' काय आहे कोरोना व्हायरसची भयंकर “थर्ड स्टेज”? जिथे पोहचू नये म्हणून आपण प्रयत्न करतोय? – InMarathi

काय आहे कोरोना व्हायरसची भयंकर “थर्ड स्टेज”? जिथे पोहचू नये म्हणून आपण प्रयत्न करतोय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आता कोविड-१९ ह्या विषाणूने सगळ्यांच्या तोंडाचे पाणी पळवले आहे. अख्ख्या जगाला ह्या भयंकर, सर्वनाश करणाऱ्या विषाणूने हादरवून सोडले आहे.

खूपच भयंकर परिस्थिती उद्भवली आहे. स्वतःला महासामर्थ्यवान म्हणवणारा; सर्वश्रेष्ठ मानणारा मनुष्य ह्या विषाणूपुढे हतबल झालेला दिसतोय आता. सर्वतोपरी प्रयत्न चाललेत ह्या संक्रमणाला रोखण्यासाठी!

कोविड -१९ म्हणजेच कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या आजाराबद्दल बरीच माहिती इंटरनेटच्या, सोशल मिडिया ह्यांच्या माध्यमातून सतत समोर येत आहे.

 

corona patient inmarathi
deccan herald

 

काही अहवालांमध्ये असे सांगितले जात आहे की, भारत आत्ता दुसऱ्या टप्प्यावर आहे. कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचे तीन टप्पे आहेत.

याचा अर्थ काय आहे आणि या टप्प्यांचा निर्णय कसा घेतला जातो? हा रोग कोणत्या स्तरावर पसरला आहे हे कोण सांगते? हेच सोप्या भाषेत, येथे समजून घेऊया.

स्टेज १

बाह्य व्यवहार 

विषाणू असा अचानक येत नाही. त्याची सुरुवात कुठून तरी झालेलीच असते. चीनच्या वुहानमध्ये कोरोनाची सुरुवात झाली.

त्यानंतर इतर ठिकाणीही त्याचा प्रसार झाला. म्हणूनच कोणत्याही क्षेत्रात जिथे व्हायरस आधी अस्तित्वात नाही, तिथे तो वाहून नेणारे लोक प्रथम टप्पा सुरू करतात.

 

corona virus 11 inmarathi
extra ie

 

अहवालानुसार,चीनबाहेरील सर्व देश ज्यांनी कोरोनाव्हायरसच्या प्रकरणांची नोंद सुरू केली, त्यांनी प्रथम प्रकरण नोंदवताच उद्रेकाने पहिला टप्पा गाठला.

जसे केरळमध्ये घडले. तेथील विद्यार्थी चीनच्या वुहानमध्ये शिकत होते. ते लोक तेथून परत आले. त्यांना संसर्ग होण्याची शक्यता होती. लक्षणे दिसताच त्याने डॉक्टरांशी संपर्क साधला.

त्यातील काही विद्यार्थी तपासानंतर पॉझिटिव्ह आढळले. त्यांना वेगळे ठेवण्यात आले. उपचार करण्यात आले आणि ते कोरोना व्हायरस निगेटिव्ह होऊन त्यांची तब्येत सुधारू लागली.

याच टप्प्यात बाहेरून येणाऱ्या लोकांना ओळखून, त्यांना योग्य उपचार दिले तर स्टेज पुढे नाही जाणार.

 

स्टेज २

स्थानिक लोक संक्रमित लोकांच्या संपर्कात आले

बाहेर देशातून लोक परत आले आणि त्यांना कोरोनाची लागण झाली आहे असे दिसून येत आहे. ते इतरांच्या संपर्कात येतात (कारण कोरोना ची लक्षणे काही दिवसांनी दिसून येतात) या अवस्थेला लोकल ट्रांसमिशन असे म्हणतात.

ज्यांची चाचणी झाली, ज्यांना व्हायरसची लागण झाली होती ते बरे झाले. परंतु या व्यतिरिक्त असे बरेच लोक होते जे वुहान व आसपासच्या भागातून परतले होते.

 

corona virus 2 inmarathi
fox news

 

त्यांना संसर्ग झाल्याचेही माहित नव्हते. त्यांना वेगळे ठेवले गेले नाही. विषाणू वाहून नेणारे ते इतरत्र फिरले.

जे त्याच्या संपर्कात आले तेही व्हायरसचे वाहक बनले. अशा प्रकारे स्थानिक पातळीवर विषाणूचा प्रसार झाला. हा झाला दुसरा टप्पा!

हा प्रकोप दुसर्‍या टप्प्यात असतो जेव्हा देशात लोकल ट्रान्समिशनची प्रकरणे आढळतात, असे अहवालात म्हटले आहे.

याचा अर्थ असा आहे की, एकाकडून दुसर्‍या व्यक्तीस संसर्ग पसरला आहे तो त्याच देशाचा आहे. जे संक्रमित ठिकाणाहून परत आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आले आहेत.

 

corona virus kanika kapoor inmarathi 3
news18.com

 

जशी गायिका कनिका कपूर चर्चेत आली होती. लंडनहून परत आल्यावर तिने पार्टी आयोजित केली. मग ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. आता जे तिच्या संपर्कात आले त्यांनी स्वत: ला वेगळे ठेवणे आवश्यक आहे.

वसुंधरा राजे, अनुप्रिया पटेल असे नेतेही त्या पार्टीत होते. हे लोक हाय प्रोफाईल राजकारणी आहेत. जे दिवसाला शेकडो लोकांना भेटतात. त्यांच्याकडून संसर्ग होण्याची शक्यता बरीच आहे.

स्टेज ३

संक्रमित स्थानिक लोकांसह गटांमध्ये संक्रमण पसरते

समुदाय प्रसार हा उद्रेक होण्याचा तिसरा टप्पा आहे. या टप्प्यात, अहवालानुसार, मोठ्या प्रमाणात व्हायरसच्या संक्रमणाची साखळी तोडणे कठीण होते.

 

China-coronavirus feature InMaarthi

 

याचा अर्थ असा की, व्हायरस हा समाजात प्रसारित झाला आहे आणि अशा व्यक्तींना देखील संसर्ग होऊ शकतो ज्यांनी उद्रेक झालेल्या देशाला प्रवास केलेला नाही किंवा व्हायरसने बाधित झालेल्या एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आला नाही.

या प्रकरणात, लॉकडाउन अत्यंत महत्वाचे ठरते कारण कोणताही माणूस विषाणूचा प्रसार करू शकतो.

मोठ्या गटात पसरलेला संसर्ग एकाच वेळी अशा लोकांपर्यंत पोहोचतो जे कधीही परदेशात गेले नाहीत किंवा त्यांच्या ओळखीची कोणतीही व्यक्ती परदेशात गेली नाही. तरीही ते पॉझीटिव आढळले.

त्या पातळीवर आल्यानंतर रोगावर नियंत्रण ठेवणे फार अवघड होते. ही एक अवघड अवस्था आहे. म्हणजेच एकामागून एक ती साथ संपूर्ण  समाजात पसरू लागते.

 

corona inmarathi
business insider

 

हा विषाणू कोठून आला हे कोणालाही माहिती नाही. मोठ्या भागात एकत्र संसर्ग होतो. भारतात, तिसरा टप्पा भारतात सुरू झाले आहे की नाही याची तपासणी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद करीत आहे.

हा आजार इतर लोकांना पसरू नये व त्याचा प्रसार होऊ नये यासाठी एक महत्त्वाचा भाग म्हणजे तिसरा टप्पा गाठण्यापूर्वी पावले उचलणे.

सार्वजनिक ठिकाणी लॉकडाउन, सामाजिक अंतरण इत्यादी या गोष्टी फार महत्वाच्या आहे.

आता आपल्यापैकी कोणालाच कल्पना नाहीये की आपण कोणत्या गर्दीचा भाग झालो होतो, किती लोकांना भेटलो होतो. त्यामुळे कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसली त्री तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

….

कोरोना विषाणूबद्दल अफवा देखील सतत पसरत आहेत. यावर फेक न्यूजही चालविली जात आहे. आपण काहीही वाचल्यास, त्याचा स्त्रोत तपासा. पॅनिक होऊ नका.

भारतातील कोरोनाव्हायरस:

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय वेळोवेळी सांगत आहे की, आतापर्यंत भारतात कोरोनाव्हायरस (साथीचा रोग) आजाराच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचला नाहीये. अद्यापपर्यंत समाजातील संक्रमणाची कोणतीही घटना समोर आली नाही.

 

corona attack
business standard

 

आता तर आपल्या पंतप्रधानांनी २१ दिवस लॉकडाऊनची उद्घोषणा केली आहे. स्थानिक पातळीवरील लोकांनी आपल्या सरकारला सर्वतोपरी सहाय्य करावे हीच अपेक्षा आहे!

हा रोग दुसऱ्या टप्प्यात रोखण्याचा प्रयत्न आपल्यालाच करावा लागेल. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जबाबदारीने वागले पाहिजे.

“जान है तो जहान है” हे आपले आपणच समजून थोडे दिवस लॉकडाऊन पाळून ह्या रोगाला दुसऱ्या टप्प्यातच हरवले पाहिजे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?