' वर्क फ्रॉम होम करताना ‘हा’ उपाय केलात, तर घर आणि काम यांचा योग्य बॅलन्स सहज साधता येईल – InMarathi

वर्क फ्रॉम होम करताना ‘हा’ उपाय केलात, तर घर आणि काम यांचा योग्य बॅलन्स सहज साधता येईल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

‘मै समय हूं’ सध्याचं लोकप्रिय वाक्य.

खरंच किती महत्वाचा आहे वेळ . तुम्ही कोणीही असा, प्रत्येकाकडे २४ तासच आहेत. निर्विवाद सत्य. यशस्वी आणि अयशस्वी व्यक्तींमध्ये फरक करणारा सर्वात मोठा फॅक्टर.

तुम्ही वेळेचा सदुपयोग करता की नाही ? यशस्वी व्हायचं असेल तर हे शिकावंच लागेल. कसं ? ते आम्ही सांगत आहोत या लेखामधून.

टाईम मॅनेजमेंट ही संकल्पना सुद्धा बदलत्या काळासोबत बदलत आहे.

 

time management inmarathi
lab manager

 

आपल्याला कायम असं शिकवण्यात आलंय की, वेळेचं नियोजन म्हणजे फक्त कामांची यादी करायची, प्रत्येक कामाला दिवसभरातील वेळ ठरवून द्यायची आणि त्यानुसार आपला वेळ योग्य रीतीने वापरला जात आहे अशी स्वतःची समजूत घालायची.

त्यासोबतच, multitasking ही एक संकल्पना सुद्धा फार दृढ आहे. जे लोक स्वतःला multi task करणारे म्हणवून घेतात त्यांना आपण फार ग्रेट वगैरे समजायचो.

सोशल मीडिया येण्याच्या आधी आणि सोशल मीडिया आल्यानंतर या दोन कालखंडात काळ विभागला गेला आहे असं म्हटल्यास फार वावगं ठरणार नाही.

या आधी आपण ठरवलेल्या गोष्टी त्या वेळेत करू शकत होतो कारण आपल्या आजूबाजूला कोणते distractions नव्हते. मग, आता आपल्याला सुद्धा त्यांना गृहीत धरून आपल्या वेळेचं नियोजन करणं हे अत्यंत आवश्यक आहे.

Time Blocking ही एक संकल्पना आपण सर्वांनी शिकणं फार गरजेचं आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर, टाईम ब्लॉकिंग म्हणजे प्रत्येक कामाला एक वेळ नियोजित करायची आणि त्या नियोजित वेळेत फक्त ते एकच काम करायचं.

 

time management inmarathi 1

 

त्या आधी आपल्याला हे सुद्धा ठरवता आलं पाहिजे की कोणतं काम किती वेळात होऊ शकतं किंवा व्हायलाच पाहिजे.

सर्वप्रथम आपण आपल्या दिवसभरातील कामांची यादी करावी. जी काम महत्वाची आहेत त्यांच्यासमोर स्टार मार्क द्यावा. या महत्वाच्या कामांना दिवसभरातील पहिला टाईम ब्लॉक म्हणजे साधारण एक ते दोन तासांचा वेळ नियोजित करावा.

टाईम ब्लॉक हा एक ते दोन तासांपेक्षा मोठा असू नये जेणेकरून आपण जास्तीत जास्त कामं एका दिवसात पूर्ण करू शकतो.

याचं उदाहरण द्यायचं तर असं असू शकेल की, जर तुम्हाला ऑफिसचं budget presentation तयार करायचं असेल तर त्या कामाला सकाळच्या पहिल्या टाईम ब्लॉक मध्ये ठेवणं हे योग्य असेल.

आलेल्या इमेल ला उत्तर देणं, कोणाला फोन कॉल करणं, सोशल मीडिया वर काही updates देणं हे कायम दिवसाच्या शेवटच्या टाईम ब्लॉक मध्ये असावं.

कारण, त्यातून तुम्हाला कोणतंही त्वरित अर्थार्जन होणं अपेक्षित नसतं.अश्या गोष्टींना आपण कायम दुय्यम दर्जा देणं शिकायला हवं. ह्याचा अर्थ असा नाही की कायम कामातच असावं.

आपण आपल्या कामाच्या दोन वेगवेगळया लिस्ट केल्या पाहिजेत. एक तर कामाच्या बाबतीत आणि दुसरी व्यक्तिगत आयुष्यातील कामाची यादी.

 

work from home inmarathi 5
iss campus

 

दोन्ही गोष्टींना त्याचा आवश्यक तो वेळ नियोजित करणं आमलात आणलं पाहिजे. त्यामध्ये ठराविक वेळ, दिवस हा स्वतःला कामापासून दूर ठेवण्यासाठी असावा जेणेकरून पुन्हा नव्या ऊर्जेने आपण ती कामं परत करू शकतो.

दिवसभरातील जास्त ऊर्जा असणारी वेळ ही प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. काहींना सकाळी जास्त ऊर्जा वाटू शकते तर काहींना दुपार नंतर.

हे ज्याचं त्याने अभ्यास करून ठरवावं आणि त्यानुसार आपल्या दररोजच्या कामाची आखणी करावी.

आठवड्यातील एक तास हा त्या आठवड्याचं प्लॅनिंग करण्यासाठी बाजूला ठेवा. त्याच प्रमाणे महिन्याचं प्लॅनिंग करण्यासाठी दोन तास काढा आणि वर्षभरातील महत्वाच्या गोष्टींची प्लॅनिंग करण्यासाठी एक दिवस ठरवा.

त्याने तुम्हाला आपण योग्य दिशेने वाटचाल करत आहोत याबद्दल कायम दिलासा असेल. एका दिवसाची प्लॅनिंग करताना ३० मिनिटं शिल्लक ठेवा unplanned गोष्टी करण्यासाठी ज्या की अचानक तुमच्यासमोर येऊन उभ्या राहू शकतात.

त्याच्या आधीच्या एखाद्या कामाला पूर्ण करण्यासाठी ठरवल्या वेळेपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. हा वेळ आधीच राखून ठेवल्यास कोणतंही काम करताना आपल्या ते वेळेत पूर्ण होईल की नाही याबद्दल होणारी अस्वस्थता नाहीशी होईल.

 

business woman working late in the office InMarathi

 

तुमच्या वेळेचं जे काही नियोजन तुम्ही ठरवलं आहे ते तुमच्या स्टाफ आणि कुटुंबातील लोकांसोबत नक्की share करा. असं केल्याने त्यांच्यापैकी कोणीही तुमच्या schedule मध्ये तुमच्या प्रत्यक्ष उपस्थितीची अपेक्षा करणार नाहीत.

तुमच्या schedule प्रमाणेच इतरांच्या वेळेचा सुद्धा तितकाच आदर करा. इतरांनी तुमच्यासाठी त्यांचं schedule बदलावं अशी अपेक्षा करू नका. नाही तर तीच अपेक्षा ते तुमच्याकडून सुद्धा करतील.

तुम्ही ही प्लॅनिंग ची पद्धत एक महिन्यासाठी आमलात आणा. त्यानंतर ही पद्धत तुमची सवय होऊन जाईल.

दुसऱ्या दिवसाची रूपरेषा जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत झोपायचं नाही ही स्वतःला सवय लावणं गरजेचं आहे. त्याने बरोबर ठरवलेल्या गोष्टी घडत जातील.

हे ठरवत असताना तुमचा फोकस हा कायम ठरवलेलं काम पूर्ण करण्याकडे असला पाहिजे आणि ना की फक्त घड्याळाकडे. कारण, हाती घेतलेलं काम पूर्ण करणं जास्त आवश्यक आहे.

 

work from home inmarathi

 

अर्धवट केलेली कामं कोणाच्याच उपयोगाची नसतात. हाती आलेला प्रोजेक्ट जेव्हा आपण ऊर्जेने आणि फोकस ने पूर्ण करतो तेव्हाच आपण पुढच्या प्रोजेक्ट्स साठी विश्वासपात्र ठरत असतो.

हे सगळं करत असताना आपली productivity ही अधून मधून आपणच तपासून बघणं अत्यंत आवश्यक आहे.

आपण ठरवलेले कामं ठरवलेल्या वेळातच पूर्ण करत आहोत किंवा आपल्याला ते काम करायला जास्त किंवा कमी वेळाची गरज आहे हे आपण स्वतः तपासून घेतलं पाहिजे.

कारण वेळेच्या नियोजनासोबत कामाची गुणवत्ता कायम ठेवणं ही आपली जवाबदारी आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?