' अनेकांचा जीव की प्राण असणाऱ्या ‘मॅगी’च्या नावाची मजेशीर गोष्ट तुम्ही ऐकलीय का? – InMarathi

अनेकांचा जीव की प्राण असणाऱ्या ‘मॅगी’च्या नावाची मजेशीर गोष्ट तुम्ही ऐकलीय का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मॅगी! प्रत्येकाच्या घरात आवर्जून उपलब्ध असलेले इन्स्टंट फूड आयटम.

 

maggie inmarathi

 

बॅचलर मुलं/विद्यार्थी/कर्मचारी यांचं नाही म्हटलं तरी अनेकवेळा रिपीट होणार ‘जेवण’.

लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांच्या आवडीची गोष्ट.

भारतात नूडल्स म्हटलं की पटकन तोंडावर येणार नाव म्हणजे मॅगी.

अर्थात नूडल्स ला पर्यायी शब्द हा आता मॅगीच आहे, जरी दोघांमध्ये जमीन आस्मानचा फरक असला तरी.

 

girl maggi

 

तर, मॅगी ला नेमकं हेच नाव पडलं तरी कसं याबाबत आज जाणून घेऊया.!

अठराव्या शतकाच्या मध्यात म्हणजेच १७६० च्या दरम्यान युरोपात औद्योगिक क्रांती ला सुरवात झालीआणि हळूहळू याच संपूर्ण लोण हे युरोपात पसरलं.

ठिकठिकाणी वसाहती तयार करून युरोपात फॅक्टरी सुरू झाल्या होत्या.

औद्योगिक क्रांतीमुळे झपाट्याने उत्पादन करणाऱ्या फॅक्टरी निर्माण तर झाल्या.पण त्यातल्या बहुतेक उद्योग हे १९व्या शतकाच्या मध्यापर्यंत ठप्प झाले.

अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली होती.

त्यामुळे १८४०-५० च्या दरम्यान युरोपात खास करून स्वित्झर्लंड मध्ये पुरुषांच्या सोबत महिला पण या काम करण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या.

===

हे ही वाचा – परदेशी चिप्सना तगडी टक्कर देणाऱ्या ‘बालाजी वेफर्स’चा कुरकुरीत इतिहास! वाचा

===

factory inmarathi

 

त्यामुळे एकूणच किचन मधलं एकूण टाइमटेबल हे विस्कळीत झालं होतं.

हीच परिस्थिती हेरून ज्युलियस मायकल जोहान्स मॅगी या स्वित्झर्लंड स्थित नवंउद्योजकाला एक कल्पना सुचली.

 

jullias maggi inmarathi

 

१८६०च्या दरम्यान त्याला पॅकेट फूड ची कल्पना सुचली. या आधी दोन वेळा त्याने फूड प्रोडक्ट मध्ये आपलं नशीब आजमवलेलं.पण त्याला त्यात अपयश चाखाव लागलेलं.

मग रेडी टू इट या संकल्पने ला सत्यात उतरवण्यासाठी त्याने आपला मेडिकल फिल्ड मध्ये असलेल्या मित्राची फ्रिडोलीन श्यूलर याची मदत घेतली.

अनेक वर्षे खस्ता खाल्ल्या नंतर अखेर १८८६ मध्ये ज्युलियस आणि फ्रिडोलीन यांना यश आलं.

वेगवेगळ्या डाळी आणि अन्नधान्यांचा वापर करून यांनी एक पीठ तयार केलं आणि त्या पिठापासून शेवया अर्थात नूडल्स तयार करून एक रेडी टू युज सूप तयार केलं.

 

maggi soup inmarathi

 

हे झटपट तयार व्हायचंचं शिवाय पौष्टिकसुद्धा होत.

मध्य युगाच्या सुरवातीपासूनचं भारतातले मसाले हे जगभर प्रसिद्ध झालेले.

त्याच मसाल्याचा वापर करून आणि थोड्या भाज्या वापरून याच्या व्हरायटी उपलब्ध करण्यात आल्या.

आता प्रॉडक्ट नवीन असल्यामुळे त्याच ब्रँडिंग करण तर आवश्यक होतं.

जस आजच्या घडीला अँज युज्वल ज्याचं प्रोडक्ट आहे तो आपल्या स्वतःच्या नावाने त्याच रजिस्ट्रेशन करतो,त्याला ज्युलियस तरी कसा अपवाद राहील?

या रेडी टू इट फूड प्रोडक्टला त्याने स्वतःचचं नाव दिल.- ‘मॅगी!’ अशा प्रकारे मॅगी अस्तित्वात आली.

 

maggi logo inmarathi

===

हे ही वाचा –

===

त्यावेळच्या कामगार वर्गाला लक्षात घेऊन या खाद्यपदार्थांची निर्मिती झाली होती, त्यामुळे तत्कालीन सरकारने पण याला आपला पाठिंबा दर्शवला होता.

सरकारच्या मदतीने ज्युलियस ने मॅगी ब्रँडच्या अखत्यारीत अनेक वेगवेगळे सूप बाजारात उतरवले.आणि अनपेक्षित रित्या हे मॅगी सारखे प्रचंड यशस्वी झाले.

हा प्रयोग इतका यशस्वी झाला की पॅरिस,बर्लिन,व्हिएन्ना,न्यूयॉर्क सारख्या मोठ्या मोठ्या शहरात मॅगी विक्रीला यायला लागली.

१९४७ मध्ये स्वित्झर्लंडचीच प्रसिद्ध कंज्युमर प्रोडक्ट कंपनी नेस्लेने मॅगीला टेक ओव्हर करून आपल्या अखत्यारीत आणलं.

 

maggi nestle

 

१९८३ मध्ये मॅगी भारतीय बाजारपेठेत उतरली आणि अल्पवधीतंच प्रसिद्ध झाली.

चव आणि झटपट तयार होण्याच्या पध्दतीमुळे मॅगी सगळ्यांच्या पसंतीला उतरली आणि घराघरात पसरली.

आजही करोडो भारतीयांच्या आवडत्या पदार्थां पैकी एक आहे मॅगी!

भारतात जवळपास ९०% नूडल्स मार्केट वर मॅगी ने कब्जा केला आहे.म्हणून भारतात नूडल्स ला पर्यायी शब्द म्हणून अजून ही मॅगीचं आहे.

मृत्यूच्या आधी म्हणजे १९१२ पर्यंत ज्युलियस मॅगी ने अर्ध युरोप आणि अमेरिकेत आपलं मॅगीचं प्रोडक्शन चालू केलं आणि नेस्ले ने पुर्ण जगभरात त्याच प्रोडक्ट पोहोचवलं.

२०१५ मध्ये भारतात मॅगीच्या सॅम्पल मध्ये शिश्याचे अवशेष सापडले आणि एकच हडकंप निर्माण झाला.

छोटयातल्या छोट्या दुकानामधून गोळा करून करून मॅगी डिकम्पोज केली जाऊ लागली.

नाही म्हटलं तरी नेस्लेला हा न झेपणारा फटका होता.

 

maggi baned inmarathi

 

शेवटी अल्पावधीतच पुर्ण तयारीनिशी सगळ्या टेस्ट आणि फॉर्मलिटी पार पाडून मॅगी पुन्हा भारतीय बाजारात उतरली आणि आपलं हरवलेलं ‘स्टेटस’ तिने परत मिळवलं.

मॅगी मुळे वाद झाल्याची ही पहिलीच घटना नव्हती.

सुरवातीला नेस्ले आपल्या जाहिरातीतून मॅगी हे हाडांसाठी आणि स्नायूंसाठी उपयुक्त अस पदार्थ असल्याचं क्लेम केलं होतं.

ऑक्टोबर २००८ मध्ये ब्रिटन च्या अँडव्हरटाईज स्टँडर्ड ऑथोरिटीने हा क्लेम सिद्ध करायला नेस्लेला बोलावणं पाठवल.आणि इथे नेस्ले तोंडघशी आपटली.

ब्रिटनच्या या ऑथोरिटीने नेस्लेच्या या जाहिरातींवर कायमचा बॅन आणला.

आणि ब्रिटनच्या या कृती नंतर जगातल्या जवळपास सगळ्या देशांनी अशी ऍक्शन घेतली. प्रोडक्ट बॅन ऐवजी जाहिरात बॅन वर हे प्रकरण निभावले गेले.

२००६ मध्ये भारतातचं वाद निर्माण झाला होता.

 

maggi

 

इंदूरच्या मौलवींनी नेस्ले वर आरोप लावला की नेस्ले च्या मॅगी आणि चॉकलेट प्रोडक्ट मध्ये डुकराची चरबी आणि जिलेटीन चा वापर केला जातो.

त्यांच्या ‘हराम’ संज्ञेला अनुसरून नेस्ले आणि इतर कंपन्या काम करत आहे असा यांनी आरोप केलेला.

मौलवींनी केलेल्या या आरोपाला बिनबुडाचे सांगून नेस्ले सोबत इतर बहुराष्ट्रीय कंपन्यांनी खारीज केले.

शिश्या संबंधित प्रकरणामुळे मॅगी नेपाळ,केनिया,युगांडा,टांझानिया,सुदान आणि झिम्बाब्वे या राष्ट्रात बॅन आहे.

जगप्रसिद्ध अशा प्रोडक्ट आणि ब्रँडला वादविवाद आणि हेवेदावे मधून जावंच लागत.

एकूणच मॅगीचा प्रवास सुद्धा असाच आहे.

 

maggi welcome back

 

ज्युलियस मॅगीच्या सुपीक डोक्यातून निघालेल्या या इन्स्टंट फूड प्रकारामुळे आज तात्काळ आपल्याला मॅगी सारखा खाद्यपदार्थ उपलब्ध होत आहे.

सध्या तर घराघरात मॅगी शिजत असली, तरी अनेक कॅफेजमध्ये मॅगीचे असंख्य प्रकार उपलब्ध आहेत.

आपआपल्या आवडीनिवडीनुसार चीज मॅगी, शेजवान मॅगी यांपासून ते अगदी चिकन मॅगीसारखे अनेक प्रकार चाखता येतात.

===

हे ही वाचा – लोणावळ्याच्या प्रेक्षणीय स्थळांप्रमाणे जगप्रसिद्ध असलेल्या “चिक्की” चा रंजक प्रवास वाचा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?