' केवळ घरातल्या मोठ्यांचा आदेश म्हणून नव्हे तर या कारणांसाठी प्रत्येक भारतीयाने मंदिरात जायलाच हवं – InMarathi

केवळ घरातल्या मोठ्यांचा आदेश म्हणून नव्हे तर या कारणांसाठी प्रत्येक भारतीयाने मंदिरात जायलाच हवं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपला देश विविधतेने नटलेला देश आहे.

 

unity in divrsity inmarathi
fastread

 

विविध धर्मांचे आणि जातीचे लोक इथे गेले अनेक वर्ष एकत्र राहत आहेत.

प्रत्येक धर्माचं स्वतःचं असं प्रार्थनास्थळ आहे ज्या ठिकाणी त्या धर्माचे सर्व लोक एकत्र येऊन प्रार्थना करतात.

 

eid inmarathi

 

प्रत्येकाची प्रार्थना करायची पद्धत,वेळ जरी वेगळी असली तरी सर्वांचा यामागचा देवाची भक्ती करायचा हेतू समान असतो.

भारताला हिंदुस्तान असंही संबोधलं जाते, कारण भारतात पूर्वीपासून हिंदू लोक बहुसंख्य प्रमाणात राहत आहेत.

त्यामुळे भारतात विविध देवांची अनेक प्राचीन मंदिरं आढळून येतात. आज ती सगळीच मंदिरं अस्तित्वात नाहीत, मात्र त्या काळी ती खूप भव्य असावीत असा अभ्यासक मंडळींचा अंदाज आहे.

 

temple inmarathi
updateuptodate

 

भारतीय लोक वैदिक काळापासून अनेक क्षेत्रात आणि कलांमध्ये पारंगत होते. तेव्हाच्या काळातही त्यांनी अनेक क्षेत्रात प्रगती केली होती जी आजच्या काळातही थक्क करेल.

याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आज आढळणारी पूर्वीच्या काळातील मंदिरे ही प्राचीन कलेचा उत्कृष्ट नमुना तर होतीच याशिवाय ती मंदिरे बांधण्याच्या तंत्रामुळे ती विशेष स्थान मिळवून आहेत.

यामध्ये अनेक मंदिरांचा समावेश होतो. यात खजुरहोचे मंदिर, कोणार्कचे सूर्य मंदिर, ओंकारेश्वरचे मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत.

 

mandir inmarathi

 

या प्रत्येक मंदिराच्या निर्माणामागे त्या मंदिराइतकीच सुंदर आणि खूप काही शिकवून जाणारी गोष्ट लपली आहे.

याचं एक उदाहरण म्हणजे गुजरातमधील सोमनाथ मंदिर घेता येईल.

या मंदिरात एक स्तंभ आहे त्याला बाणस्तंभ असं संबोधलं जातं.

 

somnath temple inmarathi

 

या स्तंभावर संस्कृत भाषेत एक श्लोक लिहलेला आहे ज्याचा अर्थ असा होतो की, या स्तंभापासून दक्षिण दिशेला एकही जमिनीचा तुकडा नाही.

म्हणजेच दक्षिण ध्रुवा पर्यंत सलग समुद्र आहे एकही जमिनीचा तुकडा नाही. ही गोष्ट आपल्या पूर्वजांना काही हजार वर्षांपूर्वी समजली होती.

मंदिरे असण्याचा आणखी एक फायदा म्हणजे मंदिरं ही भक्ती करण्याची अतिशय महत्वाची आणि गरजेची जगा आहेतच, मात्र त्या शिवाय मंदिरं आर्थिक विकासात सुद्धा मदत करतात.

एका मंदिरा मुळे फुलवाले, भटजी, वाहतूक व्यवस्था आणि पर्यटन या व अशा अनेक गोष्टींचा विकास होतो.

 

flower market inmarathi
times of india

 

एका मंदिरामुळे अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो.

याशिवाय मंदिरं एकत्र जमण्याची आणि अनेक चांगल्या गोष्टी घडवून आणण्याची ठिकाणं आहेत.

आज अनेक मंदिरांनी ट्रस्ट स्थापन केले आहेत आणि त्याद्वारे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत.

मुंबईतील सिद्धीविनायक ट्रस्ट हे त्याचंच एक उदाहरणं, केवळ भक्तांसाठीच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी इथून अनेक प्रकल्प राबविले जातात.

विशेषतः रुग्णांना मदत करण्यासाठी हे ट्र्स्ट स्वतःच्या तिजोरीतील उत्पन्नाचा वापर करतं, ही बाब नक्कीच उल्लेखनीय आहे.

अनेक मंदिरांमध्ये मोफत अन्नछत्र आणि इतर अनेक गोष्टी सुरू असतात.

 

annachhatra inmarathi
अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

 

मंदिरांमध्ये होणाऱ्या विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये अनेक चांगल्या विषयांवर उहापोह होतात आणि तिथे चांगल्या विचारांची देवाणघेवाण होऊन मंदिरे एका सांस्कृतिक आणि वैचारिक चळवळीचे केंद्र होतात.

याशिवाय मंदिरात जायचे अनेक फायदे आहेत.

मंदिरात गेल्यामुळे मनाला एक चांगली शांतता मिळते. आपल्या मनात अनेक चांगले, वाईट विचार असतात मात्र मंदिरातील शांतातेमुळे आपलं मन सुद्धा शांत होतं.

 

modi in temple inmarathi
DNA india

 

मंदिरात गेल्यावर जर तिथले वातावरण प्रसन्न असेल तर आपला ताण कुठच्या कुठे पळून जातो आणि माणसाला प्रसन्न वाटायला लागते.

आपल्या मनातील काळजी देवाला सांगितली तर माणसाचे मन मोकळं होते. म्हणूनच पंढरपूरची वारी कदाचित इतकी वर्षे चालू आहे. कारण तो विठ्ठल सर्व लोकांचा त्राता आहे.

मंदिरात सतत होम चालू असतात त्यामुळे तेथील वातावरण शुद्ध असते ज्याचा आपल्याला खूप फायदा होतो.

 

hom havan inmarathi
flicker

 

हवामानातील औषधी घटकांमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होते आणि यावर संशोधन सुद्धा चालू आहे.

मंदिरात सतत नामस्मरण सुरु असतं, वातावरण शुद्ध असतं त्यामुळे माणूस डिप्रेशन सारख्या आजारातून बाहेर पडू शकतो. त्याला मानसिक शांती मिळते.

थोडक्यात काय मंदिरच नव्हे तर प्रत्येक प्रार्थना स्थळ मग ते कोणत्याही धर्माचे असो ते पवित्रच असते .मात्र तेथे चांगल्या गोष्टी सुरू ठेवणे महत्त्वाचे आहे.

 

child inmarathi
pintrest

 

मंदिरे हा आपला ठेवा आहे,त्याचे महत्त्व आपल्याला समजले पाहिजे आणि हा ठेवा आपण जतन केला पाहिजे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?