आयडियॉलॉजी काही का असेना, प्रत्येक राजकीय पक्षाने रामराज्यातील या गोष्टी आत्मसात करायलाच हव्यात
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून राज्यकर्ते ह्या नावाखाली एकदम सावळा कारभार सुरू आहे. सत्ता हे एकच उद्दिष्ट ठेऊन निवडणूका लढविल्या जातात आणि साम दाम दंड भेद सगळे वापरून जिंकल्या जातात.
प्रसंगी कार्यकर्ते, आमदार खासदार फोडले जातात,आणि येन केन प्रकारे सत्ता मिळविली जाते. वर्षानुवर्षे हा प्रकार चालू आहे व तो आज ही आहे.
पुन्हा एकदा सत्ता हातात आली की धर्मराज्य, सामाजिक न्याय, अहिंसा, गरिबी निर्मूलन, सुरक्षा ह्या शब्दांचा आपसूक विसर पडतो व फक्त पैसा कसा मिळविता येईल आणि सत्ता काशी टिकवून ठेवता येईल ह्याचाच विचार पुन्हा सुरू होतो.
भारतात आज स्त्री वरील अत्याचाऱ्याच्या अनेक घटना आपल्याला ऐकायला मिळतात पण रामायणात ह्या विरोधात कडक कायदे होते. किंबहुना सीतेच्या सन्मानासाठी पूर्ण रामायण झाले.
शूर्पणखेचे गर्व हरण करताना सुद्धा कुठेही मर्यादेचे उल्लंघन झाले नाही, आज कालच्या राज्यकर्त्यांनी मूलभूत कायद्यात ह्या संदर्भात बदल करणे आवश्यक ठरते.
भारतीय संस्कृतीत रामराज्य हे आदर्श मानले जाते. राज्य कसे करावे, लोकशाही कशी असावी, राजा कसा असावा, ह्या सगळ्यांचे आदर्श रूप रामायणात मिळते.
महर्षी वाल्मीकींनी ह्या बाबत रामराज्य कसे होते हे सविस्तर लिहून ठेवले आहे.
जाणून घेऊया या लेखात रामराज्यापासून आजच्या राज्यकर्यांनी कोणत्या गोष्टी शिकाव्या!
१. राज्यकारभार कसा असावा –
रामराज्य हे लोकशाही चे आदर्श उदाहरण आहे. रामायणात सध्याच्या लोकशाहीतील प्रत्येक समस्येचे उपाय सापडतात.
रामायण आपल्याला सांगते की, रामराज्यात लोकांमध्ये कुठे ही दारिद्र्य, दुःख, वेदना, रोगराई, जातपात, वर्णभेद, भेदभाव नव्हता. आज आपण खुशाल मोठे पणाने अठरा पगड जातींमध्ये विभाजन
करतो.
महर्षी व्यास लिहितात,
पर्यदेवन्विधवानवाचव्यालक्रूतंभयम..!
नव्याधिजंभयन्वापिरामेराज्यमप्रशासती..!!
“जेव्हा राम राज्य करीत होते तेव्हा सर्व प्रजा आनंदी होती, कुठेही वैधव्यविलाप नव्हता, हिंस्र श्वापदांचे, रोगराईचे भय नव्हते.
सर्वलक्षण संपन्ना:सर्वधर्म परायणाः!
२. परराष्ट्र धोरण –
रावणाचा वध केल्यानंतर रामाने लंकेला वाऱ्यावर सोडले नाही. रामाचे रावणाशी वैर होते, लंकेशी नाही. बिभीषणाला राज्याभिषेक करून, लंकेशी घडी व्यवस्थित बसवून मग राम अयोध्येला पोचले.
किष्किंधा नगरीच्या बाबतीत ही तेच. बाली च्या वधानंतर सुग्रीव चा राज्याभिषेक करून किष्किंधा सुदृढ केली तसेच वाली पुत्र अंगद चे ही पुनर्वसन केले.
अश्या अयोध्येच्या आजूबाजूची अनेक उदाहरणे सापडतील. ह्यावरूनच आजच्या राज्यकर्यांनी परदेश धोरण कसे असावे ह्याचा बोध घ्यावा!
३. बंधुप्रेम –
काल परवा आपण औरंगाबाद येथील बहीण भावाच्या हत्येची बातमी वाचली असेल. वाचून मन सुन्न झालं.
रामायणात राम, लक्ष्मण आणि भरत यांनी बंधुभाव अतिशय योग्य पद्धतीने निभावलेला आहे. रामाने वडिलांचे वचन पाळले. भरताने सिंहसनाचा त्याग केला आणि राम परत येईपर्यंत वनात राहून कारभार केला.
शेषावतार लक्ष्मण स्वतः रामासोबत वनवासात गेले. हे असे बंधुप्रेम आज क्वचितच पाहायला मिळते.
४. गुप्तहेर खाते –
रामराज्यात प्रभू श्रीरामाचे गुप्तहेर खाते एकदम बळकट होते. प्रजेच्या राज्याकडून काय अपेक्षा आहेत, शेजारील देशांचे राजे काय डावपेच आखतायेत ह्याची इत्यंभूत माहिती रामाकडे होती.
युद्ध कांडात महर्षी वाल्मिकी म्हणतात –
रामाने वानर सैन्य जेव्हा लंके कडे कूच करायला निघाले तेव्हा सर्वात पुढे अंगद ला निवडक सैन्या सह लक्ष ठेवण्यास पाठविले, जेणेकरून दगा फटका झाल्यास मूळ सैन्याला लगेच माहिती मिळून सावध होता येईल.
५. कारभार (गव्हर्नन्स) –
राज्य कोण करतो ह्या पेक्षा राज्य कसे केले जाते ह्याला जास्त महत्व आहे. राज्यकर्त्यांची प्रत्येक कृती ही प्रजेच्या कल्याणप्रित्यर्थ असावी.
राजा ज्या राजधर्माचे पालन करून नियम आखून देतो त्याचे प्रजेने पालन केले पाहिजे..
मुखिआमूखूसोचाहीऐखानपानकहुँएक
पालइपोषइसकलअंगतूलसिसहीतभिबेक..!!
६. सत्तेपासून अलिप्तता –
रामायणातील एक प्रसंग अतिशय भावनिक आहे, जेव्हा भरत अरण्यात रामाची समजूत काढून राज्य करायला विनंती करतो.
वाल्मिकी, महाराज जनक, कौसल्या माता, सुमित्रा माता सगळ्यांनी सांगून पाहिले पण प्रभू श्रीराम आपल्या वाचनापासून बधले नाहीत.
आपल्या वडिलांना दिलेले वचन त्यांनी पाळले. सत्ता त्यांना ह्या वाचनपूर्ती पासून रोखू शकली नाही. हा प्रसंग पाहताना सगळ्यांच्या अंगावर काटा उभा राहील असेल..
प्रभू श्रीराम इथे भरत ची समजूत काढताना म्हणतात,
गुरुपीतुमातूस्वामीसुखपले
चलेंहुकूमगपगपरनहीहीनखाले..!!
जो आपल्या आई वडील, वडीलबंधु, गुरू ह्यांनी सांगितलेल्या योग्य सल्ल्या चे पकलं करतो त्याला नेहमीच यश येईल!
आजकालचे राज्यकर्ते स्वतः आमदार आहेत, वर बँकेचे चेयरमन आहेत, दूध डेअरी चे अध्यक्ष आहेत, सहकारी कमिटीचे अध्यक्ष आहेत, एवढे कमी की काय म्हणून साखर कारखान्याचे पण अध्यक्ष आहेत.
रामासारखी वचनपूर्ती हे लोक करतील का? सत्तेपासून अलिप्त राहतील का? लोक कल्याणास्तव जगतील का?
७. सामाजिक न्याय निवाडा –
सामाजिक न्याय निवाडा राम राज्यात आदर्श घेता येईल असा होता. सत्याची शहानिशा करून लगेच न्याय होत असे.
न्याय करताना गुन्हेगाराला शासन तर व्हायचेच पण त्याच सोबत असे पुन्हा होणार नाही ह्यासाठी समाजात सुधारणा केली जायची. समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत न्याय पोचत असे.
न्याय करताना श्रीमंत गरीब असा कुठलाही भेदभाव केला जात नव्हता. रामायण आपल्याला वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात कसे वागावे ह्याचा आदर्श घालून देते.
आजकालच्या राजकर्त्यांनी ह्या धड्यांचे पालन केल्यास नक्कीच भारत एक आदर्श लोकशाही देश बनेल ह्यात शंका नाही.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.