चित्रपट बघण्यासाठी थिएटरला जाण्याऐवजी घरबसल्या बघता येतील हे चित्रपट!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
हे वर्ष खऱ्या अर्थाने बदल घेऊन येणारं ठरत आहे. प्रत्येक क्षेत्रात बदल होत आहेत किंबहुना ते करावे लागत आहेत. वर्षाच्या सुरुवातीला कोणाला वाटलं नसेल की इतके सगळे बदल या एकाच वर्षी होणार आहेत.
शाळा ऑनलाईन झाल्या आहेत, किती तरी लोकांचं वर्क फ्रॉम होम सुरू आहे. कोरोना चा प्रादुर्भाव वाढल्यापासून social distancing हा एक नवीन शब्द प्रत्येकाच्या शब्दकोशात समाविष्ट झालाय.
मागील तीन महिन्यात अचानक ऑनलाईन कुकिंग शो बघणाऱ्यांची संख्या ही चौपट वाढली आहे. एके काळी चैनीची गोष्ट वाटणाऱ्या ‘इंटरनेट’ चा अत्यावश्यक गोष्टींमध्ये समावेश झाला.
वृत्तपत्र घरी येणं बंद झालं, मोबाईल वर पेपर वाचणं ही कॉमन गोष्ट झाली. शॉपिंग मॉल्स आणि थिएटर बंद झाली आणि ऑनलाईन वेबसिरीज आणि सिनेमा घरी बसूनच बघणं हे लोकांना आवडायला लागलं.
OTT प्लॅटफॉर्म सर्व निर्मात्यांना, प्रेक्षकांना आकर्षित करू लागलं. एकेकाळी रांगेत उभं राहून सिनेमाचे तिकीट काढलेले आपण आज घरी बसल्या सिनेमा चा फर्स्ट डे, फर्स्ट शो सहजपणे बघू लागलो.
या आधी पण सिनेमा ऑनलाईन रिलीज झालेले आहेत. पण, या लॉकडाऊन च्या काळात रिलीज झालेला ‘गुलाबो सिताबो’ हा अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला सिनेमा खऱ्या अर्थाने ‘ट्रेंड सेटर’ ठरणार आहे हे आता स्पष्ट झालंय.
कारण, या सिनेमा पाठोपाठ अजून ७ चित्रपट या रांगेत येऊन उभे राहिले आहेत जे की सर्वात पहिल्यांदा OTT प्लॅटफॉर्म वर रिलीज होणार आहेत. या सिनेमांबद्दल जाणून घेऊया:
१. Ludo:
अभिषेक बच्चन, आदित्य रॉय कपूर, राजकुमार राव, फातिमा सना शेख आणि सानिया मल्होत्रा अशी मोठी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा ‘अमेझॉन प्राईम’ वर लवकरच रिलीज होणार आहे.
अनुराग बासू हे या सिनेमाचे दिगदर्शक आहेत. ‘लाईफ इन अ मेट्रो’ प्रमाणेच हा सिनेमा सुद्धा चार वेगवेगळ्या कथा दाखवणारा असेल. या कथा एकमेकांसोबत कशा कनेक्ट होतील हे पाहणं औत्सुक्याचं असेल.
२. लक्ष्मी बॉम्ब:
अक्षय कुमार चा हा सिनेमा तमिळ सिनेमा ‘कांचना’ चा रिमेक आहे. रमजान ईद च्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होणार होता. पण, कोरोना मुळे या सिनेमाचं प्रदर्शन लांबलं आहे. हॉरर कॉमेडी या जॉनर मध्ये मोडणारा हा सिनेमा असेल.
राघव लॉरेंस हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. डिस्नी + हॉटस्टार या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर हा सिनेमा काही दिवसात रिलीज करण्यात येणार आहे.
या सिनेमात अक्षय कुमार सोबत कियारा अडवाणी, तुषार कपूर, शरद केळकर आणि अश्विनी काळसेकर ह्यांच्या सुद्धा भूमिका आहेत.
३. झुंड:
अमिताभ बच्चन यांचा हा अजून एक सिनेमा अमेझॉन प्राईम वर सर्वात पहिल्यांदा पहायला मिळणार आहे. नागराज मंजुळे यांनी हा सिनेमाचं दिगदर्शन केलं आहे.
‘सैराट’ आणि ‘नाळ’ सारख्या यशस्वी आणि संवेदनशील चित्रपटानंतर सगळे प्रेक्षक नागराज मंजुळे यांच्या या चित्रपटाकडे डोळे लावून बसलेले आहेत. विजय बारसे या समाज सुधारकाच्या जीवनावर हा सिनेमा आधारित आहे.
त्यांनी स्लम सॉकर ही एक संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जवळपास दहा हजार मुलांचं आयुष्य बदललं आहे.
या सिनेमात सुद्धा प्रेक्षकांना आर्ची आणि परश्या म्हणजेच रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची जोडी हे एकत्र बघायला मिळणार आहेत.
४. शकुंतला देवी:
विद्या बालन ची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा मानवी calculator म्हणून प्रसिद्ध असलेल्या शकुंतला देवी यांची स्टोरी आहे. जिशु सेनगुप्ता, सान्या मल्होत्रा आणि अमित साध हे सुद्धा यांचे सुद्धा या सिनेमात महत्वाचे रोल आहेत.
गणितातील कोणत्या प्रश्नाचं तोंडी उत्तर देऊ शकणाऱ्या शकुंतला देवी म्हणजे ग्रेट व्यक्तिमत्व. १९८२ मध्ये त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सामील झालं आहे.
त्यांनी बरीच पुस्तकं सुद्धा लिहिली आहेत. हा सिनेमा सुद्धा आपण अमेझॉन प्राईम वर बघू शकणार आहोत.
५. मिमी:
मराठी सिनेमा ‘मला आई व्हायचंय’ याचा हा हिंदी रिमेक आहे. कृती सनॉन, पंकज त्रिपाठी, सई ताम्हणकर, मनोज पाहवा, सुप्रिया पाठक कपूर ही या सिनेमाची स्टारकास्ट आहे.
लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शनात तयार होणारा हा सिनेमा सरोगेट मदर या विषयावर भाष्य करणारा असणार आहे.
हिंदी प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून पटकथेत काही बदल केले जातील. हा सिनेमा डिस्ने + हॉटस्टार या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर रिलीज करण्यासाठी चर्चा सुरू आहेत.
६. खाली पिली:
‘टॉक्सिवाला’ या तेलगू सिनेमा चा हिंदी रिमेक असणार आहे. ‘टारझन द वंडर कार’ या हिंदी सिनेमासारखं कथानक आहे असं म्हणता येईल.
ईशान खट्टर, अनन्या पांडे आणि जयदीप अहलावत ही स्टारकास्ट असलेला हा सिनेमा म्हणजे एका टॅक्सी ड्रायव्हर ची स्टोरी आहे, ज्याच्या आयुष्यात एक बोलणारी टॅक्सी येते आणि तिथून सिनेमाच्या कथानकाला एक कलाटणी मिळते.
७. गुलाबो सिताबो :
अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराणा यांच्या सारखे स्टार्स असलेला हा सिनेमा १२ जून ला अमेझॉन प्राईम वर रिलीज झाला आणि त्याला मिळालेल्या प्रतिसादाने हा ट्रेंड चालू राहेल असं दिसत आहे.
लखनऊ मधील एका हवेली चे मालक होऊ पाहणाऱ्या अमिताभ बच्चन आणि त्यांचा भाडेकरू आयुष्मान खुराणा यांच्यातील संघर्षाची ही कथा आहे.
आजूबाजूला असलेली माणसं महत्वाची की, हवेली सारखी एखादी वास्तू या विषयावर बोलणारा हा सिनेमा जरी संथ असला तरी त्याच्या OTT प्लॅटफॉर्म वरील रिलीज ने त्याला लोकांनी चर्चेत आणलं आहे.
८. गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल:
कारगिल युद्धात जखमी सैनिकांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवणाऱ्या पायलट गुंजन सक्सेना आणि श्रीविद्या राजन यांच्या साहस कथेवर हा सिनेमा आधारित आहे.
जान्हवी कपूर ची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा शरण शर्मा यांनी दिगदर्शीत केला आहे.
कारगिल युद्धात जखमी सैन्याला मेडिकल फॅसिलिटी देण्याचं सुद्धा काम गुंजन सक्सेना यांनी केलं होतं. या घटनेबद्दल भाष्य करणारा हा सिनेमा प्रेक्षकांना नक्की आवडेल असा या टीम ला विश्वास आहे.
Netflix वर हा सिनेमा आपल्याला लवकरच पहायला मिळणार आहे.
८. शिद्दत:
सनी कौशल यांनी दिगदर्शीत केलेला हा सिनेमा सुद्धा OTT प्लॅटफॉर्म वरच पहिल्यांदा रिलीज होणार आहे ज्याबद्दल निर्मात्यांमध्ये चर्चा अजून सुरू आहे.
राधिका मदन, मोहित रैना, डायना पेंटी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. कथानका बद्दल कोणती माहिती अजून हाती लागलेली नाहीये.
बदललेल्या या ट्रेंड ला दोन बाजू आहेत. एकीकडे ग्राहकांना घर बसल्या अगदी कमी खर्चात सिनेमा बघायला मिळणार, आपला टीव्ही म्हणजे थिएटर झाला आहे याचा आनंद असणार आहे. दुसरीकडे, मल्टिप्लेक्स मालक, तिथे काम करणारे कर्मचारी हे या निर्णयाने हवालदिल झाले आहेत.
कारण, इतक्या वर्ष त्यांनी सर्व परिस्थितीत चालू ठेवलेला त्यांचा व्यवसाय यापुढे कसा चालेल हा त्यांच्या समोर प्रश्न असणार आहे.
INOX या मल्टिप्लेक्स चैन ने ‘गुलाबो सिताबो’ च्या निर्मात्यांना याबद्दल पत्र लिहून नाराजी सुद्धा व्यक्त केली होती. पण, निर्माते तरी किती दिवस परिस्थिती बदलण्याची वाट बघणार हा सुद्धा एक प्रश्न आहे.
तोपर्यंत आपणही थिएटर मध्ये मिळणारे पॉपकॉर्न घरीच तयार करून हे सिनेमे बघत रहावे आणि या बदलत्या ट्रेंड चं साक्षीदार व्हावं इतकंच आपल्या हातात आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.