तुम्हाला माहीत आहे का ‘ट्युबलाईट’चा शोध कसा लागला?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
“मैं पिछले ३०-४० मिनिट से बोल रहा हू।और ये अभी बोल रहे है।लगता है करंट देरी से पोहोच रहा है। चोक वाली ट्युबलाईट का यही प्रॉब्लेम होता है।”
संसदेत आपल्या भाषणा दरम्यान वायनाड चे खासदार राहुल गांधींना उद्देशून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं हे वक्तव्य!
तेव्हा पासून सीएफएल मुळे आपलं अस्तित्व हरवत असलेल्या ट्युबलाईट आणि राहुल गांधींवर एवढे मीम आणि जोक आले की विचारायची सोय नाही.
चोक वाली ट्युबलाईट चालू व्हायला ४-५ सेकंदाचा डिले लागतोच लागतो. म्हणून लवकर कशालाही रिऍक्ट न करणाऱ्या पब्लिकला ट्युबलाईट म्हणून संबोधले जाते.
आणि तीच ट्यूबलाईट जर बंद पडली की एक तर ट्यूब फिरवा नाही तर चोक,चालू होणार म्हणजे होणार.!आता विषय निघालाच आहे तर बघूया या ट्युबलाईट चा शोध लागला कसा ते.
ट्यूबलाईट या फ्ल्यूरोसेन्ट फॅमिलीमधला प्रकार.ज्यांचं मुख्यत्वे काम आहे प्रकाश निर्मितच.
फ्ल्यूरोसेन्ट ट्यूब एक लो प्रेशर मर्क्युरी गॅस डिस्चार्ज दिवा आहे जो दृश्यात्मक प्रकाश निर्मिती साठी फ्ल्युरोसेन्स वापरतो.
गॅसमधील विद्युत प्रवाह मर्क्युरी गॅसला उत्तेजित करते, ज्यामुळे शॉर्ट-वेव्ह अल्ट्राव्हायोलेट लाइट तयार होते ज्यामुळे दिवाच्या आतून फॉस्फर लेप चमकू लागतो.
१९३० च्या दरम्यान या फ्ल्यूरोसेन्ट दिव्यांचा व्यावसायिक दृष्ट्या निर्मिती झाली पण याचा मुख्यत्वे शोध हा १८व्या शतकाच्या मध्यात लागला.
जर्मन शास्त्रज्ञ हेन्रीक गिझलर यांनी १८५६ च्या दरम्यान आर्क ट्युबचा अभ्यास केलेला. त्यांचा जीसलर ट्यूब हा डिस्चार्ज ट्यूबच्या निर्मितीचा पाया होता!
त्याही आधी मायकल फॅराडे आणि जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांनी फ्लोरोसेन्स हा खनिज पदार्थ प्रकाश निर्मिती साठी वापरू शकतो याचा शोध लावलेला.
१९ व्या शतकाच्या सुरुवातीला थॉमस एडिसन याने एक्स रे वर बेस असलेल्या दिव्यांचे पेटंट रजिस्टर केले पण त्याला एवढं काही व्यावसायिक यश आलं नाही.
१९३४ मध्ये प्रसिद्ध जनरल इलेक्ट्रिक कंपनीचे सल्लागार आणि भौतिकशास्त्र तज्ज्ञ आर्थर कॉम्प्टन यांनी यशस्वी रित्या फ्ल्यूरोसेन्ट बल्ब चा प्रयोग करून दाखवला, रिचर्ड थायर आणि जॉर्ज इनमॅन यांनी मग त्या प्रयोगाला यशस्वी रित्या एका मॉडेलचं रूप दिलं.
या मूळ बल्ब वर नंतर हळूहळू रिसर्च होत आजचा हॉट कॅथोड ट्यूब ची निर्मिती झाली.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या फ्ल्यूरोसेन्ट ट्यूबची मागणी भयानक वाढली, त्यामुळे हळूहळू ट्यूब लाईट जगभरात पसरली
आता ही ट्यूब नक्की असते काय न याच काम कसं चालत ते बघूया.
फ्ल्यूरोसेन्ट ट्यूब मध्ये कमी दाबाची पाऱ्याची वाफ भरलेली असते.सोबत नियोन,क्रिप्टॉन,झेनॉन,ऑरगॉन सारखे रिऍक्ट न होणारे प्रकाश निर्माण करणारे इलेमेंट.
ट्यूबचा आतील भाग हा फ्ल्युरोसेन्सने कोट केलेला असतो,ज्याचा मूळ उद्देश हा निर्माण झालेला प्रकाश लांब पर्यंत प्रकाशित करणे.
ट्यूबचे इलेक्ट्रोड हे मुळात टंगस्टन पासून बनवलेले असतात.त्याच मूळ उद्देश इलेक्ट्रॉन उत्सर्जित करणे आहे, टंगस्टन हे ३०००° सेल्सिअस पर्यंत गरम करण्याची कपॅसिटी असल्याने इलेक्ट्रॉन सर्क्युलेशन फास्ट होत.
आणि त्याच्या सोबतीला बेरियम, स्ट्रॉन्टियम आणि कॅल्शियम ऑक्साईडच्या मिश्रणाचा त्यावर लेप केलेला असतो.
ट्यूबलाईट चे ट्यूब सामान्यतः सरळ आणि लांब असतात.१०० मिली मीटर पासून ते हाय आउटपुट प्रकाश निर्मिती साठी २.४३ मीटर म्हणजे जवळपास ८ फूट पर्यंत त्यांची लांबी असते.
काही ठिकाणी वक्राकार आकाराचे ट्यूब सुद्धा पाहायला मिळतात. फ्ल्युरोसेन्ट ट्यूब लाईट हे निगेटिव्ह डिफ्रेंशीएट रेजिस्टन्स डिव्हाईस आहेत! जेवढा रेजिस्टन्स कमी असेल तेवढा जास्त प्रकाशाचा प्रवाह हा फ्लो होऊ शकतो.
ट्यूब लाईट डायरेक्ट सप्लाय ला कनेक्ट केला तर शॉर्ट सर्किट होऊन ट्यूब फुटायची शक्यता असते.हे टाळण्यासाठी रेग्युलेटर प्रमाणे काम करणार बॅलास्ट वापरलं जातं, जे प्रवाहित होणारा विद्युत प्रवाह रेग्युलेट करून ट्यूब लाईट पर्यंत पोहोचवायचं काम करतं.
हेच ते ‘चोक’.
विद्युत प्रवाह रेग्युलेट करण्यासाठी काही सेकंदाचा अवधी लागतो म्हणून ट्यूब लाईट चालू व्हायला थोडा वेळ लागतो. सध्या ट्यूब लाईट ला रिप्लेस करणारे सीएफएल हे सुद्धा ट्यूब लाईटच्याचं धरतीवर काम करत.
कोल्ड कॅथोड फ्ल्यूरोसेन्ट लॅम्प म्हणजेच सीएफएल्स हे ट्यूब लाईट पेक्षा जास्त फास्ट इलेक्ट्रॉन सर्क्युलेट करतात त्यामुळे सामान्य ट्यूब लाईट पेक्षा हे लवकर प्रकाशित होतात.
कोल्ड कॅथोड डिव्हाइस प्रकाश स्रोत म्हणून जन्माला आले नाही.
सीएफएल्स प्रकाश निर्मितीच्या बेस वर काम करत नाही.त्याच्या प्रत्येक एन्ड ला इलेक्ट्रोड असतात जे इलेक्ट्रॉन निर्मितीचे काम करतात आणि ट्यूब मध्ये प्रकाश निर्माण करणारे गॅस भरलेले असतात.
आधीच्या काळात इंटरटेन्मेंट साठी वापरल्या जाणाऱ्या जिजलर ट्यूबचाचं बेसिक इथे वापरलं गेलं आहे.
नंतर याच सिएफएल्स चा वापर हा प्रकाश निर्मिती सोबत अनेक मल्टीपर्पज वापरासाठी केला जाऊ लागला, टीव्हीच्या स्क्रीन,संगणक-लॅपटॉपच्या डिस्प्ले यमांध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा वापर होऊ लागला.
या सीएफएल्स चा जन्म झाला १९७६ मध्ये आणि याचे निर्माते होते एडवर्ड हॅमर.
अफकोर्स आता फ्ल्यूरोसेन्ट ट्यूब लाईट चं पेटंट जनरल इलेक्ट्रिक (जीई) कडे आहे म्हटल्यावर त्यावर संशोधन सुद्धा तेच करणार.
सीएफएल चा पण जन्म पण जीई च्या लॅब मध्ये झाला आणि यात भर घातली ती जॉन अँडरसन यांनी!
यांनी जीई आणि रेन्सिलर इन्स्टिट्यूटच्या मदतीने या ट्यूब लाईट आणि सिएफएल चे १९७० ते १९९२ च्या दरम्यान २७ पेटंट रजिस्टर केले.
ट्यूब लाईट विदाऊट चोक,शॉर्ट आर्क लॅम्प,ट्यूब लाईट मध्ये डिमिंगची (झिरो लॅम्प) सिस्टीम यांनीच डेव्हलप केली.
काही वेळेला आपण ऐकलं असेल की थॉमस एडिसन यांनी निकोलस टेस्ला ची टेक्नॉलॉजी चोरून ट्यूब लाईट ची निर्मिती केली! पण मुळात एडिसन हा इलेक्ट्रिक बल्ब चा निर्माता आणि टेस्ला ने विजेच्या निर्मिती वर संशोधन केले होते.
ट्यूब लाईट निर्मितीमध्ये या दोघांचा तेवढा संबंध नाही.
बाकी हेवे दावे हे होतच असतात! काळाची गरज आणि डेव्हलप होत जाणारी टेक्नॉलॉजीच्या बेसवर या ट्यूब लाईट ची निर्मिती झाली असे आपण म्हणून शकतो.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.