' तुमच्या या सवयीमुळे कोरोनाचा धोका अधिक वाढु शकतो, वेळीच सावध व्हा – InMarathi

तुमच्या या सवयीमुळे कोरोनाचा धोका अधिक वाढु शकतो, वेळीच सावध व्हा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

 

जगावरील कोरोनाचा धोका अजून पर्यंत कमी झालेला नाही. अनेक देशांमध्ये या कारणामुळे पुन्हा लाॅकडाऊन देखील करण्यात आलेलं आहे.

यामुळे जागतिक अर्थव्यवस्था रसातळाला जाताना दिसत आहे आणि याचे दूरगामी परिणाम दिसतील असे सांगण्यात येत आहे.

चीनमधून जगभरात पसरलेला हा व्हायरस चीनमधून मात्र नाहीसा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्याबाबत किती तथ्य आहे याचा खुलासा अजूनही करण्यात आलेला नाही.

 

corona in south korea 3

 

जसाजसा कोरोनाचा विळखा जगावरती वाढत आहे तसतसे अनेक प्रश्न देखील उत्पन्न होत आहेत. कारण हा व्हायरस कुठल्या वातावरणात कशाप्रकारे काम करेल याचं योग्य आकलन आजपर्यंत जगासमोर आलेलं नाही. त्यामुळे या व्हायरसबाबत अनेक अंदाज बांधले जात आहेत.

जी मंडळी नियमित स्मोकिंग करतात त्यांना कोरोनाचा धोका जास्त असल्याचा एक अहवाल मीडियाच्या माध्यमातून बाहेर आला काय आहे या मागील तथ्य जाणून घेऊयात….

‌आपल्याकडे तंबाखू उत्पादनं मोठ्या प्रमाणात दैनंदिन आयुष्यामध्ये वापरली जातात त्यामुळे हा प्रश्न भारतासारख्या देशासाठी खरंच महत्त्वाचा आहे.

 

no smoking inmarathi

 

जगभरामध्ये तंबाखू उत्पादनांचा खूप मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो. युवकांमध्ये सिगरेट आणि ई सिगरेट वापरण्याचे प्रमाण कमालीचे असल्याचे आढळून आले आहे.

ही एक वाईट सवय नक्कीच आहे ज्यामुळे ही मंडळी खूप जास्त प्रमाणात आजारी पडण्याची शक्यता असते.

सिगरेट मुळे इतरही अनेक आजार होतातच परंतु लक्षात घ्या जर तुम्हाला सिगरेट घ्यायची सवय असेल तर लक्षात घ्या नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार,

तुम्हाला कोरोना व्हायरस होण्याचा धोका अधिक प्रमाणात आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की, करोना बाधित व्यक्तीला सर्वात पहिल्यांदा श्वास घ्यायला आणि अन्न पचन करायला त्रास होतो.

म्हणजेच करोना सर्वात पहिल्यांदा आपल्या श्वसन यंत्रणेवर आणि पचन यंत्रणेवर हल्ला करतो आणि त्यानंतर पंचेंद्रिय त्याच्या प्रभावाखाली येतात.

जी व्यक्ती सिगरेट नियमित सेवन करते त्या व्यक्तीची श्वसनक्रिया नक्कीच खराब झालेली असते, त्यामुळे करोना व्हायरस कदाचित अशा व्यक्तीला लवकर बाधा निर्माण करू शकतो.

 

smoking kills inmarathi

हे ही वाचा – धूम्रपान सोडायचंय, पण जमत नाहीये? या ८ गोष्टी तुम्हाला नक्की फायद्याच्या ठरतील

जर तुम्ही सिगरेट सोडण्याची संधी शोधत असाल तुम्हाला सिगरेट सोडण्याची ही सुवर्णसंधी आहे हे लक्षात घ्या.

जी व्यक्ती नियमित सिगरेट घेते त्यांची फुफ्फुसे तंबाखूच्या उपयोगामुळे आधीच मोठ्या प्रमाणात खराब झालेली असतात. त्यासोबतच तंबाखूच्या सेवनामुळे माणसाच्या श्वसन प्रक्रियेवर परिणाम होत असतो.

अमेरिकेतील काही तज्ञ डॉक्टरांच्या मते स्मोकिंगमुळे सर्वप्रथम आपल्या फुफ्फुसांवर प्रचंड प्रमाणात परिणाम जाणवतो. आपल्याला दैनंदिन गोष्टी करताना देखील हे बदल जाणवू शकतात.

अगदी पायर्‍या चढताना दम लागणे हेदेखील याचेच एक उदाहरण आहे आणि यासोबतच काही लहान लहान अपाय देखील सिगरेट मधील केमिकल मुळे होताना आपण पाहू शकतो.

 

no smoking inmarathi 2

 

सिगरेट जास्त प्रमाणात घेतल्यामुळे आपल्या श्वसन प्रक्रिया स्वच्छ करण्याची क्षमता कमी होते.  लक्षात घ्या, मानवी शरीरामध्ये श्वसन प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे आणि श्वसन प्रक्रियेची स्वच्छता देखील तेवढीच महत्वाची आहे.

त्यामुळे जर अशाप्रकारे श्वसन प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण झाला तर हा अडथळा भविष्यकाळात आपल्या जीवाला धोका देखील निर्माण करू शकतो.

ज्या व्यक्तींच्या श्वसन प्रक्रियेवरती अशाप्रकारे परिणाम झालेला असेल त्या व्यक्तींची फुफ्फुसे कसल्याही प्रकारच्या व्हायरसशी लढण्यास सक्षम नसतात आणि अशा व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी असते.

त्यामुळे जर इन्फेक्शन खूप मोठ्या प्रमाणात होणार असेल तर त्या व्यक्तीच्या जीवाला नक्कीच धोका आहे.

 

smoking and corona inmarathi 1

 

अमेरिकेत देखील प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना या धोक्याबद्दल बजावून सांगण्यात येत आहे. खरं बघता या कोरोना बाबत प्रत्येकाच्या प्रतिकारशक्ती वर आणि प्रत्येकाच्या शरीरस्वास्थ्य वरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.

त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळी लक्षण देखील दिसू शकतात. अशा गोष्टींमुळे घाबरून न जाता सावधानता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.

याआधीदेखील तुम्ही अशाप्रकारे सिगरेट सोडण्याचा प्रयत्न नक्कीच केला असेल पण मित्रांनो यावेळी मात्र तुम्ही सिगरेट सोडाच कारण यावेळी प्रश्न तुमच्या जिवाचा आहे.

एक खराब सवय सोडल्यामुळे जर तुमचे आयुष्य वाचणार असेल तर तुम्ही नक्कीच ही सवय सोडण्याचा विचार करायला हवा.

सिगरेटमुळे कोरोना लवकर होण्याचे अजून एक कारण सांगितले जाते, ते कारण म्हणजे सिगरेट तयार होण्यापासून ते तुमच्यापर्यंत पोचेपर्यंत अनेक लोकांनी या उत्पादनाला हाताळलेले आहे.

सिगरेट तयार करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा कागद वापरला जातो याची तुम्हाला नक्कीच कल्पना असेलच. असं म्हटलं जातं की, कागदावर कोरोनाचा वायरस खूप अधिक काळ जिवंत राहू शकतो.

 

smoking 2 inmarathi

हे ही वाचा – दारू, सिगारेट नव्हे तर `ही’ ७ व्यसनं तुमचा घात करू शकतात

त्यामुळे या काळात जर एखाद्या कोरोना बाधित व्यक्तीने तो बॉक्स तुमच्यापर्यंत पोचवला किंवा हात लावला असेल तर तुम्हाला देखील या गोष्टीचा प्रचंड प्रमाणात धोका आहे.

सिगरेट तयार करण्यापासून, ती ओढण्यापर्यंत आपल्या शरीरात विषाणू जणीची शक्यता असते.

त्यामुळे सिगरेटद्वारे संसर्ग होण्याचा धोका जाणवत असल्यामुळे काही दिवस सिगरेटचं सेवन न केलेलंच चांगलं. त्यामुळे विचार करा तुमचं जीवन महत्वाचं आहे की तुमचे व्यसन.

===

 

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?