' फाळणीच्या निर्वासितांची कत्तल – डाव्या सरकारच्या क्रौर्याचा इतिहास – InMarathi

फाळणीच्या निर्वासितांची कत्तल – डाव्या सरकारच्या क्रौर्याचा इतिहास

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

३१ जानेवारी रोजी, मानवतेला काळिमा फासणाऱ्या एका दुःखद घटनेला ३८ वर्ष झाली. बहुतांश भारतीयांना, विशेषतः मराठी माणसाला त्या घटनेची माहिती नाही. हा इतिहास आपणास माहित असावा म्हणून हा खास लेख.

===

विभाजनाच्या कधीही न पुसता येणाऱ्या गंभीर आणि खोल जखमांसहित, लाखो लोकांच्या कत्तली आणि अमानवी अत्याचार यांच्या पार्शवभूमीवर १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला. लोकांचे थवेच्या-थवे रोज इकडून तिकडे जात-येत होते.

 

partition india inmarathi
फाळणीचं क्षणचित्र

भारतात येणारे लोक जे सुखवस्तू होते, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या रहीवासाची, उपजिवीकेची काही-ना-काही सोय केली होती. पण स्थलांतरीत होणाऱ्या गरीब जनतेकडे राहायचे कुठे आणी खायचे काय असे प्रश्न होते…जे त्या वेळच्या सरकारने काही अंशी सोडवले.

तेव्हाच्या पुर्व पाकीस्तानातून (आताचा बांग्लादेश) आलेल्या जवळपास दीडलाख लोकांना सरकारने दंडकारण्यात वसवले.

विरोधी पक्षनेते दिवंगत ज्योती बसु यांनी  सरकारला सांगीतले कि या निर्वासितांना पश्चिम बंगाल मध्ये सहज वसवता येईल. विरोधी पक्ष या अधिकाराने डाव्या आघाडीने दंडकारण्यातील निर्वासीतांना पश्चिम बंगालातील सुंदरबन येथे वसवण्याची मागणी केली.

१९७७ मध्ये पश्चिम बंगालात डावी आघाडी सत्तेत आली.

Minister of State Home (Civil Defense) Department मंत्री राम चटर्जी यांनी दंडकारण्यातील निर्वासीतांना भेट दिली आणि लोकांना स्वगृही म्हणजे पश्चिम बंगालात येण्यासाठी प्रोत्साहीत केले. (मंत्री राम चटर्जी – हे १९५० चंदानगर, हुगळी येथील कम्युनल दंग्यात संबंधीत होते. नंतर ते “विचारधारेत” येऊन पवित्र वगैरे झाले.)

सत्तेत आल्या नंतर , १९७८ ला डाव्या सरकारने आपला स्टँड बदलला आणि हे निर्वासीत राज्यावर बोजा ठरतील असं सांगीतलं गेलं.
दीड लाख लोकांपैकी जवळपास ४०,००० लोक सुंदरबनातील मरीचझापी बेटावर राहू लागले.

marichijhappi sundarban map marathipizza

स्रोत

सुंदरबन संरक्षित क्षेत्रात येत होतं…आणि आजही येतं…

खरंतर याच सरकारातील लोकांनी निर्वासीतांना इथे आणलं होतं…पण नुकत्याच सत्तेत आलेल्या डाव्यांच्या राज्य सरकारला निर्वासीतांचं इथे रहाणं बेकायदेशीर आणि गैरसोईचं वाटलं.

२४ जानेवारी १९७९ ला पश्चिम बंगाल सरकारने प्रतिबंधक कारवाई सुरु केली. आर्थीक नाकेबंदी, जमावबंदी, माध्यमांना प्रवेश निषिद्ध अशा कित्येक जाचक अटी घातल्या गेल्या.

पोलीसांच्या गस्ती बोटी हे पहात होत्या कि कुणी या लोकांना पिण्याचं पाणी, जेवण किंवा औषध तर देत नाही ना…!

वाघ आणी इतर वन्य पशु-पक्ष्यांसाठी प्रसिद्ध सुंदरबन सारख्या खाडीच्या प्रदेशात, लहानसहान कीटक, मच्छर आणी खार-दूषीत पाणी यांच्या प्रादुर्भावाने लोकं आजरी पडले नसतील तरच नवल. त्यातही उपचारांसाठी डॉक्टरना तिथे जाण्यास बंदी होती.

 

marichijhappi incident 01 marathipizza

 

३१ जानेवारीला अन्न-पाण्यावाचून त्रस्त लोकांनी पोलीस ठाण्यावर हल्ला केला. पोलीसांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबार केला. Hindustan Times नुसार, या घटनेत जवळपास १००० लोक मरण पावले. काही लोकांच्या मते पोलीस फायरींग, उपासमार आणि जबरदस्तीच evacuation यामुळे काही हजार लोक मेले, जे सिद्ध होऊ शकणार नाही.

उशिरा का होईना पण कलकत्ता उच्च न्यायालयाने जवळपास १५ दिवसांनी सरकारला पाणी पुरवठा, आवश्यक खाद्यान्न आणि जीवनावश्यक औषध पुरवन्याचे आदेश दिले.

marichijhappi incident 02 marathipizza

मे महिन्यात सरकारने या निर्वासितांना बळजबरी तेथून हकलवले. ते करताना वृत्तपत्र, माध्यमे तिथे पोहोचणार नाहीत याची खबरदारी घेतली गेली.

असं सांगीतलं जातं की त्या दिवशी, पोलीसांनी मृत व्यक्तींची पार्थीव नदीत ढकलून दिली, तर काहीजण पोलिसांपासून, सरकारी कारवाई पासून वाचण्याच्या गडबडीत बुडून मेले.

३८ वर्षांपूर्वीचा इतिहास आजही तिथल्या लोकांच्या मनांत घर करून नसेल तर नवल.

राज्य सरकारकडून अन्नान्न दशा केले गेलेले हे लोक बहुतांशी नामशुद्र या समाजाचे होते. म्हणजे मुल-निवासी, आदिवासी वगैरे.

वर्गलढा, समानता, सामंतशाहीचा विरोध, भांडवलशाहीचा विरोध कुणासाठी करायचा तर दबलेल्या, पिचलेल्या, उपेक्षीत समाजासाठी!

– अशी काहीशी विचारसरणी असलेल्या डाव्यांच्या कु-कृत्यांतील हे एक उदाहरण .

जगभरात मानवी हक्क, जीवन मूल्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, माध्यमांची स्वतंत्रता अशा संज्ञेसाठी ultra जागरूक असलेल्या विचारधारेकडुन एका लोकशाही देशात, जिथे जिथे यांची सत्ता आहे अशा राज्यात बरंच काही संदिग्ध झालंय. “जल-जंगल-जमीन-जानवर इसपे हक की लढाई” असं म्हणत संघर्षाची गाणी गाणाऱ्या लोकांची रेकॉर्ड २००२ वरच अडकते.

जागरूक आणि अभ्यासू वाचकांनी पुढील २ लेख नक्की वाचावेत:

Times of India: Wound still raw for Marichjhapi survivors

Hindustantimes : Ghost of Marichjhapi returns to haunt

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?