तब्बल २ महीने ‘चोरून’ नेटफ्लिक्स वापरणाऱ्या या मुलीचं ‘नेटफ्लिक्सनेच’ केलं कौतुक!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सध्या ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचा सगळीकडेच सुळसुळाट झाला आहे आणि या लॉकडाऊनच्या काळात तर त्यांची चांदीच झाली आहे!
सध्या सगळ्यांच्या मोबाइलमध्ये चांगल्या स्पीडचं नेट पॅक तसेच घरात वायफाय असल्याने हे ऑनलाइन व्हीडियोज बघणं अगदीच सोपं झालं आहे!
शिवाय लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी थिएटर्स सुद्धा बंद आहेत. त्यामुळे बरेचसे सिनेमे या प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्याचा पर्याय निवडत असल्याचं पाहायला मिळत आहे!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
अमिताभ बच्चन आणि आयुष्मान यांचा गुलाबो सिताबो या महिन्यात प्राइम वर रिलीज होणार आहे तर अक्षय कुमारचा हॉरर सिनेमा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा सिनेमा सुद्धा हॉटस्टार वर रिलीज होणार असल्याची बाहेर चर्चा आहे!
बरं या लॉकडाऊनमुळे व्हीडियो मिटिंग्स, क्लासेस, शाळांची लेक्चर्स सुद्धा सुरू झाल्याचे आपण बघितले असेलच!
शाळा सुरु होण्याची शक्यता नसल्याने, बऱ्याच शाळा, कॉलेज आणि ट्युशन-शिकवण्या यांनी ऑनलाइन लेक्चर्स चालू केली आहेत. मुलांनी एक सो एक शक्कल लढवून यापासून पाठ सोडवायला अनेक युक्त्या लढवल्या.
सोशल मीडियावर शेअर केल्या गेलेल्या गमतीदार व्हिडीओमध्ये आपण पाहिलंच असेल की कोणी जेठालाल क्लास अटेंड करत आहे तर कुठे बबिता.
एकाने तर कहर केलेला होता, युजर नेम ‘Reconnecting’ ठेवून कॅमेरा आणि व्हिडीओ ऑफ ठेवला अन भासवलेलं की इंटरनेट इश्यू आहे.
नंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना ही ट्रिक कळल्यानंतर अनेक सेम केसेस यायला लागल्यामुळे त्याचा भांडाफोड झाला होता.
आता तुम्ही म्हणाल याचा आणि लेखाचा संबंध काय? तर संबंध असा आहे, की अशीच कल्पना लढवून एका मुलीने तब्बल दोन महिने आपल्या एक्स-बॉयफ्रेंडचं नेटफ्लिक्सचं अकाऊंट वापरलं. ते सुद्धा फ्री!
प्रेम संबंध असले की आपआपली गुपित ही गुपित राहत नाहीत.
इंस्टा-फेसबुकचे पासवर्ड शेअर करणं,नेटफ्लिक्स अमेझॉन प्राईम सारख्या ओटिटी प्लॅटफॉर्मचे अकाउंट शेअर करणं यासारख्या गोष्टी होत असतात.
सध्या ट्विटरवर एक ट्विट खूपच व्हायरल होत आहे. युजर व्यक्तीने ट्विट करत आपल्या नेटफ्लिक्स अकाऊंटचा स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केला आणि त्याच्या भावाची एक्स गर्लफ्रेंड कशी दोघांना गंडवून त्यांचं नेटफ्लिक्स अकाऊंट वापरत आहे ते दाखवून दिलं.
या ट्विटची दखल खुद्द नेटफ्लिक्सने सुद्धा घेतली.
आधी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असल्या कारणाने आधी कधी युजर आयडी पासवर्ड शेअर झाला असेल.
पण संबंध तुटल्यानंतर त्या मुलीने आपल्या प्रोफाइलचं नाव ‘सेटिंग’ ठेऊन त्यावर बफरिंग किंवा लोडिंगचं सिमबॉल असलेला फोटो ठेवला.
बघायला गेलो तर ती एखादी सेटिंगच आहे असं प्रथमदर्शनी वाटेल.
युजर ट्विट मध्ये म्हणतो,
माझ्या भावाची एक्स गर्लफ्रेंड चोरी करून आमचं नेटफ्लिक्स अकाऊंट तब्बल दोन महिने वापरत आहे. मी अगदी वेडा झालो जेव्हा मला हे कळलं.
त्या सेटिंग नावाच्या प्रोफाइलला मी खरंच नेटफ्लिक्सची सेटिंग आहे असं गृहीत धरलं होतो. मी स्वतः याने खूप निराश झालो आहे.
स्क्रीनशॉटमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की नोमार नावाच्या प्रोफाइलच्या बाजूला सेटिंग आहे.
दिसताना ते सेटिंग सारखंच दिसत आहे आणि त्यावर टॅब केला असता की ती काही तरी एरर आल्यामुळे न उघडणारी सेटिंग असावी असा प्रत्यय यावा.
वर सांगितलेल्या ‘Reconnecting’ युजर आणि नेटफ्लिक्सवरची ही ‘सेटिंग’ वाली युजर जवळपास सारखेच गंडवण्यात यशस्वी झाले.
बरेचजण तिला ‘लेजेंड’ आणि ‘क्वीन’ म्हणत असताना, नेटफ्लिक्स ही ओटीटी स्ट्रीमिंग कंपनी देखील त्या मुलीच्या या कृत्याने प्रभावित झाली आणि ट्विट ला ‘Respect’ अशी कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली.
हे ट्विट व्हायरल होताच, अनेकांनी समान अनुभव शेअर केले. तर काहींनी समान ट्रिक वापरून असाच प्रयत्न केला आणि त्याचे पुरावे ऑनलाईन दिले.
या ट्विटने बऱ्याच जणांचं लक्ष त्याच्याकडे खेचून घेतलं आहे.
जवळपास १.७ लाख लाईक्स तर ५०,००० पेक्षा जास्त कमेंट या ट्विट वर आले आहेत. बघायला गेलो तर यात हॅकिंग चा प्रकार असा काही नाही आहे.
आपण निव्वळ सेटिंग, मोर, नेक्स्ट सारख्या टॅब कडे दुर्लक्ष करतो त्याचा फायदा त्या मुलीने घेतलेला दिसतो.
सामान्य असलेली ती टॅब एखादी प्रोफाइल असेल असे पहिल्यांदा पाहताना अजिबात वाटणार नाही. याच दुर्लक्षित केल्या गेलेल्या गोष्टींचा वापर काही स्वतःसाठी करून घेतात.
निव्वळ नजरेचा खेळ! सुरवातीला शंका येईल असं काही न वाटल्यामुळे त्या मुलीला दोन महिने नेटफ्लिक्स वापरता आलं.
अंततः ती नेटफ्लिक्सची सेटिंग नसून एक युजर प्रोफाइल आहे कळल्यावर त्याच्या डोळ्यावर पडलेली धूळ झटकली गेली आणि मुलीच पितळ उघडं पडलं!
तर, केवळ समोरच्याच्या हलगर्जीपणा किंवा दुर्लक्षामुळे मोठा गैरफायदा कसा घेतला गेला ते यावरून स्पष्ट होत.
मोठा यासाठी की लॉक डाऊन च्या या काळात नेटफ्लिक्सचं अकाउंट दोन महिने फ्री मध्ये वापरायला मिळणं काही साधी गोष्ट नव्हे.
यावरून आता सगळेच नेटफ्लिक्स वापरणारे सावध होतील, काही लोकं ही ट्रिक पुन्हा करायचा प्रयत्न सुद्धा करतील! पण आता ही ट्रिक बाहेर आल्यामुळे असं फुकट चोरी करून अकाऊंट वापरणं शक्य होणार नाही!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.