यती….आता हे यती प्रकरण म्हणजे नेमकं काय ते आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित नसणार, कारण हे प्रकरण उगवलं आहे ते मुळातच बर्फाळ प्रदेशांमधून.
म्हणूनच पाऊस आणि उन्हाळा पाहणाऱ्या आपल्या सारख्या सर्वसामान्य भारतीय लोकांना यती बद्दल जास्त काही माहिती नाही, पण ‘हिममानव’ म्हणून आपण त्याला ओळखतो, तसा हा प्राणी खरंच अस्तित्वात आहे की नाही इथून खरी चर्चेला सुरुवात आहे. त्यामुळे ह्या ‘यती’ बद्दलची रंजकता अधिकच वाढीस लागते.
बऱ्याच जणांच्या मते हा एक काल्पनिक कथेमध्ये वगैरे आढळणारा प्राणी आहे. त्याच्या अस्तित्वाचे ठोस पुरावे नाहीत,
पण एक गट असाही आहे जो ‘यती’च्या अस्तित्वाचा पुरस्कार करतो. चला जाणून घेऊया या यतीबद्दलच्या तुम्हा आम्हाला माहित नसलेल्या काही गोष्टी!
wikia.nocookie.net
यती, बिग फूट आणि ससक्चॅक नावाने ओळखला जाणारा हा जीव जगभरासाठी हजारो वर्षांपासून एक गूढ ठरलेला आहे. नॅशनल जिऑग्राफीपासून ते डिस्कव्हरी चॅनेल पर्यंत अनेकांनी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे, पण तरीही अद्याप हे रहस्य कायम आहे.
हा प्राणी नेहमी घनदाट जंगल आणि डोंगराळ भागात राहतो असे म्हटले जाते. ज्या लोकांनी हा प्राणी पाहिला आहेत ते त्याचे वर्णन धिप्पाड देह, सामान्य माणसापेक्षा लांब, पूर्ण शरिरावर मोठ्या प्रमाणावर केस असलेला, मोठे पाय असलेला, शक्तीशाली आणि सतत ओरडणारा असे करतात.
१) यती हा हिममानव माकडासारखा एक प्राणी असतो. नेपाळ, भारत आणि तिबेटच्या जंगली भागात त्यांचा वास असल्याचा समज आहे.
i.ytimg.com
२) यतीला पाहण्यासंदर्भातील पहिली माहिती १९२५ साली एका जर्मन फोटोग्राफरने दिली होती. अनेक नेपाळींनीही त्याला पाहिल्याचा दावा केला आहे.
bigfootbase.com
३) १९५३ साली सर एडमंड हिलेरी आणि तेन्जिंग नोर्गे यांनी माऊंट एव्हरेस्टवर माणसापेक्षा मोठ्या पायांचे ठसे आढळल्याचे सांगितले होते. त्यानंतर मात्र सर एडमंड यांनी यती दिसल्याचे वृत्त फेटाळले होते.
dailymail.co.uk
४) २००८ साली एका जपानी पर्यटकाने त्याला मोठ्या पावलांचे ठसे आढळल्याचा दावा केला होता. ते ठसे यतीच्या पायाचे असल्याचा कयास लावला जात होता. पायांचे ठसे जवळपास आठ इंचांचे होते. ते अगदी मानवी पावलांप्रमाणेच दिसत होते.
kaiju.wdfiles.com
५) २०१० साली चीनच्या जंगली भागात वुडलँड्स आढळलेल्या एका प्राण्याला यती असल्याचे ठरवले गेले होते. लोकांच्या तक्रारीवरुन हा केसाळ प्राणी सिचुआन प्रांतातून पकडण्यात आला होता. स्थानिक लोक त्याला अस्वल समजत होते.
lazerhorse.org
६) माजी हेविवेट बॉक्सिंग चॅम्पियन निकोलाय व्हॅल्यूवने यतीच्या शोधासाठी एक मोहीम सुरू केली होती. पण नंतर त्यांनीही हार मानली.
pinimg.com
७) येतीबाबत माहिती देणाऱ्यांनी त्याला कमी उंचीवर राहाणारे माकड, तिबेटचा निळा अस्वल किंवा हिमालयातील करडा अस्वलासारखा दिसत असल्याचेही म्हटले आहे.
2.bp.blogspot.com
८) रशियाच्या सायबेरिया येथील डोंगराळ भागात मोठे केस असलेले यती आढळत असल्याचा दावा केला होता.
4.bp.blogspot.com
असं आहे हे यती प्रकरण अगदी गूढ, रहस्यमयी आणि उत्सुकता वाढवणारं…