' कितीही खाल्लं तरी काहीजण ‘स्लिम-ट्रीमच’ असतात, हे आहे त्यामागचं रहस्य – InMarathi

कितीही खाल्लं तरी काहीजण ‘स्लिम-ट्रीमच’ असतात, हे आहे त्यामागचं रहस्य

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्याचा जमाना हा फिटनेस फंडा वापरण्याचा आहे. रोज जिम करणे, योगा करणे, धावणे याबरोबरच डायट पाळणे ह्या सगळ्या गोष्टी सध्या ट्रेंडमध्ये आहेत.

शिवाय फिटनेस मिळवायचा असेल तर तुमचं डायट हे कसं आहे यावर बरंच काही अवलंबून असते. रोज नवीन नवीन प्रकारचे डायटचे फॅड येताना आणि ते प्रसिद्ध होताना आपण पाहतो.

यामध्ये डायटच्या वेळा पाळणे आणि मोजून-मापून खाणे ह्या सगळ्या गोष्टी होताना आपण पाहतो आणि आपणही कधीतरी स्लिम ड्रीम होण्याच्या नादात होण्यासाठी अशा गोष्टी करतो फॉलो करतो.

 

deepika padukone 1 inmarathi

 

मित्रांबरोबर हॉटेलमध्ये गेलो तरी त्या पदार्थाच्या किमतीपेक्षा या पदार्थात किती कॅलरीज आहेत याकडे आपलं लक्ष जातं. खाण्यापेक्षा कॅलरीजचं गणित करण्यातच वेळ जातो.

मात्र आपले काही काही मित्र मैत्रिणी असे असतात की ते बिनदिक्कत भरपूर खातात आणि कॅलरीजचा विचारही त्यांच्या मनात येत नाही. असे लोक पाहिल्यावर असं वाटत राहतं की,

“अरे काय हे? आपण हवा खाऊन पण जाड होतो आणि हे लोक इतकं खाऊन पण इतके बारीक कसे!!” काय केल्याने आपले वजन कमी होईल? असा प्रश्न आपल्याला पडतो.

 

fat lady inmarathi

हे ही वाचा – नकोश्या कडवट डाएटपेक्षा हे पदार्थ म्हणजे वाढलेलं वजन आणि चरबी कमी करण्याचा पौष्टिक मार्ग!!

हा प्रश्न आपल्यालाच पडला नसून तर आधुनिक सायन्सलाही पडला आहे. यासाठी यावरती रिसर्च करण्यात आला आणि त्या रिसर्च मधून असं निष्पन्न झालं की,

एखाद्या माणसाचे काही जीन्स त्याला बारीक ठेवतात. आयुष्यभरासाठी त्या व्यक्तीचं वजन फारसा फरक न पडता आहे तसचं राहतं.

केंब्रिज युनिव्हर्सिटीत प्रोफेसर सदाफ फारुकी यांच्या मार्गदर्शनाखाली यावर रीसर्च झाला. आधीचा रिसर्च हा माणसाचं वजन का वाढतं आणि त्यासाठी कोणते जीन्स कारणीभूत आहेत? या संदर्भात होता.

मात्र या वेळेस माणूस बारीक का राहतो? त्याला कोणते घटक कारणीभूत आहेत? यासंदर्भात संशोधन करण्यात आलं. आणि संशोधनाचा निष्कर्ष हा ‘PLOS जेनेटिक जर्नल’ मध्ये प्रकाशित करण्यात आला.

यासंदर्भात झालेला हा अभ्यास हा खूप मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच करण्यात आला. यासाठी १४००० लोकांना या रिसर्चमध्ये सामील करून घेण्यात आले.

या १४००० लोकांचा DNA तपासण्यात आला आणि प्रत्येकाची त्याच्या वजनानुसार वर्गवारी करण्यात आली. आधीच्या रिसर्चमध्ये काही सदोष जनुक (जीन्स) जाडे पणाला कारणीभूत होते.

 

dna inmarathi

 

आताच्या संशोधनानुसार काही जणांच्या शरीरातील बारीक राहण्यासाठी असलेले जीन्स किंवा लठ्ठपणाचा अभाव असलेले जीन्स यांच्यामुळे ती व्यक्ती बारीक राहते.

या १४००० लोकांपैकी १६२२ लोक हे सडपातळ या गटात मोडणारे होते. तर १९८५ लोक हे अतिलठ्ठ या गटात मोडणारे होते आणि १०४३३ लोक हे नॉर्मल वजनाचे होते.

मानवी DNA हा रेणूंच्या बेस जोड्यांपासून बनलेला असतो. A, C, G, T ही अक्षरे बेस जोड्या बनवतात आणि त्यातूनच अनुवंशिकता पुढच्या पिढीत येत असते.

आपले C हे जीन्स माणसाच्या शरीराचं कार्य कसं चालेल हे ठरवत असतात. तर A ते थोडासा चेंज होतो आणि त्यामुळे माणसांच्या डोळ्यांचा रंग, केसांचा रंग आणि वजनामध्ये फरक असतो.

लोकांना त्यांच्या वजनावरून जज करणं किंवा कोणत्याही कमेंट्स पास करणं, त्यांची खिल्ली उडवणं खूप सोपं असतं. पण सायन्स आपल्याला दाखवून देत आहे की, ह्या किती कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत.

 

belly fat inmarathi

 

आपल्या वजनावर आपण कंट्रोल करणं हे फारसा आपल्या हातात नाही. तुमची जनुकीय स्थिती काय असेल त्यावरच बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.

हे संशोधन करताना त्यांनी माणसांच्या खाण्याच्या सवयी त्यांची एकूण लाईफस्टाईल या सगळ्यांचा विचार केला आहे.

परंतु सडपातळ लोकांनीही जर रोज बर्गर, चिप्स सारखे पदार्थ खाल्ले तर त्यांचीही टेंडन्सी हळूहळू लठ्ठपणाकडे झुकते, हे ही या स्टडी मध्ये दिसून आलं.

 

cancer causing food 1 inmarathi

 

प्रोफेसर फारुकी यांच्या टीमने केलेल्या स्टडी मध्ये सहभागी झालेल्या लोकांचा त्यांच्या वजनानुसार त्यांच्या डीएनएचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की, काहीजणांच्या अनुवांशिक प्रदेशांमध्ये गंभीर लठ्ठपणाचे जीन्स आढळले.

तर काहीजणांच्या DNA मध्ये बारीक असण्याचे जीन्स आढळले. या टीमने काही नवीन अनुवांशिक रुपे शोधून काढली आहेत.

लठ्ठपणाला आणि बारीक राहण्याला कारणीभूत असणारी अनुवंशिकता यांचा अभ्यास केल्यावर कोणते जीन्स माणसासाठी जास्त घातक आहेत, हे तपासण्यात आलं,

आणि त्यानुसार लठ्ठ असणाऱ्या लोकांना नॉर्मल लोकांपेक्षा धोका जास्त आहे हे लक्षात आलं. तर सगळ्यात कमी धोका हा सडपातळ असणाऱ्या लोकांना होता.

पण म्हणून सडपातळ असणाऱ्या लोकांनी एक्सरसाइज न करणे, डायट न पाळणे योग्य आहे का तर त्याचे उत्तरही नाही असंच आहे.

जरी तुम्ही सडपातळ असला तरी तुमच्या शरीराला व्यायामाची गरज ही असतेच. तसेच हेल्दी डायट खाणं केव्हाही चांगलेच. हा अभ्यास केवळ जीन्स कशाकशासाठी कारणीभूत आहेत हे पाहण्यासाठी करण्यात आला होता.

 

veg diet inmarathi

 

त्यापुढे वजनाचा विचार करताना, कोणत्याही फास्ट फूड चेन मध्ये खायला जाताना लक्षात असू देत की, आपल्या शरीराला हेल्दी डायट आणि एक्सरसाइजची नितांत गरज आहे.

तुम्ही तुमची लाइफस्टाइल कशी ठेवणार आहात हे देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे. काहीजणांना जेवणात इंटरेस्ट नसतो तरी ती लोकं जाड असतात, तर काही जण आवडीने खातात तरी बारीक असतात.

याला फक्त त्यांचे जीन्सच कारणीभूत आहेत. म्हणूनच हे जीन्स कोणते आहेत हे जर कळलं तर पुढे वजन कमी करण्याच्या पद्धतीमध्ये त्यांचा वापर करण्यात येईल.

आणि पुढचे डायट प्लान हे त्यांना विचारात घेऊन केले जातील. ज्यांच्याकडे असे जीन्स नसतील, त्यांना नक्कीच याचा फायदा होईल.

===

हे ही वाचा – वजन कमी करण्यासाठी हे पदार्थ खाताय? मग त्यांचे विपरीत परिणाम होणार नाहीत याची खात्री करून घ्या !

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?