' हे एकच चटपटीत स्नॅक्स तुमची कित्येक औषधं कायमची बंद करू शकतं! – InMarathi

हे एकच चटपटीत स्नॅक्स तुमची कित्येक औषधं कायमची बंद करू शकतं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मखाणा हा प्रकार तुम्हाला ठाऊक आहे का?

हा कुरमुऱ्यासारखा किंवा पॉपकॉर्नसारखाच दिसणारा आणि लागणारा पदार्थ. याला काही लोक मखाणा म्हणतात तर काही लोक मकाणाही म्हणतात. खरंतर हा आपला देसी प्रकारच आहे. परंतु सध्या तो इन आहे.

मखाणा हा एक प्रकारचा पॉपकॉर्नच आहे. क्रंची, टेस्टी, बनवायला सोपा, सहज, स्वस्त आणि आरोग्यदायी. हा मखाणा तलावात, साचलेल्या पाण्यात उगवणाऱ्या कमळाच्या बियांपासून बनवला जातो. या बिया भाजून, फुलवून त्यापासून मखाणा तयार केला जातो.

या मखाण्यापासून बरेच पदार्थही बनवले जातात. भारतात अनेक ठिकाणी काही विशिष्ट सणांना मखाणा देवाला नैवेद्य म्हणून दाखवला जातो. तसेच त्यापासून बनवलेल्या मिठायाही नैवेद्य म्हणून देवाला अर्पण केल्या जातात.

तुम्हाला जर कुरकुरे इत्यादीसारखे चविष्ट पण शरीराला हानीकारक असे प्रक्रियायुक्त (प्रोसेस्ड) बाजारू पदार्थ खायची सवय लागली असेल, तर तुम्ही त्यांच्या ऐवजी मखाणा खाऊ शकता.

 

makhana inmarathi 1
https://www.youtube.com/

 

मखाणा तुम्हाला पॉपकॉर्न्स, कुरकुरे आदी खाल्ल्याचे समाधानही देईल, पण ते शरीराला हानीकारक तर नाहीतच, उलट ते आरोग्यदायी खाणे होईल.

चला तर आपण पाहू या, या टेस्टी, क्रंची पण आरोग्याला हितकारक अशा मखाणाचे काय फायदे आहेत ते –

मखाणामध्ये फ्लेव्होनॉईड्स नावाचे रसायन असते. त्याचा शरीराला चांगला उपयोग होतो. फ्लेव्होनॉईड्समुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी धोका कमी होतो.

मखाण्यात अँटी-बॅक्टेरीअल गुणधर्म देखील आहेत ते आपल्याला निरोगी राहण्यास मदत करतात.

वार्धक्य रोखण्याचा गुणधर्म –

 

makhana inmarathi 2
https://buzztowns.com/

 

मखाण्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स देखील आहेत. हे अँटी-ऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील फ्री रॅडीकल्सशी लढा देते आणि वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करते.

त्यामुळे आपले आरोग्य सुधारते. मखाणाच्या सेवनाने शरीरावरील सुरकुत्या, केसांचं अकाली पांढरे होणे थांबते.

डिटॉक्सिफिकेशन –

मखाण्यामध्ये डिटॉक्सिफिकेशन्स करणारी तत्वे असतात’ ती शरीरातील प्लीहाला डिटॉक्स करतात. प्लिहा हा रक्त तयार करणारा आणि त्यातील लाल पेशी तयार करणारा एक घटक आहे.

मखाणा हे शरीरातील अवयवांनाच अशाप्रकारे डिटॉक्सिफाईड करतात आणि आपले आरोग्य चांगले राखण्यास मदत करतात.

रक्तदाब नियंत्रणात ठेवतात –

 

blood pressure inmarathi

 

मखाणा हे पोटॅशिअमने भरपूर असता; पण त्याचवेळी सोडीयमची मात्रा मात्र त्यांत कमी असते. त्यामुळे ते उच्च रक्तदाबाने पिडीत व्यक्तींसाठी लाभदायक असतात.

मखाणा शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवतात. विशेषतः सिस्टॉलिक ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवते.

माणसाची पुनरुत्पादन (प्रजनन) शक्ती वाढवते –

मखाणा शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यास मदत करतात. शरीरातील विविध स्त्राव व्यवस्थित ठेवण्यास आणि त्याद्वारे शरीरातील मॉयश्चर टिकवून ठेवण्यास मदत करतात.

त्यामुळेच मखाणा हे पुनरुत्पादन किंवा प्रजनन प्रक्रियेसाठी देखी चांगले समजले जातात.

कॅल्शिअमने भरपूर –

 

makhana inmarathi 3
ndtvfood.com

 

मखाणामध्ये कॅलशिअम भरपूर मात्रांमध्ये उपलब्ध असते. त्यामुळे तुमचे दात आणि हाडे मजबूत राहण्यास मदत होते.

मखाणा खाल्ल्याने आपल्या शरीरातील कॅलशिअमची गरज भागते आणि सांधेदुखीवर देखील आराम मिळतो.

सांधेदुखीवर फायदेकारक –

सांधेदुखी आणि संधिवात या विकाराने त्रस्त असलेल्या लोकांना मखाणा अत्यंत लाभदायी आहेत. मखाणा खाल्ल्याने शरीरातील कॅलशिअमची मात्रा योग्य प्रमाणात राहते आणि सांध्याचे विकार कमी होतात.

 

joint pain inmarathi

 

मखाणा हे लो कॅलरी फूड म्हणून ओळखले जाते. त्यामुळे दोन जेवणाच्या मध्ये भूक लागणारी माणसे देखील हे खाऊ शकतात. त्याने वजन वाढण्याची भीती राहात नाही.

मखाणामधील ऍस्ट्रीन्जन्ट तत्वामुळे ते किडनीसाठी देखील उपकारक आहे असे सांगतात. युनानी उपचारपद्धतीने देखील मखाणाचे गुण सांगितलेले आहेत.

असा हा बहुगुणकारी मखाणा चायनीज मेडिसीनमध्ये गेली ३००० वर्षे वापरला जातो आणि आपल्या इथल्या आयुर्वेदाने देखील याचे गुण सांगितलेले आहेत.

तर हा मखाणा खायचा कसा?

 

makhana inmarathi
https://www.archanaskitchen.com/

 

मखाणा हा कसाही खाल्ला जाऊ शकतो. तुम्ही त्याला भाजून पॉपकॉर्नसारखे खाऊ शकता. त्यावर चाट मसाला मीठ, तिखट इत्यादी लावून स्नॅक्स रुपात खाऊ शकता.

मखाण्याचे अनेक पदार्थ देखील बनू शकतात. यु ट्यूबवर तुम्हाला मखाण्याच्या रेसिपीज मिळू शकतील. मखाण्याची खीर बनते.

जपान आणि चायनामध्ये मखाण्याची पेस्ट बनवून ती अनेक पदार्थांमध्ये वापरली जाते. मिठायांमध्येही वापरली जाते.

 

makhana inmarathi 4
https://www.yummytummyaarthi.com/

 

मखाण्याला स्वतःची अशी चव फारशी नसते. मात्र तुम्ही त्यात ज्या चवी, मसाले टाकाल त्याची चव मखाण्यांना येते आणि ते खायला छान लागतात.

ज्याप्रमाणे पॉपकॉर्न्स किंवा इतर प्रक्रियायुक्त स्नॅक्स पदार्थांची मूळ चव कमी; परंतु त्यात टाकलेल्या मसाल्यांची चव अधिक लागते त्याचप्रमाणे मखाण्यांचे देखील आहे.

परंतु इतर प्रोसेस्ड फूडप्रमाणे मखाणा हे शरीराला घातक नसून उलट ते अनेक प्रकारे उपकारकच आहेत. हा फरक आहे.

सध्या मॉल्स, बिग बाजार सारख्या अनेक स्टोअर्समध्ये आणि ऑनलाईन देखील मखाणा मिळतो आणि तो विविध स्वादांमध्ये देखील उपलब्ध आहे.

मखाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य किंवा फायदा –

 

makhana inmarathi 5
https://www.jansatta.com/

 

सॉफ्ट किंवा हार्ड ड्रिंक्सबरोबर चकणा म्हणून शरीराला हानीकारक इतर तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाण्यापेक्षा मखाण्याचा वापर केला तर चवीलाही चांगले लागते.

शिवाय ते आरोग्यासही उपकारक ठरते.

 

आहाराबद्दल सतर्क असलेले लोक आणि मखाणा-

 

eating makhana inmarathi

 

डायटबद्दल सतर्क असलेले अनेक लोक मखाणाचा आपल्या नेहमीच्या आहारात समावेश करू लागले आहेत. करीना कपूर सारख्या फिल्म स्टारने देखील मखाणा आपला आवडता स्नॅक्स असल्याचे म्हटले आहे.

जरी अजूनही सर्वसामान्य अनेक लोकांना मखाणाबद्दल माहिती नसली तरी येत्या काळात मखाणा हा सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ बनणार यात शंका नाही.

वरील सर्व गुणधर्म आणि फायदे वाचल्यावर तुम्हीही नक्कीच आपल्या आहारात त्याचा समावेश कराल.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?