' करोना “Pandemic” आहे, पण Pandemic म्हणजे नेमकं काय? वाचा, pandemic रोगांचा इतिहास… – InMarathi

करोना “Pandemic” आहे, पण Pandemic म्हणजे नेमकं काय? वाचा, pandemic रोगांचा इतिहास…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

#गो कोरोना गो हे ब्रीद वाक्य अगदी चले जाओ चळवळीसारखं सर्वत्र गाजलं. आपल्या देशात अशी क्वचितच एखादी व्यक्ती सापडेल जिला हे माहित नसेल.

कोरोना व्हायरसपेक्षा ‘गो कोरोना’च जास्त व्हायरल झालंय असं म्हणायला हरकत नाही. चायना मध्ये धुमाकूळ घालून आता इतर देशांतही हाहाकार माजवत आहे.

वेळोवेळी लोकांना हात धुण्याचे, मास्क वापरण्याचे संदेश दिले जात आहेत. कॉलरट्यूनवर सुद्धा जनजागृती केली जातेय. इतकंच नव्हे तर रोगाचं गांभीर्य लक्षात घेऊन सरकारतर्फ़े योग्य ती पाऊलं उचलली जाऊ लागलीयेत.

 

corona in kerla inmarathi
loksatta

 

काही जणं घरून काम करतायत तर काही जण एक दिवस आड कामाला जातायत.

काहींना सुट्टी मिळालीये तर काहीजणं सुट्टी मिळावी ह्या अपेक्षेने दिवस ढकलतायत. सेलेब्रिटीसुद्धा आपापल्या परीने सर्वांना इन्फ्लूएन्स करत काळजी घेण्याचं व विनाकारण बाहेर न जाण्याचे संदेश देऊ करतायत.

व्हॉटसप ग्रुपवर देखील सगळीकडे ह्याच आशयाच्या चर्चा दिसून येतायत. ह्या काळजी बरोबरच काही जणं आपले अनुभव शेअर करतायत. काही जण कंटाळतायत तर काहीजण आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवून आनंदी होतायत.

सर्वत्र कोरोनावर फिरणाऱ्या जोक्सचं तर काही विचारायलाच नको. त्यामुळे अगदी सगळी कडे कोरोना एके कोरोना हा इतकाच पाढा वाचला जातोय म्हणा ना!

 

corona effect inmarathi
sangbad pratidin

 

आता ज्याची इतकी चर्चा चालू आहे त्याबद्दल खरंच सगळ्यांना किती ज्ञान आहे हे देवच जाणे. कोरोना Pandemic आहे असं म्हणतायत. म्हणजे नेमकं काय बरं आहे ही भानगड ?

११ मार्च ला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO ) ने कोरोना व्हायरसच्या वाढत जाणाऱ्या जागतिक उद्रेकाचा आढावा घेत त्यास pandemic म्हणून संबोधले.

एखादा संसर्गजन्य रोग वाऱ्याच्या वेगाने जगभर पसरल्यास त्यास pandemic म्हणून संबोधलं जाऊ शकतं. फ्लू नसताना एखाद्या रोगाला Pandemic म्हणून संबोधण्याची ही अगदीच पहिली वेळ आहे.

WHO च्या रिपोर्ट प्रमाणे जगभरातील मृतांचा आकडा साधारण ४२९२ वर गेला असून ११८३२६ इतक्या जणांना त्याची लागण झाली असल्याचं वृत्त समोर आलंय.

 

corona death inmarathi
news track english

 

ह्यापूर्वी ‘Pandemic’ कधी घोषित केला गेला होता ?

२००९ साली H१N १ व्हायरस म्हणजेच स्वाईन फ्ल्यू च्या उद्रेकामुळे प्रचंड हानी झाली होती. तेव्हा त्यास Pandemic म्हणून संबोधलं गेलं होतं.

तसेच २००५-१२ दरम्यान hiv/aids मुळे जवळजवळ ३६ मिलियन माणसं मृत्युमुखी झाली होती तेव्हाही ‘Pandemic’ ह्यातच ते मोडत होतं.

एपिडेमिक आणि Pandemic यातला नक्की फरक काय?

एपिडेमिक हा असा संसर्गजन्य रोग असतो जो भराभर पसरत जातो. त्याचा वाढता प्रादुर्भाव हा नक्कीच तापदायक असतो. Pandemic हे सुद्धा थोडंसं असंच वाटत असलं तरी त्यात भौगोलिक प्रदेशाचा संदर्भ असतो.

थोडक्यात सांगायचं तर काही रोग हे ठराविक प्रदेशात व संपूर्ण जगात तसेच देशांत पसरतात. अशा रोगांची लागण सर्वत्र असल्यास त्याचं Pandemic म्हणून वर्गीकरण केलं जातं.

 

China-coronavirus feature InMaarthi

 

ह्या व्याख्या वरवर पाहता थोड्या क्लिष्ट वाटतात मात्र एकदा त्याचा वापर सुरु झाला की आपणही अगदी सराईतपणे त्यांचा उल्लेख करतो. आणि म्हणूनच त्याची थोडीशी का होईना मात्र पार्श्वभूमी जाणून घेणंही महत्वाचं असतं.

WHO ने निर्धारित केलेल्या पांडेमिकच्या पूर्वीच्या ६ पातळ्या :

पहिली पातळी: ह्या पातळीत एखादा व्हायरस हा प्राण्यांना थोड्या प्रमाणात संसर्ग करतो मात्र त्याची माणसांना अजिबात लागण झालेली नसते.

दुसरी पातळी: ह्या पातळीत प्राण्यांमार्फत व प्राण्यांबरोबरच माणसांनाही व्हायरसचा संसर्ग होण्यास सुरुवात झाल्याची निश्चिती मिळते.

तिसरी पातळी : ह्या पातळीत आजाराच्या तुरळक केसेस दिसून येतात तसेच माणसांना माणसांचा संसर्ग होत नाही.

चौथी पातळी : ह्या पातळीत माणसांना माणसांचा किंवा माणसांचा व प्राण्यांचा एकमेकांना संसर्ग होऊन रोगाचा उद्रेक वाढू लागतो.

पाचवी पातळी : ह्या पातळीत मात्र माणसांचा माणसांना होणारा संसर्ग वाढीस लागतो. तसेच किमान २ देशांत हा रोग पसरू लागतो.

सहावी पातळी : ही पातळी तेव्हा येते जेव्हा त्या virus चा संसर्ग वाढून आणखीन एखाद्या देशात त्याचा प्रसार होऊ लागतो.

 

corona virus 2 inmarathi
fox news

 

उदाहरणार्थ, चीन मध्ये सुरु झालेला कोरोना पुढे इटली, इराण, दुबई, स्पेन भारत अशा अनेक देशांत माणसांमुळे पसरू लागला.

ह्या पातळ्यांचा कालावधी अनिश्चित असतो. एखादी पातळी काही महिने किंवा वर्षही टिकू शकते. तसेच सर्व Pandemic सहावी पातळी गाठातीलच असं नाही.

शिवाय व्हायरस कमकुवत झाल्यास झटक्यात ह्या पातळीत घटही होऊच शकते, पण २०२० मध्ये WHO ने ह्या सहा पातळ्यांचा पालन करणं बंद केलं असल्याचं समोर आलं आहे.

सध्या आपल्याकडे हा Pandemic रोग आलाय आणि जणू हे एक प्रकारचं जागतिक युद्धच आहे. फरक असा की, हे युद्ध कोणताही प्रदेश जिंकण्यासाठी नव्हे तर त्या जीवघेण्या व्हायरसला पराभूत करून आपलं जग वाचवण्याकरिता आहे.

म्हणूनच प्रत्येक नागरिक हा एखाद्या सैनिकाप्रमाणे कर्तव्यदक्ष असायला हवा. आपली यंत्रणा तर जोरदार प्रयत्न करतेच आहे, मात्र आपणही त्यांना उचित सहकार्य करणं गरजेचं आहे.

 

corona attack
business standard

 

कारण नसताना वाट्टेल त्या गोष्टी शहानिशा न करता, ‘घेतला msg आणि टाकला व्हॅट्सअॅपला’ अशाप्रकारे पसरवू नका. मिळालेला वेळ हा नक्कीच सार्थकी लावा परंतु मुद्दाम बाहेर फिरायला जाऊन गर्दी करू नका.

ज्यांचं बाहेर पडणं अनिवार्य आहे त्यांनाच बाहेर जाऊ द्या. या आणि अशा अनेक सूचना आता आपल्याला नक्कीच पाठ झाल्या आहेत. त्यामुळे आता फक्त त्याची जाणीवपूर्वक अंमलबजावणी करायची वेळ आली आहे.

त्यामुळे स्वतःहून ‘physical unity’ टाळून आपल्यातील एकीने ह्या संकटावर मात करूया आणि पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम होऊयात!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?