मधुमेह असलेल्या आईने, बाळाला दूध पाजणे कितपत योग्य आहे? वाचा खरे उत्तर!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आईचं दूध हे बाळासाठी सर्वात उपयुक्त गोष्ट असते म्हणून डॉक्टरांचा असा सल्ला असतो की, सुरुवातीचे पाच-सहा महिने फक्त आईचं दूधच बाळाला द्यावं. त्याला वरून कोणताही दुसरा आहार देण्याची गरज नाही.
पण हल्ली बाळाला दूध दिलं तर आपलं सौंदर्य कमी होईल म्हणून काही स्त्रिया स्तनपान करायची टाळाटाळ करतात. आधुनिक सायन्स किंवा जुन्या काही रूढी, परंपरा, उपचार पद्धती यामध्ये हेच सांगितलं आहे की, स्तनपान ही बाळासाठी उपयुक्त गोष्ट आहे.
म्हणूनच नोकरी करणाऱ्या स्त्रियांना देखील व्यवस्थितपणे बाळांना स्तनपान देता यावं म्हणून सरकारनेदेखील सध्या आईची बाळंतपणासाठीची रजा ही वाढवली आहे ती आता एक वर्षापर्यंत मिळू शकते.
आता असं जरी असलं तरी जेव्हा आई आजारी असते तेव्हा बाळाला स्तनपान करणे योग्य आहे की आयोग्य असा प्रश्न पडू शकतो. विशेषतः ज्या नवमाता आहेत त्यांना तर याविषयी मनात खूप शंका-कुशंका असतात. कारण पहिल्यांदा बाळ झाल्यानंतर त्याला काही होऊ नये यासाठी आई प्रयत्न करत असते.
आईचं दूध बाळासाठी योग्य आहे. जरी आई आजारी असली तरी बाळाला दूध पाजताना त्याने कोणतंही नुकसान होणार नाही उलट बाळाची प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी त्याची मदतच होईल.
इतर कुठल्याही आजारापासून रक्षण करण्याची शक्ती आईच्या दुधात जास्त असते. आईच्या दुधाचे गुणधर्म लक्षात घेतले तर त्यात ऑंटीबॅक्टेरियल, अँटिव्हायरल क्षमता असते. आईच्या दुधावर वाढणारे बाळ हे फॉर्मुला फिडवर वाढणाऱ्या बाळापेक्षा अधिक लवकर बरं होतं असाच आज पर्यंतचा अभ्यास आहे.
तरीही आईच्या मनामध्ये शंका येतेच की, आपण आजारी असताना बाळाला स्तनपान करावं का? तर त्याचे उत्तर होय असंच आहे.
जर तुम्हाला साधा खोकला, ताप, सर्दी, पोट बिघडणे असेल, किंवा अगदी स्तनदाह असला तरी तुम्ही बाळाला स्तनपान देऊ शकता.
त्यामुळे बाळाला ह्या आजारांपासून संरक्षण मिळेल… स्तनपान ही बाळासाठी सर्वात उत्कृष्ट गोष्ट असेल.
आई आजारी असताना बाळाला स्तनपान करणे हे आईला थकवा येण्याचे कारण असू शकेल त्यासाठी आईने भरपूर पाणी पिणे, वेळेवर जेवण करणे, आराम करणे आदी गोष्टी मात्र केल्या पाहिजेत.
आराम करायच्या वेळेस बाळाला घेण्यासाठी घरातल्या कुणाची तरी मदत घेतली पाहिजे.
बाळाला स्तनपान मात्र केलं पाहिजे, जेणेकरून स्तनदाह होण्याची शक्यता कमी राहील. जर अचानक स्तनपान थांबवलं तर दूध साठून त्याचा त्रास आईला होऊ शकतो. या छोट्या गोष्टींसाठी स्तनपान करणे थांबवणे योग्य नाही.
स्तनपानाच्या काळात औषध घेणं योग्य आहे की, नाही याबाबत आईच्या मनात शंका असते. तर डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, आयबुप्रोफेन आणि पॅरासिटॅमॉल ही औषध तुम्ही घेऊ शकता. जर पोटातला अल्सर, अस्थमा असेल तर मात्र आयबुप्रोफेन घेऊ नये. एस्परिन मात्र शक्यतो टाळावे.
किंवा अगदी घ्यायचं असेल तर त्याचा थोडासाच डोस घ्या. असं वैद्यकशास्त्रात सांगितलं जातं. स्ट्रॉंग पेनकिलर घेणे थांबवा. काही औषधे असतात की, ज्याच्यामुळे आईचं दूध कमी होऊ शकत. तर औषध घ्यायची की नाही हे मात्र डॉक्टरांना विचारणे आणि घेणे जास्त चांगले.
कारण अकाली प्रसूत झालेल्या (premature baby) आणि कमी वजनाच्या बाळाला अशा औषधांचा त्रास होऊ शकतो.
काहीकाही आजार जसे, मधुमेह (diabaties), अस्थमा, डिप्रेशन आणि आणखीन काही दीर्घकालीन दुखणी जर आईला असतील आणि त्याचे औषधोपचार सुरू असतील तर स्तनपान करावं का नाही असा प्रश्र्न आईला पडतो.
यामध्ये मधुमेहाची भिती सर्वाधिक असते, कारण गरोदरपणात अचानक मधुमेह असल्याचा रिपोर्ट अनक महिलांच्या हाती पडतो. यापुर्वी मधुमेहाची कोणतीही लक्षणे, किंवा पार्श्वभुमी नसतानाही हा धक्का अनेक महिलांना सहन करणे कठीण होते.
अर्थात प्रसुतीदरम्यान उद्भवणारा मधुमेह हा कालांतराने नाहिसा होतो, मात्र या दरम्यान महिलांनी काळजी घेत योग्य पथ्याचे पालन कले नाही तर मात्र टाईप २ अर्थात मधुमेेहाच्या दुस-या प्रकारात मोडणा-या मधुमेहाशी आयुष्यभर झुंज द्यावी लागते.
मात्र असे असतानाही एकीकडे बाळाच्या पोषण आहाराची जबाबदाराही आईवरच असते. आपल्याला मधुमेह असताना बाळाला स्तनपान करावे का? हा प्रश्न अनेक माता विचारतात.
या केसमध्ये पण आईने बाळाला दूध देण्याने फरक पडत नाही. अगदीच rare cases मध्ये आईने बाळाला दूध देऊ नये. किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू ठेवावेत आणि स्तनपान चालू ठेवावे.
कुठल्याही इमर्जन्सी मध्ये आईला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करायची वेळ आली तर स्तनपान करावं का? असाही प्रश्न उद्भवू शकतो, तर या केसमध्ये मूल अगदीच जन्मजात असेल तर हॉस्पिटल्स कडून बाळाची सोय करता येते, ते आईबरोबर बाळाची पण काळजी घेतात.
थोड्या मोठ्या बाळाच्या दूधाची सोय मात्र ,पंपाने आधी दूध काढून रेफ्रिजरेटर मध्ये त्याचा साठा करून ठेवता येते. जेणेकरून बाळाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीला ते बाळाला भरवणे सोपे होते.
अगदी काही दुर्धर आजार जर आईला असतील, ज्यामध्ये कॅन्सर, क्षयरोग किंवा हर्पिस आणि इतर काही complicated आजार असतील तेव्हा मात्र बाळाला स्तनपान करू नये. रेडिओथेरपी, केमोथेरपीचा विपरीत परिणाम बाळावर होऊ शकतो.
क्षयरोग, हर्पिस यासारख्या आजारच संक्रमण आईच्या दुधामधून बाळात होऊ शकतं. म्हणून त्यावेळेस मात्र बाळाला फॉर्मुला फिडवर ठेवाव लागेल. या काळात आईला येणारे दूध हे पंपाने काढून फेकून द्यावं, नाहीतर तिच्या स्तनात दुधाच्या गाठी तयार होऊन आईच्या प्रकृतीला धोका निर्माण होऊ शकतो.
कधीकधी बाळ आजारी असताना स्तनपान करावं की नाही हाही एक प्रश्न असतो. त्यावेळेस तर स्तनपान हेच बाळासाठी सर्वोत्तम औषध असेल. कारण बाळाचे खाणे, पिणे, औषध हे सगळं फक्त आईचं दूध असतं. बाळाला दुसरं काहीही मिळत नाही.
आईच्या दुधातील प्रतिकारशक्ती मुळेच बाळ व्यवस्थित लवकर रिकवर होतं.
कधीकधी बाळ खूप अशक्त असतं किंवा आणखीन काही आजारामुळे त्याला दूध घेणं अवघड होतं, त्यावेळेस पंपाने दूध काढून बाळाला देणे हा एक उपाय करता येतो.
कधी सर्दी मुळे, नाक बंद झाल्यामुळे बाळाला आईच दूध पिताना अडचण येते त्यावेळेस त्याला थोड्या थोड्या वेळाने स्तनपान करणे योग्य.
बाळाचे पोट बिघडले असेल तरी फक्त आईचं दूध त्याच्यासाठी पचायला हलकं आणि योग्य असतं म्हणून स्तनपान केलं पाहिजे. आईच्या दुधामध्ये अँटीबॉडीज, प्रोटिन्स, मिनरल्स याबरोबरच व्हाईट ब्लड सेल, स्टेम सेल्स, जीवनसत्व आणि संरक्षण करणारे इंझाईमस असतात.
म्हणून बाळाला स्तनपान करणे टाळू नये त्यातूनच पुढे तो एक सुदृढ बालक बनतो आणि आयुष्यभर कुठल्याही आजाराचा सामना करण्याची शक्ती त्याच्यामध्ये येते. आई आपल्या बाळाला पूर्ण संरक्षण देऊ इच्छित असते आणि ते ती आपल्या दुधामधूनच त्याला आयुष्यभरासाठी देते.
—
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.