जगभरात गाजलेल्या मालिकेसमोर भारतीय हिंदू महाकाव्यं कशी उठून दिसतात पहा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
===
“ही सिरीयल तर काय, त्याची कॉपी आहे” हे वाक्य आपण सर्रास वापरत असतो. कारण, मधल्या काळात भारतात बनलेल्या काही सिरियल्स किंवा त्याचे पॅटर्न हे हॉलीवूड च्या एखाद्या सिरीज वर बेतलेलं असणं हे आपण खूप दा बघितलं आहे.
याचं उदाहरण म्हणजे ‘बिग ब्रदर’ या शो च्या फॉरमॅट वरून त्याच कंपनी ने त्या सिरीयल चं सुरू केलेली भारतीय आवृत्ती म्हणजे ‘बिग बॉस’. ज्याचे आपण तेरा सिजन्स बघितले आहेत.
या व्यतिरिक्त हॉलीवूड च्या सिनेमाच्या कथेचा धागा पकडून हिंदी सिनेमाची कथा लिहिली जाणं ही गोष्ट आपल्यासाठी काही नवी नाहीये.
पण, आज आम्ही असं एक उदाहरण घेऊन आलो आहोत ज्यामध्ये आपल्या भारतीय पौराणिक कथांची साम्य हॉलीवूड च्या एका टेलिव्हिजन सिरीज मध्ये तंतोतंत आढळली आहे.
गरज आहे ते साम्य आपण मान्य करायची.
भारतीय महान ग्रंथ ‘महाभारत’ चे साम्य आपल्याला अमेरिका आणि जगभरात प्रचंड क्रेझ असलेल्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’ (GOT) मध्ये पहावयास मिळेल.
महाभारतात ज्या पद्धतीने सतत आपली रणनीती बदलणारे लोक आणि घटना आपण बघितल्या, जसं मानापमान नाट्य बघितलं, शौर्य बघितलं, युद्ध या सगळ्या गोष्टी आपल्याला गेम ऑफ थ्रोन्स मध्ये बघायला मिळतात.
ज्या लोकांना भारतीय mythology चं थोडं जरी ज्ञान असेल त्यांना GOT मधील घटना बघताना साम्य जाणवेल.
हे साम्य एक दोन नाही मुद्यांपुरतं सीमित नसून हे दहा मुद्दे आहेत जे की या दोन्ही ग्रेट सिरीज मधील साम्य अधोरेखित करतात:
१. Jon Snow आणि कर्ण :
कर्ण आणि Jon Snow हे सारखे पत्र आहेत. कारण, दोघंही प्रतिष्ठित कुटुंबात जन्म घेतलेले आहेत आणि दोघंही आयुष्यभर दुर्दैवी आहेत आणि त्यांचा जन्म हा नेहमीच अनौरस असा मानण्यात आलेला आहे.
दोघेही खूप हुशार आहेत आणि शाही परिवारातले आहेत. पण, ते जो मान त्यांना मिळायला हवा तो त्यांना शेवटपर्यंत कधी मिळालाच नाही.
२. Joffrey Baratheon आणि दुर्योधन :
हे दोघेही सारखेच उद्धट पात्र आहेत. दोघांनीही एका राजकुमारीचं आयुष्य बरबाद केलं ज्यांना की त्यानंतर आयुष्यभर त्यांच्या सोबत घडलेल्या घटनांबद्दल सहानुभूती मिळत राहिली.
त्यांच्यात एक वेगळीच विध्वंसक बुद्धी आहे आणि बोलण्या वागण्याचे अजिबात मॅनर्स नाहीयेत.
३. शकुनी आणि Littlefinger:
हे दोन्ही पात्र अत्यंत हुशार आहेत. पण, दोघांचीही हुशारी ही कायम नकारात्मक गोष्टी करण्यासाठी वापरताना दाखवण्यात आलं आहे.
दोघांचीही इच्छा एका कुटुंबाला धोका देणे आणि युद्ध घडवून आणणे हीच कायम दाखवण्यात आली आहे.
कोणतंही काम करण्यापेक्षा राजकारण करण्यात शकुनी आणि Littlefinger यांची ही सवय हा अगदी कॉमन गुण आहे.
४. गांधारी आणि Cersai :
गांधारी हे पात्र म्हणजे महाभारतातील एक महत्वाचं पात्र म्हणून मानलं जातं. गेम ऑफ थ्रोन्स मध्ये गांधारी शी मिळतं जुळतं पात्र म्हणजे Cersai.
जी की आपल्या मुलांचा जीव वाचवण्यासाठी काहीही करायला तयार असते.
गंधारी सुद्धा आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार असते आणि तसं न घडल्यावर ती कृष्णाला शाप द्यायला सुद्धा मागे पुढे बघत नाही.
५. Daenerys आणि द्रौपदी :
या दोन्ही पात्रांमध्ये स्वतः बद्दल प्रचंड मान आहे, महत्वकांक्षा आहे.
द्रौपदी हे जसं महाभारत घडण्यामागचं एक प्रमुख कारण मानलं जातं. तसंच Daenerys सुद्धा GOT या सिरीजचं प्रमुख पात्र मानलं जातं.
या दोन्ही पात्रातील अजून एक साम्य म्हणजे त्यातील एक म्हणजे ‘द्रौपदी’ ही अग्नितून जन्म घेतलेली आहे. तसंच, Daenerys ला आग सहन करण्याची शक्ती आहे.
६. अश्वत्थामा आणि Jamie Lannister :
हे दोघेही शूरवीर आहेत, एकनिष्ठ आहेत. पण, दोघंही शापित आहेत. हे दोघेही जन्मतः व्हिलन नाहीयेत.
पण, त्यांच्या आजूबाजुला अश्या काही घटना घडतात की, त्यांना तिथून पुढे कायम वाईट गोष्टींचीच साथ द्यावी लागते!
आणि सुरुवातीला एक साधं वाटणारं व्यक्तिमत्व कथा जशी पुढे सरकते तसे नकारात्मक दिशेने वाटचाल करताना आपल्याला पहायला मिळतात.
७. Lord Vayrs आणि शिखंडी :
ही दोन्ही पात्र अशी आहेत की ज्यांच्या सोबत कपट झालं आहे ज्याचा की त्यांना बदला घ्याचाच आहे. अजून एक साम्य हे की, दोघेही नपुंसक आहेत आणि तरीही त्यांना त्यांच्या या गोष्टीचा सुद्धा अभिमान आहे.
ज्यांच्या लक्षात नसेल त्यांना सांगतो की,
शिखंडी म्हणजे आदल्या जन्मीची ‘अंबा’ होती जिचा अपमान भीष्मांनी केला होता म्हणून ती परत शिखंडी म्हणून जन्म घेते आणि भीष्माला मारून आपल्या अपमानाचा बदला घेते.
८. कृष्ण आणि Tyrion Lannister :
हे दोघेही सर्वात जास्त हुशार आणि लोकप्रिय पात्र आहेत. या दोघांनी ही एक गोष्ट कायम गुलदस्त्यात ठेवली की ते नेमकं कोणाच्या बाजूने आहेत. हे दोन्ही पात्र स्त्रियांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.
जसं की, श्री कृष्णाने अर्जुन ला युद्धातून वाचवण्यासाठी बऱ्याच युक्त्या केल्या, तसंच Tyrion हे त्यांच्या शत्रू पासून वाचण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी केवळ आपल्या डोक्याच्या जोरावर करताना दिसतात.
९. घटत्कोच आणि Wildlings :
राक्षस वगैरे कायम शत्रूपक्षातच आपण बघत आलो आहोत. पण, या दोन्ही सिरीज मध्ये घटत्कोच हा राक्षस जसा पांडव म्हणजे चांगल्या लोकांच्या बाजूने लढताना आपण बघतो.
तसंच, Wildings हा सुद्धा चांगल्या लोकांच्या बाजूने लढताना आपण बघतो.
भीमाचा मुलगा असल्याने घटत्कोच ला मिळालेल्या काही सुपरपॉवर जसं की, स्वतःची उंची कमी जास्त करणे या क्षमतेमुळे हे दोघेही युद्धक्षेत्रातील महत्वाचे पात्र म्हणून कायम गणले जातात.
१०. Arya आणि एकलव्य :
Arya हे पात्र एक वेगळीच विद्या शिकताना तिचे डोळे हरवून बसते. एकलव्य हे सुद्धा पात्र त्याचा अंगठा गुरू दक्षिणेत समर्पित केलेलं पात्र आहे.
एकलव्य ला धनुर्विद्या शिकायची होती गुरू द्रोणाचार्य यांच्या कडून. पण ते नकार देतात म्हणून एकलव्य द्रोणाचार्य यांची मूर्ती ची स्थापना करून एकटाच धनुर्विद्या शिकतो आणि द्रोणाचार्य च्या कोणत्याही विद्यार्थ्यापेक्षा अधिक पारंगत होतो.
पण, द्रोणाचार्य ची इच्छा नव्हती. म्हणून, ते एकलव्य चा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून मागतात. तसंच Arya चे ही विद्या शिकताना डोळे जातात.
दोन्ही महान कलाकृती आहेत. तुम्हाला अजून कोणते साम्य दिसल्यास अवश्य आम्हाला कमेंट करून शेयर करा.
हा लेख केवळ ह्या दोन कथानाकांमधली साम्य तुमच्यासमोर ठेवायची इतकाच उद्देश असून त्यातून रामायण किंवा महाभारतासारख्या महान ग्रंथांमधल्या त्या पात्रांना चुकीच्या पद्धतीने मांडायचा अजिबात हेतु नाही!
जर तुम्हालाही ह्यामध्ये आणखीन काही साम्य किंवा बदल आढळल्यास कमेंट मध्ये जरूर कळवा!
अमेरिकेत राहणाऱ्या आपल्या मित्र, नातेवाईकांनी फक्त तिकडच्या वेब सिरीजचं, तंत्रज्ञानाचं कौतुक न करता कधी GOT च्या थीम चा उगम कुठे झाला ह्यावर सुद्धा कधी चर्चा करावी आणि त्याबद्दल भारतीयांना सांगावं.
भारतीय लोकांना ही गोष्ट खूप आवडेल.
===
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.