स्वयंपाकापासून भांडी घासण्यापर्यंत सगळी कामं तुमच्यावर पडलीयेत? “हे” उपाय कामात गंमत आणतील
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
कोरोनाच्या धास्तीने लॉकडाऊन असल्यामुळे सगळ्या लोकांना घरी राहावं लागतंय. सरकारकडून वारंवार सूचना देण्यात येत आहेत, की बाहेर जाऊ नका, घरीच थांबा.
त्यामुळे लोक याचं पालन करून घरात थांबत आहेत, आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. घरूनच ऑफिसचही काम करण्यात येत आहे.
मुलांना शाळेला सुट्टी असल्यामुळे मुलेदेखील घरीच आहेत.
या सगळ्यामुळे घरातल्या स्त्रीवर मात्र कामाचं ओझं वाढलेलं आहे. त्यात भरीस भर म्हणजे घरी घरकामासाठी येणाऱ्या मावशा देखील आता येत नाहीत कारण त्यांच्या आरोग्याबाबत धोकाही निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे घरातली काम वाढली आहेत. स्वयंपाक, घर झाडणे- पुसणे, भांडी घासणे, कपडे धुणे इ. कामे आता वाढली आहेत. त्यामुळे कधी एकदा लॉक डाऊन संपेल आणि कोरोनाचं सावट दूर होईल याची वाट पाहिली जात आहे.
त्यात ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांना हे हँडल करणे अवघड जात आहे. घरचं वाढलेलं काम आणि ऑफिसचं काम करावं लागत आहे.
मग हेच काम जर कंटाळवाण न समजता केलं तर त्या कामाचं टेन्शन वाटणार नाही, यासाठी काही गोष्टी आपल्याला करता येतील, जेणेकरून त्या कामाचा आनंद घेता येईल.
घरकाम केल्यामुळे विशेषतः भांडी घासल्यामुळे आपला स्ट्रेस, तणाव कमी होतो. घरातला केर काढताना आपल्या घराबरोबर आपला संवाद साधला जातो.
मग असं असताना आपण कामाचं टेन्शन घेण्याची गरज नाही. हे काम अधिक उत्स्फूर्तपणे करण्यासाठी काही गोष्टी करता येतील.
–
- गृहिणींना नॉन-स्टिक भांड्यांबाबत सतावणारी एक कटकट “या” टिप्समुळे कायमची अदृश्य होईल
- या ७ टीप्स वापरल्यात तर गॅसवर ठेवलेलं दूध कधीही ऊतू जाणार नाही
–
संगीत ऐका :
घरातली साफसफाई करताना गाणी लावा किंवा तुमच्या आवडीचे संगीत म्हणजे, शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, पॉप म्युझिक, भावगीत लावा.
जे तुम्हाला मनापासून आवडते ते संगीत लावा, ते गुणगुणत काम करा काम मनापासून केलं जाईल.
कामाला एक्सरसाइज म्हणून पहा:
काम करताना त्याकडे व्यायाम म्हणून पहा, म्हणजे झाडू मारताना तुम्ही थोडे खाली वाकता परत वर येता. मागेपुढे येत राहता. हा एकप्रकारचा व्यायामाच होतो.
घरातली फरशी पुसताना देखील बराच व्यायाम होतो. घरातल्या घरात कितीतरी आपलं चालणं होतं. speedometer लावला असेल तर तुम्हाला त्याचा अंदाज येईल.
घरात जर जिना असेल तर त्या पायऱ्यांवरून वरखाली करण्यात देखील कितीतरी व्यायाम होतो.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
स्वच्छता करताना खेळ खेळा:
घराची स्वच्छता करताना घरातल्या सगळ्यांना सामिल करून घ्या, आणि प्रत्येकाला कामं वाटून द्या.
कुणाचं लवकर आणि चांगलं काम होईल त्या व्यक्तीला काहीतरी गिफ्ट देणार अस जाहीर करा. त्यामुळे घरही स्वच्छ राहील आणि घरकामदेखील हसतखेळत केलं जाईल.
घरगुती कामाचे यादी करा:
घरात काय काय काम करावे लागेल याची यादी तयार करा. प्रत्येक कामासाठी वेळ ठरवा. त्यावेळतच किंवा ठरलेल्या वेळेच्या आधी काम पूर्ण होईल हे पहा, म्हणजे एकाच कामात खूप वेळ जाणार नाही.
वेळेत काम पूर्ण झालं तर,स्वःलाच काहीतरी बक्षीस द्या. एखादी मस्त कॉफी वगैरे घ्या.
कामामध्ये मुलांना सामील करा:
सध्या मुलं ही २४ तास घरीच आहेत त्यांनाही वेळ कसा घालवावा हे कळत नाही. अशावेळेस मुलांनाही आपल्या कामात सहभागी करून घ्या. त्यांना कामाबद्दल काही आयडिया विचारा.
त्यांनी सांगितल्या तर “करून दाखवा” असं सांगा, मुलं उत्साहाने करतील, आणि तुमचं कामही सोपे होईल.
गेम खेळा:
मुलांबरोबर काम करताना काही गेम्स खेळा, उदा. अंताक्षरी, शब्द ओळखणे त्यामुळे मुलांनाही काम करताना बोअर होणार नाही. आणि मुलांना कामाची आवड निर्माण होईल.
आजकाल जर मुलं परदेशात शिकायला गेली किंवा पुढे नोकरीच्या निमित्ताने बाहेरच्या देशात गेली तर त्यांना सगळ्या कामाची सवय हवी.
कारण तिकडे आपल्यासारख्या घरकामासाठी बायका मिळत नाही. तिकडे सगळी कामे घरीच करावी लागतात.
मित्रमैत्रिणींबरोबर बोला:
आपण सध्या कुणीच बाहेर जात नाही. त्यामुळे मित्र-मैत्रिणींबरोबर गप्पा होत नाहीत आणि घरात काम असल्यामुळे बोलणं होत नाही.
अशा वेळेस काम करताना देखील तुमच्या मित्रमैत्रिणींशी बोलू शकता. फक्त मोबाईल पाण्यात वगैरे न पडता बोलता येईल याची काळजी घ्या. त्यांच्या बरोबर बोलल्यावर नक्कीच फ्रेश वाटेल.
–
- तुमच्या किचनमध्ये असलेल्या या वस्तू कधी जीवघेण्या ठरतील तुम्हाला कळणारही नाही
- भांडी घासण्याचे काम ते ७५ कोटींचा टर्नओव्हर: ही जबरदस्त गोष्ट ठरेल यशाची गुरुकिल्ली
–
आवडीचे कार्यक्रम पहा:
काम करताना तुम्हाला तुमच्या आवडीचे कार्यक्रम पाहता येतील. मोबाईल वर एखादी वेब सीरिज लावून भांडी घासता येतील. काम करताना टीव्ही वरील कार्यक्रम देखील बघता येईल.
जाहिरातीमध्ये दुसऱ्या खोलीतील काम करता येईल.
स्वतःला बक्षीस द्या :
घरचं साफसफाईचं काम करणं तसं चिकाटीचं काम आहे. साधं बाथरूम धुणे देखील कठीण असतं. त्यासाठी वेळ लावून बाथरूम धुवा. महिन्यातून एकदा बाथरूम वरून धुवून घ्या.
त्यामुळे बाथरूम लखलखीत राहील. अशा छोट्या छोट्या गोष्टी झाल्या की स्वतःला छोटंसं का होईना पण बक्षीस द्या. एकतर सध्या बाहेर जातं येत नाहीय, घरातील काम वाढलंय त्यामुळे डिप्रेशन येऊ शकतं.
त्यासाठी आपणच आपल्याला motivate करतं राहणं गरजेचं आहे.
तसं पाहिलं तर घराची साफसफाई , भांडी घासणे ही आपला स्ट्रेस, तणाव कमी करण्याच्या गोष्टी आहेत.
आपण भांडी घासताना ते स्वच्छ कसं निघेल हे पाहण्यासाठी त्यावर आपलं लक्ष केंद्रित करतो, मनातले इतर विचार दूर करतो. त्यामुळे ही एक आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे.
कामामुळे आपलं शरीर सतत हलत राहतं, नाही म्हटल्या तरी थोडी तरी एनर्जी बर्न होतेच. आणि आपलंच स्वच्छ झालेलं घर बघून आपल्याला जास्त आनंद होतो.
मन प्रसन्न होतं. प्रत्येक वस्तुशी आपलं नातं तयार होत. म्हणून आनंदाने या गोष्टी केल्या पाहिजेत.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.