कोरोनाच संकट असतानाही जपानच्या युनिव्हर्सिटीन लढविलेली ही शक्कल पाहून तुम्हीही त्यांचं कौतुक कराल
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
सध्या कोरोनाच्या संकटाने सगळ्यांनाचं घेरलेलं आहे. सामान्य लोकही आता लॉक डाऊनला सरावले असून, बरेच जण नियमांचं पालन करीत आहेत.
ज्यामध्ये विनाकारण घराच्या बाहेर न जाणे, हॅण्डवॉशने हात धुणे, सॅनिटायझर वापरणे इत्यादी गोष्टी करत आहेत.
बाहेर गेल्यावर तोंडावर मास्क घालणे, सोशल डिसन्सिंग सांभाळणे इत्यादी काळजी सगळी लोक घेताना दिसत आहेत.
सगळ्या जगावर कोरोनाचं संकट घोंगावत असताना, जपानसारख्या देशातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढती आहे.
संपुर्ण जग लॉकडाऊनमध्ये अडकलं असतनाही जपानच्या एका युनिव्हर्टिसिटीने मात्र ही शक्कल लढवली ती पाहून आपल्यालाही त्यांच्या कल्पनाशक्तीचं कौतुक करावसं वाटतं.
युनिव्हर्टिसीतील पदवीप्रदान सोहळा म्हणजे प्रत्येक विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आनंदाचा क्षण.
विद्यार्थी आणि पालकांच्या हा आनंदाचा प्रसंग कोरोनामुळे हुकणार अशी भिती वाटत असतानाच हा दिवस त्यांच्यासाठी कसा अविस्मरणीय ठरला ते पाहुयात.
जपानमधील एका कॉलेजचे विद्यार्थी कोरोनासंसर्गाच्या या काळातही पदवीदान समारंभाला एकत्र जमले.
पण रोबोटच्या माध्यमांतून.
इतकचं नव्हे तर, घरी राहूनच पदवीदान समारंभात हजर राहिले विद्यार्थी.
जपान हा देश आधुनिक तंत्रज्ञानात नेहमीच पुढे राहिलेला आहे हे आपल्याला माहीत आहे.
आत्ताही कोरोनाच्या प्रादुर्भाव काळातही जपानने ते सिद्ध करून दाखवले आहे.
जपानमधील विद्यालयांचा हा पदवीदान समारंभाचा काळ आहे. परंतु कोरोनामुळे जगभर झालेल्या लॉकडाऊन परिस्थितीला जपानही सामोरा जात आहे.
अशावेळी विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा सर्वात महत्त्वाचा काळ आणि महत्त्वाचा समारंभ विद्यार्थी मिस करताहेत आणि नाराज होतायत.
अशावेळी जपानमधील बिझनेस ब्रेकथ्रू या टोकियोतील एका विद्यालयाने यावर आधुनिक तंत्राच्या सहाय्याने तोडगा शोधून काढला आणि एका अभिनव कल्पनेद्वारे आपल्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ झोकात घडवूनही आणला. मात्र तो रोबोटच्या साह्याने.
हे नेमके कसे घडवून आणले
प्रत्येक विद्यार्थ्याच्या जागी त्याचा प्रतिनिधी म्हणून रोबो पाठवला गेला होता.
या रोबोच्या चेहरा म्हणजे टॅबलेट्स होते. हे टॅबलेट्स प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावाचे होते.
प्रत्येक विद्यार्थ्याने घरी राहूनच या रोबोंद्वारे पदवीदान समारंभ एंजॉय केला. त्या त्या रोबोच्या चेहऱ्यावर त्या त्या विद्यार्थ्याचा चेहरा दिसत होता.
कारण ते प्रत्यक्षात टॅब होते आणि ते टॅब विद्यार्थी घरी राहून ऑपरेट करत होते.
एकामागोमाग एक याप्रमाणे विद्यार्थी जसे व्यासपीठावर जाऊन आपल्या गुरुंच्या हातून पदवी प्रमाणपत्र घेतात, त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यासह प्रतिनिधी म्हणून हजर असलेले हे रोबो एकामागोमाग एक व्यासपीठावर येऊन आपले प्रमाणपत्र घेत होते.
गुरुंना अभिवादन करत होते आणि गुरु त्यांच्या पाठीवर शाबासकीची थापही देत होते.
विद्यापीठाचे कुलगुरू केनिची ओहमा प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रमाणपत्र त्याच्या नावाच्या आणि चेहऱ्याच्या रोबोच्या मध्यभागी ठेवत होते तेव्हा शाळेचा बाकी शिक्षक आणि कर्मचारीवर्ग “कॉंग्रेच्युलेशन्स” म्हणत कौतुकाने टाळ्या वाजवत होता.
हे दृश्य अभूतपुर्व असे होते.
या विद्यार्थ्यांपैकीच काझुकी तामुरा हा एक विद्यार्थी म्हणतो की,
हा खरोखरच एक अद्भुत अनुभव होता. घरी राहून सार्वजनिक ठिकाणी वावरण्याचा आणि आपली मास्टर्सची (पदव्युत्तर) पदवी घेण्याचा हा अनुभव आम्ही एंजॉय केला.
महत्त्वाचं म्हणजे, जपानमध्ये हा अनुभव पहिलाच नव्हता आणि केवळ कोरोनाव्हायरसमुळे करावा लागणारा प्रयोग नव्हता.
या आधीदेखील मागच्या महिन्यांत माईनक्राफ्ट येथील एका प्राथमिक शाळेच्या पदवीदान समारंभात विद्यार्थी रोबोच्या माध्यमातून आभासी (व्हर्चुअल) उपस्थित राहिले होते.
ANA Holdingsचे ‘Newme’ रोबो –
हे विद्यार्थी ज्या रोबोच्या माध्यमांतून आपल्या पदवीदान समारंभासाठी आभासी स्वरूपात हजर राहिले होते, ते रोबो ANA होल्डींग्सने तयार केले होते आणि त्यांचे नाव होते, ‘Newme’.
या रोबोंना विद्यार्थी पदवीदान समारंभात घालतात तशी ग्रॅज्युएशन कॅप आणि गाऊन्स देखील घातलेले होते.
अर्थात हा पदवीदान समारंभ देखील फक्त चार रोबो विद्यार्थ्यांपुरताच मर्यादित ठेवला होता. सध्याच्या संसर्गकाळात रोबोंना देखील सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे.
अशी कल्पना प्रत्येकच शाळा-कॉलेजने राबवून सध्याच्या काळात विद्यार्थ्यांना विनाकारण एकत्र आणू नये अशी त्या कॉलेजची इच्छा आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने येणारं युग अजून काय काय चमत्कार दाखवेल कोण जाणे.
मात्र या कल्पना संपुर्ण जगभर राबविल्या गेल्या तर औषधोपचारांसह कल्पनाशक्तीच्या बळावर कोरोनाचं युद्ध
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.