' मोबाईल विश्वात क्रांती आणणाऱ्या नोकियाने केलेल्या चुकांमधून प्रत्येक उद्योजकाने धडा घ्यायलाच हवा – InMarathi

मोबाईल विश्वात क्रांती आणणाऱ्या नोकियाने केलेल्या चुकांमधून प्रत्येक उद्योजकाने धडा घ्यायलाच हवा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

स्मार्टफोन आता प्रत्येकाच्या जीवनातील एक आवश्यक ‘गरज’ झाली आहे. दूरध्वनीच्या काळात फोनचा वापर केवळ संदेशवहनासाठी केला जात होता.

९० च्या दशकात एखाद्या घरात दूरध्वनी असणं सुद्धा मोठी गोष्ट समजली जायची. नंतर दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडत गेली. विना वायर उपकरणं शोधली गेली, अगोदर पेजर मग आला मोबाईल.

जेव्हा पहिला मोबाइल आला तेव्हा त्याचं स्वरूप बरंच अवाढव्य होतं आणि तो दिसायला ही विचित्र होता. त्या वेळी मोटोरोला कंपनीचे मोबाईल बाजारात उपलब्ध होते. त्याकाळी भारतात इंनकमिंग कॉल्स ला सुद्धा मिनिटाला किमान १८ रुपये खर्च यायचा.

पुढे २००० नंतर कॉल्स रेट कमी होत गेले आणि सामन्यांसाठी कॉलिंग दर आवाक्यात आला.

 

nokia inmarathi2
zeenews.com

 

इंटरनेट आधारित फोन जगात १९९६ च्या दरम्यान आला होता, परंतु भारतात तो सर्वसामान्यांपर्यंत येण्यासाठी बराच काळ जावा लागला.

सुरवातीला स्मार्टफोन क्षेत्रात संपूर्ण जगात मोटोरोला कंपनीचा दबदबा होता, परंतु नंतर नोकिया ने फोन बाजारात कब्जा केला. बाजारातील ४०% हिस्सा नोकिया ने व्यापला आणि कोणाच्या ध्यानी-मनी नसताना त्यांनी मोटोरोला मागे सुद्धा टाकलं.

त्यावेळी नोकिया काही तंत्रज्ञानाच्या दृष्टीने पुढारलेली कंपनी वैगेरे समजली जात नव्हती. १९९६ ला त्यांनी पहिला स्मार्टफोन बाजारात आणला होता. टच स्क्रीन मोबाईल चं स्वरूप त्यांनी २००० च्या आसपास तयार केलं होतं.

नंतर २००८-०९ पर्यंत नोकिया फोन्स चा दबदबा कायम होता. त्या वेळी त्यांचे नोकिया क्लासिक, N series फोन्स तुफान चालले. परंतु नंतर अँपल चा होत गेलेला उदय आणि सॅमसंग ने अँड्रॉइड वापरून आणलेल्या विविध टच स्क्रीन मोबाईल समोर नोकिया गायब झालं.

अर्थात नोकियाच्या या अपयशाला किंवा बाजारातून लुप्त होण्यासाठी अँपल किंवा सॅमसंग चं यश केवळ कारणीभूत नव्हतं. नोकियाच्या अपयशात कंपनी ने स्वतः केलेल्या अनेक चुका मुख्य कारण ठरल्या.

पाहुयात, की अशी कोणती कारणे होती की एक यशस्वी मोबाईल कंपनी अक्षरशः डबघाईला आली.

शक्तीची अवास्तव मोजणी

 

nokia inmarathi3
firstpost.com

 

नोकिया सुरवातीला मजबूत आणि टिकाऊ फोन साठी लोकप्रिय होतं. त्यांच्या हार्डवेयर ला तोड नव्हती. परंतु केवळ हार्डवेअर या एकाच बळाच्या आधारावर बाजारात टिकून राहणं कठीण होतं.

काळ बदलत होता आणि त्यानुसार बदलणं हे कुठल्याही व्यवसायासाठी आवश्यक गोष्ट असते. किंबहुना कुठल्याही धंद्यात अपयश येण्यामागे प्रमुख कारण हे काळानुसार आलेले बदल आत्मसात न करणे हेच असतं.

नोकिया हा मोठा ब्रँड होता परंतु स्मार्टफोन च्या बाजारात यायला त्यांनी बराच उशीर केला. त्यांनी त्यांच्या हार्डवेअरचं डिझाइन बदलण्यास नकार दिला. आहे त्या हार्डवेअरने आपण अँपल ला टक्कर देऊ शकू हा फाजील आत्मविश्वास त्यांच्यात होता.

स्वतःत बदल करण्यास दिलेला नकार हीच नोकियाच्या शेवटाची सुरवात होती. विंडोज कंपनी ची साथ लाभून सुद्धा नोकिया स्मार्टफोन्स क्षेत्रात उभारी घेऊ शकलं नाही.

अँड्रॉइड समोर विंडोज फार काही कमाल दाखवू शकलं नाही, परिणामी विंडोज ची ऑपरेटिंग सिस्टिम डेस्कटॉप, लॅपटॉप साठी जरी लोकप्रिय ठरली तरी फोन साठी सपशेल अपयशी ठरली.

कंपनी जेव्हा नवीन उच्च तंत्रज्ञानाचं महत्त्व समजून घेण्यास अपयशी ठरते त्या कंपनीचा प्रवास उलट्या बाजूने सुरू होतो.

उदाहरण घ्यायचं, तर २००७ ला जेव्हा आयफोन बाजारात आला त्यावेळी नोकिया ची ‘ई सिरीज’ जोरात होती. परंतु कंपनीने स्मार्टफोन क्षेत्रात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष केलं.

त्याचवेळी सॅमसंग ने मात्र हा बदल टिपला आणि स्वतःच्या उत्पादनात कुशलतेने आमूलाग्र बदल घडवून आणला.

 

नोकिया- मायक्रोसॉफ्ट डील

 

nokia inmarathi
businesstech.co.za

 

नोकियाच्या इतिहासात अजून एका अपयशाची नोंद झाली ती म्हणजे नोकिया- मायक्रोसॉफ्ट डील! सिंबियन ऑपरेटिंग सिस्टिम वर आधारित मोबाईल नोकिया उत्पादित करत गेलं.

जेव्हा मायक्रोसॉफ्ट सोबत करार केला गेला तेव्हा कुठे ऑपरेटिंग सिस्टिम बदलण्यात आली. परंतु तोपर्यंत बराच उशीर झालेला होता. iOS आणि अँड्रॉइड यांनी बाजाराची नाडी बरोबर ओळखली होती.

२००२ मधे नोकिया ने सिमबियन ६० सिरीज वाले फोन्स बाजारात आणायला सुरुवात केली. जे २००८ पर्यंत बाजारात बऱ्यापैकी दबदबा ठेवून होते.

अँपल आणि अँड्रॉइड ऑपरेटिंग यंत्र प्रणाली ने २००८ पासून वेगाने स्वतःत बदल घडवून आणला. दुसरीकडे सिमबियन मात्र आपला युजर इंटरफेस आकर्षक बनवू शकली नाही.

त्यानंतर विंडोज वर विश्वास ठेवून नोकिया ने सर्वात मोठी चूक केली.

 

नोकिया ब्रँड च्या डावपेचांचे अपयश

नोकिया एकाच छताखाली फोनचे विपणन करण्यात अपयशी ठरला. ज्याप्रमाणे अँपल ने आयफोन एका छत्री खाली आणून प्रत्येक मॉडेल दरवर्षी बाजारात आणला. सॅमसंग ने सुद्धा गॅलक्सी एस सिरीज काढून अँपल च्या पावलावर पाऊल ठेवलं.

 

samsung inmarathi
pocketlint.com

 

नोकिया ने N सिरीज काढली होती परंतु त्यात आवश्यक बदल न केल्यामुळे त्याचा विचका झाला.

अँपल दरवर्षी ठराविक महिन्यात आयफोन सिरीज मधील नवीन मॉडेल बाजारात आणते. सबंध वर्षभर अँपल कंपनी बाजारात येणाऱ्या नवीन फोन विषयी चर्चा, कुतुहुल निर्माण करते.

ग्राहकांच्या अपेक्षा वाढतात आणि आगामी फोन विषयी सगळीकडे उत्सुकता निर्माण होते. या सर्व डावपेचात नोकिया सपशेल अपयशी ठरलं.

 

विक्रीत झालेली प्रचंड घट

 

nokia inmarathi4
astore.in

 

२००९ मधे नोकियाच्या अपयशापूर्वी कंपनी चा, मोबाईल बाजारपेठत ३८.६% इतका हिस्सा होता. २०१४ पर्यंत मात्र परिस्थिती बदलून गेली. सॅमसंगने नोकियाचं मार्केट हळू-हळू पादक्रांत करायला सुरुवात केली.

३.३% वरून त्यांनी आपला बाजारातील हिस्सा ५ वर्षांत २३% पर्यंत वाढवला! बाकी नंतर जे झालं तो इतिहास आहे.

 

तंत्रज्ञानाचा तुटलेला संपर्क

 

कुठल्याही कंपनीला नवीन तंत्रज्ञान आणि त्या द्वारे निर्माण होणाऱ्या नवीन व्यावसायिक संधीं कडे बारीक नजर ठेवणे अत्यावश्यक असते. कदाचित याच संधी भविष्यात व्यवसायाची दिशा बदलू शकतात.

एकदा यश मिळू लागल्यावर कंपनीचे लक्ष केवळ स्वतःची उलाढाल आणि यश यादरम्यानच सीमित होऊन गेलं. नवीन संकल्पना आणि वाढीकडे नोकिया च दुर्लक्ष होत गेलं.

त्यांनी Nokia Ventures Organisation च्या माध्यमातून नवीन संधींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. हे नवीन संधी, तंत्रज्ञान निर्माण करण्याचं एक सर्वसमावेशक धोरण होतं.

याच माध्यमातून नोकिया ने अनेक नवीन तंत्रज्ञान शोधले आणि त्याचं व्यवसायात रूपांतरण सुद्धा केलं. Internet of things(IOT) च्या वापराने त्यांनी काही नवनवीन संकल्पना शोधून काढल्या होत्या.

कदाचित जग या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी तयार नव्हतं. अभ्यासकांच्या मते, नोकिया च्या संकल्पना ह्या काळाच्या बऱ्याच पुढे होत्या. परंतु वर्तमानात ज्या टेक्नॉलॉजी ची मागणी आहे त्याकडे त्यांचं सपशेल दुर्लक्ष झालं.

 

चुकीचे ठरलेले निर्णय

 

nokia inmarathi5
slideshare.com

 

कुठल्याही अपयशात असलेलं हे नेहमीचं कारण या कथेत सुद्धा आलं. नोकिया लाखोत फोन्स विकत होतं. त्यावेळी अँपल आयफोन च्या डिझाइन मध्ये व्यस्त होतं. त्याचवेळी गुगल ने अँड्रॉइड ऑपरेटिंग प्रणाली आणली.

गुगल च्या प्रमुखांनी Open Handset Alliance स्थापन करून प्रमुख मोबाईल कंपन्यांना फोन साठी एक सामायिक प्रणाली विकसित करण्याचं आवाहन केलं. ही ऑपरेटिंग सिस्टिम सर्व कंपन्यांना उपलब्ध होती.

परंतु नोकिया ने या समूहात सहभागी होण्यास चक्क नकार दिला! याचा परिणाम केवळ दोन वर्षात दिसून आला. नोकिया ची विक्री तळ गाठू लागली, संपूर्ण साम्राज्य पत्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळले.

 

ब्रँड ची खासियत

प्रत्येक ब्रँड ला आपली बाजारात काय किंमत आहे ह्याची जाणीव असणं आवश्यक असतं. ग्राहकांच्या दृष्टीने तुमच्या उत्पादनात कुठली महत्त्वाची गोष्ट आहे हे कंपनीला माहीत असावं लागतं. थोडक्यात सांगायचे, तर प्रत्येक ब्रँड ला आपली एक खासियत निर्माण करावी लागतेच.

आयफोन या बाबतीत बऱ्यापैकी स्पष्ट होतं “अँपल फॅमिली” च्या माध्यमातून त्यांनी बाजारात आपलं एक महत्त्व निर्माण केलं होतं.अँड्रॉइड च्या वापराने सॅमसंग आणि इतर मोबाईल कंपन्या सुद्धा भरारी घेण्यास सिद्ध होत्या.

 

apple iphone InMarathi

 

परंतु नोकिया च्या बाबतीत असली कुठलीही खास बात नव्हती. त्यांनी कॅमेरा च्या माध्यमातून निरनिराळे प्रयोग केले पण तोपर्यंत बाजारात बऱ्याच कंपन्या आल्या होत्या.

प्रतिस्पर्धी कंपन्यांची संख्या वाढली होती. या सर्वांमध्ये नोकिया चं स्वतःच असं खास वैशिष्ट्य काहीही नव्हतं. त्यामुळे इतर कंपन्यांच्या उत्पादनांना मागे टाकेल असं कौशल्य नोकिया च्या फोन्स मध्ये नव्हतं.

 

बदलांकडे केलेलं दुर्लक्ष

 

mobile phone shape06-marathipizza
iywlovelove.blogspot.in

 

नोकियाचं व्यवस्थापन, मोबाईल विश्वात हार्डवेअर चं महत्त्व कमी होऊन सॉफ्टवेअर चं वाढत चाललेलं महत्त्व वेळीच ओळखू शकले नाहीत.

बदलणारे सॉफ्टवेअर ट्रेंड्स वापरून नवनवीन अप्लिकेशन बनवण्याचा जमाना आला होता. नोकिया कडे दुर्दैवाने या परिस्थितीत आवश्यक असणारे स्किल्स नव्हते, ना ही त्या दिशेने प्रयत्न करण्याची इच्छाशक्ती!

 

मोबाईलच छोट्या संगणकात न केलेलं रूपांतरण

 

mobile inmarathi
theashaleader.com

 

अँपल आणि गुगल ने परिपूर्ण मोबाईल्स बाजारात आणले. आपल्या फोन्स ची जाहिरात करताना ते एखाद्या संगणकाचं छोटं स्वरूप असल्याचा प्रचार ह्या कंपन्या करायच्या.

खरोखरच त्यांचे मोबाईल एखादा संगणक करू शकेल ती सर्व कामं करू शकत होता- HD व्हिडिओ पासून ते थ्री डी गेम्स पर्यंत सर्वकाही हातातल्या मोबाईल मध्ये समाविष्ट होतं.

या बाबतीत नोकियाच नाही तर ब्लॅकबेरी सुद्धा बदल आत्मसात करण्यास अपयशी ठरली. अगदी आज सुद्धा स्मार्टफोन्स म्हणजे छोटा संगणक समजून घेण्यात या कंपन्या कमी पडल्या.

 

चुकीच्या निर्णयावर अतोनात खर्च

 

dollar inmarathi
pinterest.com

 

वॉल स्ट्रीट जर्नल च्या अनुसार ,नोकिया च्या संशोधन आणि विकसन (R &D) विभागाचा खर्च ४० बिलियन अमेरिकी डॉलर होता. परंतु त्यांचे तथाकथित संशोधन कधी उत्पादनाच्या स्वरूपात बाजारात आलंच नाही.

कंपनीच्या अंतर्गत हेव्या दाव्यांनी कंपनीची अजून वाताहत झाली.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?