' राजकीय पक्षांना राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा कसा दिला जातो? – InMarathi

राजकीय पक्षांना राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा कसा दिला जातो?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ताज्या आकडेवारीनुसार सध्या भारतात 7 राष्ट्रीय, 58 प्रादेशिक आणि 1786 registered पक्ष आहेत.

पण एखाद्या पक्षाला राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा कसा दिला जातो ते जाणून घेऊया.

The Election Symbols (Reservation and Allotment) Order,1968 मधील निकषांनुसार राजकीय पक्षांना राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा दिला जातो. हे निकष वेळोवेळी आवश्यकतेनुसार बदलले जातात.

 

Indian-Political-Parties-Logo

 

 

प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी खालील निकषांपैकी एक निकष पूर्ण करावी लागते –

1) विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी 6% मते आणि एकूण जागांपैकी कमीत कमी 2 जागा मिळाल्या पाहिजेत किंवा

2) लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी 6% मते आणि एकूण जागांपैकी कमीत कमी 1 जागा मिळाली पाहिजे किंवा

3) विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाला एकूण जागांपैकी कमीत कमी 3% जागा किंवा कमीत कमी 3 (whichever is more) जागा मिळाल्या पाहिजेत किंवा

4) लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला राज्यातील 25 जागांमागे 1 जागा मिळाली पाहिजे किंवा

5) विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी 8% मते मिळाली पाहिजेत.

राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी खालील निकषांपैकी एक निकष पूर्ण करावी लागते –

1) विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला चार किंवा जास्त राज्यांमध्ये वैध मतांपैकी कमीत कमी 6% मते मिळाली पाहिजेत आणि लोकसभा निवडणुकीत कमीत कमी 4 जागा मिळाल्या पाहिजेत किंवा

2) लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला एकूण जागांपैकी कमीत कमी 2% जागा मिळाल्या पाहिजेत आणि या जागा कमीत कमी 3 राज्यांमधून निवडून आल्या पाहिजेत किंवा

3) त्या पक्षाला कमीत कमी 4 राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला पाहिजे. (पश्चिम बंगाल,त्रिपुरा,मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाल्यामुळे तृणमूल काँग्रेसला नुकताच 7 व्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला गेला आहे.)

 

राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाल्याचे फायदे –

1) राखीव निवडणूक चिन्ह

2) पक्षाच्या कार्यालयासाठी subsidized दरांमध्ये जमीन

3) दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर मोफत प्रक्षेपण

4) निवडणूक आयोगाकडून निवडणूक याद्यांचं मोफत वितरण

सध्याचे 7 राष्ट्रीय पक्ष खालीलप्रमाणे आहेत –

All India Trinamool Congress, Bahujan Samaj Party, Bharatiya Janata Party, Communist Party of India, Communist Party of India (Marxist), Indian National Congress, Nationalist Congress Party

भारतातील राष्ट्रीय, प्रादेशिक आणि इतर registered पक्षांची यादी  – National,State and Registered parties in India

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?