या १५ गोष्टींचे पालन केले तर तुमचं व्यक्तिमत्त्व आत्मविश्वासाने झळाळून निघेल!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
व्यक्तिमत्त्व विकास हा प्रत्येकाने शाळेत शिकलेला पण थोडासा दुर्लक्षित राहिलेला विषय आहे. पण आयुष्यात हाच विषय सर्वात जास्त कामी येतो हे आयुष्यात खूप पुढे आल्यावर लक्षात येतं.
कारण शिक्षण संपल्यावर नोकरी मिळवण्यासाठी त्या विषयामधील मूलभूत शिक्षणासोबतच व्यक्तिमत्त्व विकासच जास्त महत्वाचा असतो हे नोकरी साठी खेटे घालताना समजत जातं.
एखाद्या हुशार माणसापेक्षा छान व्यक्तिमत्व असणारा माणूस लगेचच दिसण्यात येतो.
तरीही प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व प्रभावी असणे ही काळाची गरज आहे आणि आजच्या जागतिकीकरणाच्या काळात तर रुबाबदार व्यक्तिमत्त्व ही एक महत्त्वाची बाब मानली जाते.
चांगले व्यक्तिमत्त्व म्हणजे फक्त चांगले दिसणे नसून आपल्या आचरणातून आणि देहबोलीतून नम्रता दिसणे सुद्धा महत्वाचे आहे.
आपल्या वागण्याबोलण्यात आत्मविश्वास असणे मात्र तरीही कमालीची मृदुता असणे फार गरजेचे आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
आता आपण काही महत्त्वाचे मुद्दे पाहू जे आपल्याला आपले व्यक्तिमत्त्व अजून समृद्ध करायला मदत करतील.
१. लोकांचा आदर करा
कोणताच माणूस १००% बरोबर नसतो मात्र त्या माणसात काही ना काही चांगले गुण नक्कीच असतात. म्हणूनच आपण प्रत्येक माणसाचा आदर करायला शिकणे फार गरजेचे आहे.
प्रत्येक माणसाकडून नवीन गोष्टी शिकून त्या आपल्या अंगी बाणवल्या पाहिजेत.
२. आत्मविश्वास वाढवा
आत्मविश्वास ही आपल्या उत्तम व्यावसायिक आणि व्यावहारिक जीवनाची गुरुकिल्ली आहे.
अति आत्मविश्वास ही जरी वाईट गोष्ट असली तरी आवश्यक तेवढा आत्मविश्वास हा माणसात आलाच पाहिजे. आत्मविश्वास हा कोणत्याही क्षेत्रातील प्रगतीचा पाया आहे.
३. आवडत्या गोष्टी ओळखायला शिका
जी गोष्ट माणसाला जास्त आवडते त्या गोष्टीचा खोलवर अभ्यास करून तो माणूस ती गोष्ट आवडीने आणि अचूक करायला शिकतो.
म्हणूनच स्वतः ला आवडणाऱ्या आणि न आवडणाऱ्या गोष्टी ओळखून आवडत्या गोष्टी शिकण्याचा व त्यात निपुण व्हायचा प्रयत्न करा.
४. स्वतः ची चूक ओळखून दुरुस्त करा
माणूस कधी ना कधी चुकतो. मात्र या चुका दुरुस्त करणे गरजेचे असते.
एखादी चूक एकदा झाल्यावर ती आपल्याकडून परत होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.
५. योग्य लोकांचे मार्गदर्शन मिळणे
माणसाला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर चांगल्या मार्गदर्शनाची गरज असते आणि ते मार्गदर्शन योग्य वेळी मिळणे सुद्धा तितकेच गरजेचे असते.
म्हणूनच आपण योग्य वेळी आपल्या मार्गदर्शकाची निवड करणे गरजेचे आहे तो आपल्याला चांगला मार्ग दाखवू शकेल.
६. ध्येय निश्चित करा
आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे याचा नीट विचार करा आणि त्याप्रमाणे आपले ध्येय निश्चित करा.
त्या ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी ज्या गोष्टी लागतील त्यांची तयारी करा. चुकलात तरीही थांबू नका. प्रयत्न करत रहा.
७. छंद जोपासा
छंद हे एकप्रकारचे मेडिटेशनच आहे. प्रत्येकाने काही ना काही छंद जोपासला पाहिजे ज्यातून आपल्याला आनंद मिळेल.
हाच आनंद आपल्याला व्यक्तिमत्वाला वेगळे वळण देतो यात शंका नाही.
८. Comfort zone च्या बाहेर या
माणसाचा comfort zone त्याच्या प्रगतीला जास्त मारक ठरतो. त्यातून बाहेर आलं तर आपली खरी ताकद आणि आपले गुण आपल्याला आजमावता येतात.
म्हणूनच आपल्या रोजच्या जीवनापेक्षा प्रत्येक माणसाने थोडे दिवस तरी वेगळे जीवन अनुभवून पाहिले पाहिजे.
९. आपले व्यक्तिमत्त्व उठावदार ठेवा
माणसाची पहिली पारख ही त्याच्या पोषाखावरून केली जाते.
जरी प्रत्येक वेळी नवीन आणि महागतले कपडे नसतील तरी माणसाने स्वच्छ आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे असे कपडे परिधान करणे जास्त गरजेचे आहे.
आपल्याला जे कपडे आवडतात ते घाला. इतर लोक काय म्हणतील याचा विचार करू नका.
१०. मन प्रसन्न ठेवणे
आपला चेहरा हा आपल्या मनाचा आरसा असतो आणि म्हणूनच आपले मन प्रसन्न असणे गरजेचे आहे.
ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो त्या गोष्टींपासून लांब राहणे आणि त्याकडे दुर्लक्ष करणे हेच फायद्याचे ठरते.
११. बोलका स्वभाव विकसित करणे
असं म्हणतात की, बोलणाऱ्याची माती सुद्धा खपते पण बोलणाऱ्याचे सोनेही खपत नाही. म्हणूनच आपला स्वभाव बोलका असणे खूप गरजेचे आहे.
बोलक्या स्वभावाचा माणूस कोणाचेही मन आपल्या नुसत्या बोलण्याने सुद्धा जिंकू शकतो.
१२. काळासोबत जगा
काळ कोणासाठी थांबत नाही तो कायमच बदलत असतो आणि म्हणूनच काळाची पावले ओळखून त्याप्रमाणे आपले ज्ञान, विचार यात योग्य तो बदल करून आपण काळासोबत चालले पाहिजे.
१३. स्वतः साठी वेळ राखा
आपला दिनक्रम कितीही व्यस्त असला तरीही स्वतः साठी काहीतरी वेळ काढा. स्वतः चे यश स्वतः सोबत साजरे करा आणि अपयशाच्या वेळी परत नव्याने उभे रहा.
हेच आपल्याला स्वतः मध्ये सुधारणा घडवून आणण्यात मदत करते.
१४. लोकांमध्ये मिसळायला शिका
लोक आपल्याला खूप काही शिकवून जातात. म्हणूनच लोकांमध्ये मिसळणे आणि त्यांच्याकडून विविध गोष्टींचे ज्ञान घेणे ही एक वेगळीच मजा देणारी गोष्ट असते.
१५. स्वतःला स्वीकारणे
सगळे लोक सारखे नसतात. त्यामुळे स्वतः ला आहे तसं स्वीकारून योग्य ते बदल करणे खूप गरजेचे असते. कारण जेव्हा तुम्ही स्वतः च्या प्रेमात पडाल तेव्हाच त्याचा वेगळा आत्मविश्वास तुमच्या चेहऱ्यावर दिसेल.
शेवटी आपले व्यक्तिमत्व हे आपल्या विचारांवर अवलंबून असते आणि आपले विचार चांगले करणे हे आपले ज्ञान, संस्कार आणि आपल्या आजूबाजूची माणसे यावर अवलंबून असतं.
म्हणूनच जेवढे तुमचे विचार जेवढे उच्च, तेवढे तुमचे व्यक्तिमत्त्व झळाळून निघते यात वाद नाही.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.