‘करोना व्हायरस’मुळे चिंतित आहात? या आहेत १३ चुकीच्या समजुती
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
सध्या संपूर्ण जगाला करोना व्हायरसच्या चिंतेने ग्रासले आहे. WHO ने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. जगातल्या जवळजवळ सर्वच राष्ट्रांमध्ये करोना व्हायरस बद्दल हायअलर्ट लागला आहे.
करोना व्हायरस जगाला माहीत होऊन आज दोन महिने झाले. चीनमध्ये हा व्हायरस आला, त्यानंतर तिकडे लोक आजारी पडायला लागले त्यात अनेकांचा मृत्यू झाला.
ह्या व्हायरसने ग्रस्त लोक सगळ्या देशांमध्ये दिसून येत आहेत. सर्व देशांमधील व्यापार जवळजवळ ठप्प झाल्यागत परिस्थिती निर्माण झाली आहे.
सगळ्यात देशांमधील शेअर मार्केटवर याचे पडसाद उमटले आहेत. सगळीकडे शेअर मार्केट कोसळले आहे आणि त्यामुळेच ह्या आजाराबद्दल लोकांमध्ये भीती वाढत आहे.
या भीती बरोबरच लोकांच्या मनात अनेक शंका-कुशंका येत आहेत त्यासोबतच काही गैरसमजही पसरताना दिसत आहेत.
ते गैरसमज कोणते हे जाणून घेऊ…
कोलंबिया युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर स्टीफन मोर्से आणि सायरा मदाद (सिनियर डायरेक्टर ऑफ न्यूयॉर्क सिटी हेल्थ हॉस्पिटल) या दोघांनी करोना व्हायरसबद्दल असलेल्या गैरसमजावर प्रकाश टाकला आहे.
करोना व्हायरस झालेला प्रत्येक जण मृत्यू पावतो
हा एक सगळ्यात मोठा गैरसमज आहे. खरंतर हा एक इन्फेक्शनचा प्रकार आहे. ज्यांना हा आजार होतो त्यापैकी फक्त काही लोकंंच सिरीयस कंडिशन मध्ये जातात.
आत्तापर्यंतच्या रेकॉर्ड नुसार फक्त दोन टक्के लोक हे या आजारामुळे मृत्यू पावले. याचं कारण म्हणजे त्यांना आधीच काही आजार होते किंवा प्रतिकार शक्ती कमी होती.
फक्त चिनी लोकांनाच करोना व्हायरस होतो.
करोना हा व्हायरस चीनमधून आल्यामुळे लोकांची अशी समजूत आहे की, हा आजार फक्त चिनी लोकांनाच होतो. व्हायरस हा एका विशिष्ट देशातले लोक बघून होत नाही तर तो कोणालाही होऊ शकतो.
आजारासाठी कुठल्याही देशाच्या सीमा ठरलेल्या नाहीत. साधारण फ्लू झालेल्या लोकांना पण हा व्हायरस होऊ शकतो.
करोना व्हायरस हा सगळ्यात घातक व्हायरस आहे.
हाही सगळ्यात मोठा गैरसमज आहे. करोना पेक्षाही भयानक व्हायरस जगामध्ये अस्तित्वात आहेत किंवा होऊन गेले आहेत. या आधी आलेला इबोला व्हायरस हा जास्त घातक होता.
त्याचा संसर्ग होण्याचा वेग अधिक होता आणि माणसावर गंभीर परिणाम करण्याचा वेगही जास्त होता.
मास्क घालून फिरल्यामुळे मला हा आजार होणार नाही.
लोकांना वाटतं की, मी मास्क घालून फिरलो तर मला ह्या व्हायरसचा त्रास होणार नाही. मात्र ही पण चुकीची समजूत आहे. फक्त मास्क घालून फिरल्यामुळे तुमचा व्हायरसपासून बचाव होऊ शकणार नाही.
एक तर लोकांना मास्क कसा घालायचा ह्याचं काही ट्रेनिंग नाहीये. ते चुकीच्या पद्धतीने मास्क घालतात. बाजारामध्ये दोन प्रकारचे मास्क मिळतात.
एक असतो तो साधारण सर्जिकल मास्क जो बरेच लोक वापरताना दिसतात आणि दुसरा आहे तो N95 मास्क. जो डॉक्टर आणि हेल्थ वर्कर वापरतात.
हा पूर्णतः सायंटिफिक मास्क असून यातून कुठलीही हवा ९५% फिल्टर करून येते. हा मास्क सुरक्षित समजला जातो. लोकांना हा मास्क घालायचा असतो. मात्र तो घातल्यानंतर थोड्यावेळाने अनकम्फर्टेबल फिलिंग येतं.
करोना व्हायरसपासून वाचायचं असेल तर आपले हात नेहमी स्वच्छ धुतले पाहिजेत. जर आजारी असाल तर घरीच राहून औषधोपचार घेतले पाहिजेत.
वटवाघळाचं सूप प्यायल्यामुळे करोना व्हायरस हा आजार होतो.
ही पण एक चुकीची समजूत आहे. मान्य आहे की, करोना व्हायरस हा चीनमधल्या वूहान प्रांतातून आला आणि त्यासाठी तिथल्या मासळीबाजाराला जबाबदार धरण्यात आलं.
त्याबद्दल बऱ्याच अफवा उठवल्या त्यातली ही एक. करोना हा आजार माणसाच्या श्वासनलिकेशी निगडित आहे.
करोना हा आजार खरंतर शिंकल्यावर, खोकल्यावर उडणाऱ्या शिंतोड्यामधून पसरतो. करोना झालेल्या माणसाच्या संपर्कात जो माणूस येतो त्यालाही हा आजार होतो.
चीन मधून आलेल्या कुठल्याही पॅकेट मधून हा आजार पसरतो
ही अफवा पसरणे म्हणजे दुर्दैवच आहे. कारण कुठलंही पॅकेट येण्यासाठी त्यात बराच काळ जातो आणि इतका वेळ हे विषाणू जिवंत राहू शकत नाहीत.
एखाद्या देशाच्या किंवा गावच्या सीमा बंद केल्या म्हणजे हा व्हायरस येणार नाही.
ही पण एक चुकीची समजूत आहे कारण, सीमा बंद करून काहीच उपयोग होणार नाही. हा माणसाकडून हवेतून पसरत जाणारा व्हायरस आहे. यासाठी कुठल्याही सरकारला जबाबदार धरता येणार नाही.
वाहतूक आणि पर्यटन बंद केलं तर हा व्हायरस होणार नाही हे पण चुकीची समजूत आहे. त्यामुळे उलट लोकांच्या मनात अजून शंका निर्माण होतील आणि गोंधळ वाढेल.
आताही जर पाहिलं तर चीन सरकारने वुहानमधली वाहतूक बंद केली आहे. पण या व्हायरसचा प्रसार जगभर व्हायचा तो झालाच आहे.
त्यामुळे प्रवास करताना आपण कुठे जाणार आहोत किंवा कुठून आलो आहोत याची माहिती तिथल्या सरकारला देणे आणि पर्यायी मेडिकल सुविधांचा वापर करणे, काळजी घेणे हेच जास्त योग्य आहे.
हा व्हायरस हा शक्यतो वृद्ध लोकांना होतो.
ही पण या चुकीची समजूत आहे कारण हा आजार म्हाताऱ्या लोकांबरोबरच मुलांना देखील होतो होऊ शकतो.
फक्त इतकंच आहे की वृद्ध लोक हे आधीपासूनच कुठल्यातरी आजाराने ग्रासलेले असतात त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते आणि हा आजार होण्याची शक्यता अधिक असते.
करोना व्हायरस हा सार्सचाच एक प्रकार आहे.
करोना व्हायरस हा सार्स फॅमिली मधलाच पुढचा प्रकार आहे. आतापर्यंत सार्सचे दोन प्रकार येऊन गेलेत हा तिसरा म्हणता येईल.
परंतु करोना व्हायरसची जर तुलना केली तर सार्स हा जास्त गंभीर आजार होता.
करोना व्हायरसचा करोना बियरशी संबंध आहे.
करोना व्हायरस बद्दलची ही एक सगळ्यात विनोदी अफवा आहे. कारण करोना बियर ही करोना व्हायरसला थांबवत नाही किंवा करोना व्हायरस या बियर मुळे होत नाही.
यात फक्त नावाचं साधर्म्य आहे.
पाळीव प्राण्यांमुळे करोना व्हायरस होऊ शकतो.
प्राण्यांमुळे करोना व्हायरस होतो हे अजून सिद्ध झालेलं नाही. आजपर्यंत अशी कोणतीही केस समोर आलेली नाही की, तुम्ही पाळलेल्या प्राण्यांमुळे करोना व्हायरस झालाय.
माणसांमुळे प्राण्यांना झालाय का हे ही अजून माहिती नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्यांची योग्य काळजी घ्या.
करोना व्हायरस हा मुद्दाम तयार करण्यात आला आणि तो प्रसारित करण्यात आला
आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर गेल्या तीन दशकांमध्ये तीन प्रकारचे सार्स व्हायरस आलेले आपल्याला पाहायला मिळतील. त्यातलाच एक म्हणजे करोना व्हायरस. यात काही तरी खूप वेगळं आहे असं अजिबात नाहीये.
संसर्गजन्य आजार व्हायला बरेच फॅक्टर्स कारणीभूत असतात.
अँटिबायोटिक्स मुळे या आजारावर प्रतिबंध घालता येईल.
मुळात व्हायरस आणि बॅक्टेरिया यामध्ये फरक आहे. बॅक्टेरियावर अँटिबायोटिक्स चालू शकतात. मात्र व्हायरस वर अँटिव्हायरल औषध काम करतात.
म्हणून अँटिबायोटिक्स चा करोना व्हायरस ला काही उपयोग नाही आणि अजूनही काही औषधांवर संशोधन सुरु आहे, अजून काही संशोधन प्राथमिक अवस्थेत आहे.
म्हणूनच करोना व्हायरस बद्दल अनेक चुकीच्या गोष्टी पसरताना आपल्याला दिसत आहेत. अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता आपल्या मेडिकल कन्सल्टंट किंवा डॉक्टर यांचा सल्ला घ्यावा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.