अमेरिकेने भारताकडे मदत मागितलेल्या Hydroxychloroquine चा कोरोनाशी नेमका संबंध काय?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
कोरोना व्हायरसवर सध्यातरी कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नाही. त्यामुळे त्यामुळेच डॉक्टरांना वाढणाऱ्या पेशंटवर उपचार करणे कठीण झाले आहे.
इतक्या पेशंटना तपासण्याचा एक आव्हानंच डॉक्टरांसमोर उभे राहिले आहे. त्यामुळे डॉक्टर उपलब्ध असलेल्या अनेक औषधांची चाचपणी करत आहेत.
कुठल्या औषधामुळे रुग्ण बरा होईल हे पाहिलं जात आहे. त्यासाठी आधी अस्तित्वात असलेली काही औषध वापरली जात आहेत. वेगवेगळ्या औषधांचे कॉम्बिनेशन्स करून देखील रुग्णांना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
त्यापैकीच एक म्हणजे हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन आणि क्लोरोक्वीन ही औषधं. मलेरिया असणाऱ्या पेशंटला ही औषधं उपयोगी पडतात म्हणून ते वापरून पाहिले जात आहे.
सध्या अमेरिका हा कोरोनाचा केंद्रबिंदू झाला असून जगातील सगळ्यात जास्त कोरोना रुग्ण सध्या अमेरिकेत असून, कोरुना मुळे होणारे मृत्यू देखील अमेरिकेतच अधिक आहेत.
त्याच वेळेस जर्मनी मधल्या शास्त्रज्ञांनी असा दावा केला की, हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांमुळे कोरोना रुग्ण बरे होत आहेत. म्हणून तोच प्रयोग अमेरिकेत देखील करण्यात येत आहेत.
मुळात अमेरिकेत अशा औषधांची निर्मिती होत नाही, तर अशी सगळी औषधे तिकडे आयात करून मागवावी लागतात. भारतात मलेरियाचे रुग्ण अधिक असल्यामुळे भारतात हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीनचे उत्पादन भारतीय फार्मासिटिकल कंपन्या करत असतात.
म्हणूनच अमेरिकेने भारताकडे या औषधांची मदत मागितली, त्यावरून थोडा वाद झाला.
मदत मागताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला औषध नाही दिलं तर बघून घेऊ, अशी धमकी दिली. त्यावरून थोडा वाद झाला मात्र भारताने अमेरिकेला हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन देऊ असं सांगितले, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे आभार मानले.
आता तो वाद शमला असला तरी ही औषध नक्की काय आहेत, हे मात्र बऱ्याच जणांना माहीत नाही.
हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि क्लोरोक्वीन ही दोन औषधं गेली अनेक दशकं मलेरिया, संधिवात आणि लूपस वरील औषध म्हणून वापरली जातात.
आत्तापर्यंतच्या अभ्यासानुसार हे काही कायमस्वरूपी covid-19 साठी औषध असणार नाही. काही भागातल्या अभ्यासानुसार covid-19 साठी हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीनची मदत होईल असं म्हटलेलं आहे.
रिसर्चमध्ये हेही दिसून आले की या औषधामुळे covid-19 ला कोणताही प्रतिबंध करता येणार नाही. सध्या चर्चेत असलेले हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे नेमके काय आहेत.
हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे मलेरियावर दिलं जाणार औषध असून त्याची रचना क्लोरोक्वीन प्रमाणेच आहे. भारतातील मलेरियाच्या पेशंटसाठी हे फार उपयुक्त औषध आहे.
क्लोरोक्वीन या औषधाला अमेरिकन एफडीएने १९४९ यावर्षी मान्यता दिली होती, तर हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाला १९५५ साली मान्यता मिळाली.
कारण क्लोरोक्वीनचे काही साइड इफेक्ट्स दिसून येत होते. अजूनही ही या दोन्ही औषधांचा जास्त डोस घेतला तर त्याचे साईड इफेक्ट दिसून येतात.
काही प्रमाणात दृष्टिदोष निर्माण होतो.
हृदयांच्या ठोक्यांची लय बिघडते.
स्नायूंमध्ये शक्ती कमी होते.
सोरायसिसचा त्रास होतो.
हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन किंवा क्लोरोक्वीन यांचे साइड इफेक्ट्स असूनही ही औषधे का दिली जातात?
ही दोन्ही औषध मलेरिया साठी दिली जातात. हे गोळ्यांच्या रुपात उपलब्ध असून तोंडावाटे घेतली जातात. त्यातही हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध सांधेदुखी साठी देखील दिलं जातं.
400mg चा डोस हा मलेरियाच्या पेशंटसाठी आठवडाभरासाठी देण्यात येतो. पेशंटची कंडिशन पाहून डॉक्टर ठरवतात की हे औषध किती दिवसांकरिता द्यायचं आहे.
मलेरियाच्या पेशंटला चार आठवड्यापर्यंत आठवड्यातून एकदा या गोळ्या डॉक्टर सजेस्ट करतात , तर तीव्र सांधेदुखीसाठी मात्र २०० ते ४०० एमजी पर्यंत दररोज घेण्यासाठी डॉक्टर सांगू शकतात.
हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि क्लोरोक्वीन यांचा covid-19 काय संबंध आहे?
हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि क्लोरोक्वीन या औषधांमध्ये काही अँटीव्हायरल घटक आहेत जे सार्स cov 2 या व्हायरसला प्रतिबंध करतात ज्यामुळे covid-19 हा आजार बरा होऊ शकतो.
ह्या गोळ्यांमुळे व्हायरसची वाढ माणसाच्या शरीरात होत नाही. अर्थात सगळ्याच रुग्णांच्या बाबतीत हे खरं होत नाही. पण जगभरात त्याची मागणी वाढलेली आहे.
अमेरिकन FDA ने 28 मार्च 2020 यादिवशी ह्या गोळ्या covid19 च्या रुग्णांना वापरायची परवानगी दिली आहे.
हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन किंवा क्लोरोक्वीन आणि covid-19 यांच्याबद्दलचा अभ्यास काय सांगतो?
१: १६ मार्च २०२०
यादिवशी चीनमधल्या संशोधकांनी 100 लोकांचा जो अभ्यास केला, त्यानुसार त्यांना क्लोरोक्वीन ह्या गोळ्या देण्यात आल्या. पण ते covid-19 ने फार गंभीर आजारी नव्हते.
या गोळ्यांमुळे किती फरक पडला हे समजू शकलेले नाही.
२: २० मार्च २०२०
फ्रान्समध्ये देखील ज्या जे covid-19 मुळे गंभीर आजारी नव्हते त्यांना हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्या देण्यात आल्या. पण ह्या रिपोर्टचा तोटा इतकाच आहे की, हे सगळे फ्रान्समध्ये वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये ऍडमिट होते.
त्यामुळे हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन दिलेले किती लोक बरे झाले याचा डेटा मिळाला नाही. आणि त्यातल्या २६ लोकांना त्याचे साईड इफेक्ट जाणवले.
सहा रुग्णांना हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन बरोबर azithromycin हे देखील दिलं गेलं, तर काही रुग्णांना फक्त हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन देण्यात आलं. त्यातून औषधांचं कॉम्बिनेशन दिलेल्या रुग्णांमध्ये covid-19 विषाणू कमी दिसून आले.
ज्या रुग्णांवर हा सर्च करण्यात आला त्यापैकी ९३ टक्के रुग्ण हे कॉम्बिनेशन औषधांमध्ये बरे झाले.
३: ३१ मार्च २०२०
चीनमधल्या वूहान प्रांतात ६२ रुग्णांवर केलेल्या स्टडी नुसार, त्यांना हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन देऊन पाहिलं तर ते रुग्ण कमी दिवसांमध्ये बरे झालेले दिसून आले आहेत.
तरीही या बाबतीत आणखीन जास्त संशोधन आवश्यक आहे असं तिथल्या संशोधकांचे म्हणणे आहे.
हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन वापरूनही काही रिझल्ट नकारात्मक आलेले आहेत
४: २४ मार्च २०२०
चीन मधल्या शांघाय मध्ये कोरोनाग्रस्त ३० रुग्णांवर याचा प्रयोग करण्यात आला, त्यापैकी १५ रुग्णांना हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन देण्यात आलं तर इतर १५ ना ते दिलं गेलं नाही.
ज्या रुग्णांना हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन दिलं त्यापैकी तेरा रुग्ण बरे झाले. तर ज्यांना दिलं नाही त्यापैकी १४ रुग्ण बरे झाले यावरून हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन फार उपयुक्त ठरतं असं म्हणता येत नाही.
५: ३० मार्च २०२०
फ्रान्समध्ये कॉम्बिनेशन औषधांचा वापर करण्यात आला. अकरा रुग्णांना ही दोन्ही औषध देण्यात आली त्यापैकी दहा पेशंट हे आठ दिवसानंतरही कोरोना पॉझिटिव्ह होते, तर एकाचा मृत्यू झाला.
आणि त्या दहा पेशंट मधील दोन जणांना आयसीयूमध्ये हलवावं लागलं, कारण त्यांची प्रकृती गंभीर बनली.
याचाच अर्थ हा आहे की, हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन मुळे फार फायदा covid-19 पेशंटना होईल याची काहीच शाश्वती सध्या तरी दिसत नाही. कारण सगळ्या देशांमधला डेटा, रुग्ण बरं व्हायचं प्रमाण या सगळ्या गोष्टी पहायला लागणार आहेत.
त्यासाठी अजूनही संशोधन आवश्यक आहे.
यामुळे भारतात अचानक हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीनची कमतरता भासू लागणार. कारण आता सरकारने हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन किंवा क्लोरोक्वीन औषधं हवी असल्यास डॉक्टरांच्या अपडेटेड तारखेचं प्रीस्क्रिप्शन मेडिकल दुकानांमध्ये दाखवणे आवश्यक केले आहे.
त्यासाठीच भारतातून हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन अमेरिकेला पाठवण्याबद्दल दुमत आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.