बॉलिवूडच्या या १० जोड्यांनी एक काळ गाजवलाय, पण का वेगळ्या झाल्यात या जोड्या?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आपलं बॉलीवूड हे जोड्यांसाठी कायम प्रसिद्ध आहे. कधीही जोडी लेखकांची असेल तर कधी, कलाकार-दिग्दर्शक यांची असेल तर कधी दोन संगीतकारांची असेल.
एक काळ असा होता की काही जोड्यांच्या नावानेच लोक चित्रपट पहायला जात असायचे.
जोडीचं यशाचं हे कारण असावं की, दोघांचा अनुभव एकत्र येऊन ती कलाकृती तयार होत असल्याने त्यात होणाऱ्या चुका या अगदी कमीत कमी असाव्यात.
जवळपास सर्व जोड्या या यशस्वी होत्या ज्याचं कारण होतं त्यांचं एकमेकांसोबत असलेलं कमालीचं ‘ट्युनिंग’.
जसं आपण क्रिकेट मध्ये सुद्धा युवराज आणि धोनी ही एक जोडी पाहिलेली आहे जे की मैदानात एकत्र असले की आपणच जिंकणार ही भावना आपल्या मनात कायम असायची.
पण, बॉलीवुड मध्ये असं काय झालं असावं ज्याने या दहा सुप्रसिद्ध जोडयांनी एकत्र काम करणं सोडलं ?
आपण त्यांच्या एकमेकांसोबत असलेल्या नात्याबद्दल आणि त्यांनी एकत्र काम करणं का सोडलं ह्यावर एक नजर टाकूया!
१. सलीम – जावेद :
या लेखकांच्या जोडीने एकत्र येऊन २४ सिनेमांचं लिखाण केलं आहे. ज्यामध्ये ‘शोले’ हा सारख्या बॉलीवूड च्या एका मैलाचा दगड असलेल्या सिनेमाचा समावेश आहे.
पण, एक वेळ आली जेव्हा त्यांच्यामध्ये काही मतभेद झाले आणि त्यांच्यातील मानापमान यामुळे त्यांनी एकत्र काम न करण्याचा निर्णय घेतला.
सध्या हे दोघेही बॉलीवूड च्या यशस्वी परिवाराचं नेतृत्व करतात.
२. जतीन – ललित :
नव्वद च्या दशकातील ही एक यशस्वी संगीतकार जोडी ज्यांनी दिलवाले दुल्हानिया ले जायेंगे, कुछ कुछ होता है, सरफारोश, प्यार तो होना ही था यासारख्या अनेक यशस्वी चित्रपटांना संगीत दिलंय.
ह्या जोडीने एकत्र जवळपास ५०० गाणी केली आहेत जे की आज ही आवडीने ऐकली जातात. पण, ह्या दोघांमध्ये पैश्यामुळे काही वाद झाले.
हे वाद इतके निकोपाला गेले की त्यांनी एकत्र न काम करण्याचं ठरवलं.
ह्या जोडीने एकत्र संगीतबद्ध केलेला शेवटचा सिनेमा म्हणजे २००६ मध्ये रिलीज झालेला ‘फना’.
३. सनी देओल – राजकुमार संतोषी :
हिरो आणि दिगदर्शक असलेल्या या जोडीने एकत्र काम करून घायल, घातक आणि दामिनी सारखे बॉक्सऑफिस वर यशस्वी झालेले सिनेमे प्रेक्षकांसमोर ठेवले आहेत.
या जोडीचे चाहते कायमच त्यांनी परत एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त करत असतात.
ह्या जोडीमध्ये वादाची ठिणगी पडली ती म्हणजे ‘भगत सिंग’ च्या जीवनावर आधारित सिनेमा करायचं ठरल्यावर.
सनी देओल ला त्याचा भाऊ बॉबी देओल ला घेऊन हा सिनेमा तयार करायचा होता तर राजकुमार संतोषी ला अजय देवगण ला घेऊन.
दोघांनीही एकाच विषयावरील दोन सिनेमे तयार केले आणि ज्यामध्ये राजकुमार संतोषी यांनी तयार केलेला ‘The Legend of Bhagat Singh ‘ हा सिनेमा जास्त यशस्वी झाला!
आणि त्याला राष्ट्रीय पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलं.
४. गोविंदा – डेव्हिड धवन :
बॉलीवूड च्या जोडीने एक काळ गाजवला आहे. त्यांनी एकत्र येऊन १७ सिनेमे केले आहेत. डेव्हिड धवन यांचा गोविंदा ला स्टार बनवण्यात सिंहाचा वाटा आहे असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही.
त्या दोघांनी एकत्र काम केलेले कुली नंबर १, हिरो नंबर १, राजबाबू हे सगळे चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते.
या दोघांनी एकत्र काम न करण्याचं असं काही विशेष कारण घडलं नव्हतं.
केवळ काही सिनेमाला अपेक्षेपेक्षा कमी मिळालेला प्रतिसाद आणि गोविंदाचं वाढतं वय यामुळे डेव्हिड धवन ने नवीन कलाकारांना संधी देण्याचं ठरवलं आणि गोविंदासोबत काम करणं बंद केलं.
त्यांनी पार्टनर या २००७ मध्ये रिलीज झालेल्या सिनेमा मध्ये शेवटचं एकत्र काम केलं होतं.
५. संजय गुप्ता – संजय दत्त :
मैत्रीचं एक अनोखं उदाहरण या जोडीने बॉलीवूड मध्ये प्रस्थापित केलं आहे. या दोघांनी एकत्र येऊन ८ सिनेमे केले आहेत ज्यापैकी जवळपास सगळेच सिनेमे हिट झाले होते!
आणि ‘कांटे’ हा सर्वात मोठा हिट होता. त्यांचं बिनसणं सुरू झालं ते ‘शूटआऊट अॅट लोखंडवाला’ या सिनेमा च्या चित्रकरणाच्या दरम्यान.
२००७ मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमा नंतर या दोघांनी एकत्र काम न करण्याचं ठरवलं.
६. करण जोहर – काजोल :
बॉलीवूड मधील अजून एक दिग्दर्शक आणि कलाकार (अभिनेत्री) यांच्यातील यशस्वी जोडी. या जोडीने एकत्र केलेले सगळेच सिनेमे हे मोठे हिट आहेत.
ज्यामध्ये कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम सारखे बिग बजेट सिनेमे होते.
त्यांच्यात मतभेद होण्याचं कारण म्हणजे तिचा नवरा असलेला अजय देवगण,
याच्या सिनेमा ‘शिवाय’ आणि करण जोहर चा ‘ऐ दिल है मुश्किल’ या दोन्ही सिनेमांची रिलीज ची तारीख ही एकच राखून ठेवण्यात आली होती या कारणामुळे. दोघेही मागे हटायला तयार नव्हते.
२०१० मध्ये रिलीज झालेला ‘My Name is Khan’ हा त्यांचा शेवटचा एकत्र काम केलेला सिनेमा होता.
७. नदीम – श्रवण :
जतीन ललित प्रमाणेच या संगीतकार जोडीने ११५ सिनेमांसाठी एकत्र संगीत दिलं आहे.
ज्यामधले आशिकी, साजन, राजा हिंदुस्थानी, धडकन हे श्रवणीय संगीत असल्याने हिट झाले असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. या सिनेमाची गाणे लोक आजही आवर्जून ऐकत असतात.
या जोडीचं फुटण्याचं कारण हे आहे की, नदीम ला गुलशन कुमार यांच्या हत्येचा संशयित जेव्हा पकडण्यात आलं तेव्हा तो स्वतः इंग्लंड मध्ये जाऊन सेटल होणं पसंत केलं.
योगायोग असा की ह्या दोघांनी एकत्र येऊन जे काम केलंय त्या शेवटच्या सिनेमाचं नाव ‘दोस्ती’ होतं जो की २००५ मध्ये रिलीज झाला होता.
८. आमिर – जुही :
बॉलीवूड च्या या जोडीने १९८८ मध्ये कयामत से कयामत तक या चित्रपटाद्वारे पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी ७ सिनेमा मध्ये एकत्र काम केलं होतं.
१९९७ मध्ये रिलीज झालेल्या इश्क मध्ये या दोघांनी एकत्र काम केलं आणि त्यानंतर परत एकत्र काम केलं नाही!
कारण आमिर ने निवडलेला perfectionist चा आग्रह आणि त्यामुळे सोडलेले किती तरी चांगले सिनेमे. त्यामुळे ही जोडी आपल्याला परत कधीही रुपेरी पडद्यावर दिसली नाही.
९. साजिद खान – साजिद नाडीयाडवाला :
निर्माता आणि दिग्दर्शक यांची ही जोडी ३ सिनेमांसाठी एकत्र आली होती त्यापैकी हाऊसफुल हा सर्वात जास्त यशस्वी सिनेमा होता.
ह्या जोडीमध्ये उभी फट पडली जेव्हा साजिद खान ने हाऊसफुल च्या यशानंतर स्वतःचं मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला आणि निर्मात्याला ते शक्य नव्हतं.
त्या नंतर त्या दोघांनी एकत्र काम केलं नाही.
१०. अक्षय कुमार – प्रियदर्शन :
हिरो आणि दिगदर्शकाच्या या जोडीने ६ सिनेमे एकत्र केले आहेत. त्यापैकी सगळेच हिट आहेत. त्यापैकी हेरा फेरी, भुलभुलैया आणि भागमभाग हे सर्वात मोठे हिट आहे.
या जोडीचं वेगळं होण्याचं कारण हे होतं की, अक्षय कुमार ने ठरवलं की आता इथून पुढे आपण नवीन दिग्दर्शकांसोबत काम करायचा असा हा उपक्रम होता.
त्यामुळे ही जोडी आपल्याला परत रुपेरी पडद्यावर परत दिसले नाही.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.