' माणुसकीचा साक्षात्कार – २२ एड्सग्रस्त मुलांना घेतले दत्तक! – InMarathi

माणुसकीचा साक्षात्कार – २२ एड्सग्रस्त मुलांना घेतले दत्तक!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

आपल्या आसपास आपण बघतो जो तो आपापल्याच धुंदीत आहे. आपल्याच घाईत आहे. आजूबाजूला काय चाललंय? आपण ज्या समाजाचा भाग आहोत त्याचं आपण काय देणं लागतो? ह्याची बिलकुल जाणीव नसल्यासारखा आजचा माणूस वागत आहे. पण सगळेच तसे नाहीत, त्याला काही अपवाद आहेत. पनवेलचे राजीब थॉमस नावाची ही व्यक्ती अश्याच अपवादांपैकी एक आहेत.

आपल्या कार्यातुन त्यांनी माणुसकीचं एक उत्तम उदाहरण उभं केलं आहे.

मुंबईच्या महागाईत झगडत असताना आणि दोन मुलांचे वडील असतांनाच, राजीब ह्यांनीं २२ एड्सग्रस्त मुलांना दत्तक घेतलं आहे. राजीबजी मुलांच्या शिक्षणाची आणि दवाखान्याची काळजी घेतात तर त्यांची बायको मुलांच्या जेवणाची काळजी घेते. सुरुवातीला सगळी जुळवाजुळव होत नसे. पण नंतर लोक स्वतःहुन मदतीला धावून आले. त्यांच्याकडुन कपडे, धान्य आणि आर्थिक मदत होऊ लागली.

 

Rajib Thomas marathipiaaz

 

ह्या कामाची सुरुवात कशी झाली हे सांगताना स्वतः राजीबजी Humans of Bombay ला सांगतात,

मी एकदा डी. वाय. पाटील हॉस्पिटल मधून येत असताना मला तिथे एक अतिशय अशक्त मुलगी दिसली. मी तिची विचारपूस केल्यावर कळले ती एड्सग्रस्त आहे. तिचे आई बाबा दोघेही एड्स चे शिकार होते आणि ते जगात नाहीत. ती एवढी अशक्त होती की तिची फक्त हाडंच दिसत होती.

मी तिला काय खाणार म्हणून विचारलं तर ती “नूडल्स” म्हणाली. मी शोधलं पण मला तिथे कुठेच नूडल्स दिसल्या नाही. मी तिला ‘उद्या नक्की घेऊन येईन असं सांगून निघालो. दुसऱ्या दिवशी दवाखान्यात पोहोचतो तर काय…ती तिथे नव्हती.

हॉस्पिटलच्या लोकांनी सांगितलं की ती त्या रात्रीच मृत पावली…

ही गोष्ट राजीबजींना जिव्हारी लागली. त्यांनी तेव्हाच दवाखान्यात सांगून ठेवलं, “जर कुणी एड्सग्रस्त लहान मूल असेल तर आम्हाला कळवा. आम्ही त्यांना दत्तक घेऊ.” आणि तसंच झालं.

दवाखान्यातुन फोन आला आणि २ नवीन पाहुणे घरी आले. तेव्हा दिवस कठीण होते. तरी स्वतःच्या मुलांसोबतच ह्या दोन मुलांना सुद्धा आपल्याच घराचा सदस्य मानु लागले.

वाढत वाढत हा आकडा २२ वर आहे. आता राजीबजींच्या घरात २६ जण राहतात. १२ ते ८ वय वर्ष असलेली ही मुले एक तर आपल्या आईबाबांनी सोडून दिलेली आहेत किंवा त्यांचं ह्या जगात कुणीच नाही.

 

rajib thomas marathipizza

Source

ह्यांच्या घरातलीच एक गोष्ट.

ट्युबरक्युलॉसिस आणि एड्स च्या शेवटच्या स्टेज मध्ये असलेल्या एका मुलाला त्याचे आई वडील दवाखान्यात सोडून गेले. राजीबजींनी त्याला घरात घेतलं. त्याला सर्व गोष्टी दिल्या, ज्याची त्याला गरज होती. त्यासोबत फ्रेश ज्युस, ताजी हवा आणि आम्ही त्याच्या आसपास खेळायचो त्याला हसवायचो. अशाने जो मुलगा अंथरुणावरून आधाराशिवाय उठू शकत नव्हता तो दोन आठवड्यात खेळु-बागडू लागला.

राजीबजी म्हणतात –

ह्या सगळ्याच मुलांना बघितलं की वाटतं हीच आमच्या कामाची पावती आहे.

ह्या कामात आपल्या बायकोच्या मिळालेल्या साथीबद्दल राजीब भरभरून बोलतात. प्रत्येक पावलावर खंबीर तिची साथ आहे, म्हणून मला काम करायला अजून उत्साह येतो. आम्ही दोघेही आमच्या मुलांमध्ये कसलाच भेद करत नाही. सगळ्यांना सारखंच रागावतो आणि सारखेच लाड करतो.

“मला मदत करायला येणारी लोक माझी फार स्तुती करतात. पण ही पोरं मला पापा रेजी म्हणतात बाप मानतात आणि मी बाप म्हणुन माझं काम करतोय एवढंच!”

कारण एड्स झाला म्हणजे तुमचं आयुष्यच संपतं असं नाहीये. नीट काळजी घेतली आणि जीव लावला की एड्सग्रस्त सुद्धा साधारण माणसाच्या बरोबरीने जगू शकतात.

…त्यासाठीच मी इथे आहे…त्यांना जीव लावायला…त्यांची काळजी घ्यायला…

राजीब थॉमस ह्यांच्याबद्दल अधिक जाणुन घेण्यासाठी ही शॉर्टफिल्म बघा.

 

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?