“असं काहीतरी” केल्याशिवाय यश मिळणं अशक्यच! “या” कलाकारांकडून मिळतो मौल्यवान धडा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
“माझा संघर्ष हा खूप कठीण होता” असं म्हणायची खूप लोकांना सवय आहे. आपण ज्या क्षेत्रात काम करत नाही ते क्षेत्र आपल्याला नेहमीच सोपं वाटत असतं.
याचं एक उदाहरण म्हणजे बॉलीवूड चे कलाकार. सामान्य माणसाला दिसतो तो फक्त त्यांना मिळणारा पैसा, प्रसिद्धी.
कोणत्याही कलाकाराने यशाच्या शिखरावर पोहोचण्याआधी किती संघर्ष केला आहे आणि विना संकोच किती वेगवेगळी कामं केली आहेत याबद्दल फार कमी वेळेस बोललं जातं.
मागच्या दहा वर्षात एक फरक मात्र प्रकर्षाने जाणवतो की आजचे कलाकार हे सोशल मीडिया मुळे reachable वाटतात. ते स्वतःहून त्यांच्या बद्दल लिहितात, काही जण Live येऊन बोलतात आणि कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्यांच्या फॅन्स च्या संपर्कात राहतात.
हेच कारण असावं की आता राजेश खन्ना च्या कार समोर जशी चाहत्यांची गर्दी व्हायची तशी कोणत्याच स्टार समोर होत नाही. लोक realistic झाले आहेत.
आजच्या प्रेक्षकाला स्टार्स पेक्षा त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेण्यात जास्त रस आहे. आज आम्ही अशाच दहा स्टार्स च्या पडद्यावर पोहोचण्यापर्यंतची स्टोरी सांगत आहोत :
१. अक्षय कुमार:
आजचा आघाडीचा अभिनेता. यशाच्या शिखरावर पोहोचण्याआधी त्याने किती तरी किती तरी सिनेमांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं आहे.
मुंबईत तो आला होता मॉडेलिंग करण्यासाठी. खिलाडी ची संधी मिळाली आणि त्याने त्या संधीचं सोनं केलं. खिलाडी नंतर त्याने कधी मागे बघितलंच नाही हे बॉलीवूड च्या कोणत्याही चाहत्याला वेगळं सांगायची गरजच नाहीये.
२. रेमो डिसोझा :
बॉलीवूड चा टॉप चा कॉरिओग्राफर. किती लोकांना माहीत असेल की रेमो डिसोझा हे 90’s च्या सिनेमांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करायचे.
शाहरुख खानच्या ‘परदेस’ सिनेमाचं ‘जरा तसवीर से तू निकल के सामने आ… मेरी मेहबुबा’ या गाण्यात रेमो डिसोझा हे बॅकग्राऊंड ला नाचले होते हे वाचून आपल्या सगळ्यांना नक्कीच आश्चर्य वाटेल.
३. सुशांत सिंग राजपूत:
‘बॉलीवूड चा क्रिकेट स्टार’ ज्याने आपल्याला M.S.Dhoni – the untold story हा एक उत्कृष्ट सिनेमा दिला आहे. त्या सिनेमा मध्ये आपण काही ठिकाणी धोनीच आहे असं समजतो.
त्याच सुशांत सिंग राजपूत ने ‘धुम 2’ या २००६ मध्ये रिलीज झालेल्या सिनेमात ह्रितीक रोशन च्या मागे डान्स केला आहे हे फार कमी जणांना माहीत असेल.
त्याचं करिअर त्याने बॅकग्राऊंड डान्सर म्हणूनच सुरू केलं होतं आणि तो किती तरी अवॉर्ड फंक्शन मध्ये सुद्धा बॅकग्राऊंड डान्सर म्हणून नाचला आहे. त्यानंतर त्याला ‘काय पो छे’ या सिनेमात लीड हिरो म्हणून काम मिळालं होतं.
४. अनुष्का शर्मा:
आजची आघाडीची अभिनेत्री. मॉडेलिंग केल्यानंतर अनुष्का शर्मा ने २००६ मध्ये रिलीज झालेल्या ‘लगे रहो मुन्नाभाई’ या सिनेमात बॅकग्राऊंड आर्टिस्ट म्हणून काम केलं होतं.
शाहरुख खान सोबत चा ड्रीम रोल मिळण्या आधी तिने काही जाहिरातीत सुद्धा काम केलं होतं त्यापैकी लोकांच्या लक्षात राहिलेली जाहिरात म्हणजे Spinz Talc ची ज्यामध्ये अंजना सुखानी ही लीड रोल मध्ये होती.
अनुष्का शर्मा चं उदाहरण देताना हे पण बोललं जातं की, ज्या राजकुमार हिरानी यांच्या दिग्दर्शनात तिने लगे रहो मुन्नाभाई मध्ये काम केलं त्याच राजकुमार हिरानी यांच्या PK या सिनेमात ती आमिर खान सारख्या स्टार सोबत लीड करत होती.
५. शाहीद कपूर:
‘कबीर सिंग’ च्या अभूतपूर्व यशानंतर लोकांच्या मनावर राज्य करणारा हा कलाकार कधी काळी एक बॅकग्राऊंड डान्सर होता यावर कदाचित काहींना विश्वास बसणार नाही.
ऐश्वर्या रॉय च्या ताल मधील ‘कही आग लगे लग जावे…’ या गाण्यात शाहिद कपूर सुद्धा मागे नाचला होता. त्याशिवाय शाहरुख खानच्या “दिल तो पागल है” मध्ये सुद्धा ‘ले गयी, ले गयी’ या गाण्यातील बॅकग्राऊंड डान्सर च्या गर्दीत एक चेहरा शाहीद कपूर चा सुद्धा होता.
शामक डावर या कॉरिओग्राफर च्या ग्रुप चा तो एक सदस्य होता. ‘आंखो मे तेरा ही चेहरा…’ ह्या अलबम च्या गाण्यात शाहिद कपूर ला संधी मिळाली आणि त्यानंतर त्याचा बॉलीवूड चा प्रवास सुरु झाला.
६. दीपिका पदुकोण:
बॉलीवूड चं कुठलंही बॅकग्राऊंड नसलेली ही आजची आघाडीची अभिनेत्री तिच्या करिअर च्या संघर्षाच्या दिवसात हिमेश रेशमिया च्या अलबम च्या गाण्यात झळकली होती.
त्यानंतर मॉडेलिंग करत असताना तिला ओम शांती ओम ची संधी मिळाली आणि त्यानंतर तिच्या करिअर ला खूप छान आकार दिला.
७. दिया मिर्झा:
मॉडेलिंग क्षेत्रातून आलेली ही अजून एक अभिनेत्री. जी सिनेमात दिसायच्या आधी तक्षक सिनेमातील ‘जुमबालिका…’ या गाण्यात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून दिसली होती.
त्याशिवाय दिया मिर्झा ने काही तामिळ सिनेमात सुद्धा बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं आहे. मॉडेलिंग मधील प्रतिष्ठित मानला जाणारा Asia Pacific Pegent हा पुरस्कार दिया मिर्झा ला मिळाला होता.
सोनू निगम च्या गाजलेल्या ‘जाने क्यू मै’ या अलबम मध्ये तिने काम केलं आणि त्यानंतर तिच्यासाठी बॉलीवूडचे दरवाजे खुले झाले.
८. फराह खान:
आजची आघाडीची कॉरिओग्राफर आणि दिग्दर्शिका. १९८६ मध्ये रिलीज झालेल्या गोविंदा च्या ‘सदा सुहागन’ या सिनेमातील “हम है नौ जवा” या गाण्यात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.
९. स्मृती इराणी:
सध्याच्या भारताच्या वस्त्रोद्योग मंत्री. स्मृती इराणी यांनी करिअर च्या सुरुवातीला मिका सिंघ च्या एका अलबम च्या गाण्यात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून दिसल्या होत्या. मध्यंतरी इंटरनेट वर हे गाणं खूप सर्च करण्यात आलं होतं.
‘क्यू की सास भी कभी बहु थी’ या प्रचंड लोकप्रिय टीव्ही सिरीयल आणि त्याच्या टायटल सॉंग ने स्मृती इराणी या घराघरात पोहोचल्या.
टेलिव्हिजन वरच्या त्यांच्या यशस्वी करिअर आणि इमेज चा फायदा त्यांना राजकीय क्षेत्रात सुद्धा झाला आहे असं जाणकारांचं मत आहे.
९. अर्षद वारसी:
‘सर्किट’ या पात्राने प्रचंड लोकप्रिय झालेल्या या कलाकाराची सुरुवात ही १९८९ मध्ये रिलीज झालेल्या जितेंद्र यांच्या सिनेमाने झाली होती. या सिनेमात जितेंद्र सोबत किमी काटकर या होत्या.
‘हेल्प मी’ नावाच्या एका गाण्यात अर्षद वारसी ने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं होतं. त्यानंतर ७ वर्षांनी म्हणजे १९९६ मध्ये अर्षद वारसी ला ‘तेरे मेरे सपने’ या सिनेमात पहिला ब्रेक मिळाला होता.
कोणतंही प्रतिष्ठेचं काम न मिळताही ७ वर्ष बॉलीवूड मध्ये टिकून राहणं ही अर्षद वारसी च्या संघर्षाची जाणीव करून देणारी आहे.
१०. अनुराग बासू:
‘लाईफ इन अ मेट्रो’ सारखा सुंदर चित्रपट तयार करणारा हा दिगदर्शक सुद्धा करिअर च्या सुरुवातीला बॅकग्राऊंड आर्टिस्ट म्हणून काम करायचा. अनुराग बासू ची स्टोरी अशी आहे की, त्यांनी बकग्राउंड डान्सर बनण्यासाठी त्यांचं कॉलेजचं शिक्षण अर्धवट सोडून दिलं होतं.
त्यांचं असं म्हणणं आहे की, बॅकग्राऊंड डान्सर ला ज्युनिअर आर्टिस्ट पेक्षा जास्त पैसे दिले जातात म्हणून ते बॅकग्राऊंड डान्सर बनण्यासाठी आग्रही होते.
एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे, आता तो काळ गेला जेव्हा बॅकग्राऊंड डान्सर ला फार कमी मानधन मिळायचं. मागच्या काही वर्षात स्टेज शो आणि रिऍलिटी शो चं प्रमाण खूप वाढलं आहे आणि त्यांची होणारी कमाई सुद्धा खूप वाढली आहे.
त्यामुळे आजकाल चे बॅकग्राऊंड डान्सर सुद्धा त्यांच्या मेहनतीच्या जोरावर चांगली कमाई करतात आणि त्यातलेच काही पुढे जाऊन आधी असिस्टंट कॉरिओग्राफर आणि मग कॉरिओग्राफर स्वतः बनतात.
हे सांगण्याचा उद्देश इतकाच की, कोणतीच संधी कधीही छोटी किंवा मोठी नसते. ती व्यक्ती त्या संधीचा किती मोठा फायदा घ्यायचा हे ठरवत असते.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.