' सावधान! हे ७ पदार्थ खाल्लेत तर तुमचा शरीरातील ‘हा’ महत्वाचा अवयव होईल खराब! – InMarathi

सावधान! हे ७ पदार्थ खाल्लेत तर तुमचा शरीरातील ‘हा’ महत्वाचा अवयव होईल खराब!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपण फिट असावं, निरोगी असावं असं प्रत्येकालाच वाटतं. तुम्हाला पण वाटतं ना?

मग आपण आपल्या फिटनेससाठी खूप काही उपाय करतो. योगासनं करतो, जिममध्ये जातो, डाएटिशियनच्या सल्ल्याने डाएट करतो. आपल्याला जे जमेल ते करतो आपण आपल्या तब्येतीसाठी.

 

fitness inmarathi

 

एखादी सुपर मॉडेल आपल्या डोळ्यासमोर ठेवतो आणि त्याच्यासारखी आपली तब्येत असावी असे ध्येय ठेवतो.

थोडक्यात काय, तर आपली तब्येत फिट ऍंड फाइन असावी, आपण निरोगी असावे असे आपल्यातील प्रत्येकाला वाटते आणि त्यासाठी आपण आपल्या व्यस्त वेळेतून पण वेळ काढतो. आपले आरोग्य नीट असावे असे वाटणे साहजिकच आहे.

पण आपल्याला हे माहित आहे का, की आपल्या आहारातील काही सवयी आपल्याला घातक ठरतात. आपल्या खाण्या-पिण्यातील काही सवयी आपल्या शरीराला हानीकारक आहेत.

ह्या सवयी इतक्या घातक आहेत की, थेट आपल्या किडनी वर वाईट परिणाम करतात.

आता आपल्या फिटनेससाठी आपण एवढा वेळ, शक्ती आणि पैसा खर्च करतो तर आहारातल्या ह्या चुकीच्या सवयी बदलायलाच हव्यात.

 

boy-eating-fastfood-inmarathi

 

आपल्या किडन्या रक्त शुद्ध (फिल्टर) करणे, लघवीवाटे कचरा बाहेर फेकणे, हार्मोन्स तयार करणे, शरीरातील खनिजे संतुलित करणे, द्रव संतुलन राखणे इत्यादी महत्त्वपूर्ण कामे करते.

जेव्हा किडनी काम करेनाशी होते, किडनीवर विपरित परिणाम होतो, त्या खराब होतात तेव्हा शरीरातील नकोशा गोष्टी मूत्रावाटे न जाता रक्तात मिसळतात. नको ती द्रव्य शरीरात साचू लागतात. खनिजे असंतुलित होतात शिवाय हार्मोन्स प्रक्रियेवरही परिणाम होतो.

थोडक्यात काय तर किडनीवर परिणाम होणे म्हणजे खूपच भयंकर परिस्थिती उद्भभवते. ही गोष्ट इतकी भयंकर आहे की, किडनी बिघडणे जीवावर बेतू शकते.

 

kidney-stone-pain-inmarathi

 

हे ही वाचा – उन्हाळ्यात फळांचा रस पिताय? मग या गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजेत!

तसं बघायला गेलं तर किडनीवर परिणाम करणारी आणखीही काही कारणे आहेत. म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मद्यपान, हॅपेटायटिस सी ह्यासारखी कारणे आहेत जी किडन्यांवर वाईट परिणाम करतात.

काही असे पदार्थदेखील आहेत, ज्यांचे आपल्या आहारात आपण वरचेवर किंवा दररोज सेवन करतो, ज्यामुळे किडन्यांवर वाईट परिणाम होतो.

त्यामुळे आहारातील ह्या सवयी ताबडतोब बदलाव्यात. अशा कोणत्या गोष्टी आहेत, कोणते पदार्थ आहेत ज्यामुळे आपल्या किडनीवर वाईट परिणाम होतात हे आज बघूया!

पुढील ७ पदार्थ आपल्या किडनीवर वाईट परिणाम करणारे आहेत, ज्यांचे सेवन करणे आपणास हानीकारक आहेत आणि ह्या सवयी आपण वेळीच बदलणे गरजेचे आहे.

१) कॅफेन

आपण दररोज सकाळी उठल्यावर आधी चहा किंवा कॉफी घेतो.

 

girl drinking coffee

 

ह्या चहा किंवा कॉफीमध्ये कॅफिन हे हानीकारक द्रव्य असते, जे आपल्या शरीरासाठी हानीकारक असते. किडनीवर विपरित परिणाम करणारे असते.

त्याचप्रमाणे सोडा आणि एनर्जी ड्रिंक्स् सुद्धा आपल्या तब्येतीसाठी धोकादायक असतात.

अभ्यासाअंती असे आढळून आले आहे की कॅफिनच्या नियमित सेवनाने किडनी स्टोन आणि मुत्रपिंडाचे गंभीर रोग उद्भवू शकतात.

चहाच्या पानांमध्ये किंवा कॉफीच्या बियांमध्ये असणारे उत्तेजक द्रव्य सौम्य लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे ज्यामुळे मूत्रपिंडाचे पाणी शोषून घेण्याच्या क्षमतेवर परिणाम करतो. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी न मिळाल्यास किडन्या आपले कार्य नीट करू शकत नाहीत.

 

kidney inmarathi

 

कॅफिन मुळे रक्त प्रवाह देखील उत्तेजित होतो आणि त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. रक्तदाब वाढणे म्हणजे किडन्यांवर आणि हृदयावर देखील वाईट परिणाम करतात, म्हणून कॅफेनचे नियमित किंवा अती सेवन करू नये.

२)  कोल्ड्रींक्स

परदेशात कोलासारख्या पेयांचे जेवणात सेवन करणे प्रतिष्ठितपणाचे, उच्च प्रतीचे मानले जाते. वारंवार त्याचे सेवन केले जाते आणि भारतीय त्यांचे अंधानुकरण करतात, एवढेच नाही तर मोठे मोठे कलाकार त्याची जाहिरात करतात त्यामुळे ते पिणे किती आवश्यक आहे हेच मनावर ठसविले जाते.

 

cold drinks inmarathi

 

पण तुम्हाला माहित आहे का? ह्या कोलासारख्या गडद रंगांच्या पेयांमध्ये अतिप्रमाणात शर्करा, कॅलरी तर असतातच ज्या तब्येतीसाठी अजिबातच चांगल्या नसतात.

त्याशिवाय ह्या पेयांना गडद रंग, चव येण्यासाठी, टिकाऊपणा वाढवण्यासाठी जे काही वापरतात त्यामध्ये फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते. जे अर्थातच आपल्या शरीराला हानीकारक असते. हे पदार्थ सर्वात जास्त हानीकारक आपल्या किडन्यांसाठी असतात. त्यामुळे कोलासारखी पेय पिणे टाळावे.

३) कॅन्ड फूड (साठवलेले अन्न)

इन्स्टंट सूप, सोयाबीनचे पदार्थ, साठवलेल्या भाज्या, फळांचे रस, मासे हे पदार्थ सोयीस्कर असतात, झटपट होतात म्हणून आपणा बऱ्याचदा ह्यांचे सेवन करतो.

 

can food inmarathi

 

घरी आणण्यास अशा साठवलेल्या पदार्थांना प्राधान्य देतो. अशा कॅन्ड वस्तूंमध्ये सोडिअम किंवा प्रिझर्व्हेटिव्ज असतात.

त्यामागे त्यांचा टिकाऊपणा वाढावा हा हेतू असतो. पण, हे सोडिअमचे जास्त प्रमाण किंवा प्रिजर्व्हेटिव्ज शरीराला हानीकारक असतात. आणि जास्त करून किडनी साठी हे घटक अपायकारक असतात.

४) चिप्स्, कुरकुरे इत्यादी

चिप्स, कुरकुरे इत्यादी पॅकेज्ड् पदार्थ चवीला खूप छान लागतात. आज कालच्या मुलांना तर टाइमपास म्हणून पालक ते खायला देतात.

 

kurkure chips inmarathi

 

पण तुम्हाला माहितेय का? ह्या चिप्स, कुरकुरे इत्यादीमध्ये पोषक तत्त्वांचा अभाव असतो. नुसते एव्हढेच नाही तर ह्यामध्ये प्रमाणाबाहेर मीठ असते.

तसेच चिप्स् हे बटाट्याचे असतात आणि बाकीच्या पदार्थांमध्ये तर पचण्यास कठीण असे अनेक पदार्थ असतात. बटाटा आणि हे पचण्यास कठीण पदार्थ तळलेले सुद्धा असतात.

त्यामुळे सोडिअम बरोबरच पोटॅशिअमचे पण प्रमाण अती असते, त्यामुळे हे किडनीसाठी खूपच हानीकारक असतात.

ह्यांचे अती सेवन किडनीसाठी खूपच नुकसान पोहोचवतात. त्यामुळे त्या पदार्थांचे सेवन करणे टाळणे हेच आपल्या किडनीसाठी अत्यंत उपयुक्त असते.

५) डेअरी प्रोडक्टस्

चीझ, दही, बटर ह्यासारख्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे युरिनमधील कॅल्शिअमचे प्रमाण खूप जास्त वाढते. हे किडनी स्टोन होण्यासाठी कारणीभूत असते.

 

milk products inmarathi

 

ज्यांना आधीपासूनच किडनीचा त्रास असेल आणि त्यांनी असे डेअरी प्रोडक्ट्स जास्त प्रमाणात खाल्ले, तर त्यांना डायलिसिसवर ठेवण्याची वेळ येऊ शकते.

त्यामुळे आपण वेळीच डेअरी प्रोडक्शनस् खाणे कमी करणे गरजेचे आहे.

हे ही वाचा – तुमच्या नकळत आरोग्यावर घाला घालणाऱ्या या सवयींपासून दूरच रहा

६) मीठ

आहारात मीठाचे प्रमाण योग्य असेल तर, चवीपुरतेच मीठ असेल तर ते जेवणाची लज्जत वाढवते, पण मीठाचे सेवन वाढले तर ते तब्येतीसाठी हानीकारक असते.

 

too much salt in food solution inmarathi

 

किडनीसाठी तर मीठाचे प्रमाणाबाहेर सेवन अतिशय हानीकारक असते. कारण मीठाचे अती सेवन आपल्या रक्तदाबावर परिणाम करते. आपला रक्तदाब वाढतो आणि ह्याचा परिणाम साहजिकच आपल्या किडनीवर आणि हृदयावर होतो.

त्यामुळे मीठाचे अती सेवन करणे अतिशय घातक असते.

७) कृत्रिम स्वीटनर्स

आज काल डाएट कोक, डाएट पेप्सी किंवा मधुमेहींसाठी खास आइस्क्रिम्स् किवा मिठाई बनवली जाते, ज्यामध्ये साखरेऐवजी कृत्रिम स्वीटनर्स्चा वापर केला जातो.

ह्या कृत्रिम स्वीटनर्स्चा किडनीच्या कार्यामध्ये अडथळा येतो. आणि मधुमेहींनी तर ह्याचे सेवन करणे तर टाळावेच! कारण मधुमेहामुळे किडनी वर वाईट परिणाम अधिक जलद गतीने होतो.

 

sweet inmarathi

 

ह्या ७ पदार्थांचे अती सेवन टाळणे आपल्या तब्येतीसाठी आणि मुख्य म्हणजे किडानीसाठी अतिशय उपयुक्त असते.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?