' अरे बापरे! तुम्ही ज्या विश्वात राहता त्या विश्वात एवढं सगळं आहे… – InMarathi

अरे बापरे! तुम्ही ज्या विश्वात राहता त्या विश्वात एवढं सगळं आहे…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – प्रथमेश कुलकर्णी

प्रचंड मोठ्या अंतराळात, आपली सूर्यमाला – आपली पृथ्वी आणि त्यावर आपण!

रोजचं जीवन जगताना आपण केवढ्या महाकाय magical world मध्ये जगत आहोत, हे लक्षात रहात नाही आपल्या. म्हणूनच, आपल्या विश्वाची कल्पना देणारी ही ३ भागातली सिरीज. हे विश्व कसं आहे – हे थोडंसं समजून घेण्यासाठी!

सिरीजमधलं पाहिलं आर्टिकल : आपलं विश्व असं आहे – भाग १

आता पुढे सरकू या –

१२. शनीच्या जवळून घेतलेला हा फोटो. ‘इंटरस्टेलर’ सिनेमात ते लोक ज्या ‘वॉर्म होल’ जवळ जातात, तीच ही जागा. पृथ्वीच्या जसं जसं दूर जाल, तसं ती एक पॉईंट दिसेल, ना कि एक प्रचंड मोठा, जीवनाने समृद्ध असा ग्रह.

 

universe12.png

 

१३. हा आहे पृथ्वीचा view – सूर्यमालेच्या अगदी टोकावरून घेतलेला. या प्रचंड विश्वात आपण म्हणजे अगदी नगण्यच!

 

universe13.png

 

१४. ही आपली पृथ्वी. सूर्याच्या पलीकडून अशी दिसते.

 

universe14.png

 

१५. हा कोवळा सूर्यप्रकाश आहे एका दूरच्या ग्रहावरचा. सूर्य आपल्याला वाटतो, त्याहून जास्त प्रखर आहे. कारण दूरवरच्या ग्रहांपर्यंतही त्याचा प्रकाश पोहोचू शकतो.

 

universe15

 

१६. संपूर्ण पृथ्वीवर जितकी वाळू आहे, तितकी एकत्र करा. त्यातील सर्व खडे मोजा. या विश्वातील तार्‍यांची संख्या त्या वाळूच्या खड्यांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. (अर्थात् ही गणना करणे हे मानवाला बहुधा कधीच शक्य होणार नाही!)

 

universe16

 

१७. हा आपल्याला दिसणार्‍यांपैकी सगळ्यात मोठा तारा – VY कॅनिस मेजॉरिस. सूर्य पाहा कसा छुटकुला दिसतो या तार्‍यासमोर. आपल्या पृथ्वीची अन् सूर्याची साईज लक्षात घेऊन जर या तार्‍याच्या साईजकडे बघितलं, तर हा चांगलाच मोठा तारा आहे, हे लक्षात येईल.

 

universe17

 

१८. पृथ्वीच्या साईजशी या तार्‍यांची तुलना पाहा. एवढ्या मोठ्या प्रकाशस्रोताची कल्पना करा. धडकीच भरेल. तुम्ही तार्‍यांच्या पृष्ठभागावरून प्रकाश निघतानाही बघू शकता.

 

Universe18

 

१९. आता जरा आपली आकाशगंगा किती मोठी, हे पाहा – जर आपण सूर्य एका WBC म्हणजे व्हाईट ब्लड कॉर्पसल (रक्तातला एक घटक) च्या साईजचा मानला, आणि आपली आकाशगंगाही त्याच स्केल मध्ये मानली, तर तिची साईज USA म्हणजे अमेरिकेइतकी होईल. आणि अशा कित्येक आकाशगंगा या विश्वात आहेत.

 

universe19

 

२०. आपल्या आकाशगंगेत सूर्यमाला म्हणजे एक लहानसा ठिपका आहे, जो बाकी मोठ्या तार्‍यांच्या प्रकाशात दिसतही नाही. आपल्या आकाशगंगेचा विस्तार आहे जवळजवळ १ लाख प्रकाशवर्षे!!!

 

universe20

 

२१. हा भले आकाशगंगेचा ओरिजिनल फोटो नाही, पण त्याचंच चित्र आहे – Vía Twitter: @lucybrockle

आपण जे सगळे तारे, ग्रह आकाशात बघतो, ते या आकाशगंगेचा (Milky way) भाग आहेत.

 

universe21

 

२२. इतर आकाशगंगांच्या मानानी आपली मिल्की वे आकाशगंगा खूपच चिरकुट वाटते, नाही? जरा बघा…. आपली आकशगंगा १ लाख प्रकाशवर्षे मोठी, तर या अजस्र आकाशगंगा केवढ्या मोठ्या!!!

 

universe22

 

२३. आपली आकाशगंगा या निरीक्षण करता येते, तितक्या विश्वात बघा केवढी लहान दिसते. डाव्या बाजूला खालच्या भागात.

 

universe23

 

शेवटचा भाग – लवकरच!

: प्रथमेश कुलकर्णी

===

Image sources:

1. D. Benningfield/K. Gebhardt/fecha estelar / Via mcdonaldobservatory.org

2. Por Andrew Z. Colvin (Own work) [CC-BY-SA-3.0 (creativecommons.org) o GFDL (gnu.org)], via Wikimedia
Commons

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात.InMarathi.com  त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. |आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?