' यशाच्या वाटेवर ही कारणं ठरू शकतात सगळ्यात मोठा अडथळा, वाचा आणि आजच ही कारणं दूर करा – InMarathi

यशाच्या वाटेवर ही कारणं ठरू शकतात सगळ्यात मोठा अडथळा, वाचा आणि आजच ही कारणं दूर करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आयुष्यात अनेक वेळा यश आणि अपयशाचे अनेक चढ उतर येत येतात.

 

try inmarathi
inc.com

 

या सर्वांना घाबरून न जाता जो मजबूतपणे उत्तर देतो तो नेहमीच यशस्वी होतो.

पण यशस्वी होण्यासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आत्मविश्वास.

होय, तुम्ही जर स्वत:वर विश्‍वास ठेवू शकत नसाल तर यश प्राप्त करण्याची शक्यता थोडी कमीच असते. कारण तुम्ही यशाच्या जवळ जरी असाल तरी आत्मविश्वास नसल्यामुळे तुम्ही प्रयत्न करायचं थांबवता आणि यामुळेच तुम्ही एक यशस्वी आयुष्य जगू शकत नाही.

 

confidence inmarathi
success stories

 

यशाच्या वाटेवर असे अनेक अडथळे असतात आणि त्यांना कशा पद्धतीने दूर करायला हवं याबद्दल आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

आपल्याला अनेकदा जाणवतं, की खूप प्रयत्न करूनही, आपल्याला यश मिळत नाही. 

अखेर आपली सहनशक्ती संपते, आणि आपण निराशेच्या गर्तेत अडकतो.

 

http://www.sheknows.com

 

यशाच्या वाटेवर चालण्यासाठी अनेक अडथळे येऊ शकतात आणि त्यांना कशा पद्धतीने दूर करायला हवं याबद्दल आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत….

1. आत्मविश्वासाचा अभाव

अनेक प्रेरणादायी व्हिडिओ सोशल मीडियावर आणि यु ट्यूब वरती उपलब्ध आहेत.

हे सर्व व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की आत्मविश्वासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे ही मानवाची सर्वात मोठी चूक ठरू शकते.

 

i can inmarathi
the jakarta post

 

सामान्य माणूस नेहमीच आपल्या क्षमतेबद्दल साशंक असतो आणि ही साशंकता आपल्याला अपयशाकडे घेऊन जाऊ शकते याचा गांभीर्याने विचार करायला हवा.

लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या आत्मविश्वासावर ती शंका उपस्थित कराल तेव्हा तेव्हा कुठेतरी तुम्ही अपयशाकडे वाटचाल करत आहातच याची खात्री बाळगा.

” ज्याच्याकडे आत्मविश्वास आहे त्याचा कधीच पराजय होत नाही ” असं म्हटले जातं.

म्हणजेच यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास अत्यंत आवश्यक घटक आहे.

 

confidence
forbes

 

आजच्या स्पर्धेच्या युगात विजय त्याचाच होणार ज्याच्याकडे आत्मविश्वास आहे जर आपल्या स्वतःवरती विश्वास नसेल तर इतरांनी आपल्यावर ती विश्वास का दाखवायला हवा याचा नक्की विचार करा.

आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे, जी फक्त अथक परिश्रमातून आणि वारंवार अभ्यासातून आपल्याला प्राप्त होते.

आत्मविश्वास प्राप्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते परंतु आत्मविश्वासाला पर्याय नाही ही गोष्ट मात्र तेवढीच खरी आहे.

2. आरोग्यरहित शरीर

ज्या व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये यशाची शिखरं गाठायची असतात त्यांना त्यांचे शरीर तेवढंच सुदृढ ठेवण्याची गरज आहे.

 

back pain inmarathi

 

कारण तुमचं शरीर जेवढं सुदृढ असेल तेवढंच तुमचं मन चांगल्या विचारांनी आणि नवीन संकल्पनांनी काम करू शकेल.

 

health checkup inmarathi 5

 

निरोगी शरीरात कुठल्याही परिस्थितीत पुष्कळ काम करण्याची क्षमता असते. त्यामुळे सुदृढ शरीर हा यशाच्या मार्गातील पहिला टप्पा आहे हे लक्षात घ्या.

3. चुकांची पुनरावृत्ती

आजच्या या धकाधकीच्या जीवनात चुका प्रत्येकाकडूनच होतात.

 

gingersoftewar,com

 

पण लक्षात ठेवा, या स्पर्धेच्या युगात तुम्हाला चुकण्याची मुभा आहे परंतु एक चूक परत केल्याने मात्र तुमचं यश तुमच्यापासून दूर जाऊ लागतं.

त्यामुळे प्रयत्न करत असताना चुका ह्या घडणारच, पण ती चूक परत होणार नाही याची काळजी घ्या.

शक्यतो आपल्या जुन्या चुकांमधून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा आणि यशाकडे वाटचाल करत रहा.

4. नेतृत्वगुणाचा अभाव

 

boss inmarathi
dice insights

 

स्पर्धेच्या युगात तुमच्यामध्ये जेवढी अधिक कौशल्य असतील, तेवढी तुमच्या करिअरच्या दृष्टीने चांगलेच आहे.

नेतृत्वगुण तर प्रत्येकामध्ये असणं गरजेचं आहे.

तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असाल, तरी तुम्ही स्वतः मधील नेतृत्व गुणांचा विकास करणे आवश्यक आहे.

 

team leader inmarathi

 

कारण यशस्वी माणसं नेहमीच नेतृत्वावर भर देतात. एक यशस्वी आयुष्य जगण्यासाठी नेतृत्व गुण अत्यंत आवश्यक आहेत.

५. स्वतःचा मोठेपणा

तुमचं यश हे केवळ तुमचं असलं तरी, त्यात अनेकांचा सहभाग असतो, हे कधीही विसरु नका.

 

attitude inmarathi

 

तुमचं कुटुंब, मित्र आणि ऑफिसमधील सहकारी हे नेहमी तुमच्या यशासाठी प्रयत्न करत असता.

उदाहरणार्थ, ऑफिसच्या एखाद्या प्रोजेक्टमध्ये यश मिळावं यासाठी प्रयत्न करत असाल, तर तुम्हाला सहका-यांसह समंजसपणे काम करावं लागेल. यावेळी शांत चित्ताने, सर्वांना समजून घेत हे कामं केलं, तर यश तुमचंच.

 

team inmarathi
smallbuisness.co

 

केवळ स्वतःचा मोठेपणा मिरविणारे, इतरांना तुच्छ लेखणारे कधीही यशस्वी होत नाहीत, किंबहुना ते आयुष्यभर एकटे पडतात.

६. नात्यांकडे दुर्लक्ष

तुमचं यश हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे, मात्र तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुमचं कुटुंब तुमची मदत करतं हे विसरु नका.

 

ignorance inmarathi
toranto stars

 

यशाच्या मागे धावताना कुटुंबाकडे किंवा अन्य कोणत्याही नात्याकडे दुर्लक्ष होत असेल, तर तुम्ही यशस्वी होणार नाही.

आपलं कुटुंब, मित्र हे आपली ताकद असतात, या ताकदीचा वापर आपण सकारात्मकरित्या नक्कीच करु शकतो.

मात्र नात्याकडे होणारे दुर्लक्ष केवळ तुमच्या यशातल्या नाहीच, तर वैयक्तिक आयुष्यातलाही मोठा अडथळा ठरु शकेल.

७. आळशी स्वभाव

आळशी स्वभाव हा तर यशाचा पहिला शत्रु.

 

lazy inmarathi

तुम्ही आळशी असाल, तर यशाचं स्वप्न पाहण्याचाही तुम्हाला अधिकार नाही. 

कारण मेहनतीशिवाय यश नाही हे आपल्याला माहित आहे.

अनेक लोकांकडे प्रचंड बुद्धीमत्ता, अनेक कौशल्य असतात, मात्र केवळ त्यांच्यात असलेल्या आळसामुळे ते कधीच विजयाचे शिल्पकार नसतात.

मेहनत ही केवळ शरिरानी नव्हे तर, मन, बुद्धी, चित्त सारं काही एकाग्र करून करायची असते, त्यामुळे तुम्ही सर्वार्थाने जेंव्हा प्रयत्न करता, तेंव्हा तुम्ही हमखास यशस्वी होता.

काही दशकांपूर्वी माणूस स्वतःमध्ये बदल घडवून आणु शकत नव्हता, परंतु आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये तंत्रज्ञान असल्याने ते सहज शक्य आहे.

 

winner inmarathi

 

तंत्रज्ञान रोज बदलत आहे, त्याचसह माणसांमध्ये देखील रोज कुठलीतरी सकारात्मक बदल होण आवश्यक आहे.

त्यामुळे, वर सांगितलेलं बदल तुम्ही तुमच्या आयुष्यात घडवले, तर तुम्हाला एक यशस्वी आयुष्य जगण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?