' गुगलपेक्षाही एका वर्षाने सिनियर असलेल्या ‘नेटफ्लिक्स’ बद्दलच्या या गोष्टी वाचून तुम्हीही थक्क व्हाल – InMarathi

गुगलपेक्षाही एका वर्षाने सिनियर असलेल्या ‘नेटफ्लिक्स’ बद्दलच्या या गोष्टी वाचून तुम्हीही थक्क व्हाल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

‘एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट’ हा चित्रपटातील संवाद बराच गाजला. एंटरटेनमेंट म्हणजेच मनोरंजन हे आपल्या आयुष्यात फार महत्वाचं असं विरंगुळ्याचं साधन आहे.

पूर्वापार मनोरंजनात्मक अनेक गोष्टी चालत आल्या आहेत. अगदी राजे -महाराजे ह्यांच्या काळात राजगायक राजनर्तकी वगैरे मंडळी आपली कला सादर करून मनोरंजनाचेच काम करायचे. त्यानंतर अनेक जाहीर कार्यक्रम वगैरे गोष्टी होऊ लागल्या.

हळू हळू आपल्याकडे रुजला तो म्हणजे ‘चल चित्रपट ‘ म्हणजेच आजचा ‘सिनेमा ‘. दादासाहेब फाळक्यांच्या कृपेने आपल्याला सिनेमाचं वरदान मिळालंय.

 

dadasaheb phalake inmarathi
patrika

 

१९१३ साली ‘राजा हरिश्चंद्र’ ह्या मूकपटाने भारतातील सिनेसृष्टीचा श्रीगणेशा झाला. हळू हळू ते एक महत्वाचं मनोरंजनाचं साधन होऊ लागलं. अनेकांची करिअर्स ह्या नव्या साधनांमुळे उभी राहिली.

 

raja harishchandra inmarathi
india today

 

पूर्वी दर रविवारी सह्याद्रीवर प्रसारित होणारा सिनेमा सर्वच आतुरतेने पाहायचे. क्वचित चित्रपटगृहात जाऊन तर नंतर हळूहळू dvd आणून घरबसल्या सिनेमा बघता येऊ लागला.

नेहमी काही DVD /CD विकत घेणं शक्य नव्हतं म्हणूनच भाड्याने घेणं सुरु झालं. आजच्या घडीला मात्र चित्रपट बघणं फारसं कठीण राहिलेलं नाही. सर्वत्र पसरलेलं थिएटरचं जाळं, tv तसेच इंटरनेट ह्या मध्यमांमुळे आता ते अतिशय सोयीस्कर झालंय.

हल्लीची पिढी ‘इडियट बॉक्स ‘ च्या अपडेटेड व्हर्जन म्हणजेच स्मार्ट tv वर काहीतरी बघण्यात गुंतलेली दिसून येतेय. काय बघतात बरं ही आजची मंडळी?

 

netflix-inmarathi

 

त्या संध्याकाळी ठराविक वेळेला लागणाऱ्या सिरिअल्स ऐवजी काहीतरी वेगळं नक्कीच सुरु असतं. काय भानगड आहे बरं ही? खरंतर ही काही भानगड नाहीए. आजकालची बरीच जणं ‘नेटफ्लिक्स’ वापरताना दिसून येतात.

नेटफ्लिक्स हे असं मध्यम आहे ज्यावर विविध विषयांवरील चित्रपट, डॉक्युमेंटरी, वेब सिरीज बघता येतात.

तर मित्रांनो गूगलपेक्षाही सीनियर असलेल्या ह्या नेटफ्लिक्सविषयी काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.

 

१. नेटफ्लिक्समागचं कारण :

 

netflix inmarathi 1
the news times

 

एखादी नवीन गोष्ट सुरु करण्यामागे त्या निर्मात्याचा काहीतरी विचार असतो, एखादं कारण असतं.

१९९७ मध्ये नेटफ्लिक्सच्या CEO ला ‘अपोलो १३’ ह्या चित्रपटाची व्हिडीओ सीडी परत करायला उशीर झाल्याने ४० डॉलर इतका दंड भरावा लागला. म्हणून नेटफ्लिक्सच्या उदयासाठीची ठिणगी पेटली.

२. गूगल चा दादा :

 

Google Search.Inmarathi
quicknewstamil.com

 

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण नेटफ्लिक्स हे १९९७ साली सबस्क्रिप्शन साठी खुलं झालं तर गुगलची स्थापना १९९८ साली झाली. म्हणूनच नेटफ्लिक्सला गुगलचा दादा म्हणायला हरकत नाही.

३. नेटफ्लिक्सला नकार :

 

netflix inmarathi 2

 

२००० साली ‘blockbuster’ ह्या व्हिडिओ cd भाडेतत्वावर देणाऱ्या कंपनीला नेटफ्लिक्स ने ५०मिलियन डॉलरची ऑफर दिली होती जी त्यांनी चक्क धुडकावून लावली.

आता मात्र ती कंपनी बंद पडली असून नेटफ्लिक्स अजूनही यशस्वीरित्या मोठ्या दिमाखात सुरु आहे.

नेटफ्लिक्सचं सध्याचं मूल्य २० बिलियन डॉलर इतकं आहे.

४. विस्तार :

१९० देशांमध्ये नेटफ्लिक्सची सेवा उपलब्ध आहे. नेटफ्लिक्सचं एकूण उत्पन्न २०.१५६ बिलियन डॉलर इतकं आहे.

नेटफ्लिक्सचे जगभरात तब्बल १६७ मिलियन स्बस्क्रायबर्स असून US मध्ये ६० मिलियन आहेत .

५. binge वॉचिंग :

 

netflix inmarathi 3
tech.co

 

६०% नेटफ्लिक्सचे युजर्स दर आठवड्याला नेटफ्लिक्स वर तासंतास एखादी सिरीज बघण्यात व्यस्त असतात. अनेकदा एखादी वेब सिरीज १-२ दिवस सलग बघून संपवली जाते.

६. kibbel :

 

netflix-logo-inmarathi
marketwatch.com

 

कंपनीचं नाव ठरण्याआधी Directpix.com, Replay.com, Luna.com ह्या नावांचा विचार सुरु होता. लुना हे तर अगदी Randolph च्या कुत्र्याचं नाव होतं.

नेटफ्लिक्स नावापूर्वी काही काळ kibble.com हे नाव वापरण्यात आलं होतं.

७. २ मिनिट सिलेक्शन :

 

netflix inmarathi 9
insider

 

२ मिनिटात तयार होणाऱ्या मॅगी प्रमाणे नेटफ्लिक्स यूजर ने साधारण २ मिनिटांत आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी सिलेक्ट कराव्या असं नेटफ्लिक्स ला वाटतं.

आणि म्हणूनच त्यांच्या आवडीनुसार काही गोष्टी नेटफ्लिक्स कडून स्वतः सुचवल्या जातात. ह्यासाठीही नेटफ्लिक्स बराच पैसा खर्च करते.

८. netflix original :

 

netflix inmarathi 4
whats on netflix

 

नेटफ्लिक्सवर फ्रेम रेट आणि व्हिडीओ सेवा नीट सुरु आहे की नाही हे तपासण्यासाठी नेटफ्लिक्सने ११ मिनिटांचा एक छोटा व्हिडीओ अपलोड केला होता.

आजही ‘example शो ‘ सर्च केल्यास नेटफ्लिक्सच्या US व्हर्जन मध्ये तो बघावयास मिळेल.

९. गडबड-गोंधळ :

 

 

नेटफ्लिक्स अत्याधुनिक असलं तरीही २०१४ मध्ये त्यात एक गडबड झाली होती. ‘content description’ हे एकाचं दुसऱ्याला किंवा कोणतीही २ वेगळी descriptions मिळून एखाद्या मूवी खाली दिसत होते.

अर्थात नेटफ्लिक्सने ही तांत्रिक अडचण पटकन सोडवली मात्र तिथपर्यंत त्याचे स्क्रीनशॉट वाऱ्यासारखे पसरले होते आणि ही फजिती सर्वांसमोर आली होती.

१०. टेस्ला :

 

netflix inmarathi 5
teslarati.com

 

टेस्ला गाडी तर सर्वांच्याच परिचयाची आहे. टेस्ला मध्ये लवकरच नेटफ्लिक्स आणि युट्युब बघता येईल अशी घोषणा करण्यात अली आहे.

मात्र कार पार्क असतानाच ह्या सोयीचा लाभ ग्राहकांना घेता येणार असून नव्या मॉडेल्स मध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

११. ऑस्कर :

 

netflix inmarathi 6
al arabiya

 

नेटफ्लिक्स ने २०११ साली असलेलं इजिप्तचं रेव्होल्यूशन दाखवणारी ‘द स्क्वेअर’ ही डॉक्युमेंटरी प्रसारित केली होती.

त्याकरिता २०१३ मध्ये नेटफ्लिक्स ला ऑस्कर ह्या मानाच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.

१२. पुरस्कार :

 

netflix inmarathi 7
business insider

 

आजकाल अनेक पुरस्कार सोहोळे आपल्याला बघायला मिळतात. नेटफ्लिक्सचाही स्वतःचा असा ‘the flixies’ नावाचा पुरस्कार सोहोळा आहे ज्यात अनेकांना पुरस्कृत करून गौरवण्यात येतं.

प्रेक्षकपसंतीनुसारही काही पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

खरंतर नेटफ्लिक्सचा हा फ्लॅटफॉर्म खूपच छान आहे असं म्हणता येईल. घर बसल्या आपण अनेक भाषेतील साहित्य बघू शकतो.

सासू सुनांचे वाद, त्याच त्याच प्रेमकथा आणि खाष्ट  माणसं असलेलं रटाळ मालिकांचं चक्र बाजूला सारून आपण त्यापलीकडचं काहीतरी वेगळं पाहू शकतो.

त्यानिमित्ताने आपलं स्वतःचंच कलाविश्वातलं ज्ञान वाढू शकतं. काहीतरी वेगळं बघितल्याचा आनंद नक्कीच उपभोगता येतो आणि रुटीनमुळे आलेला शीण नाहीसा होऊन बरं वाटतं.

 

netflix inmarathi

 

‘नेटफ्लिक्स किड्स’ मध्ये लहान मुलांना आवडेल अशा गोष्टीही तुम्ही त्यांच्याबरोबर बघू शकता. नेटफ्लिक्स बघायला कोणतंही वयाचं बंधन नाहीये. सर्व वयोगटाला रुचेल असा समर्पक कॉन्टेन्ट त्यावर पाहायला मिळतो.

त्यामुळे जर तुम्हाला आवडणार असेल तर जरूर हे मनोरंजनाचं ट्रेंडी साधन, त्यातला मनोरंजनाचा खजिना हुडकून बघा.

कारण आपल्यालाही हवी असते ती म्हणजे ”एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट’ आणि ‘नेटफ्लिक्स’ ही नक्कीच एंटरटेनमेंट आहे .

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?