lebanon या मिडल ईस्ट देशात तिथल्या सरकारने व्हॉट्सऍपवर चक्क कर बसवलाय. तर त्याबद्दल आणि या देशाच्या इतिहासाबद्दल थोड जाणून घेऊया.

लेबनॉन हा एक मिडल ईस्ट अरेबिक देश आहे. साधारण याच्या सिमांच्या बाजूच्या देशांचा विचार केला तर एका बाजूला सिरिया तर एका बाजूला इस्राएल आहे.

अशा या देशाने जो तेल उत्पादन आणि गॅस यांच्या निर्यातीत अग्रस्थानी आहे. या सरकारने देशाच्या आर्थिक स्थिति नीट ठेवण्याकरता नुकतेच काही निर्णय घेतले.

 

lebanon inmarathi
brokings.edu

 

Lebanon ची राजधानी बेरुत आहे. असा म्हणतात या शहराची अगदी राख झाली होती पण हे शहर त्यातून उभ राहील. या देशात रोमन साम्राज्यानंतर मुसलमान आले.

त्यांनी इथे मुस्लिम धर्माच्या प्रसाराला सुरुवात केली. लेबननचे मुसलमान आझाद होऊ इछित होते. कारण मधल्या काळात ऑटोमन राज्य हरल होत, आणि सिरिया आणि लेबनन होतं फ्रेंच लोकांच्या ताब्यात.

आणि मग खूप कष्ट करून १ जानेवारी १९४४ ला हा देश स्वतंत्र झाला.

१९५२ मध्ये इसाई धर्माचे कमील शमून राष्ट्रपति झाले त्यामुळे इसाई आणि मुस्लिम ह्यांच्यात भांडण झाली. पुढे १९६७ मध्ये अरब आणि इस्त्राईल यांच्यात युद्ध झाल ज्यात अरब हरले.

हे युद्ध संपल्यावर इस्त्राईल ने लेबनन च्या काही मुख्य भागांचा ताबा घ्यायचा प्रयत्न केला. ज्यामुळे दोन देशांमधला तणाव वाढला.

१३ एप्रिल १९७५ मध्ये सिविल वॉर सुरू झालं. हे युद्ध १५ वर्ष चाललं.

त्यानंतर काही काळाने २००५ मध्ये असलेला सिरिया बरोबरचा तणाव घालवण्यासाठी तिथल्या सरकारने संसदीय मतदान घेतल आणि मग अॅंटी सिरिया गठबंधन केल.

अशा या अस्थिर सरकार लाभलेल्या देशाच आत्ताही तेच चालुये. नुकतंच २०१९ च्या ऑक्टोबर मध्ये या सरकारने काही निर्णय घेतला.

पुढील वर्षाच्या देशाच्या अर्थसंकल्पात महसूल वाढविण्यासाठी जगभरात वापरल्या जाणार्‍या व्हॉट्सऍप आणि इतर ऑनलाईन मेसेजिंग अॅप्लिकेशन वापरण्यासाठी टॅक्स आकारणारा लेबनॉन जगातील पहिला देश असू शकेल.

 

whatsapp mobile inmarathi
kawa-news.com

 

त्यांच्याकडे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या सत्रात, फोन वापरणार्‍यांनी जर दररोज व्हॉट्सऍप कॉल केला तर त्यांना त्यांचे शुल्क आकारण्याची शक्यता सांगितली आहे.

त्यातही त्यांनी सांगितलं की अशा नागरिकांना २० सेंट्स अशी किंमत मोजावी लागणारे. ही माहिती लेबनीजच्या माध्यमांनी दिली.

यापूर्वीच आर्थिक भ्रष्टाचारामुळे वाईट ठरलेल्या लेबनॉनच्या सरकारला यापासून २१६ दशलक्ष डॉलर्स इतक वार्षिक उत्पन्न मिळू शकेल, असा तिथल्या अधिकार्‍यांचा अंदाज आहे.

जगात जिथे आधीपासूनच मोबाइलचे दर सर्वात महाग आहेत अशापैकी एक असलेल्या या देशात व्हॉट्सऍप फोन कॉल केल्यास कर भरावा लागणार हे कळल्यावर लोक संतप्त झाली.

इतकच नाही तर तिथे असलेल्या एका लेबनीज गायकाने त्याच नाव राघेब अलामा यांनी या प्रस्तावावर टीका केली आणि राजकारण्यांना “लोक श्वास घेतात त्या प्रदूषित हवेवर कर लावा” अस आव्हान केल.

डॉलरची कमतरता आणि संभाव्य दरवाढीच्या भीतीपोटी गेल्या महिन्यात वाढत्या कठीण परिस्थितीत शेकडो लोकांनी रविवारी बेरूतमध्ये निषेध नोंदविला.

लेबनीजचे झेंडे हातात घेऊन साधारण ५०० लोक यापूर्वी मध्यवर्ती असलेय बेरूतच्या शहीद चौकात सरकार आणि संसदेच्या जागांवर कूच करण्यासाठी जमले होते.

 

whatsapp protest inmarathi
pri.org

 

त्यांनी अनेक प्रकारे बंड पुकारला. तिथल्या सिक्युरिटी गार्ड्स बरोबर हातापाई केली.

ते अजूनही म्हणतायेत हा आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. आणि “सरकार चोर आहे. आम्ही उपाशी आहोत” असे नारे जोरजोरात लाखो लोक रोज देतायेत.

जवळपास, मोटारसायकलींवरील डझनभर तरुणांनी रेडक्रॉस रस्त्यावरून फिरविला आणि टायर पेटवून दिले, त्यातील काहींनी होर्डिंग फोडून वाढत्या आगीमध्ये फेकले.

जगातील सर्वात जास्त कर्जदार असलेल्या एका देशातील आर्थिक संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे या निषेधाला चालना मिळालीये.

लोकांच्या या रागाचा फटका सगळ्यात जास्त बसलाय बँकांना.

कारण ते बँकांमध्ये पेट्रोलचे बॉम्ब फेकून नुकसान करतायेत. कारण या बँक नागरिकांना त्यांच्या आर्थिक संकटाच्या काळात बँकेत जमा असलेला त्यांचा पैसा काढू देत नाहीयेत.

 

lebanon whatsapp tax inmarathi
fastcompany.com

 

लोकांनी इनवेस्टमेंट म्हणून ठेवलेला पैसा आता त्यांच्याच हातातून जायची वेळ आलीये. करप्शन आणि अव्यवहारिक योजना यांच्यामुळे बँक मधला पैसा गेलाय.

तर या सगळ्या परिस्थितिमुळे तुम्हाला कळलं असेलच की हा देश आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या रसातळाला गेलाय. आणि त्यातही या व्हॉट्सऍप बंद प्रकारामुळे आता तिथले नागरिक अधिकच भडकलेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?